बिर्याणी हेट क्लब

Submitted by VB on 25 December, 2020 - 18:54

पार्टी चा भात म्हणजे बिर्याणी असे कितीतरी जणांचे मत असल्याचे लक्षात आले. माझ्या ओळखीच्या दहा पैकी आठ लोकांना बिर्याणी आवडते. अन म्हणून मला बिर्याणी आवडत नाही म्हणून ते नाकही मुरडतात.
पण खरेच माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना बिर्याणी आवडत नाही. पूर्वी मी कधीतरी खायची बिर्याणी, पण आता बघवतही नाही. तसेही हल्ली चांगली बिर्याणी मिळत सुद्धा नाही आवडायला. बरेचदा तर बिर्याणी च्या नावाखाली भाज्या/चिकन/मटण/कोलंबी नावापुरता घातलेला अन मसाल्याने थबथबलेला भात देतात. तो प्रकार तर अजून भयानक असतो. कदाचित ह्या सगळ्या मुळे असेल पण मला बिर्याणी आता बिलकुल आवडत नाही.
माबोवर पण खाऊगल्लीत बरेचदा बिर्याणी दिसते अन तिची प्रशंसा करणारे पण. म्हणून सहज उत्सुकता म्हणून जाणून घ्यायला आवडेल की माझ्यासारखे अजून कोणी बिर्याणी हेटर्स आहेत का इकडे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्थात त्याचा उद्देश जाहिरातबाजी नसल्यास. >>> जाहिरातबाजी हा उद्देश नाहीच आहे फक्त मला रेसिपी शेअर करायची होती. आणि आधी फक्त युट्युबच्या लिंक शेअर केल्या गेल्यात. म्हणून विचारलं. Happy

ते शरूख, सई आणि स्वप्नील ची जाहिरातबाजी चालते मायबोली वर
बिर्याणी तर निदान सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे
बिनधास्तपणे टाका

>>> अक्खा ट्रे 6 मध्ये?? प्लेन राईस ट्रे देखील 6 ला दिला तर परवडणार नाही.. कोणते शहर आहे हे??
मी जिथे राहतो तिथे व्हेज बिर्याणी $11 ला मिळते.. ट्रे म्हणजे 35 ला..>>>
च्रप्स, छोटा अल्युमिनिअम ट्रे. केक/पास्ता वगैरे बेक करुन मिळतो तो. २ जणांचा असतो तो. कंटेनर म्हणायला हव होत.
तुम्ही Irving मध्येच आहात ना?

ते शरूख, सई आणि स्वप्नील ची जाहिरातबाजी चालते मायबोली वर
बिर्याणी तर निदान सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे
बिनधास्तपणे टाका
>>>>

बिर्याणेपेक्षा जास्त फॅन शाहरूखचे आहेत.
शाहरूखच्या धाग्यावर कधी बिर्याणीचा विषय आला नसेल पण बिर्याणीच्या धाग्यावर तुम्हाला शाहरूखचा मोह करायचा उल्लेख आवरला नाही Happy

शी शी शारुख चा मोह
आयुष्यात अनेक वाईट कामं केली असतील पण इतके वाईट दिवस नाही आले की शरूखचा मोह करावा

बिर्याणेपेक्षा जास्त फॅन शाहरूखचे आहेत.
>>>> बिर्याणी चे चाहते रामायण काळापासून आहेत
शरूख तेव्हा वानर रुपात असल्यास माहिती नाही

शरूख तेव्हा वानर रुपात असल्यास माहिती नाही
>>>

असू शकतो. बॉलीवूडचा देव आहे तो.

बिर्याणीचे चाहते तेव्हा असल्याचा संदर्भ द्या

मायबोलीवरच आहेत, शोध घेतलास तर सापडेल
त्या निमित्ताने इथं अभ्यासू आणि माहितीपूर्ण लेखन देखील होतं हे कळेल

बॉलिवूडच्या देवाला शेपूट आहे का अजून?
तपासून एकदा सांगणार का?

