खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिर्याणी मस्तच! बिर्याणी म्हणजे मेहनत खूप आणि वेळखाऊ. पण लोक खायला बसले की कधी संपली ते कळणार नाही.

बिर्याणी! आहाहा!
अठरा लोकांसाठी >>इतके लोक! कोरोना पाळत नाही का तुम्ही?
सगळे फोटो मस्त!

कोरोना कमी झाला आता.. लिमिट वीसचे केलेय.. पुढच्यावेळी ईथून आणखी एकाला बिर्याणी आमंत्रण देऊ शकता Happy

वड्या मस्त दिसताहेत Happy

धन्यवाद, काल पहिला अनारसा तळे पर्यंत लेक उभीच होती शेजारी, मला दे म्हणून. जमला हे लक्षात आल्यावर टुणकन उडी मारली मी, जाम खुश आहे मी काल पासून,

चवीला पण एकदम मस्तच झाल्या होत्या सुरळीच्या वड्या. >> thanku मृणाली.
सुहृद , ग्रेट आहात.
पापु , पिठलं ताट छान.

वर्णिता, ग्रेट काय.. खरतर मला फार अवघड आहेत असे न वाटता किचकट आणि वेळखाऊ वाटले. पण मस्त झालेत. तसं ही एक रिदम पकडून त्या ओघात गोष्टी करायला आवडतात मला.

मुगाची हलकी हलकी इडली व हिरवी चटणी.

20201013_125129.jpg

Pages