दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हा एक कलात्मक चित्रपट आहे
अती लोभ, अती हाव धरू नये.
हलक्या कानाचे असू नये.
आपले कोणतेही गुपित अयोग्य माणसाच्या हाती लागू दिल्यास विनाश अटळ.

अजून हवेत का क्लू?
इतक्या क्लुज वरून सहज ओळखाल.
एक क्लू चित्रातही आहे.

एक क्लू चित्रातही आहे.<<या साठी झूम केलं तर वेग वेगळे चेहरे वगैरे दिसायला लागले Proud

आयला श्रद्धा माते
तुजप्रत दंडवत
सीमंतिनी माते तुलाही.
मी मुद्दाम मोघम क्लू आणि सीन दिला होता.
चित्रातला क्लू म्हणजे त्या झाडावरून सोनेरी फुलांचा पाऊस पडतोय.

तू जेव्हा चित्रात क्लु आहे लिहिलंस तेव्हा ते छोटं झाड माझ्या नजरेत भरलं. नाहीतर डिस्क्रिप्शन वाचून अनेक सिनेमे डोक्यात येत होते. Happy

पण हा प्रश्न फेल आहे बरं तो कन्नड सिनेमा होता. सांगायचं ना... अशानेच पालक येतात तक्रारी घेवून ... Wink

नाय नाय हां
मी शाळेत होते तेव्हा हिंदीत लागला होता दूरदर्शन वर.
मूळ सिनेमा दाक्षिणात्य बाद करायचा ठरवले तर इथले 40% प्रश्न उडवावे लागतील Happy
हा एक अतिशय सुंदर सिनेमा.कुठे प्राईम, इरॉस नाऊ वर ऑफिशियली चांगली प्रिंट मिळाली तर नक्की बघा.

20201108_004100.jpg

यात बरेच मोठे कलाकार होते.शिवाय तीन तीन प्रसिद्ध खलनायक अभिनेते होते.
यातले 2 आता नाहीत.
IMG_20201108_111416.jpg

20201108_111800.jpg

एका खलनायकाची आई,मावशी, मावस बहिणी,मावस जिजाजी हे सर्व फिल्म इंडस्ट्रीत आहे
एकाचा नाच ही त्याची सिग्नेचर ओळख आहे.

नाही
अजून एक क्लू देते
या पिक्चर मध्ये एक जण अंडरकव्हर कॉप आहे आणि एक जण मृत आहे.जे सध्या 2020 मध्ये मृत आहेत त्यातले कोणीही या पिक्चर मध्ये मेले नाही.
एक करेक्शन: तसं पाहिलं तर 3 नसून 6 खलनायक पात्रे आहेत या सिनेमात.

दोन्ही नाही
(मनात आनंदाने नाचणारी बाहुली इमोजी.)
मी दिलेले क्लू नीट वाचा.सर्वांचा सुपरसेट करून मोजकेच ऑप्शन समोर येतील.

मोहनिष बहल तरी बरोबर आहे का? आणि जे दोन आता नाहीत ते 2 खलनायक आता नाहीत का? सिग्नेचर स्टेप नाचासाठी खलनायक प्रसिद्ध आहे/होता का?

हो
2 खलनायक आता नाहीत
सिग्नेचर स्टेप आणि खलनायक वेगवेगळ्या वाक्यात आहेत Happy
शिवाय अंडरकव्हर कॉप कडे दुर्लक्ष नको

Pages