मायबोलीवरच आहेत, शोध घेतलास तर सापडेल
>>>
मायबोली हे काही प्रमाण झाले नाही. रमायणात बिर्याणी होती याचा संदर्भ म्हणून कोणाची मायबोली पोस्ट कशी देऊ शकता. वाल्या कोळीने लिहिलेल्या रामायणातील संदर्भ द्या जिथे बिर्याणीपार्टीचा उल्लेख आहे.

डोक्यावर पडून किती वर्षे झाली रे तुला?
व्यवस्थित सांगितलेलं समजत नाही का समजून घेण्यासाठी काही नाहीये
मायबोलीवर संदर्भासहित आहे, बाकीची फालतूगिरी करण्यापेक्षा शोध घे आणि वाच
म्हणजे कळेल, मी अजिबात तुला स्पून फिडिंग करणार नाही
कारण त्यातही तू निर्बुद्ध फाटे फोडणार
सो जमत असेल तर कर नैतर बस
मी सांगण्याचे काम केलं, विषय संपला

आशूचॅम्प,
तूच जाऊन शोध हे ऊत्तर अपेक्षित होते.
तुम्हाला शाहरूखवर टिका करायचा मोह आवरला नाही.
मला शाहरूखची तरफ दारी करायचा मोह आवरला नाही.
याऊपर मला महाभारतातील बिर्याणीत जराही रस नाही.
विषय संपला Happy

मला आता भूक लागलीय. त्यामुळे मी माझ्या स्टाईलने फ्राईड अंडा बिर्याणी केलीय. ती देखील आता रात्री अडीच वाजता.. क्या करे पापी पेट का सवाल हैय.. और वैसे भी आई लव्ह बिर्याणीज.. तर या खायला Happy

1609796484808.jpg

..

IMG_20210105_031319.jpg

अंडा बिर्याणी???
अंडा पुलाव वाटतोय.. की अंडा फ्राईड राईस?

'बिर्याणी हेट' हा विषय वगळुन सगळे विषय येताहेत चर्चेला.
>>>

वर माझ्या बिर्याणीची हेटाळणी होतेय की तिला अंडा पुलाव आणि फ्राईड राईस बोलून..रामायणापासून हेच होत आलेय. नेहमी सीतेच्या बिर्याणीलाच पुलाव म्हटले गेलेय Sad

वर माझ्या बिर्याणीची हेटाळणी होतेय की तिला अंडा पुलाव आणि फ्राईड राईस बोलून>>
अहो बिर्याणी वेगळी असते आणि फोडणीचा भात वेगळा असतो.

चला म्हणजे वाचलं एकदाचा तू
>>>
मी काही वाचले नाही. तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही म्हटले रामायणात बिर्याणी होती तर होती. विषय संपला. संदर्भ मी फक्त ईतरांच्या तोंडावर फेकायला मागत होतो.

अहो बिर्याणी वेगळी असते आणि फोडणीचा भात वेगळा असतो.
>>>
एक्झॅक्टली. तरीही उगाच हट्टाने कोणी माझ्या बिर्याणीला पुलाव, फ्रा.रा. किंवा फो.भा. म्हणत असेल तर काय म्हणावे अश्यांना...

बाई दवे, फोडणीचा भात माझे पहिले प्रेम आहे. कित्येक बिर्याणीज ओवाळून टाकेन मी त्यावरून. मी स्वतंत्र धागा काढतो यावर !

पण मी सीतेचा उल्लेख पण केला नव्हता
तो बरोबर कसा केलंस?
रामायणात काय फक्त सीताच नव्हती, बाकी बायका पण होत्या

पण मी सीतेचा उल्लेख पण केला नव्हता
तो बरोबर कसा केलंस?
>>>>

सीतेने अग्नीपरीक्षा दिलेली त्या संदभाने तो डायलॉग होता ओ..
पण तुमच्या वक्तव्यावरून वाटतेय की रामायणातली बिर्याणी सीतेने केलेली.. नीनवेज होती की कंदमूळांची?

Pages