
मुखपृष्ठ :
मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)
मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)
Landscape Photography..
फोटोग्राफीला आपण सुरुवात करतो त्यात सुरुवातीला बहुतेक सगळ्यांचा सगळ्यात जास्त आवडता प्रकार असतो तो म्हणजे निसर्ग दृश्य किंवा लँडस्केप फोटोग्राफी.
(हल्ली हे स्थान सेल्फीने पटकावलेले आहे. )
जेव्हा आपण कुठेही फिरायला जातो तेव्हा ही निसर्गृश्य जास्त प्रमाणात क्लिक केली जातात, याचं कारण असं की..
फोटो काढण्यासाठी ती सहज उपलब्ध असतात…
स्थिर असतात..
डोळ्यांना, मनाला आनंद देतात…
आपल्या सहलीच्या स्मृती अगदी सहज जिवंत ठेवतात..
इतरांना दाखवायला आणि त्यांनाही बघायला आवडतात..
ह्या सृष्टी सौंदर्याच्या आवडीशी आपली एक नैसर्गिक नाळ जोडली गेलेली असते..
ह्या धाग्यामधे आपण आपली अशीच विविध निसर्गदृश्य देऊ या, पाहू या..
ह्या निसर्गचित्रात (लँडस्केप) मधे काय असेल..
तर.. कुठलाही डोंगर, टेकडी, तलाव, नदी, समुद्र, समुद्रकिनारा, जंगल, कुरण, वनश्री, बर्फाच्छादित प्रदेश आणि अगदी वाळवंटही..
अशा गोष्टींची नयनरम्य प्रकाशचित्रं (दूरचित्र/ Long Shots..) असतील..
लहानपणी आपण डोंगर, नदी, गावं, छोटी छोटी घरं असं चित्र काढायचो, तसे फोटोही चालतील..
सूर्योदय आणि सूर्यास्त हे ही खरं तर यातच मोडतात पण त्यासाठी आपला वेगळा धागा आहेच.
Wild Life Photography चे Long Shots ही खरं तर निसर्गदृश्यात मोडू शकतात पण ते ही आपण शक्यतो टाळणार आहोत.
निसर्गाचित्र/दृश्य ही निसर्गाशी संबंधित असली तरी निसर्गामधलं एकटं झाड, झुडूप, फळ, फुल, फुलं यांचे क्लोजअप्स यात मोडणार नाहीत.
आपलं प्रकाशचित्रं देताना त्याचं ठिकाण तर सांगाच..
पण त्या ठिकाणाची, फोटो काढतानाची काही खास आठवण असेल तर ती ही जरुर सांगा..
मग ती आपली शाळेची/काॅलेजची सहल असेल, मधुचंद्राच्या वेळी गेलेल्या हिल-स्टेशनचे फोटो असतील (दुसरा, तिसरा मधुचंद्रही चालेल कारण त्यावेळेला कदाचित फोटोग्राफीकडे आपलं जास्त लक्ष असेल ) किंवा जिवलग मित्रांसोबतचं धमाल गेट टुगेदर असेल..
काही जण ट्रेकला गेले असतील किंवा काही एकांडे शिलेदार एकटेच अन-वाईंड व्हायला..
त्या तेव्हाच्या आठवणी या धाग्याच्या निमित्ताने पुन्हा जाग्या होतील..
हे फोटो काढताना काही स्पेशल सेटींग्ज वापरली असतील, कुठले फिल्टर्स वापरले असतील तर ते ही जरुर कळवा..
अशा फोटोग्राफीच्या काही टिप्स आणि/अथवा ट्रिक्स असतील तर जाणकारांनी त्याबाबत इथे मार्गदर्शन केलं तर नवोदित फोटोग्राफर्सना नक्कीच त्यातून काही घेण्यासारखं असेल..
फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1
आणि सर्वात महत्वाचं : हा धागा फक्त बेफाट सुंदर फोटो काढणाऱ्यांसाठीच नाही, तर सर्व मायबोलीकरांसाठी आहे.
हल्ली बहुतेकांकडे कॅमेरे असतील.
सगळ्यांकडे मोबाईल तर असतोच ज्यामधूनही चांगले चांगले फोटो येतात.
ते बिनधास्त इथे द्या. शेवटी बघणारे सर्व आपलेच मायबोलीकर असणार आहेत.
कधी फोटो सुंदर असेल, कधी त्याच्या आठवणी सुंदर असतील.. तर कधी दोन्हीही सुंदर असेल..
तेव्हा निसर्गदृश्याचे प्रचि आणि आठवणी द्यायला विलंब करु नका..
(आणि जरी सर्व निसर्गचित्र/दृश्य "Landscape" या Term ने ओळखली जातात आणि म्हणून बहुतांशी Landscape म्हणजे आडव्या Format असतात तरी उभ्या स्वरुपातल्या निसर्गदृश्यांचही स्वागत आहे..)
