नियोवाईज धूमकेतू

Submitted by च्रप्स on 21 July, 2020 - 15:31

नियोवाईज कॉमेट फोन मधून घेतलेला फोटो...
अचानक दिसला रात्री...

9515A5A4-C927-4A4F-8C9F-375E9B2BE2CE.jpeg

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्रप्स, आणि कंसराज फोटो फारच सुंदर आहेत.
वावे, गुरुचे चंद्रासह फोटो भारी आहे.
--------------
10x50साईजच्या {ओलिम्पस } बाईनोक्युलझने दोन चंद्र सहज दिसतात. ( 8x40 ,7x35 नाही.) माझ्याकडे 10x46 मोनोक्युलर रशिअन मेक आहे त्यातून दोन दिसायचे .

आता पाऊसच आहे. आकाशदर्शन बादच.

रत्नागिरी येथील बीएस्सीचा विद्यार्थी कपिल केळकर याने नेवरे, रत्नागिरी येथून आज (२२ जुलै २०२०) टिपलेली निओवाईज धूमकेतूची छायाचित्रे. निओवाईज धूमकेतूची ही महाराष्ट्रातून टिपलेली आतापर्यंतची सर्वांत स्पष्ट आणि सुंदर छायाचित्रे आहेत. कपिल हा उत्तम छायाचित्रकार असून, गोगटे जोगळेकर महाविद्यालयात खगोल विश्वच्या सहकार्यानेन सुरू असलेल्या खगोल मंडळाचा कार्यकर्ता आहे.
#cometNEOWISE captured by kapil Kelkar from Neware, Ratnagiri in Maharashtra on 22 July 2020. Kapil is BSc student and good Photographer from Gogate Joglekar college. He is also member of Astro Club of college, which is run in association with Khagol Vishwa.
Camera - Nikon D5200
F/3.8, exposure 30 sec (single shot)
ISO 1250, lens 23 mm
dhum.jpgdhumk.jpg

सुरेख!! स्टार ट्रेल्स आल्या नाहीत का ३० सेकंद एक्स्पोज करूनही?

मस्त फोटो... पण तो माणूस आलाय फोटोत.. त्याला थोडा फ्रेम मधून बाहेर जाण्याचीरिक्वेस्ट करून चांगला फोटो आला असता..

पण तो माणूस आलाय फोटोत.. त्याला थोडा फ्रेम मधून बाहेर जाण्याचीरिक्वेस्ट करून चांगला फोटो आला असता..>>
थोडं नीट पाहिलं तर धुमकेतुबरोबर चंद्रपण दिसेल तुम्हाला.

22 जुलैची रात्र म्हणजे श्रावण शुद्ध द्वितीया. द्वितीयेची नवचंद्राची नाजूक कोर काही दिसली नाही, मात्र एक अर्धचंद्र स्पष्ट दिसला फोटोग्राफराच्या डोक्यावर. Bw
फोटो फार सुंदर आणि स्वच्छ आहेत. तेही रत्नागिरीच्या आकाशात. ऐन पावसाळ्यात. लकी गाय !

आता बहुतेक 6668 किंवा किती त्या वर्षांनीच पाहायला मिळेल. तेव्हा जो काही पाल, मांजर, मुंगी, हत्ती, कावळा, गिधाड (राहील ना तोपर्यंत गिधाड पृथ्वीवर?) झुरळ (हे टिकेल म्हणे.) असा जन्म मिळेल त्या जन्मात तरी मिळू दे पाहायला. तोपर्यंत पापांची रास वाढली तर तोही नाही दिसायचा.

मी कालच एक व्हिडिओ बघितला त्यात हा धूमकेतू बघण्याचे फायदे सांगितले होते. त्यात सांगितलंय कि ज्यांनी हा धूमकेतू प्रत्यक्ष बघितला त्यांचा भाग्योदय सुरु झाला असून पुढच्या काही वर्षातच ते करोडपती बनणार आहेत. तसेच त्यांना कोणताही मोठा आजार होणार नाही दीर्घ आयुष्य जगतील.

ढगांमुळे दिसला नाही यंदा.
आता ६७०० वर्षांनी पुन्हा संधी आहे. पण तेव्हाही ढग असले तर? असं कुणाला वाटू शकेल. पण मला वाटते तेव्हा अंतराळयानं स्वस्त होतील, तेव्हा ढगांच्यावर जाऊन पहाता येईल.

ह्या धूमकेतू ची माहिती कोणी तरी ध्या.1)
6800 वर्षांनी तो दिसतो हे कसे ठरवले गेले.
6800 वर्ष पूर्वी तो दिसल्याची नोंद आहे का.
2) त्याचा आकार किती मोठा आहे त्याच्या शेपटीची लांबी किती आहे.
3) त्याची प्रकाशमान किती आहे.
आणि 6800 वर्ष तो कुठे असतो .

यंदाच २७ मार्च २०२० ला त्याचा शोध लागला. त्याचा सूर्याभोवतीचा प्रदक्षिणा कालावधी ६७०० वर्ष आहे म्हणुन तो परत ६७०० वर्षांनी दिसेल.

तेव्हा सूर्य तरी होता का?>>>

होता हो, पण चंद्र मुद्दाम पुढेपुढे करून त्याला पुढे यायला द्यायचाच नाही ......आता बोकलतांपुढे चंद्राचे फारसे चालत नाही ना, त्यामुळे सूर्याला चान्स मिळाला अखेर.

काही ही करून 6800 वर्ष जगता येईल ( करता येईल काही तरी jugad)
पान 5 किलोमीटर जेमतेम आकार असलेला हा धूमकेतू 6800 वर्ष जगेल का? शास्वती त्याचीच नाही.

१०१ का?
१०८ हा आकडा चांगला आहे Happy

Pages