Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राजे आता डबडयाला आता ' अभिज
राजे आता डबडयाला आता ' अभिज किचन' साम्भाळायला देणार आहेत, त्याला कष्टान्ची सवय लागावी म्हणून. ( लागली वाट!!!!)>>>>>>>>>>>> आता राजे पण आसावरीच्या लाईन मधे जायला लागलेत म्हणजे बावळटपणाच्या बाबतीत
अगदी अगदी. राजे कोणाला
अगदी अगदी. राजे कोणाला सुधारायला निघालेत. आजकाल कोणी कोणाला नऊ हजार देत नाही आणि राजे नऊ लाख देऊन बसलेत. शुभ्रा दुसरी बावळट. राजेंना थँक्स का म्हणते ती, आई बाबा आलेच होते अनायासे तर निघून जायचं ना आणि मग थँक्स म्हणायचं. एवढा मोठा घोडा तो बबड्या त्याला काय सुधारणार. आसावरी शुभ्राच्या आई वडिलांना सांगते की तो खूप मेहनत करतो वगैरे, डोक्यात जाते ती आसावरी. शुभ्राच्या आई वडिलांनी हे प्रश्न विचारलेच पाहिजेत, त्यात अपराधी वाटण्यासारखं काय आहे. शुभ्राची आई बदलली आहे, राजे पाणी पुरी घेऊन आले होते तेव्हा वेगळीच होती.
मुलाच्या बाबतीत मात्र आसावरी
मुलाच्या बाबतीत मात्र आसावरी एकदम खोटारडी आहे.
आता तुला सोसायटी मधले लोक कोणत्या नजरेने बघत असतील वगैरे बोलून राजे आपला स्कोअर सेटल करत होते. अजुनही ९ लाखांचा हिशोब कुणीच स्पष्टपणे मागत नाही. अभिज किचन मधे भांडी घासायला लावली तर ठिक आहे. नाहीतर आसावरीला प्रभावित करायच्या नादात डबड्यावर ते उडवून टाकतील.
आता तर डबडयाला आयत कोलितच
आता तर डबडयाला आयत कोलितच मिळालय ( अभिज किचन). तो कसला सुधारतोय?
रामायणाच्या एकाच एपिसोड मध्ये
रामायणाच्या एकाच एपिसोड मध्ये सिरियल सुरू होऊन, दशरथाची एंट्री होऊन, यज्ञ होऊन, चारही मुलांचा जन्म होऊन, ते मोठे होऊन गुरुकुलला जाऊन शिक्षण सुरू झालं सुद्धा.
झी मराठी वर एका एपिसोड मध्ये बबड्याचं फार तर एक थालीपीठ खाऊन होतं..
#Doordarshan v/s #ZeeMarathi
झी मराठी वर एका एपिसोड मध्ये
झी मराठी वर एका एपिसोड मध्ये बबड्याचं फार तर एक थालीपीठ खाऊन होतं..>>> कधी कधी तो तेही खात नाही. फुगून निघून जातो.
डोक्यात जाते ती आसावरी >>+++
डोक्यात जाते ती आसावरी >>++++१११११११
तुपारे पासून एखादा चांगला माणूस नंतर खलनायक दाखवू शकतील असं वाटत
राजे नंतर खलनायक दाखवले तर !!!
सध्या प्रसारण बंद आहे का?
सध्या प्रसारण बंद आहे का?
मानबा पण बंद आहे का?
आणि ते आजोबा पण हल्ली दिसले नाहीत? बहुदा कोरोना कृपेने त्यांना मागचे काही आठवडे घरी थांबावे लागले असेल.
सध्या प्रसारण बंद आहे का? >>>
सध्या प्रसारण बंद आहे का? >>>>>>> हो
(No subject)
आला बाई मुर्ख बबड्या परत.
आला बाई मुर्ख बबड्या परत. प्रोमोमधे दाखवतात तो सोन्याचा दिवस कधी येतो आणि आसा कधी त्याच्या खनपटीस बसते काय माहिती.
अजूनही प्रोमो वर विश्वास आहे
अजूनही प्रोमो वर विश्वास आहे तुमचा ?
म्हंजे?? नुसतं आमिष होतं की
म्हंजे?? नुसतं आमिष होतं की काय ते? आमच्यासारख्या भाबड्या प्रेक्षकांना फसवून टीव्हीसमोर बसवण्यासाठी.
सुरू झाली का सिरीज परत?
सुरू झाली का सिरीज परत?
मालिकेतील चारही मुख्य कलाकार
मालिकेतील चारही मुख्य कलाकार मालिका परत सुरु होणार म्हणून फेसबुक वर गाऊन आणि नाचून जाहिरात करत होते. कंमेंट्समध्ये कोणीही आनंद व्यक्त केला नव्हता मालिका सुरु होणार म्हणून. एकाने तर लिहिलं होतं की कोरोनामधे सगळे गेले असं दाखवा आणि मालिका बंद करा.
टिपरे मध्येच बंद करून टाकली. आधी तरी सुरु करायची होती. दोन चार जुन्या चांगल्या मालिका परत परत दाखवल्या तरी चालतील ह्या असल्या टिनपाट मालिकांपेक्षा
प्रोमोमधे दाखवतात तो सोन्याचा
प्रोमोमधे दाखवतात तो सोन्याचा दिवस कधी येतो आणि आसा कधी त्याच्या खनपटीस बसते काय माहिती. >>>>>>
https://www.bestindianseries.com/blog/asavari-is-back-in-a-new-avatar-ag...
