दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास? हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 September, 2019 - 15:57

दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास?

हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

विकासाच्या नावाखाली आरे येथे मोठी वृक्षतोड होणार. मुंबईची फुंफ्फुसे निकामी करणार. त्याविरोधात चला पेटीशन साईन करूया म्हणून उत्साहात मी सुद्धा माझे वृक्षप्रेम आणि त्याहून कांकणभर जास्त असे मुंबईप्रेम दाखवत त्याला समर्थन दिले. माझ्यासोबत चार लोकांना जबरदस्ती द्यायला लावले.

पण आता आरेला कारे करत बातमीची दुसरी बाजू काही अभ्यासू लोकं समोर घेऊन येत आहेत. आरे वाचवा म्हणणारयांवर बेगडी पर्यावरणप्रेमीचा शिक्का मारला जात आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी वृक्षतोड किती गरजेची आहे हे सांगत आहेत.
त्यात आज सकाळीच एक बातमी कानावर आली की या विकांताला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबईतील उच्चशिक्षित विकासप्रिय नागरिक मेट्रो समर्थनासाठी जमणार आहेत.
बर्रं बातमीसोबत सोबत एक भावनिक आवाहन होते,
तुमचा एक तास वसई-कल्याण च्या लोकलमधून पडणाऱ्याचा जीव वाचवू शकतो.

एकंदरीत दोन्ही बाजूंनी मला भावनिक करून टाकले आहे.

यात माझे एक सूक्ष्म निरीक्षण असेही आहे की मित्रयादीतले भाजप समर्थक मेट्रो झिंदाबाद टीमकडून उतरले आहेत तर सरकार विरोधक आरे बचाव गटात सामील आहेत.
आणि जेव्हा असे एखाद्या विषयात राजकारण येते तेव्हा काय खरे आणि काय खोटे हे जाणून घेणे माझ्यासाठी अवघड होते.

मायबोलीचर्चेत नेहमीच चांगली आणि योग्य माहीती मिळते हा आजवरचा अनुभव म्हणून मुद्दाम ईथे हे विचारतोय.

माझे वैयक्तिक मत म्हणाल तर आपण विकासाच्या रस्त्याने विनाशाकडे जात आहोत. पण याचा अर्थ असा नाही की मी मेट्रोला वा विकासाला विरोध करतोय. विनाश असा ना तसा आज ना उद्या होणारच आहे. तर त्याआधी विकास उपभोगून घेतलेला काय वाईट Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतरांचे श्रेय भविष्यात दिसुच नयेत म्हणुन त्यांनी उभा केलेल्या संस्था, कंपन्या, कारखाने विकण्याचे कसब तर वाखाणण्याजोगे.. ना रहेगा बास ना बजेगी पुंगी..!!

श्रेय मिळू नये म्हणूनच बायकोला सोडून दिले असावे,

आजची क्रिकेट मॅच 35 रनात मेली , ह्याचे श्रेय ध्यानचंद व कपिल देवला जाते

श्री श्री श्रेयफेकू गुरुजी

मुख्यमंत्री राज्याचा असतो हे १०-२० मार्काचे नागरिकशास्त्र शिकलेल्यांच्या निदर्शनास आणून देवू इच्छितो! >>>>>>
हे त्या इटालियन बाई ला माहीत नसावे का ?
का इटली मधील नांगराला जुंपलेल्या बैला ला सुध्दा आसूड मारण्याची पद्धत आहे ?
आदिवासी बद्दल काही तरी करा असे जाहीर कळवळा युक्त पत्र मीडिया मध्ये आधी पाठवले? का मुंबई मंत्रालयात आधी पाठवले ?
एक मात्र नक्की इटालियन बाई आणि तिचा अप यशी पोरा ने स्वतःहून सेना , मुख्यमंत्री किंवा संपादक बद्दल गेल्या वर्षभरात कौतुकाचा एक ही शब्द काढलेला नाही , पण आपल्या सेनेचे दोन्ही ही अवतारी पुरुष मात्र सतत अपयशी मायलेकाची आरती करून अपरिहार्यता दाखवत असतात . जे खूपच लाजिरवाणी वाटते !

ते लग्नात आहेर कुणी काय दिले ह्याची एकजण यादी करत असतो

तसे कौतुक करणार्यानी तुमच्या यादीत नाव नोंदवून , तीन किलो कौतुक वगैरे लिहून मग कौतुक करायचे काय ?

असा लाजिरवाणा जॉब का करता ?

पुन्हा पहिले पाढे पंचावन्न !
एखाद्याला पाच पन्नास डोक्यानी जाणता राजा उपाधी दिल्याने तो होत नाही !
एखाद्या जातीला / धर्माला निशाण्यावर न घेता किंवा लांगूलचालन न करता ती व्यक्ती सर्व समाजाला पुढे घेऊन जाणारी असावी ही किमान अपेक्षा असते.

इथे बोंबलायला दोन चार जिल्हे सोडले तर कथित जाणत्या राज्या बद्दल कौतुक करणारे कोणी सापडत नाही , तसेच ती व्यक्ती निष्कलंक असावी ! छळ कपट वैगरे करणारा नसावी या पण माफक अपेक्षा असतात Happy

तिकडे पवारांवर मध्यस्थी करायची वेळ आली.... याच्यावरुन ओळखा आता की हट्ट केव्हढ्याला पडतोय!
इतके करुन जर आरेत कारशेड करायची वेळ आली तर केव्हढी ही नामुष्की!

