मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..) Landscape Photography..

Submitted by अ'निरु'द्ध on 18 October, 2020 - 08:31

मुखपृष्ठ :

मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)

मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)
Landscape Photography..

फोटोग्राफीला आपण सुरुवात करतो त्यात सुरुवातीला बहुतेक सगळ्यांचा सगळ्यात जास्त आवडता प्रकार असतो तो म्हणजे निसर्ग दृश्य किंवा लँडस्केप फोटोग्राफी.
(हल्ली हे स्थान सेल्फीने पटकावलेले आहे. Wink )

जेव्हा आपण कुठेही फिरायला जातो तेव्हा ही निसर्गृश्य जास्त प्रमाणात क्लिक केली जातात, याचं कारण असं की..
फोटो काढण्यासाठी ती सहज उपलब्ध असतात…
स्थिर असतात..
डोळ्यांना, मनाला आनंद देतात…
आपल्या सहलीच्या स्मृती अगदी सहज जिवंत ठेवतात..
इतरांना दाखवायला आणि त्यांनाही बघायला आवडतात..
ह्या सृष्टी सौंदर्याच्या आवडीशी आपली एक नैसर्गिक नाळ जोडली गेलेली असते..

ह्या धाग्यामधे आपण आपली अशीच विविध निसर्गदृश्य देऊ या, पाहू या..

ह्या निसर्गचित्रात (लँडस्केप) मधे काय असेल..
तर.. कुठलाही डोंगर, टेकडी, तलाव, नदी, समुद्र, समुद्रकिनारा, जंगल, कुरण, वनश्री, बर्फाच्छादित प्रदेश आणि अगदी वाळवंटही..
अशा गोष्टींची नयनरम्य प्रकाशचित्रं (दूरचित्र/ Long Shots..) असतील..
लहानपणी आपण डोंगर, नदी, गावं, छोटी छोटी घरं असं चित्र काढायचो, तसे फोटोही चालतील..

सूर्योदय आणि सूर्यास्त हे ही खरं तर यातच मोडतात पण त्यासाठी आपला वेगळा धागा आहेच.

Wild Life Photography चे Long Shots ही खरं तर निसर्गदृश्यात मोडू शकतात पण ते ही आपण शक्यतो टाळणार आहोत.

निसर्गाचित्र/दृश्य ही निसर्गाशी संबंधित असली तरी निसर्गामधलं एकटं झाड, झुडूप, फळ, फुल, फुलं यांचे क्लोजअप्स यात मोडणार नाहीत.

आपलं प्रकाशचित्रं देताना त्याचं ठिकाण तर सांगाच..
पण त्या ठिकाणाची, फोटो काढतानाची काही खास आठवण असेल तर ती ही जरुर सांगा..
मग ती आपली शाळेची/काॅलेजची सहल असेल, मधुचंद्राच्या वेळी गेलेल्या हिल-स्टेशनचे फोटो असतील (दुसरा, तिसरा मधुचंद्रही चालेल कारण त्यावेळेला कदाचित फोटोग्राफीकडे आपलं जास्त लक्ष असेल Wink ) किंवा जिवलग मित्रांसोबतचं धमाल गेट टुगेदर असेल..
काही जण ट्रेकला गेले असतील किंवा काही एकांडे शिलेदार एकटेच अन-वाईंड व्हायला..

त्या तेव्हाच्या आठवणी या धाग्याच्या निमित्ताने पुन्हा जाग्या होतील..

हे फोटो काढताना काही स्पेशल सेटींग्ज वापरली असतील, कुठले फिल्टर्स वापरले असतील तर ते ही जरुर कळवा..
अशा फोटोग्राफीच्या काही टिप्स आणि/अथवा ट्रिक्स असतील तर जाणकारांनी त्याबाबत इथे मार्गदर्शन केलं तर नवोदित फोटोग्राफर्सना नक्कीच त्यातून काही घेण्यासारखं असेल..

फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1

आणि सर्वात महत्वाचं : हा धागा फक्त बेफाट सुंदर फोटो काढणाऱ्यांसाठीच नाही, तर सर्व मायबोलीकरांसाठी आहे.

