भोंदू फॉर्वर्ड्स ह्या धाग्यावर चर्चा अशी झाली की काही काही फॉर्वर्ड्स हे उगाच कुणाच्याही नावावर पसरवले जातात. ह्यातले सर्वच काही भोंदू असतात असं नाही, त्यामुळे हा वेगळा धागा तयार केला. तिथे चर्चिलेले काही फॉर्वर्ड्स आणि त्यात काही भर घालून हा धागा तयार करणेत येत आहे. आता ह्या लेखनात काही विनोद नाही, पण वाट्टेल ते साहित्य कुणाच्याही नावावर खपवणारे हे जे कुणी लोक आहेत, त्यांच्या विनोदबुद्धीला स्मरून हा धागा 'विनोदी लेखन' ह्या ग्रुपमध्ये तयार केला.
चुकीच्या नावाने फॉर्वर्ड झालेल्या साहित्यात बरेचसे साहित्य ह्या लोकांच्या नावावर आहे: पु ल, व पु, नाना पाटेकर, विश्वास नांगरे-पाटील, शेक्सपियर इत्यादी. जाणकारांनी यादीत अजून भर टाकावी.
खालीलपैकी फॉर्वर्ड्स तुम्ही देखिल पाहिले असतीलः
- 'नामधेयेन किम् फलम्' - महाकवी कालिदास
- "टॅलेंट च्या तांदळात परिश्रमाचे चिकन व प्रामाणिकपणाचा मसाला टाकला की यशाची बिर्याणी तयार होते " - डॉ अब्दुल कलाम.
एखादे गुलाबाचे चित्र. (विजय कुलकर्णी ह्यांच्या सौजन्याने)
- 'मी रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही' - शेक्सपियर (टवणे सरांच्या सौजन्याने)
- 'कॉलेजचे गेट, झाली तिथे भेट, घुसलीस मनात थेट - पुलंच्या कॉलेज जीवनातील कविता
- 'प्रेम बिम धोका आहे' - विश्वास नांगरे पाटील
आणखीन अनेक आहेत, कृपया भर टाकत जा.
प्रेयसी टेस्टींग टीममध्ये
प्रेयसी टेस्टींग टीममध्ये असेल
प्रेयसी आधीच उभ्या केलेल्या
प्रेयसी आधीच उभ्या केलेल्या टेस्टबेड्स्वरून दुसर्याच कुणाशी बोलत नाही ना ह्याचं टेस्टींग त्याने केलं असेल. (फारच इन्सेप्शन होतंय का)
खालची पोस्ट सुंदर पिचाईच्या
खालची पोस्ट सुंदर पिचाईच्या नावाने सुरू होऊन वामनराव पै यांच्या नावाने संपते.
*झुरळाची गोष्ट*
गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगीतलेला किस्सा त्यांच्याच शब्दात देत आहे.
‘एकदा मी एका हॉटेलात कॉफी प्यायला गेलो होतो. माझ्या जवळच्या टेबलावर एक ग्रुप बसला होता. त्यात काही महिला पण होत्या. अचानक एक झुरळ उडत उडत येऊन एका महिलेच्या अंगावर बसले. ते झुरळ बघून ती महिला घाबरून किंचाळायला व थयथयाट करायला लागली. तिचा हा थयथयाट मिनीटभर तरी चालू होता. मोठ्या मुष्किलीने तिने ते झुरळ झटकून टाकले तर ते झुरळ त्याच ग्रुपमधल्या दुसर्याल महिलेच्या अंगावर जाऊन बसले. मग त्या महिलेने पण किंचाळायला व थयथयाट करायला सुरवात केली. तेवढ्यात त्या हॉटेलचा वेटर तेथे आला. त्या दुस-या महेलेने पण मोठ्या मुष्किलीने ते झुरळ झटकून टाकले तर ते झुरळ त्या वेटरच्या अंगावर जाऊन बसले. मला वाटले की आता वेटर पण थयथयाट करणार. पण तसे काही झाले नाही. ते झुरळ अंगावर पडताच तो वेटर स्तब्ध उभा राहीला. अजिबात हालचाल न करता त्या झुरळाच्या मुव्हमेन्ट्स बघत राहीला. योग्य वेळ येताच त्याने ते झुरळ झटक्यात पकडले आणि हॉटेबाहेर फेकून दिले. मी विचार करू लागलो की जी गोष्ट त्या वेटरला जमली ती गोष्ट त्या दोन महिलांना का जमली नाही?
