Submitted by VB on 25 December, 2020 - 18:54
पार्टी चा भात म्हणजे बिर्याणी असे कितीतरी जणांचे मत असल्याचे लक्षात आले. माझ्या ओळखीच्या दहा पैकी आठ लोकांना बिर्याणी आवडते. अन म्हणून मला बिर्याणी आवडत नाही म्हणून ते नाकही मुरडतात.
पण खरेच माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना बिर्याणी आवडत नाही. पूर्वी मी कधीतरी खायची बिर्याणी, पण आता बघवतही नाही. तसेही हल्ली चांगली बिर्याणी मिळत सुद्धा नाही आवडायला. बरेचदा तर बिर्याणी च्या नावाखाली भाज्या/चिकन/मटण/कोलंबी नावापुरता घातलेला अन मसाल्याने थबथबलेला भात देतात. तो प्रकार तर अजून भयानक असतो. कदाचित ह्या सगळ्या मुळे असेल पण मला बिर्याणी आता बिलकुल आवडत नाही.
माबोवर पण खाऊगल्लीत बरेचदा बिर्याणी दिसते अन तिची प्रशंसा करणारे पण. म्हणून सहज उत्सुकता म्हणून जाणून घ्यायला आवडेल की माझ्यासारखे अजून कोणी बिर्याणी हेटर्स आहेत का इकडे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमची पहिली भेट सुभद्रा हॉटेल
आमची पहिली भेट सुभद्रा हॉटेल मध्ये झाली होती.इथली बिर्याणी घरी खूप आवडते.जे एम रोड किंवा त्या एरियात येणं झालं की पार्सल नेतोच.(हायजीन प्रॅक्टिस चे काही मुद्दे असतील तर न वाचता पुढे जाईन
)
रीया , इंडो चायनीज नावाचा
रीया , इंडो चायनीज नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही. चायनीज पदार्थाचे भरमसाठ मसाले घालून केलेलं ते भारतीयकरण आहे. खरे चायनीज पदार्थ वेगळे असतात. ती चव भारतीय जिभेला सोसावणारी नाही.
सेम ऍप्लिकेबल टू व्हेज
सेम ऍप्लिकेबल टू व्हेज बिर्याणी.
नॉन व्हेज न खाणाऱ्यांसाठी पर्याय म्हणून व्हेज बिर्याणी.
इंडो चायनीज अस्तित्वात आहे की
इंडो चायनीज अस्तित्वात आहे की! इकडे कॅनडा/ अमेरिकेतही मिळते.
'खरे चायनीज' म्हणजे पोर्कचा भयानक वास येणारे ऑरेंज चिकन डोळ्यासमोर येतं. जसं खरं इंडियन म्हणजे बटर चिकन आणि म्यांगो लस्सी आठवतं.
मग ती तुमची मनाची समजूत आहे
मग ती तुमची मनाची समजूत आहे रीया . तो मूळ पदार्थ नाही .मूळ पदार्थाचे मोडीफिकेशन आहे ते. असो.
पदार्थ डेव्हलप होतच असतात.
पदार्थ डेव्हलप होतच असतात. एखादा प्रकार यशस्वी झाला की तो वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीत वेगवेगळ्या रूपात रुळतो.
मूळ बिर्याणी ही मटण किंवा अजून कशाची का बनली असू दे, चिकन, फिश, खीमा आणि व्हेज सुद्धा काय मस्त लागते.
इथे पट्टीचा नॉनव्हेज खाणारा असेल त्याला अचानक प्रसिद्ध जर्मन लॅम्ब डिश वगैरे खायला दिली तर कसली चवच नाही म्हणुन नाक मुरडेल.