बाकी परवा चहयेद्या ला रोहित पवार, सुजय विखे आणि पंकजा मुंडे आल्या होत्या.... ते ज्या खेळीमेळीने एकमेकांशी वागत होते ते बघता इथल्या कट्टरवाद्यांची कीव येते Proud

इतके करुन जर आरेत कारशेड करायची वेळ आली तर केव्हढी ही नामुष्की! >>>>>>>
थोडक्यात सेनेच्या दोन्ही अवतारी नेत्यांना सांभाळता सांभाळता या साठीच मी केला का हा अट्टाहास म्हणण्याची वेळ काका वर येणार हे निश्चित !
सरकारी धोरणे राबविताना विरोधी पक्ष बरोबर वादविवाद होणे अपेक्षित असते !
पण प्रत्येक विषयात खाजवून खरूज आणणारे हे दोन्ही महाभाग हे सरकार एक दिवस स्वतःच पाडतील .

बाकी सद्ध्याचे सरकार केव्हा पडेल यावर पंचांग पाहुन, ग्रह-तारे बघुन, सत्ताधार्‍यांच्या अन विरोधकांच्याही कुंडल्या बघुन नामवंतांनी( Proud ) गेल्या वर्षभरापासुन फार बौद्धिके झाडली आहेत.. त्यात अजुन एकाची भर पडली म्हणुन काय फरक पडतो म्हणा..! Proud

बाकी चहाद्या बघुन कोणी मतदान करत असेल तर मैत नै ब्वा..!

अशवतथाम्याने रात्री लहान मुले ठार केली म्हणून त्याला देवाने शाप दिला

आरेत रात्री झाडे व घरटी पाडल्याबद्दल फडनविसलापण शाप मिळाला

आता त्यांचे लोक रोज ओरडत असतात , हे सरकार पडेल पडेल

>>साठीच मी केला का हा अट्टाहास<<

कदाचित सेनेला संपवायसाठीचाच अट्टाहास असावा..... माणूस पण बरोबर पेरुन ठेवलाय Proud

बाकी चहाद्या बघुन कोणी मतदान करत असेल तर मैत नै ब्वा..!>>>>>
कीप गोईंग !
गुळगुळीत शब्द न वापरता तुम्ही प्रतिसाद देताय Happy

बाकी फडणवीसांनी उल्लेखलेल्या उच्चाधिकार समितीच्या अहवालाबद्दल कुणी बोलायला तयार नाहिये!

कुणाला श्रेयवादावर बोलावेसे वाटतेय तर काही लोक मुंबईकरांच्या भोगण्याबद्दल टिप्पणी करतायत पण मुद्द्यावर बोलायला काही कुणाला जमेना!
Proud

अशवतथाम्याने रात्री लहान मुले ठार केली म्हणून त्याला देवाने शाप दिला>>>>>>≥>>
रस्त्यावर तोंडाला रंग लावून देव बनून भीक मागणाऱ्या लोकांना देवा बद्दल अस्था असते का ?

त्याने ते पोट भरण्या पुरते रूप घेतलेले असते !
तसे तुमचे काही आहे का ?
Happy
संदर्भासाठी सतत फक्त हिंदू धर्मातील उदाहरणे वापरता म्हणून विचारले हो !!!!!

कारशेड म्हणजे नक्की काय हे तरी माहित आहे का नाही कुणास ठाऊक रोज उठुन नवीन जागा सुचवणाऱ्यांना Proud

आरेमधे पूर्वीच्या ठिकाणीच कारशेड बांधावी, उठांनी कांजूरमार्गला रहायला जावे आणि मातोश्रीच्या जागी मियावाकी पद्धतीने जंगल उभारावे.

मुंबई:देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कांजुरमार्ग येथील मेट्रो कारशेड करिता निर्धारित असलेल्या जमिनीवर ११ जून २०१९ रोजी केंद्रातील मोदी सरकारच्या हाऊसिंग फॉर ऑल २०२२ या उद्दिष्टांकरिता एक लाख परवडणाऱ्या घरांचा शापूरजी पालनजी या बांधकाम व्यावसायिकाचा प्रस्ताव स्वीकारला. त्यावर अप्पर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीही गठीत केली. या जमिनीवर गरोडिया बिल्डरचा संबंध प्रश्नांकित असल्याने शापूरजी पालनजी यांच्याबरोबर गरोडियाने केलेला करार उच्च न्यायालयाने २०१६ साली रद्दबादल ठरवला होता. त्यामुळे सदर जमिनीवरील शापूरजी पालनजी यांचा संबंध नाही याचा विचारही न करता फडणवीस सरकारने सदर प्रस्ताव स्वीकारला कसा आणि एवढ्या उच्च स्तरीय अधिकाऱ्यांची समिती कशी गठीत केली? गरोडिया यांच्याबद्दल एवढा पुळका येण्यासाठी भाजपाचे तत्कालीन सरकार यातून काय व्यावसायीक हितसंबंध प्रस्थापित करणार होते. भाजप बिल्डरांचे एजंट म्हणून काम करत होता का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. मेट्रो-३ कारशेडच्या संदर्भात कांजुरमार्गचा आग्रह सोडा, असा शाहजोगपणाचा सल्ला फडणवीस महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला देत असताना त्यांच्याच सरकारने कांजुरमार्ग येथे निर्धारित केलेला मेट्रो-६ चा कारडेपो कुठे न्यायचा याबाबत ते मत का देत नाहीत, असा सवालही सावंत यांनी केला आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-metro-car-sh...

Pages