भोंदू फॉर्वर्ड्स ह्या धाग्यावर चर्चा अशी झाली की काही काही फॉर्वर्ड्स हे उगाच कुणाच्याही नावावर पसरवले जातात. ह्यातले सर्वच काही भोंदू असतात असं नाही, त्यामुळे हा वेगळा धागा तयार केला. तिथे चर्चिलेले काही फॉर्वर्ड्स आणि त्यात काही भर घालून हा धागा तयार करणेत येत आहे. आता ह्या लेखनात काही विनोद नाही, पण वाट्टेल ते साहित्य कुणाच्याही नावावर खपवणारे हे जे कुणी लोक आहेत, त्यांच्या विनोदबुद्धीला स्मरून हा धागा 'विनोदी लेखन' ह्या ग्रुपमध्ये तयार केला.
चुकीच्या नावाने फॉर्वर्ड झालेल्या साहित्यात बरेचसे साहित्य ह्या लोकांच्या नावावर आहे: पु ल, व पु, नाना पाटेकर, विश्वास नांगरे-पाटील, शेक्सपियर इत्यादी. जाणकारांनी यादीत अजून भर टाकावी.
खालीलपैकी फॉर्वर्ड्स तुम्ही देखिल पाहिले असतीलः
- 'नामधेयेन किम् फलम्' - महाकवी कालिदास
- "टॅलेंट च्या तांदळात परिश्रमाचे चिकन व प्रामाणिकपणाचा मसाला टाकला की यशाची बिर्याणी तयार होते " - डॉ अब्दुल कलाम.
एखादे गुलाबाचे चित्र. (विजय कुलकर्णी ह्यांच्या सौजन्याने)
- 'मी रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही' - शेक्सपियर (टवणे सरांच्या सौजन्याने)
- 'कॉलेजचे गेट, झाली तिथे भेट, घुसलीस मनात थेट - पुलंच्या कॉलेज जीवनातील कविता
- 'प्रेम बिम धोका आहे' - विश्वास नांगरे पाटील
आणखीन अनेक आहेत, कृपया भर टाकत जा.
(No subject)
मनसागराच्या तळाशी विचारांचा
मनसागराच्या तळाशी विचारांचा उद्रेक झाल्याशिवाय इच्छाशक्तीचा त्सुनामी उसळत नाही. - मुल्क राज आनंद
प्लंबर कितीही एक्सपर्ट असला तरी तो डोळ्यातलं पाणी नाही थांबवु शकत. - विल्यम वर्डस्वर्थ
१. अब्राहम लिंक यांनी
१. अब्राहम लिंक यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेले ते प्रसिद्ध पत्र हे "चुकीच्या नावाने होणारे फॉर्वर्ड्स" मध्ये प्रथम क्रमांकावर येईल असे वाटते. कारण गेली कित्येक दशके ते "फॉरवर्ड" होत आहे. इंटरनेट येण्याच्या सुद्धा खूप खूप आधी पासून. अगदी अलीकडे म्हणजे मागच्या काही वर्षात उलगडा झाला कि असे कोणतेही पत्र त्यांनी लिहिले नव्हते.
२. स्वमी विवेकानंद यांच्या शिकागो येथील त्या प्रसिद्ध भाषणाचे 'त्यांच्या आवाजातले रेकॉर्डिंग' सुद्धा काही वर्षांपूर्वी जोरदार फॉरवर्ड केले गेले. नंतर लक्षात आले कि भाषण त्यांचे असले तरी तो आवाज त्यांचा नाही. तेंव्हा अमेरिकेतसुद्धा इतक्या चांगल्या रेकॉर्डिंगची सोय नव्हती.
३. "६४० किलोबाईट्स मेमरी हि कुणालाही पुरेल इतकी आहे" असे बिल गेट्स यांनी म्हटल्याचे पंचवीसएक वर्षापूर्वी पसरले होते. नंतर एका मुलाखतीत त्यांनी स्वत:च "मीच काय तर संगणक क्षेत्रात काम करणारी कोणीही व्यक्ती असे कधीही म्हणणार नाही" असे स्पष्ट केले.
