
मुखपृष्ठ :
मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)
मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)
Landscape Photography..
फोटोग्राफीला आपण सुरुवात करतो त्यात सुरुवातीला बहुतेक सगळ्यांचा सगळ्यात जास्त आवडता प्रकार असतो तो म्हणजे निसर्ग दृश्य किंवा लँडस्केप फोटोग्राफी.
(हल्ली हे स्थान सेल्फीने पटकावलेले आहे. )
जेव्हा आपण कुठेही फिरायला जातो तेव्हा ही निसर्गृश्य जास्त प्रमाणात क्लिक केली जातात, याचं कारण असं की..
फोटो काढण्यासाठी ती सहज उपलब्ध असतात…
स्थिर असतात..
डोळ्यांना, मनाला आनंद देतात…
आपल्या सहलीच्या स्मृती अगदी सहज जिवंत ठेवतात..
इतरांना दाखवायला आणि त्यांनाही बघायला आवडतात..
ह्या सृष्टी सौंदर्याच्या आवडीशी आपली एक नैसर्गिक नाळ जोडली गेलेली असते..
ह्या धाग्यामधे आपण आपली अशीच विविध निसर्गदृश्य देऊ या, पाहू या..
ह्या निसर्गचित्रात (लँडस्केप) मधे काय असेल..
तर.. कुठलाही डोंगर, टेकडी, तलाव, नदी, समुद्र, समुद्रकिनारा, जंगल, कुरण, वनश्री, बर्फाच्छादित प्रदेश आणि अगदी वाळवंटही..
अशा गोष्टींची नयनरम्य प्रकाशचित्रं (दूरचित्र/ Long Shots..) असतील..
लहानपणी आपण डोंगर, नदी, गावं, छोटी छोटी घरं असं चित्र काढायचो, तसे फोटोही चालतील..
सूर्योदय आणि सूर्यास्त हे ही खरं तर यातच मोडतात पण त्यासाठी आपला वेगळा धागा आहेच.
Wild Life Photography चे Long Shots ही खरं तर निसर्गदृश्यात मोडू शकतात पण ते ही आपण शक्यतो टाळणार आहोत.
निसर्गाचित्र/दृश्य ही निसर्गाशी संबंधित असली तरी निसर्गामधलं एकटं झाड, झुडूप, फळ, फुल, फुलं यांचे क्लोजअप्स यात मोडणार नाहीत.
आपलं प्रकाशचित्रं देताना त्याचं ठिकाण तर सांगाच..
पण त्या ठिकाणाची, फोटो काढतानाची काही खास आठवण असेल तर ती ही जरुर सांगा..
मग ती आपली शाळेची/काॅलेजची सहल असेल, मधुचंद्राच्या वेळी गेलेल्या हिल-स्टेशनचे फोटो असतील (दुसरा, तिसरा मधुचंद्रही चालेल कारण त्यावेळेला कदाचित फोटोग्राफीकडे आपलं जास्त लक्ष असेल ) किंवा जिवलग मित्रांसोबतचं धमाल गेट टुगेदर असेल..
काही जण ट्रेकला गेले असतील किंवा काही एकांडे शिलेदार एकटेच अन-वाईंड व्हायला..
त्या तेव्हाच्या आठवणी या धाग्याच्या निमित्ताने पुन्हा जाग्या होतील..
हे फोटो काढताना काही स्पेशल सेटींग्ज वापरली असतील, कुठले फिल्टर्स वापरले असतील तर ते ही जरुर कळवा..
अशा फोटोग्राफीच्या काही टिप्स आणि/अथवा ट्रिक्स असतील तर जाणकारांनी त्याबाबत इथे मार्गदर्शन केलं तर नवोदित फोटोग्राफर्सना नक्कीच त्यातून काही घेण्यासारखं असेल..
फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1
आणि सर्वात महत्वाचं : हा धागा फक्त बेफाट सुंदर फोटो काढणाऱ्यांसाठीच नाही, तर सर्व मायबोलीकरांसाठी आहे.
हल्ली बहुतेकांकडे कॅमेरे असतील.
सगळ्यांकडे मोबाईल तर असतोच ज्यामधूनही चांगले चांगले फोटो येतात.
ते बिनधास्त इथे द्या. शेवटी बघणारे सर्व आपलेच मायबोलीकर असणार आहेत.
कधी फोटो सुंदर असेल, कधी त्याच्या आठवणी सुंदर असतील.. तर कधी दोन्हीही सुंदर असेल..
तेव्हा निसर्गदृश्याचे प्रचि आणि आठवणी द्यायला विलंब करु नका..
(आणि जरी सर्व निसर्गचित्र/दृश्य "Landscape" या Term ने ओळखली जातात आणि म्हणून बहुतांशी Landscape म्हणजे आडव्या Format असतात तरी उभ्या स्वरुपातल्या निसर्गदृश्यांचही स्वागत आहे..)
नमुना प्रचि :
काबो-दे-रामा किल्ल्यावरुन बेतिलबेतिम (South Goa) ला परत येणाऱ्या रस्त्यावर ही खाडी लागली.
पुलावरुन (Assolna Bridge बहुतेक) गाडी चालली होती, सूर्य मावळतीला आला होता आणि पुलावरुन जाताना सहज खाली नजर गेली तर ही एवढी नारळाची झाडं हारीने उभं राहून पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब निरखत होती...
टीप : मायबोलीच्या प्रकाशचित्रांविषयक धोरणानुसार :
इथे दिलेले प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे.
सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
सर्व प्रकाशचित्रे स्वतःची असावीत. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहायला मिळेल - https://www.maayboli.com/node/47635?page=4
या धोरणाचे कृपया पालन करावे..
तसेच "ज्यांना मायबोली.सीसी या किंवा अशा उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यानी कृपया हा फोटो मी प्रताधिकार मुक्त करत आहे असे फोटोखाली लिहा." अशी वेमांची सूचना आहे..
त्याचा विचार व्हावा..
(मी या धाग्यावरचे माझे प्रचि प्रताधिकार मुक्त करित आहे..)
आला बाबा एकदाचा बीच जवळ..
आला बाबा एकदाचा बीच जवळ..
आणि दिसली बरं का एकदाची वाट..
वळणदार रस्ता.. ताडा-माडांची महिरप.. आणि दूरवर किनाऱ्याची रेषा अधोरेखित करणारी नारळाच्या झाडांची आडवी ओळ..
त्याच दृश्याचा हा तिरका अँगल..
अतुलपाटील, इंडोनेशिआचा फोटो
अतुलपाटील, इंडोनेशिआचा फोटो सुरेखच आहे. अन्यही खूप छान छान फोटो आहेत. प्रभावी छायाचित्रीकरण.
परत परत मेळघाट १. २.
परत परत मेळघाट