नमुना प्रचि :
काबो-दे-रामा किल्ल्यावरुन बेतिलबेतिम (South Goa) ला परत येणाऱ्या रस्त्यावर ही खाडी लागली.
पुलावरुन (Assolna Bridge बहुतेक) गाडी चालली होती, सूर्य मावळतीला आला होता आणि पुलावरुन जाताना सहज खाली नजर गेली तर ही एवढी नारळाची झाडं हारीने उभं राहून पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब निरखत होती...
टीप : मायबोलीच्या प्रकाशचित्रांविषयक धोरणानुसार :
इथे दिलेले प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे.
सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
सर्व प्रकाशचित्रे स्वतःची असावीत. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहायला मिळेल - https://www.maayboli.com/node/47635?page=4
या धोरणाचे कृपया पालन करावे..
तसेच "ज्यांना मायबोली.सीसी या किंवा अशा उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यानी कृपया हा फोटो मी प्रताधिकार मुक्त करत आहे असे फोटोखाली लिहा." अशी वेमांची सूचना आहे..
त्याचा विचार व्हावा..
(मी या धाग्यावरचे माझे प्रचि प्रताधिकार मुक्त करित आहे..)
कोकणात जाणाऱ्या वाटेतला
कोकणात जाणाऱ्या वाटेतला गोरेगाव ते म्हसळा हा पॅच मला खूप आवडतो. वळणावळणाचा रस्ता, दोन्ही बाजूला दाट झाडी, एका बाजूला दरी, दरीत दिसणारी उंचच्या उंच झाडं, झाडांवरची मधाची पोळी हे तिथलं नेहमीचं दृश्य.
हा फोटो गेल्या वर्षीच्या मे महिन्यात म्हसळ्याकडून गोरेगावकडे येताना काढला होता.
काय सुंदर फोटो आहेत सगळे.
काय सुंदर फोटो आहेत सगळे.
जर मला विचारलं तुला भारतात
जर मला विचारलं तुला भारतात पुन्हा कुठल्या ठिकाणी फिरायला जायला आवडेल तर मी अंदमान निकोबार बेटाचं नाव घेईन. अंदमान म्हटलं की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि निळे, स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारे हेच डोक्यात येतं.
भारतीय चलनातील २० रुपयांच्या नोटेवर असलेला फोटो म्हणजे अंदमान बेटावरील हे नयनरम्य ठिकाण..
तेथील देखाव्याचा फोटो कॅमेरात बंदिस्त करण्याचा छोटासा प्रयत्न...
१.

जम्मू- कश्मीर, लेह- लडाख
जम्मू- कश्मीर, लेह- लडाख ट्रीपमध्ये पतींनी काढलेले निसर्गाचे फोटो
१.
२.
३.
अंदमानच्या समुद्रातून बोटीतून
अंदमानच्या समुद्रात बोटीतून घेतलेला समुद्राचा फोटो
चित्र १
चित्र २
हर्पेन अगदी सुरेख फोटो. मनात
हर्पेन अगदी सुरेख फोटो. मनात जाउन आले तिथे. क्रिस्प ऊन व चुकार वासरु. पागोटेवाले म्हातारबाबा. झाडे. आहाहा!!! अशा क्रिस्प दुपारींचे मला विलक्षण आकर्षण आहे. सुगंध असतो दुपारला. उन्हाचा वास असतो मस्त.
अवल मस्त आहे फोटो.
हर्पेन, वासोट्याचा फोटो
हर्पेन, वासोट्याचा फोटो अप्रतिम.. गूढ वाॅटरस्केप अगदी..
आणि मोहरीचं शेतही मस्त.. सरसोंकी खेती..
अवल, फाॅल कलर्स मस्तच.. भोगवे ही छान..
स्वरुप, पंगतीला मजा आली असेल.. जंजिऱ्याची फ्रेम पण मस्त.
वावे, म्हसळा-गोरेगांव रस्ता सुंदर..
रुपाली, अंदमान आणि लेह लडाख दोन्ही ठिकाणचे फोटो सुंदर..
डलहौसी, हिमाचल प्रदेशच्या
डलहौसी, हिमाचल प्रदेशच्या वाटेवरती..
एकापाठोपाठ तीन डोंगर रांगा..
शेवटची रांग हिमाच्छादित..
*Waterscape at Airoli Creek*
*Waterscape at Airoli Creek*
विविध रुंदीच्या आडव्या बँड्सच्या स्वरुपातल्या/पॅटर्न मधल्या लाटा, फक्त एका मधल्या पट्ट्यामधे तेही आडव्याच, उडणारा पाणपक्षांचा थवा, लांब क्षितीजावर दिसणाऱ्या बोटी/गलबतं, त्यांच्या डोलकाठ्या (कदाचित मासेमारी साठी रोवलेले बांबू) आणि पुरेशा उजेडा अभावी आलेली एक प्रकारची धूसरता...