माझ्या लक्षात आले की त्या दोन महिला घाबरून ‘रिऍक्ट’ (React) होत होत्या तर त्या वेटरने ‘रिस्पॉन्ड’ (Respond) दिला होता.
त्या दोन महिला झुरळाला घाबरून ‘रिऍक्ट’ होत नव्हत्या तर आपण झुरळाच्या समस्येला तोंड देऊ शकत नाही या विचाराने भितीने गर्भगळीत होऊन ‘रिऍक्ट’ होत होत्या.
पण वेटरचे तसे नव्हते. आपण झुरळाच्या या समस्येला तोंड देऊ शकतो याची त्याला खात्री असल्यामूळे त्याने ‘रिस्पॉन्ड’ देण्याचे ठरवले होते.’
तात्पर्य
*पहिली गोष्ट म्हणजे ‘रिऍक्ट’ (React) आणि ‘रिस्पॉन्ड’ (Respond) या शब्दांमधला फरक लक्षात घ्या.*
*आयुष्यात कोणतीही समस्या आली की ‘आपण ही समस्या सोडवू शकत नाही’ या भितीपोटी माणूस ‘रिऍक्ट’ होत असतो. कुठलीही समस्या आली की तिला ‘रिऍक्ट’ होणे हा जरी मनुष्यस्वभाव असला तरी त्यामध्ये आपली कमजोरी दिसत असते. कारण मनुष्य जेव्हा ‘रिऍक्ट’ होतो तेव्हा तो बहुतेकपणे चुकिच्या माहितीमूळे, चुकीच्या विचारांमूळे, चुकीच्या गायडन्स मूळे, आत्मविश्वास नसल्यामूळे किंवा चुकिच्या संगतीने ‘रिऍक्ट’ होत असतो.
पण आपण या समस्येला तोंड देऊ शकतो अशी जेव्हा माणसाची भावना होते तेव्हा तो त्या समस्येला ‘रिस्पॉन्ड’ द्यायच्या, म्हणजेच तोंड द्यायच्या प्रयत्नांना सुरवात करतो. मग तो यासाठी योग्य ती माहिती गोळा करतो, योग्य व्यक्तिंचा सल्ला घेतो, योग्य विचार मनात आंणतो, मन शांत आणि खंबीर ठेवतो. शांत चित्ताने पण दृढ निश्चयाने त्या संकटाचा मुकाबला करू लागतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट आढळून येईल की त्यांनी संकटांना ‘रिऍक्ट’ न होता ‘रिस्पॉन्ड’ करण्याचे धोरण अवलंबीले होते. त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्यांनी काही वेळा ‘रिऍक्ट’ होण्याचे नाटक पण केले. पण खरी स्ट्रॅटेजी ही ‘रिस्पॉन्ड’ देण्याची होती. म्हणुनच ते शाहिस्तेखानाची बोटे कापू शकले, आग्रा येथून सुटका करून घेऊ शकले तसेच अ॑फजलखानाचा वध करू शकले.
आयुष्यात अनेक समस्या येत असतात. अनेक झुरळे अंगावर बसत असतात. या समस्यारूपी झुरळांना ‘रिऍक्ट’ होऊन थयथयाट करत बसायचे का ‘रिस्पॉन्ड’ देऊन त्यांना हाकलून द्यायचे हे तुमचे तुम्हीच ठरवायचे नाही का?
म्हणूनच ......