'खरे चायनीज' म्हणजे पोर्कचा
'खरे चायनीज' म्हणजे पोर्कचा भयानक वास येणारे ऑरेंज चिकन डोळ्यासमोर येतं. />>> मी आणि एक कलीग बीजिंगला मोठ्या उत्साहाने आणि अपेक्षेने प्रसिद्ध पेकिंग डक खायला गेलो, पण वासामुळे दोघांचेही खाणे शक्य नाही यावर लगेच एकमत झाले.
एपिक चॅनेलवर हैद्राबादी
एपिक चॅनेलवर हैद्राबादी बिर्याणीवर खुप दिवसांपूर्वी एक कार्यक्रम बघितल्याचे आठवतेय.
त्यात लढाईच्या मैदानावर असणाऱ्या सैन्याला खाण्यासाठी घाऊक प्रमाणात करता येतो आणि पोटभरीचा असतो म्हणून बिर्याणीचा शोध लागला आणि तो खाद्यप्रकार प्रचलित झाल्याचे सांगितल्याचे आठवतेय... त्याला शाही वगैरे रुप खुप नंतर आले म्हणे!
मूळ पदार्थाचे मोडीफिकेशन आहे
मूळ पदार्थाचे मोडीफिकेशन आहे
>>>
पण म्हणून त्याचे नाव बदलत नाही ना ? मूळ पदार्थ बिर्याणीचा रहातो. पुलाव ची रेसिपी ही बिर्याणीचा रेसिपी पेक्षा वेगळी आहे.
भारतीय पिझ्झा पनीर टॉपिंग बनवतात तरी तो पिझ्झाच ना ? भले ऑथेंटिक डिशपेक्षा 100% मॉडीफाईड आणि वेगळा असला तरी? का आजपासून त्याला पनीरची भाकरी म्हणायचं?
इंडो चायनीज हा प्रकार 100% अस्तित्वात आहे
रीया, तुम्हाला मुद्दा लक्षात
मानव , मोडीफिकेशन आणि मूळ पदार्थ ह्यात बराच फरक असतो. मोडीफिकेशनला विरोध नाही. पण मूळ पदार्थ म्हणून खपवून नका एवढंच म्हणणं आहे.
रीया, तुम्हाला मुद्दा लक्षात येत नाहीये .तेव्हा थांबते. बाकी चालू देत.
मोडीफिकेशन आणि मूळ पदार्थ
मोडीफिकेशन आणि मूळ पदार्थ ह्यात बराच फरक असतो. हे नक्की कशाबद्दल? मी काही पोस्ट्स वाचलेल्या नाहीत किंवा पूर्ण वाचलेल्या नाहीत.
व्हेज बिर्याणीला बिर्याणी म्हणु नये, पुलाव म्हणावे या बाबत आहे का हे?
नंतर विपु करते मानव . आता जरा
नंतर विपु करते मानव . आता जरा गडबडीत आहे.
मोडीफिकेशनला विरोध नाही. पण
मोडीफिकेशनला विरोध नाही. पण मूळ पदार्थ म्हणून खपवून नका एवढंच म्हणणं आहे.
>>>
एवढ्यासाठीच पिझ्झा बर्गर चं उदाहरण देतेय मी.
व्हेज बिर्याणीला पुलाव म्हणायचं तर म्हणा बापडे पण मग पिझ्झा बर्गरला पण भाकरी आणि वडा पाव म्हणा.
असो
व्हेज बिर्याणीला पुलाव म्हणा
व्हेज बिर्याणीला पुलाव म्हणा म्हणजे काहीहीच.
बिर्याणी वेगळी, पुलाव वेगळा.
बिर्याणी करण्याची, पद्धत, मसाला इत्यादी तेच वापरून त्यात मटण किंवा चिकन किंवा फिश किंवा भाज्या वापरून केलेली व्हेरायटी आहे ती. जसा आलू किंवा मेथी किंवा कोबी वगैरे वापरून केलेला पराठाच, कोणी फक्त आलू पराठ्याला पराठा म्हणा, बाकीच्याना कोबीची पोळी, मेथीची पोळी वगैरे म्हणा असं म्हटल्या सारखं होईल ते.
