नियोवाईज धूमकेतू

Submitted by च्रप्स on 21 July, 2020 - 15:31

नियोवाईज कॉमेट फोन मधून घेतलेला फोटो...
अचानक दिसला रात्री...

9515A5A4-C927-4A4F-8C9F-375E9B2BE2CE.jpeg

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता हा धागा डायरेकत 6800वर्षांनी वर येईल...>>
असं नका बोलु हो. वाटल्यास आपण हा धागा रोज वर आणु. Happy

धन्यवाद वीरू ..पण नको.. 6800 वर्षांनी जेंव्हा नियोवाईज पुन्हा पृथ्वी जवळ येईल...नक्कीच कोणीतरी नियोवाईज ची पोस्ट शोधत इथे येईल...
त्या दिवशी हा धागा मायबोली च्या पहिल्या पानावर असेल...

सध्या गुरू आणि शनी एकमेकांजवळ दिसतायत संध्याकाळी पश्चिमेला. उद्या सर्वात जवळ असणार आहेत.

हा आज काढलेला फोटो. वर शनी आणि खाली गुरू.
IMG-20201220-WA0001.jpg

अरेरे नियोवाईज मिस्स केला. शाळेत असताना हॅले चा आला होता, पण तो पाहायला दुर्बीण नव्हती. म्हणून अगरबत्ती पुड्याची नळकांडी आणि जत्रेत घेतलेल्या भिंगा वापरून विज्ञानातल्या पुस्तकातले दुर्बीणचे तत्व वाचून एक दुर्बीण बनवली होती. ते सगळे आठवले. (अगदीच "कोंड्याची भाकरी आणि पीठाचे दुध" असे काहीसे वाटते आता Lol ) असो. नियोवाईज ला इ.स. 8820 सालीच बघतो आता.

बायदवे नियोवाईजचे फोटो मस्त एकेक या धाग्यावरचे.

@वावे, शनीचा फोटो फारच विलोभनीय. जितके काही वाचले आहे त्यानुसार, केवळ काही मीटर जाडीची ही कडी असतात म्हणे, मुख्यत्वे बर्फाची. पण त्यांचा विस्तार प्रचंड मोठा आहे (जवळजवळ पृथ्वी ते चंद्र या अंतराइतका). त्यातले सर्वात खालचे कडे शनीवरून केवळ नऊ हजार किमी आहे व ते फिरताना डोळ्यांना दिसू शकेल इतका प्रचंड त्याचा वेग आहे Happy

Pages