हल्ली बहुतेकांकडे कॅमेरे असतील.
सगळ्यांकडे मोबाईल तर असतोच ज्यामधूनही चांगले चांगले फोटो येतात.
ते बिनधास्त इथे द्या. शेवटी बघणारे सर्व आपलेच मायबोलीकर असणार आहेत.

कधी फोटो सुंदर असेल, कधी त्याच्या आठवणी सुंदर असतील.. तर कधी दोन्हीही सुंदर असेल..

तेव्हा निसर्गदृश्याचे प्रचि आणि आठवणी द्यायला विलंब करु नका..
(आणि जरी सर्व निसर्गचित्र/दृश्य "Landscape" या Term ने ओळखली जातात आणि म्हणून बहुतांशी Landscape म्हणजे आडव्या Format असतात तरी उभ्या स्वरुपातल्या निसर्गदृश्यांचही स्वागत आहे..)

नमुना प्रचि :

काबो-दे-रामा किल्ल्यावरुन बेतिलबेतिम (South Goa) ला परत येणाऱ्या रस्त्यावर ही खाडी लागली.
पुलावरुन (Assolna Bridge बहुतेक) गाडी चालली होती, सूर्य मावळतीला आला होता आणि पुलावरुन जाताना सहज खाली नजर गेली तर ही एवढी नारळाची झाडं हारीने उभं राहून पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब निरखत होती...


टीप : मायबोलीच्या प्रकाशचित्रांविषयक धोरणानुसार :

इथे दिलेले प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे.

सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.

सर्व प्रकाशचित्रे स्वतःची असावीत. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहायला मिळेल - https://www.maayboli.com/node/47635?page=4

या धोरणाचे कृपया पालन करावे..

तसेच "ज्यांना मायबोली.सीसी या किंवा अशा उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यानी कृपया हा फोटो मी प्रताधिकार मुक्त करत आहे असे फोटोखाली लिहा." अशी वेमांची सूचना आहे..
त्याचा विचार व्हावा..

(मी या धाग्यावरचे माझे प्रचि प्रताधिकार मुक्त करित आहे..)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@सीमंतिनी
लुइझियाना फोटो मस्तच... पहिला तर फारच आवडला. ती बोट बुडते आहे काय, काही लेजेन्ड आहे का ...
@अतुल रोहिडेश्वर परिसर सुंदर !

संपूर्ण धामापूर देवळाचं लांबून धामापूर तलावाच्या बाजूच्या काठावरुन दिसणारं दृश्य...

जबरी फोटो आहेत सगळे!

नॉर्वे हा Fjords चा देश असल्यामुळे boat ferries भरपूर आहेत. लांब कुठे फिरायला निघालं की मधे ferries लागतातच हमखास, मग कार बोटीवर चढवून दुसर्‍या बाजूला जाउन रस्ता पुढे चालू. उन्हाळ्यात फिरताना काही ferries मधून काढलेले हे फोटोज:

Car ferry Kaupanger - Gudvangen

Fresvik

Nærøyfjord

हा खाली फोटोत बोगदा दिसतोय तो आहे Røldal Tunnel, Røldal, Norway गावाकडे जाणारा:

हा बोगदा ज्या डोंगराखालून जातो, त्या डोंगरावरुन जाणारा जुना अरुंद रस्ता पण आहे, बोगदा बांधण्यापूर्वी वापरात असलेला. एका नॉर्वेजीयन कलीगने सांगितलं की तो रस्ता मस्त आहे आणी पहाटे उठून जा म्हणजे डोंगराच्या माथ्यावरुन एक जबरी हाईक आहे तो करता येईल. 'पहाटे उठून' या शब्दांपाशी आमच्यासाठी विषय संपला होता, पण निदान नुसतं फिरत जावं म्हणून गेलो तर कमाल सुंदर रस्ता निघाला. सगळे जनरली बोगद्यातून जातात त्यामुळे डोंगरात फक्त आम्हीच होतो, निवांत थांबत जाता आलं.

