Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओके, जनरल चिरफाड / कापाकापी..
ओके, जनरल चिरफाड / कापाकापी....
अक्षरसांगड खेळ
अक्षरसांगड खेळ
खाली दिलेल्या अक्षरांपासून( किमान तीन अक्षरी) असे 20 मराठी शब्द बनवा. त्यापैकी निदान 3 चार अक्षरी आणि ३ पाच किंवा अधिक अक्षरी असावेत.
खेळ सादर केल्यापासून 4 तासांनी उत्तर (शब्दयादी) जाहीर करूया. एकेक शब्द प्रतिसादात लिहू नका.
रि र ळ
क प का
णा शू म
..................................
हा खेळ नव्याने सोडविणाऱ्या लोकांसाठी याचे काही नियम :
१. सर्व शब्द सामान्य व मूळ स्वरुपात हवेत.
२. उघड विशेषनामे नकोत. (मुलामुलींची , गावांची नावे, इ.)
३. सर्व शब्द किमान ३ अक्षरी हवेत.
४. एकाच शब्दाचे एकवचन घेतले असल्यास त्याचे अनेकवचन चालत नाही.
५. एक शब्द करताना कुठलेही अक्षर एकदाच वापरा. पुढचा शब्द करताना ते अक्षर परत वापरू शकता.
६. जोडशब्द ( मध्ये – असलेले) नकोत.
७. दिलेल्या अक्षरांत ह्रस्वदीर्घ महत्वाचे आहे. ते तसेच ठेवावे.
.....................................................................
मी आहे आज, बहुतेक.
मी आहे आज, बहुतेक.
मी पण, कदाचित.
मी पण, कदाचित.
भा प्र वे १६०० वा. उत्तरे
उत्तरे कधीही लिहू शकता.
मी आता परतलो बाहेरून.
मी आता परतलो बाहेरून.
तास भर तरी लागेल उत्तर लिहायला.
रि र ळ
रि र ळ
क प का
णा शू म
कारळ, परळ, परशू, कळका, कारक, कमळ, परम, कळप, कळणा, मळका,
परिणाम, करशूळ(मस्तकशूळ सारखं)
रिकामपणा
पुणेकर छान मानव, सवडीने !
पुणेकर छान
मानव, सवडीने !
धन्यवाद. अजून काही सुचू शकतील
धन्यवाद. अजून काही सुचू शकतील पण आत्ता जरा जमणार नाही
परिमळ, करमळ शूरपणा परका
कापणावळ
परिमळ, करमळ शूरपणा परिकर
परका रपका मरळ कामळ पवळ
हीरा छान
हीरा छान
फक्त...
पवळ, कापणावळ >>> नाही, कारण 'व' दिलेला नाही.
हो संपादन करता करता तुमचा
हो संपादन करता करता तुमचा प्रतिसाद आला. पवळ सुध्दा नाही.
हो संपादन करता करता तुमचा
प्रकाटा
दोन वेळा पडला
वरणा (पावटा)
चुकीचा प्रतिसाद काढून टाकला
माझी यात एकच भर: परिणामकारक
माझी यात एकच भर: परिणामकारक
वा !
वा !
आता माझी फक्त वेगळी भर :
परिणामशूळ
मरकळ
मकाणा , मकर, कमर, रकम, मकार, रमणा
मला एकूण २२ जमले. त्यापेक्षा २-३ वेगळे वर आलेत.
धन्यवाद !
खाली दिलेल्या परिच्छेदामध्ये
खाली दिलेल्या परिच्छेदामध्ये १२ शब्द पुसून त्याजागी अंक घातले आहे अंक म्हणजे संबंधित शब्दाची अक्षरसंख्या हे सर्व शब्द एकाच शब्दाचे विविध अर्थ आहेत. ते सर्व शब्द ओळखल्यानंतर सर्वात शेवटी मूळ शब्द सांगावा.
………………………………………..
वरिष्ठ पदाचा (४) केल्यानंतर मी खुशीत होतो. मला हे अनपेक्षित होते. माझा मालक अत्यंत खडूस असणार अशी मी पक्की (४) करून घेतली होती. परंतु तो कधीतरी इतका चांगला वागेल याची मला (३) नव्हती. अर्थात माझी पदोन्नती ही केवळ त्याची कृपा नसून माझी (३) सुद्धा त्यासाठी उपयोगी पडली होती. माझ्या अन्य सहकाऱ्यांच्या दृष्टीने मात्र तो माणूस कायम (४) ठरला होता.
संध्याकाळी खुशीत बागेत गेलो तर एक बातमी समजली. तिथल्या त्या तळ्यातली (२) मरून पडली होती. चालायचेच, प्रत्येकाला अंत असतोच. पण तिथला माळी पक्का अंधश्रद्ध. म्हणाला, की या बागेच्या मागे एक (३) लागलंय खूप दिवसांपासून ! मी गप्प बसलो. अशा लोकांच्या नादी लागू नये कारण त्यांची (६) तेवढीच असते. पण जगात असलेच लोक जास्ती. समाजाला लागलेले हे अज्ञानाचे (३) कधीतरी संपेल काय ? आता विश्वातील (२) पहा. त्यांचे ते मस्तपैकी तालात असतात. त्यांचा व आपल्या आयुष्याचा काही संबंध नसतो. जेव्हा ही (३) सर्वांना येईल, तेव्हा खरे विज्ञानयुग हे नाव सार्थ होईल.