१.
२.

निरुजी .. खूप सुंदर फोटो..
निरुजी .. खूप सुंदर फोटो..
हर्पेनजी.. मेळघाटचा फोटो खूप छान.. फोटोतील हिरवाई बघून मन प्रसन्न झालं.
आमचा उडुपी मुक्कामाचा दुसरा
आमचा उडुपी मुक्कामाचा दुसरा दिवस. नेहेमीप्रमाणे मी आणि मित्राने रात्रीच प्लॅन केला होता कि सकाळी उठून आजूबाजूचा भाग एक्सप्लोर करायचा. निघालो, ६ वाजता बरोब्बर. जसा रस्ता जाईल तसं जाऊ म्हणालो आणि एक पूल लागला . पटकन गाडी बाजूला लावली आणि जे पहिला ते अफाट होतं . सुंदर बॅकवॉटर , नारळाची झाडं आणि शेवटी एकदम नावाडी. एकदम खुश झालो. बघा आवडतोय का तुम्हाला.
mabopremiyogesh, जबरदस्त
mabopremiyogesh, जबरदस्त प्रचि..
आज कोजागिरी असल्याने काही खास
आज कोजागिरी असल्याने काही खास चंद्राचे फोटो
१.
२.
@सामो: धन्यवाद
@सामो: धन्यवाद
@mabopremiyogesh: उडुपी प्रचि जबरदस्त. फ्रेम करावे असे.
आधीचे पण प्रचि मस्त आहेत. मेळघाट आणि @निरुजी यांचा बेतिलबेतिम. दक्षिण गोवा मधले बीच एकच नंबर. शांत निवांत
वर उत्तरेला मात्र बागा कळंगुट इत्यादी संध्याकाळी कर्णकर्कश बजबजपुरी झालेली असते.
निसर्गाचा वेगळा आविष्कार
निसर्गाचा वेगळा आविष्कार
वाळूच्या टेकड्या
अस्मिता, अतुल, माबो गटग ऑन
अस्मिता, अतुल, माबो गटग ऑन बाकडे भारी
मंदारडी प्रीतीसंगम फोटो मस्तच, हर्पेन परत एकदा वेळ काढून निवांत प्रीतिसंगमावर जाऊन या. माझी गेल्या बऱ्याच वर्षात धावती भेट झालीय.
प्रत्येक फोटो सुंदर आहे.
कोजागिरीचा तेजस्वी चंद्र मस्त
कोजागिरीचा तेजस्वी चंद्र मस्त. आमच्याकडे पाऊस आहे.
धर्मशाळा क्रिकेट स्टेडिअम
धर्मशाळा क्रिकेट स्टेडिअम
आमच्याकडे लग्नानन्तर पहिल्या
आमच्याकडे लग्नानन्तर पहिल्या श्रावणात नवीन जोडप्याने नागद्वार दर्शनाला जाण्याची रीत आहे. अतिशय अवघड ट्रेक. हा मार्ग वर्षातील केवळ १५ दिवस चालू असतो. डोंगरात कुठे कुठे वर चढून महादेव बसले आहेत.