जुलै महीना होता, त्यामुळे मस्त उन होतं सगळीकडे. मात्र डोंगरात माथ्यावर बर्‍यापैकी बर्फ होताच:

सिंहगड वरून फोटो काढून येत होतो. खडकवासल्याला थांबलो आणि समोरचं दृश्य पाहून कॅमेऱ्यावर लगेच हात गेला. मस्त कपल बसलेलं आहे , शांत पाणी आणि त्यावर तरंग आहेत आणि मागे अफाट सुंदर स्काय . कसे वाटले सांगा
Landscape - Khadakwasla.jpg

खडकवासला आवडीचे ठिकाण आहे..पुण्यात असताना खूप वेळा जायचे...
ते उद्गारवाचक वाक्य होते Happy .... सुरेख क्लिक आहे म्हणून..

>> हे खडकवासला आहे?. खुपच सुंदर फोटो…

+१११ अमेरिकेतला खडकवासला वाटतो. जसे आपल्याकडे दगडीपूल उद्यान आणि तिकडे Stonebridge Park तसे काहीसे. Happy
एक नंबर झकास क्लिक !

रोहिडेश्वर पायथ्याशी एक जंगल रिसॉर्ट आहे. तिथून टिपलेले हे अजून एक छायाचित्र. कॉटेजच्यावर थोडासा उजवीकडे छोटूस्सा दिसतोय तो रोहिडेश्वर किल्ला. इथून साधारणपणे एक किमी अंतर असेल. पण वर जाण्यासाठी गाडी रस्ता नाही. एक तास चालावे लागते असे कळले.

हे छायाचित्र पॅनोरॅमिक आहे. नवीन टॅब मध्ये ओपन केले तर संपूर्ण मोठे पाहता येईल. खरेतर तो परिसरच इतका छान आहे कि कॅमेऱ्यात ते सौंदर्य मावत नाही. त्यातही माझा मोबाईल कॅमेरा असल्याने फार बारकावे आलेले नाहीत कि जे प्रत्यक्षात विलोभनीय आहेत. तरीही हा एक केवळ प्रयत्न...

दिसला आता, टुमदार घर आणि भोवती असा निसर्ग. मला हा फोटो पाहून केंजळगड ची आठवण झाली. रायरेश्वराच्या माथ्यावरून असाच केंजळगड / कमळगड दिसतो. माझ्याकडे उन्हाळ्यातले फोटो आहेत तिथले. त्यामुळं हिरवंगार नाही, उजाड डोंगर आहेत. पण ती भव्यता फार सुरेख , कितीही वेळ बघत बसलं तरी रायरेश्वर हुन उतरताना मन कष्टी होतं.

पुन्हा पुन्हा पहावीत अशीच छायाचित्रे. एकापेक्षा एक सरस. सगळ्या छायाचित्रकारांचे मनःपूर्वक आभार.

Landscape - Mulshi.jpg
~ Serene ~

एक दिवस निघालो फिरायला, मुळशी च्या बाजूला..कुठे जायचे/थांबायचे काहीच नक्की नव्हते..एका जागी आलो, छोटा पूल होता आणि पाणी वाहत होतं, म्हटलं इकडे जरा बरं वाटतंय, गाडी लावली...थोडं चाललो , काही लोकं दिसली, विचारले पाण्याकडे जाता येते का..ते म्हणाले असेच सरळ जा..चालत निघालो 5 मिनिटात पोहोचलो आणि एकदम सुंदर जागी आलो..छोटासा पण सुंदर जलाशय, थांबलो, फर्मास मधला चहा पीत बसलो..पाण्यात मासे मस्त उड्या मारत होते, म्हशी अंघोळ करत होत्या, खंड्या मासेमारी करत होता..ह्या व्यतिरिक्त काहीच आवाज नाही..मस्त शांतता.. आणि हळू हळू सूर्य अस्ताला जाऊ लागला..आणि मग मी ही फ्रेम कॅमेऱ्यात पकडली..शांत पाणी, लांबवर सहयाद्रीचा पर्वत, त्याचे प्रतिबिंब, एका बाजूला सूर्याचा प्रकाश..सुंदर जागा..

Pages

Back to top