असा विचार करत बसलो तेव्हा खिडकीतून शेजारच्या घरातील संगीताचा सुरेख (२) ऐकू येत होता.
वरिष्ठ पदाचा (४)अंगीकार
वरिष्ठ पदाचा (४)अंगीकार केल्यानंतर मी खुशीत होतो. मला हे अनपेक्षित होते. माझा मालक अत्यंत खडूस असणार अशी मी पक्की (४) समजूत करून घेतली होती. परंतु तो कधीतरी इतका चांगला वागेल याची मला (३)कल्पना नव्हती. अर्थात माझी पदोन्नती ही केवळ त्याची कृपा नसून माझी (३)चिकाटी सुद्धा त्यासाठी उपयोगी पडली होती. माझ्या अन्य सहकाऱ्यांच्या दृष्टीने मात्र तो माणूस कायम (४) ठरला होता.
संध्याकाळी खुशीत बागेत गेलो तर एक बातमी समजली. तिथल्या त्या तळ्यातली (२)नक्र/ग्राह मरून पडली होती. चालायचेच, प्रत्येकाला अंत असतोच. पण तिथला माळी पक्का अंधश्रद्ध. म्हणाला, की या बागेच्या मागे एक (३) पिशाच्च लागलंय खूप दिवसांपासून ! मी गप्प बसलो. अशा लोकांच्या नादी लागू नये कारण त्यांची (६)आकलनशक्ति तेवढीच असते. पण जगात असलेच लोक जास्ती. समाजाला लागलेले हे अज्ञानाचे (३)ग्रहण कधीतरी संपेल काय ? आता विश्वातील (२)ग्रह?? पहा. त्यांचे ते मस्तपैकी तालात असतात. त्यांचा व आपल्या आयुष्याचा काही संबंध नसतो. जेव्हा ही (३)उमज सर्वांना येईल, तेव्हा खरे विज्ञानयुग हे नाव सार्थ होईल.
असा विचार करत बसलो तेव्हा खिडकीतून शेजारच्या घरातील संगीताचा सुरेख (२) ऐकू येत होता.
मानव, छानच !
मानव, छानच !
फक्त २ बाकी आहेत ..
तो माणूस कायम (४) तापदायी?
तो माणूस कायम (४) तापदायी? ठरला होता.
असा विचार करत बसलो तेव्हा खिडकीतून शेजारच्या घरातील संगीताचा सुरेख (२) ताल ऐकू येत होता.
मूळ शब्द : ग्रह
तापदायी >> पीडणारा ग्रह
तापदायी >> पीडणारा
ग्रह बरोब्बर !
धन्यवाद
११ अक्षरी मराठी वाक्प्रचार
११ अक्षरी मराठी वाक्प्रचार (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. जुन्या लेखनात तो सलग एकच शब्द असतो. (आता शुद्धलेखन नवे ठेवले आहे) त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही उपशब्दांची शोधसूत्रे अशी :
१०-२-१ भरीव
६७९ शेवट करण्याची आज्ञा
१०-८ पत्त्यांच्या खेळातील पान
३-५-७-११ सधन
७-११-४-५ स्त्रीला आवडणारे
संपूर्ण वाक्प्रचार = सुखाची रेलचेल
इतके साधे सरळ नसावे, तरीही -
इतके साधे सरळ नसावे, तरीही --
६७९ शेवट करण्याची आज्ञा --- संपव / संपवा
३-५-७-११ सधन --- लखपती
१० २ १: सकस
१० २ १: सकस
६ ७ ९: संपव
१० ८: सत्ती
३ ५ ७ ११: लखपती
७ ११ ४ ५: पतीसुख
सकलसुखसंपत्तीवसती
वा !
वा !
कारवी, मानव
दोघेही छान .
फडशा पडला ...
आज एकदम सरळसोट निघाले शब्द.
आज एकदम सरळसोट निघाले शब्द. दोन्ही बरोबर.
७ ११ ४ ५ पतीमुख धरून पुढे गेले त्यामुळे ११ अक्षरीवरून उलटे जाता आले नाही.
कारवी, बरोबर.
कारवी, बरोबर.
ते तयार करतानाच तसे जाणवले होते.
हा ११ अक्षरी प्रकार रोचक वाटला म्हणून घेतला.
जुन्या लेखनात यातल्या दोन्ही वेलांट्या ह्रस्व आहेत
कारवी, बरोबर.
दु प्र
आजच्या सकाळ मधल्या गूढमधील
आजच्या सकाळ मधल्या गूढमधील एकच अडले आहे.
कुणाला जमतय का बघा.
सूत्र आहे : कर्णाला प्रकाशझोतात आणणारा (६)
पा * * * * स
असे नक्की आहे.
( भास , प्रभास असे काही ??)
आता मला सुटलेय असे वाटते.
आता मला सुटलेय असे वाटते.
पण बघू तुमच्याकडून !
Pages