
मुखपृष्ठ :
मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)
मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)
Landscape Photography..
फोटोग्राफीला आपण सुरुवात करतो त्यात सुरुवातीला बहुतेक सगळ्यांचा सगळ्यात जास्त आवडता प्रकार असतो तो म्हणजे निसर्ग दृश्य किंवा लँडस्केप फोटोग्राफी.
(हल्ली हे स्थान सेल्फीने पटकावलेले आहे. )
जेव्हा आपण कुठेही फिरायला जातो तेव्हा ही निसर्गृश्य जास्त प्रमाणात क्लिक केली जातात, याचं कारण असं की..
फोटो काढण्यासाठी ती सहज उपलब्ध असतात…
स्थिर असतात..
डोळ्यांना, मनाला आनंद देतात…
आपल्या सहलीच्या स्मृती अगदी सहज जिवंत ठेवतात..
इतरांना दाखवायला आणि त्यांनाही बघायला आवडतात..
ह्या सृष्टी सौंदर्याच्या आवडीशी आपली एक नैसर्गिक नाळ जोडली गेलेली असते..
ह्या धाग्यामधे आपण आपली अशीच विविध निसर्गदृश्य देऊ या, पाहू या..
ह्या निसर्गचित्रात (लँडस्केप) मधे काय असेल..
तर.. कुठलाही डोंगर, टेकडी, तलाव, नदी, समुद्र, समुद्रकिनारा, जंगल, कुरण, वनश्री, बर्फाच्छादित प्रदेश आणि अगदी वाळवंटही..
अशा गोष्टींची नयनरम्य प्रकाशचित्रं (दूरचित्र/ Long Shots..) असतील..
लहानपणी आपण डोंगर, नदी, गावं, छोटी छोटी घरं असं चित्र काढायचो, तसे फोटोही चालतील..
सूर्योदय आणि सूर्यास्त हे ही खरं तर यातच मोडतात पण त्यासाठी आपला वेगळा धागा आहेच.
Wild Life Photography चे Long Shots ही खरं तर निसर्गदृश्यात मोडू शकतात पण ते ही आपण शक्यतो टाळणार आहोत.
निसर्गाचित्र/दृश्य ही निसर्गाशी संबंधित असली तरी निसर्गामधलं एकटं झाड, झुडूप, फळ, फुल, फुलं यांचे क्लोजअप्स यात मोडणार नाहीत.
आपलं प्रकाशचित्रं देताना त्याचं ठिकाण तर सांगाच..
पण त्या ठिकाणाची, फोटो काढतानाची काही खास आठवण असेल तर ती ही जरुर सांगा..
मग ती आपली शाळेची/काॅलेजची सहल असेल, मधुचंद्राच्या वेळी गेलेल्या हिल-स्टेशनचे फोटो असतील (दुसरा, तिसरा मधुचंद्रही चालेल कारण त्यावेळेला कदाचित फोटोग्राफीकडे आपलं जास्त लक्ष असेल ) किंवा जिवलग मित्रांसोबतचं धमाल गेट टुगेदर असेल..
काही जण ट्रेकला गेले असतील किंवा काही एकांडे शिलेदार एकटेच अन-वाईंड व्हायला..
त्या तेव्हाच्या आठवणी या धाग्याच्या निमित्ताने पुन्हा जाग्या होतील..
हे फोटो काढताना काही स्पेशल सेटींग्ज वापरली असतील, कुठले फिल्टर्स वापरले असतील तर ते ही जरुर कळवा..
अशा फोटोग्राफीच्या काही टिप्स आणि/अथवा ट्रिक्स असतील तर जाणकारांनी त्याबाबत इथे मार्गदर्शन केलं तर नवोदित फोटोग्राफर्सना नक्कीच त्यातून काही घेण्यासारखं असेल..
फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1
आणि सर्वात महत्वाचं : हा धागा फक्त बेफाट सुंदर फोटो काढणाऱ्यांसाठीच नाही, तर सर्व मायबोलीकरांसाठी आहे.
हल्ली बहुतेकांकडे कॅमेरे असतील.
सगळ्यांकडे मोबाईल तर असतोच ज्यामधूनही चांगले चांगले फोटो येतात.
ते बिनधास्त इथे द्या. शेवटी बघणारे सर्व आपलेच मायबोलीकर असणार आहेत.
कधी फोटो सुंदर असेल, कधी त्याच्या आठवणी सुंदर असतील.. तर कधी दोन्हीही सुंदर असेल..
तेव्हा निसर्गदृश्याचे प्रचि आणि आठवणी द्यायला विलंब करु नका..
(आणि जरी सर्व निसर्गचित्र/दृश्य "Landscape" या Term ने ओळखली जातात आणि म्हणून बहुतांशी Landscape म्हणजे आडव्या Format असतात तरी उभ्या स्वरुपातल्या निसर्गदृश्यांचही स्वागत आहे..)
नमुना प्रचि :
काबो-दे-रामा किल्ल्यावरुन बेतिलबेतिम (South Goa) ला परत येणाऱ्या रस्त्यावर ही खाडी लागली.
पुलावरुन (Assolna Bridge बहुतेक) गाडी चालली होती, सूर्य मावळतीला आला होता आणि पुलावरुन जाताना सहज खाली नजर गेली तर ही एवढी नारळाची झाडं हारीने उभं राहून पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब निरखत होती...
टीप : मायबोलीच्या प्रकाशचित्रांविषयक धोरणानुसार :
इथे दिलेले प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे.
सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
सर्व प्रकाशचित्रे स्वतःची असावीत. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहायला मिळेल - https://www.maayboli.com/node/47635?page=4
या धोरणाचे कृपया पालन करावे..
तसेच "ज्यांना मायबोली.सीसी या किंवा अशा उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यानी कृपया हा फोटो मी प्रताधिकार मुक्त करत आहे असे फोटोखाली लिहा." अशी वेमांची सूचना आहे..
त्याचा विचार व्हावा..
(मी या धाग्यावरचे माझे प्रचि प्रताधिकार मुक्त करित आहे..)
सुंदर फोटो सीमंतिनी आणि
सुंदर फोटो सीमंतिनी आणि हर्पेन.
माझ्याकडे असा बोरा केव्ह्जचा फोटो असेल. विशाखापट्टणमजवळच्या. पण तिथे उगाचच रंगीबेरंगी लाईट्स लावले आहेत. त्यामुळे ते कृत्रिम वाटतं उगाचच.
कार्ल्सबाद केव्हज मोठा परिसर
कार्ल्सबाद केव्हज मोठा परिसर आहे https://www.nps.gov/cave/index.htm अनेक जागी नैसर्गिक प्रकाश येऊन फोटो काढायची उत्तम संधी मिळते. मी लावलेल्या फोटोत कृत्रिम प्रकाश आहे. पण चांगली प्रकाशयोजना केली आहे तेथील तज्ञ लोकांनी.
अस्मिता कहर फोटो आहेत.
अस्मिता कहर फोटो आहेत.
* **
*
*
*


