बिर्याणी हेट क्लब

Submitted by VB on 25 December, 2020 - 18:54

पार्टी चा भात म्हणजे बिर्याणी असे कितीतरी जणांचे मत असल्याचे लक्षात आले. माझ्या ओळखीच्या दहा पैकी आठ लोकांना बिर्याणी आवडते. अन म्हणून मला बिर्याणी आवडत नाही म्हणून ते नाकही मुरडतात.
पण खरेच माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना बिर्याणी आवडत नाही. पूर्वी मी कधीतरी खायची बिर्याणी, पण आता बघवतही नाही. तसेही हल्ली चांगली बिर्याणी मिळत सुद्धा नाही आवडायला. बरेचदा तर बिर्याणी च्या नावाखाली भाज्या/चिकन/मटण/कोलंबी नावापुरता घातलेला अन मसाल्याने थबथबलेला भात देतात. तो प्रकार तर अजून भयानक असतो. कदाचित ह्या सगळ्या मुळे असेल पण मला बिर्याणी आता बिलकुल आवडत नाही.
माबोवर पण खाऊगल्लीत बरेचदा बिर्याणी दिसते अन तिची प्रशंसा करणारे पण. म्हणून सहज उत्सुकता म्हणून जाणून घ्यायला आवडेल की माझ्यासारखे अजून कोणी बिर्याणी हेटर्स आहेत का इकडे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेम पिंच.बिर्याणी जास्त आवडत नाही.
भारतात पिकणार्या तांदळाला पर्याय नसल्याने भारतीय मुस्लिम संस्कृतीत बिर्याणीचा उगम झाला असे म्हणतात.

हा हा हा. बिर्याणी म्हणजे खाण्यातला बडा ख्याल. बरोबर साथीला दही रायता आणि सालन.

माझी फेवरिट व हाथ खंडा रेसीपी. चिकन बिर्याणी/. तेलंग णा अंडा बिर्याणी. मी दर रविवारी करतेच. कोणाला ऑर्डर द्यायची अस्ल्यास गुरुवार परेन्त सांगा

मटन बिर्याणी मात्र हैद्राबादमधील बहार इस्पहान पॅराडाइज झिंदाबाद.
मसाले व फॅट अगदी योग्य प्रमाणा तच पाहिजे. वरून केव्डा रोझ वॉटर आणि आत केशर हवे. सर्व घटक पदार्थ ताजे हवेत. व प्रमाणात. चावल बासमतीच.

हैद्राबादेस चिकन स्पेशल बिर्याणी मध्ये तीन पीसेस चिकन ६५ चे पण असतात.

लखनवी बिर्याणी/ कोलकाता बिर्याणी पण वेगळ्या चवीची व सुरेख असते.

आम्ही हैदराबाद चार-पाच दिवस फिरायला गेलो होतो तेव्हा लंच आणि डिनर फक्त आणि फक्त बिर्याणी च खाल्ली.....
नाष्ट्याला नाही खाऊ शकलो कारण इतक्या सकाळी मिळाली नव्हती Wink

तसेही आजकाल हेट करणे आणि बॉयकॉट करणे एक फैशन झाले आहे..खायच्या पदार्थांना हेट करणे, कुणी काही चुकीचे वागले कि आख्ख्या जातीला हेट करणे...पण हि आपली भारतीय संस्कृती आहे का?
सोशल मिडीयावर लिहायचे स्वातंत्र्य असले कि हे असे त्याचे साईड इफेक्ट्स....
जेव्हा आपण हेट शब्द वापरतोय तिथेच डिस्क्रीमीनेशन सुरू होतेय....दुसऱ्यांंच्या आवडीचा रिसपेक्ट करावा..
मी उद्या येऊन आय हेट वेजेटिरीयन्स...पण आपल्याला हेच शिकवायचं आहे का पुढच्या पिढीला???
तुम्हाला आवडत नसेल तर बी न्युट्रल बट डोन्ट युज हेट..डिसलाईक (नावडते) आणि हेट( द्वेष) यात खूप फरक आहे...
कृपया हेट हा शब्द सोशल मिडिया वर कमी वापरावे.. जितके होता येईल तितके सकारात्मक लिहायचा प्रयत्न करावा...