*"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"* #स्वामी समर्थ
खालची पोस्ट सुंदर पिचाईच्या
खालची पोस्ट सुंदर पिचाईच्या नावाने सुरू होऊन वामनराव पै यांच्या नावाने संपते.
>>
हे वाक्य वाचूनच फुटलो
खूप काम दिले म्हणून मॅनेजरचा
खूप काम दिले म्हणून मॅनेजरचा वध केल्यावर पोलिसांनी जाब विचारले तर हेच फॉर्वर्ड करावे आणि म्हणावे "काय नाय हो, शिवाजीसारखं रिस्पाँड केलं फक्त"
खालची पोस्ट सुंदर पिचाईच्या
खालची पोस्ट सुंदर पिचाईच्या नावाने सुरू होऊन वामनराव पै यांच्या नावाने संपते.
>>>लोल
उडणारी झुरळे असलेली हॉटेल्स
उडणारी झुरळे असलेली हॉटेल्स अमेरिकेत आहेत, अमेरिकस्थित सुंदर पिचाई असल्या हॉटेलात चवबदल म्हणून अधूनमधुन जातो, नेमका तो तिथे असताना झुरळांना घाबरून थयथयाट करणारा महिलावर्गही चवबदलासाठी तिथे येतो आणि समस्त भारतीयांच्या व्हाट्सअप्प युनिव्हर्सिटीत सुवर्णपान ठरणारे नाट्य त्याच्यासमोर घडते, त्याच्या डोक्यातून त्याच्या हातातील मोबाईलमधलय व्हाट्सएपवर तो त्याचे नाट्यरूपांतर प्रसवतो व युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात ते दाखल होते हा सगळा घटनाक्रम मला कायम दैवी भासलेला आहे.
तो मार्गारेट थॅचर यांच्या
तो मार्गारेट थॅचर यांच्या नावे असणारा संदेश आता लक्षात नाही. तो त्यांचाच आहे का पण ?
सुंदर पिचाईच्या नावाखाली एक
सुंदर पिचाईच्या नावाखाली एक व्हिडिओ आला होता मला. प्रत्यक्षात व्हिडिओतला माणूस कुणीतरी भलताच होता. यशस्वी झाल्यावर तो त्याच्या शाळेतल्या शिक्षिकेला भेटायला जातो असा काही तरी व्हिडिओ होता.
सीमंतिनी
सीमंतिनी
हे सर्व अप्रतिम विनोदी आहे.
हे सर्व अप्रतिम विनोदी आहे.
हल्लि 'व्हॉटसप वर छापून आलं म्हणजे ते खोटंच असणार' असा काहीसा विरक्तपणा आला आहे.
आता मीच एक काल्पनीक घटना लिहून ती स्टीव्ह जॉब्ज किंवा एलॉन मस्क च्या नावाने खपवणार आहे.
किश्श्यामध्ये दिलेला संदेश
किश्श्यामध्ये दिलेला संदेश खरोखरच चांगला आहे. फक्त "एकदा मी एका हॉटेलात कॉफी प्यायला गेलो होतो..." पासून ".... संकटाचा मुकाबला करू लागतो" इतकाच किस्सा सांगायला हवा होता. कारण नसताना प्रसिद्ध व्यक्तींना त्यात ओढल्यामुळे त्याचे हसे झाले आहे.
किश्श्यामध्ये दिलेला संदेश
किश्श्यामध्ये दिलेला संदेश खरोखरच चांगला आहे.>>>>
सहमत.
हल्लि 'व्हॉटसप वर छापून आलं
हल्लि 'व्हॉटसप वर छापून आलं म्हणजे ते खोटंच असणार' असा काहीसा विरक्तपणा आला आहे >> माझा मेंदू आधी अश्या फॉरवर्ड्समध्ये असलेले इमोजी शोधतो. उगाच नको तिथे झेंडे, स्वस्तिक, ओम, किंवा अति प्रमाणात स्पेशल कॅरॅक्टरस् (@@###$$%%%^&&*** इत्यादी) आले की, संदेश कितीही चांगला/खरा असो, तो बंडलच वाटतो.
