शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर !
आधी मी महाभारतातील कर्णावर झुंजत होतो ...

ओके, भूमितीतला कर्ण.... नाही सुचला.
मी धृतराष्ट्र - दुर्योधनाची इतर काही नावे आहेत का बघणार होते -- पांडव किंवा अर्जुनाचा शत्रू / दुस्वास करणार असे...
पार्थ *** स
पुढच्या पानावर आले तर उत्तर दिसले..

मलाही आधी महाभारतातील कर्ण च वाटला होता . पण 10 वि पर्यंत मराठी मध्ये भूमिती, बीजगणित शिकल्या मुळे अजून एक कर्ण (!) आठवला. तेव्हा हे शब्द किती वेगळे वाटायचे .

शब्दव्यूह आणि अंताक्षरी

खाली ओळीने १० शोधसूत्रे दिली आहेत. त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा) शोधायचा आहे. त्या अपेक्षित शब्दाचे शेवटचे अक्षर दिले आहे. आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:

• पहिला योग्य शब्द शोधल्यावर त्याचे शेवटचे (दिलेले) अक्षर घ्या.
• त्या अक्षराने सुरू होणारा दुसरा योग्य शब्द ओळखा.
• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे (दिलेले) अक्षर घेऊन तिसरा शब्द शोधा.
• असे क्रमाने खाली जात राहा.
• दहाव्या शब्दाचे शेवटचे अक्षर हे पहिल्या शब्दाचे सुरवातीचे अक्षर आहे. असे सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.
• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही समानार्थी पर्यायी शब्द काढलेत तरी अंताक्षरी जुळलीच पाहिजे. आणि शेवटी १ व १० ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या.
• १ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे क्रमाने एकेक सुटे चालेल.
…………………………………………………………

१. जरा आवाज लावला तर चेष्टा ..
.. तनाना
२. “ त्याला पैसे द्यावेत”. ( ४, शेवटी ग )

३. लबाड कुठला ( ४ , शेवटी ड)
४. काय भीती नका बाळगू ! (६, शेवटी न )

५. अधिकाऱ्याला खुश करण्यासाठी (७, शेवटी क )
६. काय बेक्कार आहे राव ( ६, शेवटी ट)

७. तेज सहन होईना.... (५, शेवटी त )
८. गाजवा अधिकार न काय (५, शेवटी त )

९. कठोर शिक्षा ( ५, शेवटी र )
१०. सदा कुरकुरतंय रडतराऊत

२. ना त ल ग
जुळतेयं पण पैशाचा काही संदर्भ लागत नाहीये.

७. तेज सहन होईना.... (५, शेवटी त ) ----- टळटळीत (दुपार)

९. कठोर शिक्षा ( ५, शेवटी र ) ----- तःळवेमार
(मागच्या कडेलोटवाल्या कोड्यासारखी शिक्षा असेल तर, नाहीतर बघावे लागेल.)

9 तळवेमार

ओह.कारवींनी लिहीलं होतं आधीच. मी पाहिलं नाही

आता...

२. “ त्याला पैसे द्यावेत”. ( ४, शेवटी ग )
३. लबाड कुठला ( ४ , शेवटी ड)

४. काय भीती नका बाळगू ! (६, शेवटी न )
५. अधिकाऱ्याला खुश करण्यासाठी (७, शेवटी क )

६. काय बेक्कार आहे राव ( ६, शेवटी ट)

८. गाजवा अधिकार न काय (५, शेवटी त )

देवकींचे --- ६ = कचराकस्पट, बरोबर की नाही?
२-८ यात काही अमराठी उगमाचे आहे का? की फक्त जुने मराठी?

विक्रम, नाही.

तहहयात >> अर्थ वेगळा आहे.
तुमचे बाकी शब्द मला तरी कोशात नाही दिसले.
असल्यास सांगा .
* ५ नजराणा >>> साधारण यातली अक्षरे जरा वेगळी करून पहा.

लबाड... बनावट नाही
कारण अंताक्षरी जुळणार नाही.
या धाग्यावर स्वागत !

अंताक्षरी नीट पाहा
................................
२. “ त्याला पैसे द्यावेत”. ( ४, ना * * ग )
३. लबाड कुठला ( ४ , ग * * ड)

४. काय भीती नका बाळगू ! (६, ड * * * * न )
५. अधिकाऱ्याला खुश करण्यासाठी (७, न * * * * * क )

६. काय बेक्कार आहे राव ( ६, क * * * * ट)

८. गाजवा अधिकार न काय (५, त * * * त )

८. गाजवा अधिकार न काय (५, शेवटी त ) ---- तहुकुमत? ( till the end of dominion या अर्थी.)

त हा उपसर्ग To, until, as far as; as long as, whilst; even to; in order (that), to the end (that); in such a manner (that) यासाठी असतो असे दिलेय)

तहुकुमत >>> हा अपेक्षित शब्द नाहीये.
'अधिकार' ला थेट महत्व आहे.
.....
तूर्त त्याला पर्यायी म्हणून बाजूला ठेऊ. तो नक्की 'मराठी' (कोशानुसार) आहे ना ?
नंतर तुलना करू.

Pages