माझ्या ओळखीच्या दहा पैकी आठ लोकांना बिर्याणी आवडते. अन म्हणून मला बिर्याणी आवडत नाही म्हणून ते नाकही मुरडतात.>> हे नाही कळालं.. तुम्हाला चव आवडत नाही म्हणून बिर्याणी आवडत नाही का बऱयाच जणांना आवडते म्हणून? म्हणजे तो पहिला ‘म्हणून’ चुकून लिहीलाय का?
असो, बिर्याणी माझा जीव की प्राण.. परदानशीन झालेल्या बिर्याणीतून तासाभरासाठी कैदेत असलेला केवड्याचा सुगंध जेव्हा हवेत दरवळतो तेव्हा आमच्या घरी तरी सगळेच बिर्याणीवर तुटून पडतात.. आणी असे तुटून पडतात की फोटोस्कारही व्यवस्थित करू देत नाहीत..

मलाही आवडत नाही. पूर्वी आवडायची. कौतुकानं काही वेळा केलीसुद्धा पण आता नाही आवडत. पुलाव/ बिर्याणी पेक्षा साधा वरणभात किंवा फोडणीचा भात जास्त प्रिय आहे.

मृणाल जास्त विचार करताय.. व्हीबी असे कुठे म्हणतायत की बिर्याणी वाईट.. त्यांना आवडत नाही इतकेच म्हणतायत...
आणि त्यांच्या सारखे इतर लोक शोधतायत...

बिर्याणी कोणाला नावडू शकते हे मला जरा आश्चर्यचे वाटले. पण ठिके .

लोकं व्हेज बिर्याणी या नावाखाली पुलाव खपवतात तेव्हा हसू येते. व्हेज बिर्याणी असा कोणताही पदार्थ अस्सल बिर्याणी खवयाला पसंत पडत नाही. बिर्याणी मांस आणि तत्सम पदार्थ घालूनच तयार करतात.

बिर्याणी मला खूप आवडते. हैदराबाद ला खास बिर्याणी खाण्यासाठी जाणार आहे. देवाने मला ज्या अलौकिक शक्ती दिल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे बिर्याणी फक्त बघून तिची चव कशी असेल हे मी सांगू शकतो.

च्रप्स , पॉईंट बिर्याणी वाईट आहे याचा नाहिए..हेट हा शब्द वापरणे हा आहे..
नाही आवडत म्हणजे डिसलाईक आणि हेट म्हणजे द्वेष..
डिसलाईक ला आपण हेट म्हणू नाही शकत...
आवडत नाही हे ठिकै पण हेट हा शब्द खूप खूप खूपच वाईट शब्द आहे पण आजकाल हेट शब्द वापरणे कॉमन झालेय वीच इज नॉट ओके...

म्हाळसा, मला नीट लिहिणे जमतच नाही. मला बिर्याणी आवडत नाही हे माझ्या फ्रेंड्स ना झेपत नाही अन ते मला चिडवतात असे काहीसे म्हणायचे होते मला

च्रप्स Happy

मृणाली, मी समजू शकते तुमचा त्रागा, तो जिहादचा धागा वाचला होता मी. एक सल्ला देऊ , तुम्ही न मागता, आंतरजालावर तेही तश्या ज्वलंत विषयाच्या धाग्यावर, आपले वैयक्तिक माहिती टाकुच नये. अन टाकलीच तर येणारे प्रतिसाद सकारात्मक पणे घ्यायला येता हवे म्हणजे मनात राग धुमसत राहणार नाही, अन तो दुसरीकडे निघणार नाही. सॉरी जर सल्ला आवडला नसल्यास इग्नोर करा.

हेट हा शब्द खरच मोठा आहे, पण तरीही मला इकडे तोच वापरावा वाटला, मला अगदी द्वेष या अर्थी तो वापरायचा नव्हता इथे, च्रप्स यांनी जे लिहिलंय तेच अपेक्षित होते/ आहे. कृपया खाद्यपदार्थाच्या धाग्यावर जात आणू नका.