आणि या सगळ्या मुळे होणारा एखाद्या जुन्या पेंटींगचा आभास...
गलेशिअर नॅशनल पार्कमध्ये १४
गलेशिअर नॅशनल पार्कमध्ये १४ मैल ट्रेल केली तेव्हा काढलेला हा फोटो.
निरूजी, कंसराज
निरूजी, कंसराज
अप्रतिम फोटो...
सगळे प्रचि भारी, मस्त धागा.
सगळे प्रचि भारी, मस्त धागा.
रुपाली, निरू, कंसराज
रुपाली, निरू, कंसराज
सुरेख फोटो!
रुपाली लडाखचा म्हणून दिलेला दुसरा पॅराग्लायडिंग वाला फोटो तपासून पहा लडाखचा नसावा असे वाटते आहे.
ह्या फोटोतला परिसर इथल्या
ह्या फोटोतला परिसर इथल्या अनेकांना परिचित असेल.

हर्पेनजी धन्यवाद,
हर्पेनजी धन्यवाद,
तो लडाखचा नाही कश्मीर चा फोटो आहे. मी नाव टाकायला विसरले.
पुणे सातारा रोडवर करंदी
पुणे सातारा रोडवर करंदी गावाच्या जवळपास एका शेतात काढलेला हा फोटो!
(No subject)
किल्ले सुधागड
ह्या गडाचा ही विचार स्वराज्याची राजधानी बनवण्याकरता म्हणून केला गेला होता असे म्हणतात.
आम्ही गडावर मुक्कामी गेलो होतो.
आम्ही गडावर गेलो त्या दिवसापर्यंत पाऊस पडायला अजीबात सुरुवात झाली नव्हती. आम्ही पोचलो त्या रात्री पासून त्या वर्षीचा पावसाळा सुरु झाला.
किल्ले सुधागड
किल्ले सुधागड
दुसर्या दिवशी परत जाताना वेगळ्या रस्त्याने उतरलो
त्या वेळी हा माहौल होता.
होडीची सफर, भेडघाट
होडीची सफर, भेडघाट
.
मार्बल का पहाड देखो.!
कंसराज : ग्लेशियर पार्क-
कंसराज : ग्लेशियर पार्क- अप्रतिम प्रचि.. True Landscape
हर्पेन, स्वरुप : मस्त प्रचि.. सुधागड धुकं छानच..
मनिम्याऊ, भेडाघाट सुंदर..
कट्यार काळजात घुसली या
कट्यार काळजात घुसली या चित्रपटात याची पहिल्यांदा ओळख झाली .भोर जवळील नदीचा नेकलेस

पेरियार ला बोटिंग करताना
पेरियार ला बोटिंग करताना काढलेला फोटो . निष्पर्ण झाडावरील सजीवाचे घरटे . निसर्गाची किमया !!!!
वाह! सुंदर धागा आणि एकसे एक
वाह! सुंदर धागा आणि एकसे एक प्रतिसाद. खरे आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
सुधागड मिस्टी (दमट, पावसाळी)
सुधागड मिस्टी (दमट, पावसाळी) फोटो फार छान आहे.
काबो-द-रामा किल्ल्याजवळच्या
काबो-द-रामा किल्ल्याजवळच्या केप गोवा रेस्टॉरंट मधून दिसणारं दृश्य..
अश्विनी नदीची चंद्रकोर
अश्विनी नदीची चंद्रकोर अप्रतिम. व हिरवा कंच भूभाग.
तांबडी सुर्ला मंदिराची वाट..
तांबडी सुर्ला मंदिराची वाट..
मुळात जंगलामधलं मंदिर.. लोखंडी गेटमधून प्रवेश केल्या केल्या डाव्या हाताला झुळझुळणारा झरा.. त्यात पाय सोडून निवांत बसलेली, आपलंच प्रतिबिंब निरखणारी झाडं, झाडांच्या अंगाखांद्यावर विहरणारी माकडं, मधेमधे उन्हाचे पडलेले कवडसे आणि हिरवाई प्रतिबिंबित करणारं, डोळ्यांना थंडावा देणारं पाणी... केवळ सुकून...
नदीची चंद्रभागा सुंदरच!
नदीची चंद्रभागा सुंदरच!
सुधागड अहाहा!!
अश्विनी, पेरियारचा असाच एक घरट्याचा फोटो माझ्याकडेपण होता. पाहते सापडतो का.
शनिवारची निवांत सकाळ आणि
शनिवारची निवांत सकाळ आणि लालबागला फेरफटका
नंतर MTR ला जाऊन जेवण!

बंगलोरच्या लालबागमधला जलाशय
बंगलोरी लालबागचा सुंदर परिसर.
बंगलोरी लालबागचा सुंदर परिसर.
Pages