दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

भारी वाटतयं... अव्वघड पेपर देऊन...बदला..... हाहाहाहाह
कित्ती गाणी मला ओळखता येत नव्हती
Lol

बरं अजून एक क्लु
सिनेमातील एक कलाकार अजूनही अविवाहित आहे.

कर्रेक्ट Happy

आता द्या कुणीतरी पुढचे

20201112_184703.jpg

ही नायिका नाही. या नटीचे नाव मंजू. हिच्या समोर नायिका बसलीय, जिच्या लग्नाची पहिली रात्र आहे आणि ही तिला चिडवत हे गाणे म्हणत आहे.

Biggrin शोधून अपलोड करायला पण जास्त वेळ लागतो, निर्दय मुली

हे गाणे कधी तरी दूरदर्शनवर सिनेमात पाहिले होते. इतका मधुर स्वर, सुंदर गाणे आणि कोण गातो तर.. गदाधारी भीम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! Talk about childhood trauma...

मी हे गाणं पाहिलेलं नाही, मला वाटलं हे एखाद्या रोमँटिक पिक्चरचं गाणं असेल.<<<<< Proud

कीचक वधाच्या गोष्टीवरचा आहे सिनेमा त्याच नावाने.

नाही पाहिले तरी चालते Happy , कीचक वध सिनेमा ...
कीचकासाठी रोमँटिक आहे फक्त , द्रौपदीसाठी काळजीयुक्त, भीमासाठी excited to kill कीचक !
तुम्ही कीचकाच्या दृष्टीने ऐकताय पाहिल्यावर कळेल Biggrin

सिनेमात बघा मानवदादा. अगदी शेवटी आहे हे गाणे. किचक येतो, सैरंध्री लपलेली असते. मग गाणे संपल्यावर समोर भीम येतो... अर्र इतक्यावेळ हा बाबा गात होता???!!!
https://www.youtube.com/watch?v=e8QAQW-Z9uo

Screenshot1.jpg
हा स्क्रिनशॉट दृश्यासाठी. खंगरी आहे पण शोधायला स्कोप नाही. म्हणुन शोधता यावं म्हणुन खालचे दृश्य.
.
Screenshot1_0.jpg
ही कोण ओळखलं की शोधायला एकदम सोपं.

कलकत्त्यात जन्मलेली नर्तकी. हिच्या नाचाचे मी मागे एकदा गाणे दिले होते. हिच्या नाव आणि आडनावाचे देवनागरी संक्षिप्त रुप (जसे की मानव पृथ्वीकरचे मापृ) हे सध्याच्या एका चाळीशीतल्या प्रसिद्ध नटीचे पडलेले एक टोपणनाव सुद्धा आहे, जे तिच्याच एका गाजलेल्या गाण्यावरुन पडले.

हेलेन ?हेलेनचा गोडवा नाही यात
लंपन Lol , starting from scratch झालं हे

आता माझे ओळखा..
माझे केस रादर बट गुंतली आहे तू सोडवशील का हा गुंता माझ्या प्रिया , कपाळावरले कुंकू सुद्धा पसरले आहे , ते पण सजवशील का जरा
अतिsssss शय सुंदर गाणे , सिनेमात नाही
रिमिक्स आढळलंय !

Pages