बाकी, गेल्या काही वर्षात मी जी बिर्याणी खालीये त्या चवीची खाल्ली तर खरच तुम्हीही म्हणाल आय हेट बिर्याणी Proud

VB thanks for your understanding Happy
There is nothing personal here , we are talking about food....We can not hate food whatever form it is because it came from mother nature...
Please don't spread hate word.

गेल्या काही वर्षात मी जी बिर्याणी खालीये त्या चवीची खाल्ली तर खरच तुम्हीही म्हणाल आय हेट बिर्याणी Proud>> म्हणजे चांगली बिर्याणी कधी जल्मात खाल्लेली नाही अजून. पुढे खाण्याची शक्यता नाही म्हणून त्याचा हेट करायचा. रुसु बाई रुसू... हलके घ्या. दिवे दिवे

शायद लाइफ में आगे जाके कभी अच्छी बिर्यानी खाने को मिले. मेरेकु क्या.

एक समर्पक मराठी म्हण आहे पण इथे लिहिणे योग्य वाटत नाही. Wink

हापूस आंबा, चांगले अत्तर, इस्त्रीचे कपडे, चांगली वाइन लता रफीची गाणी, एसी चे २४ डिग्री टेंपरेचर, थिओब्रोमाची पेस्ट्री व ब्राउनीज.
जीवनातले किती तरी सुखोपभोग न आव्डणारे लोक असतात. पण म्हणून त्या अनुभवांचा उत्तम पणा कमी होत नाही. हेट अ‍ॅज मच अ‍ॅज यु वाँट तुम्हाला ते स्वातंत्र्य आहेच.

बिर्याणी खाणार्यांनी ब्लू नाईल ची इराणी चेलो मुर्ग खाऊन पाहिली पाहिजे. यात मसाला नसतो. पण अप्रतिम चव.

व्हीबी, इथून पार्सल पाठवून देऊ का बिर्याणी, ट्राय करायला? चिकन / मटण / फिश अशा तिन्ही पाठवतो बघा एखादी आवडेल का ते.

बाकी हेट शब्दाला एवढं हेट करू नये, जशी अभिमानाची जागा (हिंदीतल्या?) गर्वाने घेतलीय तशी नावडण्याची जागा (love विरुद्ध) हेट ने घेतली. बिर्याणी लव्हर्स क्लब असे धागे पण असतात ना, खाद्यपदार्थांवर प्रेम आहे असं म्हणतात का? आवडतात म्हणावं, असं आपण म्हणतो का? तसंच हे.

दावत किंवा इंडिया गेट बासमती चावल अर्धा तास भिजवून ठेवायचा. मग तो तुपावर जिरे मिरे घालून परतायचा व आधणाच्या पाण्यात वरच शिजवून घ्यायचा. कणी मोड झाले की चाळणीत टाकायचा. दाणा खरेच दीड ते दोन सेंटिमिट र परेन्त फुलतो. ह्याच पाण्यात मीठ घालायचे
म्हण जे ते भातात जाते. ही एक युक्ती आहे.

कांदा लांब कापून तळतात - ब्रिसा- तेव्हा तो पण एक तास आधी कापून मीठ लावून टिशु पेपर मध्ये ठेवायचा वरुन पोळपा ट ठेवून वजन ठेवायचे. तळताना पिळून घ्यायचे म्हणजे ऑसम कुरकुरीत होतो. माझे तर करता करता हा भात व तळीव कांदा खाण्यातच पोट भरते.

मी तर परवा बिर्याणी साठी केशर दुधात भिजिवले होते. वास इतका अप्रतिम आला कि थोडे केशर मिश्रीत दूध तसेच पिउन टाकले. ही ही.

मद्रास मधली खरेतर दिंडिगलची तलपक ट्टी बिर्याणी पण छान असते बरोबर फ्राइड फिश चा तुक् डा घ्यायचा. ह्याचा तांदूळ वेग्ळा असतो मात्र.

केरळ मधील मोपला बिर्यानी पण वेगळ्या छान चवीची असते.

