दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी_आर्या ते तुम्हे याद होगा कभी हम मिले थे आहे.
https://youtu.be/nLl34jZYYSY?t=161 (हा दिव्याचा खांब, ही हिरोईन!)
मला माहिती नव्हतं. साडी सुजाता छाप वाटली म्हणून सुजाता यूट्यूबवर बघितलं तर यूट्यूबनेच दाखवलं.... Biggrin

लावण्या
गाणे : दृष्ट लागण्याजोगे सारे
चित्रपट : माझ घर माझा संसार

रोहित शेट्टीचा बाबा असलेलं एक गाणे कोण मला सांगेना. दोन वेळा विचारला तो प्रश्न. इतकं अवघड पण नाहीये बर... पण फॉलिकली-चॅलेंज्ड लोकांना हिडीस-फिडीस करायची समाजात सवय आहे.... Happy

मानव,
त्यासाठी सुनिल शेट्टीला १२ व्या वर्षी पितृत्वाची जबाबदारी घ्यावी लागेल ना पण.

सेम हियर..
रोहित शेट्टी चे बाबा एम बी शेट्टी एवढे कळलं

"रोहित शेट्टीचा बाबा असलेलं एक गाणे कोण मला सांगेना." - अरे दिवानों, मुझे पहचानों, कहाँसे आया, मैं हूं कौन. तो गाण्यात आहे, जरी गाणं त्याच्यावर चित्रीत झालेलं नसलं तरिही.

Pages