*
*
सुरेख संग्रह होत आहे. धन्यवाद निरू.
प्रत्येक फोटो सुंदर आहे
प्रत्येक फोटो सुंदर आहे धाग्यावरचा...
अस्मिता.. निसर्ग सौदर्यं अगदी ओसंडून वाहतयं फोटोंमधून ...
आहाहा काय एकसे एक फोटो
आहाहा काय एकसे एक फोटो
हा काहींनी बघितला असेल आधी।
हा काहींनी बघितला असेल आधी। पण पुन्हा टाकावा वाटला
नाही नाही कोकण नाही। मिशिगन
नाही नाही कोकण नाही। मिशिगन मधला एक रस्ता। कोकणचीच आठवण देणारा
वा! एक से बढकर एक !
वा! एक से बढकर एक ! @अस्मिता, हरपेन, सीमंतिनी, अवल आणि आधीचे पण सर्व फोटो... टॉप!
हा मधला बाली (इंडोनेशिया) मध्ये टिपलेला...
अस्मिता. : सुंदर फोटोज्. एका
अस्मिता. : सुंदर फोटोज्. एका पोस्ट मधे तुमचे बरेच फोटो असतात आणि त्यातला पहिला फोटो बघितला की कळतं की स्क्रोल केल्यावर खाली तुमचंच नांव असणार आहे...
अवल आणि atuldpatil, मस्त प्रचि..
निरू , हो
निरू , हो

