मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..) Landscape Photography..

Submitted by अ'निरु'द्ध on 18 October, 2020 - 08:31

मुखपृष्ठ :

मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)

मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)
Landscape Photography..

फोटोग्राफीला आपण सुरुवात करतो त्यात सुरुवातीला बहुतेक सगळ्यांचा सगळ्यात जास्त आवडता प्रकार असतो तो म्हणजे निसर्ग दृश्य किंवा लँडस्केप फोटोग्राफी.
(हल्ली हे स्थान सेल्फीने पटकावलेले आहे. Wink )

जेव्हा आपण कुठेही फिरायला जातो तेव्हा ही निसर्गृश्य जास्त प्रमाणात क्लिक केली जातात, याचं कारण असं की..
फोटो काढण्यासाठी ती सहज उपलब्ध असतात…
स्थिर असतात..
डोळ्यांना, मनाला आनंद देतात…
आपल्या सहलीच्या स्मृती अगदी सहज जिवंत ठेवतात..
इतरांना दाखवायला आणि त्यांनाही बघायला आवडतात..
ह्या सृष्टी सौंदर्याच्या आवडीशी आपली एक नैसर्गिक नाळ जोडली गेलेली असते..

ह्या धाग्यामधे आपण आपली अशीच विविध निसर्गदृश्य देऊ या, पाहू या..

ह्या निसर्गचित्रात (लँडस्केप) मधे काय असेल..
तर.. कुठलाही डोंगर, टेकडी, तलाव, नदी, समुद्र, समुद्रकिनारा, जंगल, कुरण, वनश्री, बर्फाच्छादित प्रदेश आणि अगदी वाळवंटही..
अशा गोष्टींची नयनरम्य प्रकाशचित्रं (दूरचित्र/ Long Shots..) असतील..
लहानपणी आपण डोंगर, नदी, गावं, छोटी छोटी घरं असं चित्र काढायचो, तसे फोटोही चालतील..

सूर्योदय आणि सूर्यास्त हे ही खरं तर यातच मोडतात पण त्यासाठी आपला वेगळा धागा आहेच.

Wild Life Photography चे Long Shots ही खरं तर निसर्गदृश्यात मोडू शकतात पण ते ही आपण शक्यतो टाळणार आहोत.

निसर्गाचित्र/दृश्य ही निसर्गाशी संबंधित असली तरी निसर्गामधलं एकटं झाड, झुडूप, फळ, फुल, फुलं यांचे क्लोजअप्स यात मोडणार नाहीत.

आपलं प्रकाशचित्रं देताना त्याचं ठिकाण तर सांगाच..
पण त्या ठिकाणाची, फोटो काढतानाची काही खास आठवण असेल तर ती ही जरुर सांगा..
मग ती आपली शाळेची/काॅलेजची सहल असेल, मधुचंद्राच्या वेळी गेलेल्या हिल-स्टेशनचे फोटो असतील (दुसरा, तिसरा मधुचंद्रही चालेल कारण त्यावेळेला कदाचित फोटोग्राफीकडे आपलं जास्त लक्ष असेल Wink ) किंवा जिवलग मित्रांसोबतचं धमाल गेट टुगेदर असेल..
काही जण ट्रेकला गेले असतील किंवा काही एकांडे शिलेदार एकटेच अन-वाईंड व्हायला..

त्या तेव्हाच्या आठवणी या धाग्याच्या निमित्ताने पुन्हा जाग्या होतील..

हे फोटो काढताना काही स्पेशल सेटींग्ज वापरली असतील, कुठले फिल्टर्स वापरले असतील तर ते ही जरुर कळवा..
अशा फोटोग्राफीच्या काही टिप्स आणि/अथवा ट्रिक्स असतील तर जाणकारांनी त्याबाबत इथे मार्गदर्शन केलं तर नवोदित फोटोग्राफर्सना नक्कीच त्यातून काही घेण्यासारखं असेल..

फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1

आणि सर्वात महत्वाचं : हा धागा फक्त बेफाट सुंदर फोटो काढणाऱ्यांसाठीच नाही, तर सर्व मायबोलीकरांसाठी आहे.

हल्ली बहुतेकांकडे कॅमेरे असतील.
सगळ्यांकडे मोबाईल तर असतोच ज्यामधूनही चांगले चांगले फोटो येतात.
ते बिनधास्त इथे द्या. शेवटी बघणारे सर्व आपलेच मायबोलीकर असणार आहेत.

कधी फोटो सुंदर असेल, कधी त्याच्या आठवणी सुंदर असतील.. तर कधी दोन्हीही सुंदर असेल..

तेव्हा निसर्गदृश्याचे प्रचि आणि आठवणी द्यायला विलंब करु नका..
(आणि जरी सर्व निसर्गचित्र/दृश्य "Landscape" या Term ने ओळखली जातात आणि म्हणून बहुतांशी Landscape म्हणजे आडव्या Format असतात तरी उभ्या स्वरुपातल्या निसर्गदृश्यांचही स्वागत आहे..)

