शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नरोटी >> नाही.
(= अर्धी करवंटी )

खट नाही व भाट नाही !

२३ दक्षिण भारतीय वाद्यविशेष …… घट

५६ राजा असून टोचणारा !
चार नऊ दहा : बैठ्या खेळातील लाकडी वस्तू

१३ गाठीचा प्रकार
७३ प्रिय पण लुच्चा !
४८ हवीहवीशी पण हानिकारक

संपूर्ण शब्द : एक तंत्रकुशल सल्लागार

चार नऊ दहा : बैठ्या खेळातील लाकडी वस्तू: नरद

१३ गाठीचा प्रकार : सुट
७३ प्रिय पण लुच्चा ! : विट
४८ हवीहवीशी पण हानिकारक: नशा

सुघटन??विशारद

विट आला नव्हता.
घट,नशा आले होते पण बाकीचे कळत नव्हते.

सुघटन??विशारद
Submitted by मानव पृथ्वीकर >>>>

सुघटन शल्य विशारद ( plastic / cosmetic surgeon )
५६ राजा असून टोचणारा ! -- शल्य असणार

विक्रम,
होय. झालंय ते. भाग १ संपलाय
आता २ घेता येईल ...

भाग २
वरील सल्लागाराची (सुघटनशल्यविशारद) कृती
********
आता हा ८ अक्षरी शब्द असा तयार करायचा आहे:

खाली एकूण ८ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून हा शब्द तयार करायचा.

सारीपाटावर
कानफाट्याच्या
प्रशस्तीपत्रक

दिव्यभाषेच्या
सदऱ्यावरती
सरदारकीमुळे

इच्छेविरुद्ध
आवरताना

सोपे करतो :
८ अक्षरीची ३ +५ अशी विभागणी :

सारीपाटावर, प्रशस्तीपत्रक, सरदारकीमुळे.
……………………………
कानफाट्याच्या
दिव्यभाषेच्या
सदऱ्यावरती
इच्छेविरुद्ध
आवरताना

( योग्य तो क्रम मात्र लावणे).

दुसर्‍या भागाला कोणी नाही?
कृती आहे म्हणजे हे ऑपरेशनशी संबंधितच काहीतरी
पण शल्य, चिकित्सा, क्रिया, सौंदर्य, वृद्धी -- ही अक्षरेच दिसत नाहीयेत.

वा!

शरीरव्यवच्छेदन ! कठीण होता अंदाज लावायला
मी सुघटनच्या आसपासच विचार करत राहिले ( केशरोपण चेहरा दात लेसर लिपोसक्शन यापैकी असावे वाटून)

'व्यवच्छेदक लक्षण' हा खास समीक्षकी शब्द आहे !
......................................
आपल्या खेळासाठी अधिक लांबीचे शब्द छान असतात. बऱ्याच व्यावसायिक इंग्लिश नावांचे भाषांतर केले की मग असे तयार होतात.

मागच्या एका खेळातील 'वास्तुसजावटकार' हा मी सह्याद्रीच्या बातम्यांत ऐकला होता.
आता कोणी ११-१२ अक्षरी काढा शोधून !

व्यवच्छेदक लक्षण वाचलेय.
मेडीकल-मराठी बहुतेक संस्कृतच्या आधारेच होतात.
शरीरव्यवच्छेदन = नेमके काय? गुगल ऑटोप्सी दाखवतोय.

गुगलकाकांकडून साभारः
व्यवच्छेदक - वि . व्यवच्छेद करणारा . व्यवच्छेद जीवनक्रिया - स्त्री . ( शाप . प्राणि . ) पृथक्करणपूर्वक अपचय . ( इं . ) कॅटॅबोलियम . व्यवच्छेदन - न . ( वैद्यक ) फाडाफाडी ; शस्त्रक्रिया .

हे पाहा :
शल्य :
६ शरीरांत राहिलेला (कांटा, सुई, बाण, इ॰ चा) अंश. [सं.] ॰तंत्र-शास्त्र-न. वैद्यकीय शस्त्रविद्या; शरीरांत असलेले आगंतुक पदार्थ कसे काढावे या विषयींचें शास्त्र; शरीरव्यवच्छेदन शास्त्र. [सं.]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF+

Pages