ह्या प्रोमोबद्दल बोलताय का? पण लॉकडाऊन नन्तर तर " जैसे थे' परिस्थिती आहे सिरियलमध्ये. फक्त राजेन्ना दाढी फुटली एवढाच काय तो बदल दाखवलाय. हाहाहाहा
बबड्याचा बबडेपणा आणी आईचा
बबड्याचा बबडेपणा आणी आईचा अचाटपणा सुरूच .. काही नवीन नाही.
प्रोमोमधे दाखवतात तो सोन्याचा
प्रोमोमधे दाखवतात तो सोन्याचा दिवस कधी येतो आणि आसा कधी त्याच्या खनपटीस बसते काय माहिती. >>>>>>अऑ! मागे एकदा दिली होती ना.. मग लगेच माफी मागून माती खाल्ली होती.
त्या बबड्याच्या कचकन् कानफटीत
त्या बबड्याच्या कचकन् कानफटीत मारायचे कितीतरी प्रसंग येतात. पण लेखकाला टीआरपी नकोच आहे बहुतेक.शुभ्रावर पण सासूची सावली पडायला लागलेय. मंद होत चाल्लेय ती.
डबड्याला चांगला कुटावा असे
डबड्याला चांगला कुटावा असे मला वाटायला लागलेय. वेडी आसा, मंद शुभ्रा आणी हताश, निराश असे राजे. असा गोंधळ चालू आहे. मी २ दिवस पाहीले नाही. पण शुभ्रा तिच्या मित्रा सोबत बोलत असतांना डबड्या डुबड्या येऊन तिच्यावर, ती बाहेर लफडे करत असल्याचा आरोप करतो, मागुन प्रज्ञा साथ देते. शुभ्रा घर सोडुन जाण्याचे स्पष्टीकरण देत असतांना डुबड्या मध्येच पचकुन शुभ्रावर चालूगिरीचे आरोप करतो. या मंद शुभ्राच्या जागी दुसरी बाई असती तर नवर्याला जाम थोबाडुन काढले असते. किती तो उदात्तपणा ! डबड्याचे तोंड आणी डोळे मला आजकाल चिचुंद्रीसारखे का दिसायला लागलेत का माहीत? कधी तो चिचुंद्री दिसतो तर कधी मिअर कॅट !
वरील प्राणी त्या बबड्यापेक्षा
वरील प्राणी त्या बबड्यापेक्षा बराच क्युट आहे.
बबड्या शुभ्रा यांचं खरंखरं
बबड्या शुभ्रा यांचं खरंखरं लग्न ठरतंय असं वाचलं कुठेतरी.
मी पण वाचलं. बबड्या फार लहान
मी पण वाचलं. बबड्या फार लहान वाटतो मला शुभ्रापुढे मात्र. असो हे असंच मनातल लिहिलं. लग्न करत असतील तर त्यांना शुभेच्छा.
पुन्हा घाई करुन एका वर्षासाठी
पुन्हा घाई करुन एका वर्षासाठी लग्न करु नका म्हणावं.
बबड्या शुभ्रा यांचं खरंखरं
बबड्या शुभ्रा यांचं खरंखरं लग्न ठरतंय असं वाचलं कुठेतरी.
यावेळी तरी तेजश्री प्रधानने घाई करू नये.जर ही बातमी खरी असेल तर.
कधी कधी जोडी यशस्वी व्हावी
कधी कधी जोडी यशस्वी व्हावी म्हणूनहि असं उठवतात, trp वाढावा ह्या हेतूने. खरं खोटं कळेल लवकर.
बबड्याच्या नीचपणाचा कहर. आणि
बबड्याच्या नीचपणाचा कहर. आणि ही मंद आसा लाड करुन थकतच नाही त्याचे. "बाळा असं करु नये रे......बाळा असं बोलू नये रे.....बाळा इतकंपण शेण खाऊ नये रे "
यांचं घर बदलल्यासारखं वाटतंय
यांचं घर बदलल्यासारखं वाटतंय. सहजीवन मधेच राहत आहेत ना.
राजे पण इकडेच आलेत वाटतं. घरजावई.
पोकळ बांबूचे फटके हवेत त्या
पोकळ बांबूचे फटके हवेत त्या बबड्याच्या पश्चिम टोकावर.
आमच्या मातु:श्रींनी आमचे इतके (रीड - अजिबात) लाड केले नाहीत. खाण्याच्या बाबतीत तर नाहीच. वर बदडून काढायची शक्यता ९९%.
तो बबड्या भिकार्यासारखा का
तो बबड्या भिकार्यासारखा का करत असतो प्रोमो मध्ये. परत सुरु झाल्यापासून एकही भाग बघितला नाही.
गिरीश ओक यांची वादावादी झाली ऑनलाईन असं मी मघाशी कुठेतरी वाचलं. ते म्हणाले की आम्ही जीव धोक्यात घालून शूटिंग करतोय तुमचे मनोरंजन व्हावे म्हणून. त्यांना ट्रोल केलं गेले आणि ती बाई त्यांना म्हणाली की सगळे उपजीविकेसाठी धडपड करताहेत, कोणी जीव धोक्यात घालत नाही. तुम्ही सगळे घरी बसा आणि तुमच्या लेखकाला अमूल्य बुद्धी वाया घालवायची गरज नाही
Pages