सकाळी धागा वाचला तेव्हा बिर्याणीची तयारी करत होते. वाटले.. हेटर्सपेक्षा लव्हर्सच इथे हजेरी लावतील. कशी आणि कुठली आवडते ते सांगतील Happy
अमा छान टिप्स. तुमचा बिर्याणी पाककृतीचा धागा असेल तर लिंक द्या. नसेल तर धागा काढा.

बोकलत, केव्हा येता बिर्याणी खायला सांगा, एखाद्या झपाटलेल्या जागी शेकोटी पेटवून बिर्याणी खाण्याचा आनंद घेऊ या.

खरं तर या डिसेंबरला तिकडेच यायचा प्लॅन केला होता पण कोरोनामुळे फिस्कटला. बघू आता लाईफ कधी नॉर्मल होते.

अत्यन्त आवडता पदार्थ. उत्तम बिर्याणी नावडणे ही एक गोष्ट आणि वाईट चवीची बिर्याणी खाणे आणि म्हणून नावडणे ही वेगळी गोष्ट. तर असो वरती बऱ्याच जणांनी पर्याय दिलेत तिथे एकदा ट्राय करा आणि ती पण नाहीच आवडली तर तुम्हाला खरेच आवडत नाही बिर्याणी, जे की ठीकच आहे.

चिडकू ब्लु नाईल चेलो मुर्ग हे आमच्या ऑफिसचे शनिवारचे लंच असायचे 10 एक वर्षापुर्वी, आता ब्लु नाईलला चुकून सुद्धा जाऊ नये. एकदम बंडल चव झाली आहे. कॅम्पात करीम, येरवड्यात देगची , इ ठिकाणी चांगली बिर्याणी मिळते.

जीवनातले किती तरी सुखोपभोग न आव्डणारे लोक असतात. पण म्हणून त्या अनुभवांचा उत्तम पणा कमी होत नाही. हेट अ‍ॅज मच अ‍ॅज यु वाँट तुम्हाला ते स्वातंत्र्य आहेच. >>>>> अगदीच सहमत.
आवड नसणे वेगळं आणि द्वेष करणं वेगळं. शब्दांच्या अर्थाची शेड समजुन ती वापरली तर प्रतिक्रिया पण तशाच येतात. मला मृणालची पोस्ट योग्य वाटली, पण त्यावरचा धागकर्तीचा प्रतिसाद अत्यन्त वाईट आणि immature आहे. विनाकारण दुसर्या धाग्यावरच्या डिलीट केलेल्या पोस्टचा संदर्भ देऊन इतकी हलकी कमेंट करण्याची गरज नव्हती.

हाय कम्बखत च्या चालीवर अच्छी बिर्याणी खाई ही नहीं म्हणते. एक्स्पर्ट व्यक्तीने बनवलेली किंवा योग्य ठिकाणी ऑर्डर केलेली बिर्याणी खाल्ली नसणं दुर्दैवी. आमच्या क्लोज ग्रुपमध्ये इराणी मित्र आहेत, त्यामुळे त्यांनी बनवलेली बिर्याणी नेहमी खाते, मला जगातली बेस्ट बिर्याणी काय असते माहीत आहे.

(वर कोणाला तरी म्हण लिहायची होती, ती लिहुन टाकायची होती की. आम्हाला उगीच उत्सुकता. गागुचका का? Wink )

आई लव्ह बिर्याणी किंवा आई हेट बिर्याणी हेटर्स असा धागा काढायचा विचार होता. पण त्याची गरज नसावी. या धाग्यावरच बिर्याणीचे गुणगान गोडवे गाणे सुरू होणार आहे Happy

बाई दवे,
कोणी केप्सा बिर्याणी खाल्ली आहे का?
आमच्या माझगावची देण आहे जगाला असे म्हणतात Happy

आता ब्लु नाईलला चुकून सुद्धा जाऊ नये. एकदम बंडल चव झाली आहे >>>> मी लिहीणार होते, पण वाटलं की प्रत्येकाची चवीची आवड वेगळी असते. आता ब्ल्यू नाईलची शान गेली. कॅम्पमध्ये करीम्स, FJ, देगची, दोराबाजी आणि कित्येक मुस्लिम केटरर्सची बिर्याणी उच्च चवीची असते.

Pages