डाउनलोडींगच्या कंटाळ्यामुळे रोज एकेक टाकण्यापेक्षा दोन तीन दिवसाला पाच सहा टाकतेय. चालेल ना ? नसेल तर Sorry बरं का
पोलादपूर घाटात...
पोलादपूर घाटात...
<<डाउनलोडींगच्या कंटाळ्यामुळे
<<डाउनलोडींगच्या कंटाळ्यामुळे रोज एकेक टाकण्यापेक्षा दोन तीन दिवसाला पाच सहा टाकतेय. चालेल ना ? >>
अगदी, अगदी. सोय महत्वाची.. जसं सोयीचं पडेल तसे अपलोड करा..
पुर्ववाहिनी तापी नदी.
पुर्ववाहिनी तापी नदी. मेळघाटातल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमाभागातले एक गाव. एका वर्षी आमचे काम संपल्यावर तिकडे गेलो होतो. गावाचे नाव आठवत नाही. तिकडची माणसं चालत, बाईकवरून, बैलगाडीतून नदीपार होत होते. सुंदर परिसर होता. फार खोल नसलेले पाणी होते.

१.
२.

हा फोटो पाण्यात उतरून काढलेला आहे.
३.

हा तिथलाच अजून एक. इतके नितळ , निवळशंख, स्वच्छ पाणी असलेली नदी बघायची सवयच गेलेली माणसं आम्ही हरखूनच गेलो होतो.
<<डाउनलोडींगच्या कंटाळ्यामुळे
<<डाउनलोडींगच्या कंटाळ्यामुळे रोज एकेक टाकण्यापेक्षा दोन तीन दिवसाला पाच सहा टाकतेय. चालेल ना ? >>
नक्कीच चालेल..
गुल का मजा अलग.. गुलदस्तेका अलग..
प्रत्येक फोटो नेत्रसुखद आहे.
प्रत्येक फोटो नेत्रसुखद आहे. लाल फुलांचा सडा फोटो विशेष आवडला.
अस्मिता , बाकडे फोटो मस्त , निवांत गप्पा मारत बसावं तिथे .
हर्पेन , नदीचे स्वच्छ निळे पाणी आणि गुळगुळीत दगड , मला कराडचा प्रीतिसंगम आठवला. लहानपणी तासनतास काठावर बसून गुळगुळीत दगड पाण्यात टाकलेत.
मला कराडचा प्रीतिसंगम आठवला.
मला कराडचा प्रीतिसंगम आठवला. लहानपणी तासनतास काठावर बसून गुळगुळीत दगड पाण्यात टाकलेत.>> मी तर अजुनही टाकतो. जेव्हा जायला मिळेल तेव्हा
वर्णिता मी प्रीतिसंगमावर
वर्णिता, मंदार मस्तच की!
मी प्रीतिसंगमावर एकदाच गेलोय तेही अन्धार पडल्यावर. मजा नाही आली. परत एकदा तिथे दिवसाउजेडी जायचंय.
मस्त फोटो आहे हर्पेन..मला अशा
मस्त फोटो आहे हर्पेन..मला अशा पाण्यात पाय सोडून बसायला आवडते.. नदीपात्राच्या पाण्याचा आनंद घ्यायचा योग नाही आला पण मागच्या वर्षीची, नागार्जुन सागरचा फोटो, ही एक आठवण..

माझी लेक
प्रितीसंगम कराड फोटो मित्रानं
प्रितीसंगम कराड फोटो मित्रानं काढलेला
धन्यवाद निरू
धन्यवाद निरू