नमुना प्रचि :

काबो-दे-रामा किल्ल्यावरुन बेतिलबेतिम (South Goa) ला परत येणाऱ्या रस्त्यावर ही खाडी लागली.
पुलावरुन (Assolna Bridge बहुतेक) गाडी चालली होती, सूर्य मावळतीला आला होता आणि पुलावरुन जाताना सहज खाली नजर गेली तर ही एवढी नारळाची झाडं हारीने उभं राहून पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब निरखत होती...


टीप : मायबोलीच्या प्रकाशचित्रांविषयक धोरणानुसार :

इथे दिलेले प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे.

सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.

सर्व प्रकाशचित्रे स्वतःची असावीत. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहायला मिळेल - https://www.maayboli.com/node/47635?page=4

या धोरणाचे कृपया पालन करावे..

तसेच "ज्यांना मायबोली.सीसी या किंवा अशा उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यानी कृपया हा फोटो मी प्रताधिकार मुक्त करत आहे असे फोटोखाली लिहा." अशी वेमांची सूचना आहे..
त्याचा विचार व्हावा..

(मी या धाग्यावरचे माझे प्रचि प्रताधिकार मुक्त करित आहे..)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पावसाळ्यातले महाबळेश्वर:

हि वाट दूर जाते:
20140816_163344.jpg

वाट इथे स्वप्नातील संपली जणू:
20140816_170736.jpg

शुभ्र काही जीवघेणे... कारण हि एक एक प्रचंड खोल दरी आहे जी धुक्याने भरली आहे:
20140817_134235.jpg

हर्पेन : मेळघाटचे दोन्ही प्रचि मस्त... ती शांत, निवांत झोपडीही आणि चरायला जाणारी/जाऊन येणारी गुरंही..
तुमचे खजियारचे प्रचिही छान..

माबोप्रेमीयोगेश, कोजागिरीही मस्त आणि कोळथर बीच तर अप्रतिम..

mandard : धरमशालाचं आर्किटेक्टर पण छान आणि पार्श्वभूमी ही.
आणि खजियार पण छान..

मनिम्याऊ : नागद्वार दर्शनची वाट सुंदरच.. महादेवाकडे जाणारी वाट खरं तर अशीच गुढरम्य हवी.

अवल कोलंबस इंडियाना फाॅल कलर्स सुरेखच.. इंडियानाचे काही फोटो उधार घेऊन इथे डकवतो.

अनामिका : दोन्ही प्रतिबिंब आणि ती ही धुक्यातली... सुंदरच..

स्वरुप : देवबाग पॅराग्लायडिंग मस्त प्रचि.. झब्बू देतो लवकरच..

अमृता अमित : सगळेच समुद्राचे फोटोज् छान..

अतुल, पावसाळ्यातल्या महाबळेश्वरचे फोटो सुंदर... अजूनही येऊ द्यात..

Preikestolen (English: "The Pulpit Rock", "Pulpit", or "Preacher’s Chair")
Norway मधे Stavanger शहरापासून साधारणपणे पाऊण तासावर हे ठिकाण आहे. Lysefjorden या फियॉर्डच्या वर सरळ रेषेत हा 604 metres (1,982 ft) उंच कडा आहे. वरती जायला २ ते ३ तास लागतात, पण वर गेल्यावर तिथून जो व्ह्यू मिळतो त्यापुढे हायकींगचे श्रम अगदीच गौण वाटतात Happy

(१)

(२)

धन्यवाद निरु, रुपाली!

नॉर्वेमधे १८ Norwegian Scenic Routes आहेत. त्यातल्या Hardanger Route वरुन जाताना हा Låtefossen धबधबा लागतो. पुलाच्या एका बाजूने दोन वेगळे धबधबे येउन पुलाखाली एकत्र मिळतात. पुलावरुन जाताना कारच्या काचा खाली करुन तुषार झेलत जाण्यात जबरी मजा येते.

(१)

(२)

(३)

अप्रतिम नयनरम्य छायाचित्रे.समस्त छायाचित्रकारांचे हार्दिक आभार. सगळ्यांना (छायाचित्रकार आणि प्रेक्षकांना) दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

तिलारी धरण परिसर पंधरा वर्षापूर्वी (दिवाळी २००५)
(१)
Tilari 2005
(२)
Tilari 2005
(३)
Tilari 2005
(४)
Tilari 2005
(५)
Tilari 2005
(६)
Tilari 2005
.
टीप: ""Open image in new tab" केल्यानंतर हे फोटो मोठे दिसतील

@सीमंतिनी,
खूप छान! असे प्रचि वेगळे आहेत ह्या कलेक्शनमध्ये.

>> अस्मिता, * फोटो मधल्या सावल्या अप्रतिम आहेत.
सहमत. दिल ढूँढता है ला पोषक Happy

Pages

Back to top