अब्राहम लिंक यांनी
अब्राहम लिंक यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेले ते प्रसिद्ध पत्र हे "चुकीच्या नावाने होणारे फॉर्वर्ड्स" मध्ये >> क्काय सांगता! अरेरे!! लहानपणी लिंकनबद्दल बाकी काही वाचलं नव्हतं, तरी त्यांचं हे लिखाण वाचलं आहे हा एक समज होता, जो एका फटक्यात 'गैर' झाला
अब्राहम लिंक यांनी
अब्राहम लिंक यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेले ते प्रसिद्ध पत्र हे "चुकीच्या नावाने होणारे फॉर्वर्ड्स" मध्ये प्रथम क्रमांकावर येईल असे वाटते.>>>
अरे बापरे !! ते तर शाळेतच छान फ्रेम वगैरे करून लावलेले असायचे!
प्लंबर कितीही एक्सपर्ट असला
प्लंबर कितीही एक्सपर्ट असला तरी तो डोळ्यातलं पाणी नाही थांबवु शकत. - विल्यम वर्डस्वर्थ >>>>> खरं आहे... कुणी का म्हणलं असेना...
प्लंबर कितीही एक्सपर्ट असला
प्लंबर कितीही एक्सपर्ट असला तरी तो डोळ्यातलं पाणी नाही थांबवु शकत. >> हा दवणीय वर्डस्वर्थ वाटतो
अब्राहम लिंकनच्या वरच्या
अब्राहम लिंकनच्या वरच्या फोरवर्ड मध्ये अजून एक शोध लागला असता की त्यावेळी इंटरनेट होते पण तुम्ही हाणून पाडला..
प्लंबर ...
स्वामी विवेकानंद यांचा आवाज मीही भक्तिभावाने ऐकला....
इथे नवकवी काळजाला हात घालणारी निर्मिती करतात कुणाला काही किंमत नाही
नरेंद्र दाभोलकरांच्या नावाने
नरेंद्र दाभोलकरांच्या नावाने एक निर्भीड कविता या नावाखाली एक विद्रोही चळवळीतील एक कविता फिरत होती.
मुर्त्यांना पुजण्यापेक्षा, माणूसकिला पूजतो मी !
काल्पनिक देवांना न मानता, फुले,शाहू,आंबेडकरांना वाचतो मी !
छाती ठोकून सांगतोय, असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी !
.
.
.
महाराष्ट्र अंनिस ने याचा खुलासा केला होता की दाभोलकरांनी कुठलीही कविता केलेली नाही. तरी ते फॉरवर्ड फिरत राहतात. कुठे कुठे खुलासा करत राहणार?
मेलो हसून एकेक कोट्स वाचून.
मेलो हसून एकेक कोट्स वाचून. आधी काही वाचले होते त्यामुळे वर्ड्स्वर्थ सगळ्यात धमाल वाटले.
अब्राहम लिंक यांनी
अब्राहम लिंक यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेले ते प्रसिद्ध पत्र आमच्या शाळेत स्टाफ रूमच्या भिंतीवर अगदी छान अक्षरामधे लिंकन यांच्या चित्रासह आहे....बापरे
संदीप खरेच्या नावाने काय
संदीप खरेच्या नावाने काय वाट्टेल त्या कविता येतात.... त्या जर त्याने वाचल्या तर लिहणेच सोडून देइल बहुदा!
मागच्या सप्टेंबर महिन्यात हा
मागच्या सप्टेंबर महिन्यात हा किस्सा व्हाट्सप आणि फेसबुकवर जोरदार व्हायरल झाला होता...
-------
स्वर कोकिला, स्वर साम्राज्ञी, लता मंगेशकर के जन्मदिन खास...