सीमंतिनी
सीमंतिनी
विनोदाच्या पोस्टमध्येच
विनोदाच्या पोस्टमध्येच जेवढ्या हसण्याऱ्या इमोजी तेवढा तो विनोद केविलवाणा वाटु लागतो.
तशात एखादा चांगला विनोद वाचल्या गेलाच तर मी फॉरवर्ड बटण न दाबता कॉपी - पेस्ट करून त्या इमोजी काढुन पुढे ढकलतो.
तीन चार वर्षांपूर्वी मला
तीन चार वर्षांपूर्वी मला व्हाटसपवर एक फॉरवर्ड आलं होतं. त्यात एका दंगा करणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेतले मास्तर काही प्रश्न विचारतात तर तो दंगेखोर विद्यार्थी सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देऊन मास्तरांनाच त्यांच्या प्रश्नांच्या कोंडीत पकडतो अशा आशयाचं काहीतरी फॉरवर्ड होतं. ते सवाल जवाब वाचताना हा दंगेखोर विद्यार्थी कोणीतरी मोठा माणूस असावा हे लगेच आपल्या लक्षात येतं. शेवटी अपॆक्षेप्रमाणे 'तो विद्यार्थी म्हणजे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन होय.' या वाक्याने ते फॉरवर्ड समाप्त झालं. काही दिवसांनी तेच फॉरवर्ड दुसऱ्या एका ग्रुपवर आलं . आता वाचायला बरं आणि त्यात तो हुशार विद्यार्थी आईन्स्टाईन म्हणून परत एकदा वाचलं. आता सवाल जवाबचा पॅरा संपला आणि हा विद्यार्थी म्हणजे आईन्स्टाईन ही शेवटची ओळ वाचणार तोच मला मानसिक धक्का बसला कारण या फॉरवर्ड मध्ये शेवटची ओळ होती 'तो विद्यार्थी म्हणजे आपले लाडके शास्त्रज्ञ ए पी जे अब्दुल कलाम.'
तुम्हालाच बरे आले असे
तुम्हालाच बरे आले असे फॉर्वर्डस्..
मलाही आला होता तो, अब्दुल
मलाही आला होता तो, अब्दुल कलामांच्या नावाने.
मलाही आला होता पण दोन
मलाही आला होता पण दोन वेगवेगळ्या नावाने
डॉ. सिंग आणी लालुप्रसाद.
एक आस्तिकतेचा प्रचार करणारा
एक आस्तिकतेचा प्रचार करणारा मेसेज आहे. त्यात एक प्रख्यात हृदयरोगतज्ञ अत्यंत खराब हवामानामुळे विमान रद्द झाल्याने कार ने निघतो दुसऱ्या शहरात महत्वाच्या कॉन्फरन्ससाठी मग त्याची गाडीही बंद पडते आणि शेवटी तो ज्या घरात एका बाईचा मुलगा पैशा अभावी हृदयावरील शस्त्रक्रियेविना काही दिवसांचा पाहुणा राहिला असतो त्या घरात पोचतो (बाईला हा प्रख्यात हृदयरोगतज्ञ असतो हे माहीत नसते.)
हा मेसेज आधी रशियातील प्रख्यात हृदयरोगतज्ञ आणि रशियातील शहरातील नावाने मी वाचला. मग अमेरिकेतील, जर्मनीतील आणि काही महिन्यांपूर्वी हा मेसेज मराठीत भाषांतरीत बहुतेक मुंबईचे हृदयरोगतज्ञ दिल्ली की कुठे निघाले असतात, मध्ये इमर्जन्सी लँडिंग होते, पुढे टॅक्सीने निघतात असा वाचण्यात आला.