आणि व्हेज बिर्याणी म्हणजे कोणी बिर्याणीच्या नावाखाली पुलाव खपवत नाही, की कुणाला मटण घातलेली बिर्याणी अपेक्षित आहे त्याला अहो हीच बिर्याणी म्हणुन व्हेज बिर्याणी खपवत नाही. मटण / चिकन / प्रॉन्स / व्हेज असं स्पष्टपणे लिहिलेले असते. त्यामुळे अमक्याच्या नावाखाली तमके खपवणे इथे लागु होत नाही.
हां जर कुठे पुण्या, मुंबईत कुणी हैदराबादी बिर्याणी असे नाव दिलेय आणि त्याला हैद्राबादी बिर्याणी कशी करतात हेच माहिती नाही, पुलावासारखी पाकृ करून तो त्यात मटण / चिकन / भाज्या घालुन देत असेल तर त्याला म्हणता येईल की बाबा रे तू हैदराबादी बिर्याणीच्या नावाखाली भलतंच काही खपवत आहेस.
आता चायनीज बद्दल. भारतातील मेनलँड चायना, जर्मनीतलं चायनीज रेस्टॉरंट, अमेरिकेतीलं मेनलँड आणि चीन मधलं चायनीज या सर्व ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या चवीचे मिळेल. सगळीकडे डिशेसची नावे तीच असली तरी. हा खाद्य संस्कृतीप्रमाणे झालेला बदल आहे. तसाच बदल आपल्याला जर्मनीतल्या इंडियन रेस्टॉरंट मध्ये जाणवेल. आता या सगळ्यांना काय मूळ डिशेसच्या नावाखाली काहीही खपवू नका, डिशेसची नावे बदला म्हणुन सांगणार?
हेच म्हणायचंय ओ मला.
हेच म्हणायचंय ओ मला.
बिर्याणीला भारी म्हणण्याच्या
बिर्याणीला भारी म्हणण्याच्या ओघात पुलाव ला असे कमी लेखू नका हो
नाही नाही. मला पुलाव पण आवडतो
नाही नाही. मला पुलाव पण आवडतो पण बिर्याणीला पुलाव म्हणल्याने पुलावचा पण अपमान होतो ना? तो बिचारा साधा सात्विक पदार्थ.
आता उद्या पुलाव करणे आले
नाही, कमी लेखत नाही फक्त
नाही, कमी लेखत नाही फक्त वेगळा प्रकार आहे तो. मला नाही आवडत, पण मला मसाले भात खूप आवडतो. बिर्याणीला मसाले भात म्हणा असे कुणी म्हणाले तरी मी वर म्हणालो तेच म्हणेन.
मानव , विपु करणार होते पण आता
मानव , विपु करणार होते पण आता राहू देत अस दिसते. चालू देत तुमचे.
बाकी इतरांसाठी : तुम्हाला व्हेज बिर्याणी नामक पुलाव आवडत असेल तर तो खाऊन, तसे म्हणून नंदनवनात खुश राहा. पण इतरांना तो पदार्थ बिर्याणी म्हणून पटत नाही हे ही लक्षात असू देत. आणि तसे त्यांना स्वातंत्र्य आहे.
बरं ! धाग्याचा विषयाकडे वळू . अजून कोण बिर्याणी हेटर्स आहेत इथे?
जाई. - बिर्याणी आणि पुलाव
जाई. - बिर्याणी आणि पुलाव यांच्या बनवण्याच्या पद्धती निरनिराळ्या असतात. केवळ भाज्या घातल्या म्हणून तो पुलाव होतो असे नाही.
हे वाचून पहा.
https://www.indiatoday.in/food-drink/food/story/biryani-pulao-fried-rice...