एक बार किशोर दा ने लता दीदी से सहज ही पूछ लिया कि लता तुम्हें मेरा कौनसा गाना सबसे ज़्यादा पसंद है.. इस सवाल पर लताजी मुस्कुरायी और बोली गाकर सुनाऊं या ऐसे ही बताऊँ.. किशोर दा बोले मुझे गाकर ही सुनाओ.. लताजी बोली आज नहीं सुनाती..अब मैं तुम्हें ..तुम्हारा ही गाना रिकॉर्ड कर ही भेजूँगी.. कुछ दिनों बाद लता दीदी ने मशहूर HMV रिकॉर्डिंग कंपनी से संपर्क किया और फिर जो गाना रिकॉर्ड किया उसे आप भी सुनें..यादों को खंगालते हुए लीना जी बताती है कि संयोगवश लताजी ने जिस दिन ये गाना किशोर दा को भेजा उस दिन लताजी का खुद का जन्मदिन ही था.. उन्होंने बताया कि किशोरदा हमेशा लताजी को उनके जन्मदिन के पर टेलीफ़ोन या व्यक्तिगत जैसा मौका मिलता था.. बधाई ज़रूर देते थे.. उस दिन भी जब किशोर दा ने फ़ोनपर बधाई दी तो .. लताजी बोली कि दादा आज मैं आपको मैंरे जन्मदिन की रिटर्न गिफ़्ट भेज रही हूँ..बतानाा ज़रूर कैसा लगा, लताजी ने वायदे के मुताबिक़ किशोर दा को जो शानदार रिर्टन गिफ़्ट... भेजा वो था किशोर दा का ही गया हुआ बेहतरीन नग़मा... जिसे लता मंगेशकर ने अपनी आवाज़ में रिकॉर्ड कर भेजा था..
जानते हैं वो कौनसा गाना था...
“ ये जीवन है... इस जीवनन का यही है रंग रूप”
-------
एकंदर हा किस्सा वाचूनच मला शंका आली. अशा कॉलेजच्या मुलांसारख्या गप्पा मारतील का हे थोर गायक एकमेकांशी? ये जीवन है हे गाणे किशोरकुमार यांनी व्यावसायिक चित्रपटासाठी गायिले आहे. अशी गाणी स्टुडीओ मध्ये रेकॉर्ड करताना व्यायसायिक करार असतात. अटी असतात. याशिवाय रेकॉर्डिंग साठी तांत्रिक मदत करणारी टीम, वाद्यवृंद, व इतर बराच लवाजमा असतो. गाण्याचे रेकॉर्डिंग दिवसभर चालत असे. त्यांनतर त्याचे प्रोसेसिंग फिनिशिंग करावे लागते. तेंव्हा कुठे ते बाजारात येण्यासाठी सज्ज होते. त्यामागे अनेक तंत्रज्ञ, कलाकार यांची मेहनत असते. HMV मध्ये लता मंगेशकरांनी फोन केला आणि गाणे रेकॉर्ड करून किशोरकुमार यांना पाठवले? खाऊ आहे का?
प्रत्यक्षात हे गाणे लता मंगेशकर यांच्या १९९२ किंवा १९९४ साली प्रसिद्ध झालेल्या श्रद्धांजली अल्बम मधले आहे. त्यात त्यांनी किशोरकुमार यांच्या या गाण्यासोबत तत्कालीन इतरही गायकांचीही विविध गाणी गायिली आहेत. असा कोणताही प्रसंग घडल्याचे अधिकृत उल्लेख कुठेही नाहीत.
सलील चौधरी यांच्याबद्दल अशीच
सलील चौधरी यांच्याबद्दल अशीच एक काल्पनिक कथा वेगवेगळ्या भाषांत भाषांतरित होऊन जालावर फिरत होती. पुढे ती कथा मुद्दामून लिहिली आहे आणि काल्पनिक आहे असा खुलासा मूळ लेखकाने करून ती मूळ ठिकाणावरून काढून टाकली, पण ती अजून जालावर्/व्हॉतसॅपवर फिरतेच आहे. मुळात अशी ही काल्पनिक कथा सलील चौधरी यांच्यावर रचलीच का हे कळत नाही. उगाच किडे!
संदीप खरेच्या नावाने काय
संदीप खरेच्या नावाने काय वाट्टेल त्या कविता येतात >> त्याच्या ओरिजिनल कविता पण मला तश्याच वाटतात, हेमावैम
माझ्या https://www.maayboli
माझ्या https://www.maayboli.com/node/33570 या लेखातील मजकूर तोडून ८-१० नवीन धागे केलेे दिसताहेत। तेही माझे नाव न लिहिता? प्रत्याधिकार अधिकार मायबोली ॲडमिन टिमच तोडणार का?
चुकीच्या नावाने लेख इथल्या इथे ॲडमिन टिमच करतेय याचं काय करायचं????
चुकीच्या नावाने केलेल्या
चुकीच्या नावाने केलेल्या फॉरवर्डच्या धाग्यात चुकीच्या धाग्यावर केलेला प्रतिसाद. असो, तुम्हाला योग्य तो न्याय मिळो ही सदिच्छा.