अशा गर्द पावसाळ्यातली हिरवीकंच रानवाट.
खज्जर
खज्जर
वाह.. नागद्वार कुठे आहे भारी
वाह.. नागद्वार कुठे आहे भारी जागा दिसत आहे
>>> भारी जागा दिसत आहे>>> +१
>>> भारी जागा दिसत आहे>>> +१
छान धागा... आणि चित्रे.
छान धागा... आणि चित्रे.
मनिम्याऊ, किती सुंदर वाट आहे.
मनिम्याऊ, किती सुंदर वाट आहे.
नवीन लग्न झालेल्या दांपत्याने अशा वाटेवर निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले क्षण म्हणजे आयुष्याभर मर्मबंधात जपून ठेवावी अशीच ठेव आहे.
कुठे आहे म्हणे हे नागद्वार पंचमढी साईड्ला का
मंदार,
खज्जीयारचा फोटो ही मस्त. माझाही झब्बू देतो जरा वेळाने.
मनिम्याऊ, किती सुंदर वाट आहे.
मनिम्याऊ, किती सुंदर वाट आहे. >>+ 1
खज्जियार.
खज्जियार.
१.

२.

३.

इथेच मी आयुष्यात पहिल्यांदा (असिस्टेड) पॅराग्लायडिंग केलं. त्यामुळे खज्जीयार एकदम आठवणीत राहणार.
मध्यंतरी तो एक पॅराग्लायडिंग करणार्या मुलाचा, ये मैने क्यो किया, मै तुम्हे ज्यादा पैसे देता हू मुझे ठिक से उतारो, स्वतःला शिव्या वगैरे व्हिडियो व्हायरल झाला होता त्याच्यानंतरच आम्ही हे केलं. त्यामुळे माझ्या एका मित्राने तर नाहीच करणार म्हणून सांगितले. दुसरा तळ्यात मळ्यात करत होता पण अजून एकाला करायचेच होते मग त्याच्यामुळे मी पण केले. एकूण तिघांनी एका पाठोपाठ केले. खूप मजा आली. वार्याने चांगली साथ दिल्यामुळे मी पहिल्या दोघांपेक्षा जरा जास्त वेळ हवेत होतो.
घरबसल्या नयनसुख मिळतय इथे
घरबसल्या नयनसुख मिळतय इथे

जरा वेळ काढून जुने फोटो शोधते आणि टाकतेच
तोवर अजून एक फॉल कलर। कोलंबस
तोवर अजून एक फॉल कलर। कोलंबस इंडियाना

वाह हर्पेन मस्त फोटो , खज्जर
वाह हर्पेन मस्त फोटो , खज्जर बद्दल बरच ऐकलं आहे.
संध्याकाळची वेळ, कोंकण किनारा
संध्याकाळची वेळ, कोंकण किनारा अजून काय पाहिजे .. कोळथर बीच , दापोली जवळ
नागद्वार फार फार आवडला आहे
नागद्वार फार फार आवडला आहे अजून माहिती देना प्लीज, माउमैया.
Mabopremi yogesh , जबरदस्त.
सगळेच फोटो सुरेख.
कोळथर बीच >>> खूप छान.
कोळथर बीच >>> खूप छान.
(No subject)
श्रीक्षेत्र औदुंबर. नोव्हेंबर
श्रीक्षेत्र औदुंबर. नोव्हेंबर महिन्यातील धुक्याची पहाट.
मागचा आठवडा work from office
मागचा आठवडा work from office होते त्यामुळे इकडे फिरकायला फारसा वेळ झाला नाही... आज सगळा बॅकलॉग भरुन काढला.... काय एकसेएक सुंदर फोटो आहेत!
वा वा!.... मजा आली!
देवबाग, सिंधुदुर्ग!
देवबाग, सिंधुदुर्ग!
Pages