(एगलेस केकचे उदाहरण जास्त समर्पक वाटू शकेल पारंपारिक रित्या केक बनवताना अंडे घातले जाते पण अंडे न घालताही स्वादिष्ट केक बनतोच की. केक = बेकिंग केक म्हणायचे की नाही हे त्यातल्या पदार्थांपेक्षा बनवण्याच्या पद्धतीशी म्हणजे बेकिंगशी जास्त निगडीत आहे)
थीशियस चे जहाज.
थीशियस चे जहाज.
चिनी भातासाठी बासमती वापरला जातो कधी कुणाच्या स्वयंपाकघरात आणि बिर्यानीसाठी दूबराज किंवा कमोद.
कोणी बिर्यानीत बटाटे तळून घालतात. कोणी खोबरे भाजून.
हे ऐकीव असले तरी खरे ऐकीव आहे.
मानव , विपु करणार होते पण आता
मानव , विपु करणार होते पण आता राहू देत अस दिसते. चालू देत तुमचे. >>>
जाई, असं काही नाही मी माझं मत सांगितलं त्यावर तुम्ही तुमचं सांगा, पटलं तर सहमती दर्शवेन.
कौआ बिर्याणी खाल्ले काय कोणी?
कौआ बिर्याणी खाल्ले काय कोणी?
जाईटिम्ब, तुमचा अट्टाहास काय
जाईटिम्ब तुमचा अट्टाहास काय आहे नक्की? तुम्हाला व्हेज बिर्याणीला बिर्याणी म्हणणे आवडत नाही तर ठीक आहे तसे सांगा. उगाच लोक कसे delusion मधे आहेत, लोक मूर्खांच्या नंदनवनात राहतात हे कशाला? modifications असतात म्हणायचे तरी इंडो चायनीज असा प्रकार अस्तित्वात नाहीये हे सुध्दा म्हणायचे!! ("मी लोकांना मूर्ख म्हणाले नाही पण नंदनवनात रहातात म्हणाले" टाइप डिफेन्स केलात तर
)
अच्छा म्हणजे बिर्याणी फक्त
अच्छा म्हणजे: "बिर्याणी फक्त नॉनव्हेजच असते का? आणि व्हेज बिर्याणीला पुलाव म्हणावे का?" हे फक्त इथेच नव्हे तर इंटरनेट अन्य फोरम्समध्ये सुद्धा व्यापक प्रमाणात चर्चेत असलेले मुद्दे आहेत तर. हे मलाही माहित नव्हते.
कुणाच्या भावना कशाने दुखतील
कुणाच्या भावना कशाने दुखतील काहीच सांगता येत नाही आजकाल.
सो मोरल ऑफ द चर्चा इज की
सो मोरल ऑफ द चर्चा इज की ज्यांना व्हेज बिर्याणीला पुलाव म्हणायचंय त्यांना त्यांच्या नंदनवनात राहू देत पण व्हेज बिर्याणी हा प्रकार असतो (केक चं उदाहरण अतिशय परफेक्ट)
मी मीट खात नाही पण मला एग बिर्याणी पण आवडते आणि मस्त जमते. व्हेज बिर्याणीपेक्षा ती सोपी वाटते कारण भाज्या चिरायची कटकट नाही
(मी उगाच अंडे व्हेज असते वगैरे म्हणणार नाही)
नाबूअबूनमा
नाबूअबूनमा , मोठे व्हायला शुभेच्छा
कुणाच्या भावना कशाने दुखतील काहीच सांगता येत नाही आजकाल.>>> हे मात्र खरं. व्हेज बिर्याणीवाल्याचा भावना किती दुखवल्यात ते दिसतेय. केवढा तो अट्टाहास recognition मिळवण्यासाठी. जाम करमणूक झाली
केवढा तो अट्टाहास recognition
केवढा तो अट्टाहास recognition मिळवण्यासाठी.
>>>
बिर्याणीसाठी? Lol. We have better things to get recognized for. Touchwood !
Pages