>> दंगेखोर विद्यार्थी सगळ्या
>> दंगेखोर विद्यार्थी सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देऊन मास्तरांनाच त्यांच्या प्रश्नांच्या कोंडीत पकडतो
हो, हो. आठवले हे. तो विद्यार्थी आपल्या शिक्षकांना निरुत्तर करून अखेर "देव हा विज्ञानापेक्षा कसा श्रेष्ठ आहे" हे दाखवून देतो, अशी काहीशी ती कथा होती. अब्दुल कलाम आणि आईन्स्टाईन या दोघांच्या नावाने फॉरवर्ड केले जात होते.
नीतू मांडके यांच्या नावाने तो
नीतू मांडके यांच्या नावाने तो वाचला आहे.
अश्या प्रेरणादायी कथांमध्ये मोठीच माणसं का असावी लागतात?
एखाद्या फार कोणाला मीडियात माहीत नसलेल्या नॉर्मल पण चांगल्या डॉ ला अनुभव आला तर तो प्रेरणादायी म्हणून फाऊल ठरतो का?
मेक इन इंडिया.....
मेक इन इंडिया.....
>> प्रख्यात हृदयरोगतज्ञ
>> प्रख्यात हृदयरोगतज्ञ अत्यंत खराब हवामानामुळे विमान रद्द झाल्याने कार ने निघतो...
ह्रदयरोगतद्न्य डॉ नितू मांडके यांच्या नावाने हा किस्सा फॉरवर्ड होत होता
विद्यार्थी आपल्या शिक्षकांना
विद्यार्थी आपल्या शिक्षकांना निरुत्तर करून अखेर "देव हा विज्ञानापेक्षा कसा श्रेष्ठ आहे" हे दाखवून देतो, अशी काहीशी ती कथा होती.>>>>
हिंदी पिक्चरवाल्यांनी न्यूटन आईन्स्टाईन सगळ्यांना गुंडाळून ठेवले. तरी ते बरे.. देव विज्ञानापेक्षा श्रेष्ठ हे आईनस्टाईन पटवून देतो असे दाखवणे यापेक्षा मोठा अपमान त्याचा कोणी केला नसेल.
मुलांना मराठी माध्यमाच्या
मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घाला हा मेसेज अमर्त्य सेन, शिक्षणतज्ञ यांच्या नावे आला होता.
>> *हॅलो हे ग्राहम बेलच्या
>> *हॅलो हे ग्राहम बेलच्या प्रेयसीचे नाव होते. आम्ही मात्र कुणालाही फोन लावला तरी सुरुवात ग्राहम बेलच्या प्रेयसीचे नाव घेवून करतो.*
>> Biggrin
>> आमचंच नशीब थोर की तो वेंकटपावनीभानूचंद्रिकेच्या प्रेमात नव्हता. नाहीतर रोज "वेंकटपावनीभानूचंद्रिका, काकू, मी सीमंतिनी बोलत्ये" अशी >> सुरूवात...
>> Submitted by सीमंतिनी on 17 December, 2020 - 20:45
हे आता वाचलं हो, आणि हॅलो म्हणाली असती "वेंकटपावनीभानूचंद्रिका, मी हॅलो बोलत्ये".
बाय द वे आताच्या हॅलोचा प्रियकर काय म्हणत असेल? "हॅलो हॅलोची आई, हॅलो आहे का घरात?"
सुंदर पिचाईच्या नावाखाली एक
सुंदर पिचाईच्या नावाखाली एक व्हिडिओ आला होता मला. प्रत्यक्षात व्हिडिओतला माणूस कुणीतरी भलताच होता. यशस्वी झाल्यावर तो त्याच्या शाळेतल्या शिक्षिकेला भेटायला जातो असा काही तरी व्हिडिओ होता.
>>
सत्या नाडेला होते का? हा बघा विडिओ
https://youtu.be/17ml0rRfwcQ
पाहिलात का? मग एक मिनिट थाम्बा. ते नाडेला पण नाहीत. गणेश कोहली नावाचे गृहस्थ आहेत
What a loser.. लाज कशी वाटत
What a loser.. लाज कशी वाटत नाही सत्या नादेला नाव टाकायची व्हिडीओ ला.. उगाच एक view वाढवला मी...:(
Pages