>>हेमावैम Wink Lol
>>हेमावैम Wink Lol
हो.... असतात असेही लोक
अवल अहो धागा चुकतोय तुमचा...
अवल अहो धागा चुकतोय तुमचा...
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/77402
चूक दुरुस्त केलीय ॲडमिन टिमने
योग्य त्याच सर्व धाग्यांवर टाकलेलं। म्हणूनच चटकन हालचाल झालीआहे। प्लिज नोट
अवांतर.
अवांतर.
नवीन Submitted by लावण्या on 5 December, 2020 - 23:16
<<
हे युजरनेम लावण्ण्या असे वाचण्या ऐवजी लावणी/लावणे चे अनेकवचन/रीती वर्तमानकालीन रुप वगैरे वाटते
आ.रा.रा. माहिती बद्दल धन्यवाद
आ.रा.रा. माहिती बद्दल धन्यवाद, आता कसे बदलायचे?
बदलायची गरज नाही. शहर पुण्यात
बदलायची गरज नाही. शहर पुण्यात आणि पाप-पुण्यात उच्चार जसे वेगळे आहेत, तसंच तुमचं आहे. ह्या शब्दांत उच्चार बदलले तरी स्पेलिंग एकच आहे.
लावण्या माझ्याकडून तरी बरोबरच
लावण्या माझ्याकडून तरी बरोबरच वाचले जातेय.
लावण्यवती हा शब्द सुद्धा नेहमी योग्यच वाचला जातो.
मोरेल ऑफ द स्टोरी - बदलायची गरज नाही.
हरचंद पालव,ऋन्मेऽऽष धन्यवाद
हरचंद पालव,ऋन्मेऽऽष धन्यवाद
*शेवटी अंतर तेवढचं राहीलं !*
*शेवटी अंतर तेवढचं राहीलं !*
लहानपणी, लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं... आपण ही खावं..., ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाहीं...
मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली...
*शेवटी अंतर तेवढच राहीलं!*
लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे...
मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले... सुती कपडे महाग झाले.
*शेवटी अंतर तेवढच राह्यलं!*
लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची,... शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची...
मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले...
*शेवटी अंतर तेवढच राह्यलं!*
लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी गुळाचा, काळा चहा मिळायचा... अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो... वाटायचं आपणही प्यावा पण ?
आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत.
*शेवटी अंतर तेवढच राह्यलं!*
लहानपणी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चार चाकी मधून फिरताना बघायचो, वाटायचं, आपणही फिरावं, आता सकाळी सकाळी सर्वांना सायकल वरून व्यायाम करताना बघितले की वाटत...
*शेवटी अंतर तेवढंच राहीलं!*
लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी, चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं...
आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी हॉटेल मध्ये पैसे मोजून रांगा लावताना बघितलं की वाटत...
*शेवटी अंतर तेव्हढच राहीलं!*
लहानपणी शेतात झोपडीत राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही मोठ्या घरात राहावं, आज तेच लोक मनशांती साठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत (रिसॉर्ट) मध्ये राहतात तेंव्हा वाटत...
*... शेवटी अंतर तेव्हढच राहीलं ... !*
_आता कळलं...हे अंतर असंच कायम राहणार, मग मनाशी पक्क केलं जसा आहे, तसाच राहाणार... कुणाचं पाहून बदलणार नाही..._
म्हणून तर *जगद्गुरु तुकोबारायांनी* म्हंटले होते ,
*_ठेविले अनंते तैसेचि राहावे,_*
*_चित्ती असू द्यावे समाधान ..._*
*कारण, शेवटी अंतर सारखाच राहत...!*
आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्यांशी करून आपला स्वभाव बदलू नका, चांगल्या गोष्टी शिका, वाचा, life एंजॉय करा.
शेवटी जीवनात माणल तर सुख आहे.
अन्यथा आयुष्यभर दुःखात राहावं लागेल!
म्हणून -------
व
*या जन्मावर या जगण्यावर.. शतदा प्रेम करावे...*
(No subject)
मी लवकर झोपून उशिरा उठतो कारण
मी लवकर झोपून उशिरा उठतो कारण माझी स्वप्न खूप मोठी आहेत- बिल gets
(No subject)
इच्चूकाटा, ते साहित्य
इच्चूकाटा, ते साहित्य कुणाच्या नावावर आलं आहे म्हणे?
Pages