सुरेख फोटोज मंदारडी, मृणाली (लेक गोड♡), अवलताई, अतुल, हर्पेन.
प्रितीसंगम फार आवडला.
वर्णिता , कधीही ये गप्पा मारत बसू त्या बाकड्यावर
धन्यवाद सर्वांना.
नेत्रसुखद छायाचित्रे. कष्ट
नेत्रसुखद छायाचित्रे. कष्ट घेऊन निसर्गचित्र दालनात प्रकाशचित्रे प्रसिद्ध करणाऱ्या समस्त सभासदांचे हार्दिक आभार. एकापेक्षा एक सरस प्रचि
atuldpatil : पोलादपूर छान.
atuldpatil : पोलादपूर छान.
हर्पेन, तापी नदी जवळून आणि आतून मस्त.. त्यातली माणसं, गुरं आणि एकूणच ग्रामीण बाज छान वाटतो..
आणि तळजाईची सूर्यकिरणं अप्रतिम.
मृणाल, नागार्जुनसागर
mandard : कराडचा प्रीतिसंगम झकास,
सूर्यास्त, केशरी आकाश, त्याचं पाण्यातलं प्रतिबिंब आणि एकंदरीतच माहौल मस्तच..
<<<नेत्रसुखद छायाचित्रे. कष्ट घेऊन निसर्गचित्र दालनात प्रकाशचित्रे प्रसिद्ध करणाऱ्या समस्त सभासदांचे हार्दिक आभार. एकापेक्षा एक सरस प्रचि>>>
आणि किशोर मुंढे : विशेष विशेष धन्यवाद..
हे बेतिलबेतिमच्या सनसेट
हे बेतिलबेतिमच्या सनसेट बीचच्या वाटेवरचं दृश्य..
धुक्याने भारलेली सकाळ..
मागे माडाची झाडं..
आणि उन्हाची वाट पहात एका उभ्या दांडीवर कुडकुडणारा गारठलेला पक्षी..
>> प्रत्येक फोटो नेत्रसुखद
>> प्रत्येक फोटो नेत्रसुखद आहे.
+१११ अग्गदी!
@हर्पेन: वांह! आवाज येतोय स्वच्छ नितळ वाहत्या पाण्याचा इतके ताजे चित्र


@mrunali.samad: छान फोटो. Lake च्या किनारी लेक
@mandard: Nostalgic click !
@निरु: थंडीने हुडहुडी भरणारा जिवंतपणा टिपलात
@वर्णिता: अस्मिता , बाकडे फोटो मस्त , निवांत गप्पा मारत बसावं तिथे >> चला चला लवकर आम्ही ते बुकिंग केलेच आहे आधी
ता.क. या धाग्यातला प्रत्येक फोटो बघितल्यावर मी मनातल्या मनात निरु यांचे आभार मानतो
चला चला लवकर आम्ही ते बुकिंग
चला चला लवकर आम्ही ते बुकिंग केलेच आहे आधी...
माबो गटग on बाकडे करू हाकानाका.
किशोर मुंढे यांची प्रतिक्रिया फारच आवडली.
धाग्यातला प्रत्येक फोटो बघितल्यावर मी मनातल्या मनात निरु यांचे आभार मानते... मम.
>> माबो गटग on बाकडे करू
>> माबो गटग on बाकडे करू हाकानाका
नाही. त्यासाठी इजिप्त स्फिंक्स बुक केले आहे ना?
ओके. सॉरी फॉर विषयांतर! इजिप्तचा फोटू टाका कुणीतरी आता...
करोनाकाळात बाक बंद आहेत!!
करोनाकाळात बाक बंद आहेत!! (अस्मिता यांचे चित्र जुने आहे! बाकावरच्या गटगसाठी उशी घेवून यावे.) अवांतर बद्दल क्षमस्व!!!!
पुन्हा एकदा बेतिलबेतिमच्या
पुन्हा एकदा बेतिलबेतिमच्या सनसेट पाॅईंट कडे जाणारा रस्ता..
कलत्या सूर्यामुळे सोनसळी भासणारे गवताचे तुरे...
गेल्या वर्षीचा पावसाळा तसा
गेल्या वर्षीचा पावसाळा तसा लांबलेलाच.. त्यामुळे नोव्हेंबरमध्येही कुरणं, खाचरं पाण्याने ओली होती आणि म्हणूनच हिरवीही.
त्यातच मग किडे टिपणाऱ्या पाणपक्षांचीही चंगळच..
त्याचाच हा लाँगशाॅट..
आणि हा मिडशाॅट.. (ठिकाण अर्थात ती च ती : बेतिलबेतीमची वाट..)
Pages