बिर्याणी हेट क्लब

Submitted by VB on 25 December, 2020 - 18:54

पार्टी चा भात म्हणजे बिर्याणी असे कितीतरी जणांचे मत असल्याचे लक्षात आले. माझ्या ओळखीच्या दहा पैकी आठ लोकांना बिर्याणी आवडते. अन म्हणून मला बिर्याणी आवडत नाही म्हणून ते नाकही मुरडतात.
पण खरेच माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना बिर्याणी आवडत नाही. पूर्वी मी कधीतरी खायची बिर्याणी, पण आता बघवतही नाही. तसेही हल्ली चांगली बिर्याणी मिळत सुद्धा नाही आवडायला. बरेचदा तर बिर्याणी च्या नावाखाली भाज्या/चिकन/मटण/कोलंबी नावापुरता घातलेला अन मसाल्याने थबथबलेला भात देतात. तो प्रकार तर अजून भयानक असतो. कदाचित ह्या सगळ्या मुळे असेल पण मला बिर्याणी आता बिलकुल आवडत नाही.
माबोवर पण खाऊगल्लीत बरेचदा बिर्याणी दिसते अन तिची प्रशंसा करणारे पण. म्हणून सहज उत्सुकता म्हणून जाणून घ्यायला आवडेल की माझ्यासारखे अजून कोणी बिर्याणी हेटर्स आहेत का इकडे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रामायणात काय फक्त सीताच नव्हती, बाकी बायका पण होत्या
>>>

पुरुष का नाही म्हटले?
बिर्याणी करणे काय फक्त बायकांचे काम आहे का? रामायणातील पुरुषही करत असतील बिर्याणी

तू आधी नॉनव्हेज असा शब्द नीट लिही मग सांगतो
रामायणात पुरुष नव्हते करत बिर्याणी
याबद्दल तू एक धागा काढू शकतोस
की महाभारतात भीम करू शकत होता तर रामायणात का राम करत नव्हता?
हिंदू संस्कृती अशी पुरुषसत्ताक का
घे धो धो प्रतिसाद
नाही पडले तर तू आहेसच

रामायणाचा आणि हिंदू संस्कृतीचा काय संबंध?
रामायणात वानरही होते ज्यांच्यात हिंदू मुस्लिम असा धर्म नसतो. हि नाटके हे भेदभाव माणसांमध्येच आढळतात..
तसेच आपल्या एका पोस्टमध्ये व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शाहरूखसुद्धा होता.

म्हाळसा, बिर्याणी मस्त दिसते आहे. पण हल्ली ॲल्युमिनीयमची भांडी स्वयंपाक करताना वापरू नये म्हणतात.>> मान्य.. मी पण ॲल्युमिनीयमच्या एकदम अगेंस्ट आहे.. पण ही बिर्याणी मी सासूच्या किचन मधे आणि तीने दिलेल्या राखीव टोपात बनवली होती.. ॲल्युमिनीयम कसं आरोग्यासाठी वाईट हे पटवून द्यायचा प्रयत्न एकदा करून झालाय पण जुन्या बायकांना त्यांची जुनी भांडी सुटत नाहीत

आशुचॅम्प, तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे ? म्हणजे ऋन्मेषची पोस्ट दिसली की तुमचं रक्त वगैरे सळसळायला लागते का? Happy
तुमच्या एक लक्षात येतय का, तुम्ही जितक्या खालच्या लेव्हलला जाऊन वाद घालता तितक्याच पराकोटीच्या शांतपणाने ऋन्मेष उत्तरे देतो. त्यामुळे तुम्ही अ‍ॅक्च्युअली त्याची फॅन संख्या वाढायला अप्रत्यक्षरित्या मदत करत आहात. आपलं एक निरीक्षण नोंदवलं. बाकी तुम्ही सूज्ञ आहातच.

जुन्या बायकांना त्यांची जुनी भांडी सुटत नाहीत>> +१
तुम्ही कुठली भांडी वापरता? >> स्टीलची २ कढई, छोटी-मोठी पातेली आणि लोखंडी कढई, तवा. तसेच पितळेचे छोटे पातेले जे गेल्या भारत वारीत हौसेने घेतले होते. २ नॅानस्टीक पॅन्स. एक नॅानव्हेज पदार्थांसाठी आणि दुसरा डोसे-धिरड्यांसाठी. ते वर्षाला बदलले जाते.

बाकी जाउद्या पण फो.भा वर धागा पायजेच. खरंच कोणतीही बिर्याणी ओवाळून टाकीन मी पण. रुन्मेश, हम तुम्हारे साथ है.

झक्कास बिर्याणी , म्हाळसा .
आमच्याकडेपण खास बिर्याणीसाठी असच ॲल्युमिनीयमचं पातेलं आहे. ३ किलो तांदळाची बिर्यानी आरामात होते त्यात.
पण ते एकच ॲल्युमिनीयमचं भांड आम्ही वापरतो , फक्त दम द्यायला . चिकन शिजवायला वगैरे नाही .
बाकी नॉन -स्टीक आणि स्टील .

तुम्ही जितक्या खालच्या लेव्हलला जाऊन वाद घालता >>>>>

कमाल आहे, यात खालच्या पातळीवर जाऊन कुठला वाद घातला मी?

हा धागा म्हणजे मायबोलीचा एक व्हॉट्सऍप ग्रुप झालाय.
इकडे तिकडे काही लिहायला सुचलं नाही की इकडे येऊन टाकली एक पोस्ट.
जशी मी टाकतोय आता.

बिर्याणीचे लाडच फार. हेच भांडं पाहिजे, तोच मसाला पाहिजे.
इतके लाड फो.भा. च्या वाट्याला कधीच येत नाही.

इतके लाड फो.भा. च्या वाट्याला कधीच येत नाही.>>> तिथे फक्त प्रेम! Happy फो भा कसा का असेना फारच आवडतो. मी तर आईला डब्यात रोज फोभा दे असे सांगायचे. माझी भाची ही तशीच.

रात्री मुद्दाम जास्त भात कुकरला लाऊन फोभा करणारे लोक कुटुंबात आहेत. मी विकतच्या भारतीय जेवणासोबत आलेला भात फो.भा. करते. केचपसोबत फो. भा. खाते. सगळे तु.क. देतात.

मेधावि Lol
एक मामेभाऊ दाण्याच्या चटणीसोबत फो.भा. खातो. वरून भुरभुरून...

Pages