अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या आठवड्यात चहयेद्या पाहिलय का कुणी? अगबाईचे सगळे कलाकार आले होते.
सिरिअल बेकार झालीये पण त्यावर स्किट मात्र मजेदार झाल.

शुभ्राने आसाला मस्त सुनावले. पण तिच्या डोक्यात प्रकाश पडायलाय असे काही तिच्याकडे बघून वाटले नाही. बबड्याला राजेंकडून मिळणारा पैसा हवा पण राजे नकोत. >>>>>>>>> ++++++११११११११

बबड्या आणि शुभ्रा कायम घरीच पडीक असतात. >>>>>>>> काल ' मला थोडा वेळ आहे ऑफिसला जायला, तोपर्यन्त ओट्सचा उपमा करते' म्हणाली. पण राजे ओटसचा उपमा खाऊन गेले, आजोबा वॉकला जाऊन आले तरीही हि अजून घरीच! Uhoh

काल आसा कडे बायका आल्या होत्या. हकु होते का? >>>>>>> हकुची कल्पना आजोबान्ची. मी पूर्ण एपिसोड बघितला. डबडयाने नवीन नाटक चालू केलय ' मिसेस राजे' म्हणण्याच. राजेन्नी आसाच्या केसात गजरा माळला, तिला झुमके कुरियर केले, झुमक्यान्बरोबर प्रेमपत्रही पाठवल ते बघून डबडयाच्या पोटात दुखल. म्हणून तो तिला ' आई' हाक न मारता मिसेस राजे म्हणत सुटतो.

तो म्हणतो की राजेन्नी ' अभिज किचन' बन्द करुन प्रेमाचे क्लासेस घ्यावे. त्याला म्हणाव, 'त्या प्रेमाच्या क्लासचा पहिला विद्यार्थी तूच असावास'. जेव्हा बघाव तेव्हा कुजकट बोलत असतो. प्रेम कशाशी खातात ह्याला माहित नाही. राजेन्नी आणलेले झुमके खरे तरी होते. ह्याने बायकोला वाढदिवसाला नकली नेकलेस दिला.

की मेंदी लावली होती, घ्यायचे ना स्वतः उठुन. >>>>> ह्याआधी त्याने दोन ग्लास असेच गट्टम केले होते. हा तिसरा.

शुर्पणखा >>>>>>>> Rofl

ह्या आठवड्यात चहयेद्या पाहिलय का कुणी? अगबाईचे सगळे कलाकार आले होते.
सिरिअल बेकार झालीये पण त्यावर स्किट मात्र मजेदार झाल. >>>>>>>>> +++++++११११११११ अन्कुर वाढवेचा डान्स आणि शेवटच सोहमचा गुलाबजाम खाण्याचा भाग मस्त होता.

स्किट मात्र मजेदार झाल>>>>>> हो एकदम मस्त.. कारखानीस काकूंना चक्क केवढं फुटेज मिळालं Proud

बबड्या बायल्याच आहे. एवढ्या बायका हकु ला येणार तर सगळ्यांसमोर कशाला बसायचं?

हो माझ्याही मनात अगदी तेच आलं होतं. कामधंदा तर काही करत नाहीच पण निदान आत तरी जाऊन बसायचं. बाहेर काय साड्या आणि दागिने बघायला बसला होता बबड्या Proud
अजून एक आत्ता आठवलं, शुभ्रा तिच्या नवऱ्याला विचारते, तू मिसेस राजे असं का म्हणत असशील. हा पॅसिव्ह की ऍक्टिव्ह.

काल आसा सौदिंडिअन दिसत होती Happy अबोलीचे मोठे गजरे घातल्याने

मला थोडा वेळ आहे ऑफिसला जायला, तोपर्यन्त ओट्सचा उपमा करते' म्हणाली. पण राजे ओटसचा उपमा खाऊन गेले, आजोबा वॉकला जाऊन आले तरीही हि अजून घरीच! >>>>>>>>>>>> दुपारची गोळी विसरली सीन वगैरे म्हणजे ती गेलीच नाही ऑफिसला.

शुभ्रा काहीतरी चुकीचंच मराठी बोलत असते काल त्या डबड्याला २ वेळा अरे पण तू आईंना असं का म्हणत असशील? असं म्हणाली. समोरासमोर बोलताना अरे पण तू त्यांना असं का म्हणतोयस? असं हवं ना? Proud जाऊदे फारच पिसं निघतील. Proud

तुपारेपेक्षा असेल कदाचित. शुभ्रा फारच चुकीचं मराठी बोलते. सवांद तसे असतात की शुभ्राचं स्वतःचं योगदान आहे काही कळायला मार्ग नाही. निजो म्हणत होती एका मुलाखतीत की तेजश्रीचं मराठी चांगलं आहे वगैरे. निजोच्या अपेक्षा कमी असतील.
विश्वास टाकलाय मी तुझ्यावर (विश्वास ठेवतात ना) वगैरे बरेच चुकीचं बोलतात आजकाल बहुतेक सगळ्याच मालिकेत. संवाद ऑडिट करत नाहीत का टेक घ्यायच्या आधी.

काल आसा सौदिंडिअन दिसत होती Happy अबोलीचे मोठे गजरे घातल्याने>>हो मलाही ती साऊथ इंडियन वाटली..
आणि शुभ्राचा ब्लाउज तिचा एक ब्लु कलरचा कुर्ता होता तो तिनी ब्लाउज म्हणून घातला होता. Happy

'तू आई झाल्यावर तुला कळेल' हे बोलून आसाने सूनेला गप्प केले. शुभ्राने पण लगेच माघार घेतली. Angry
म्हणायचे ना कि डबड्या चुकतोय आणि तुम्हीही. हे कळायला मला आई व्हायची गरज नाही. डबड्या असाच वागत राहिला तर मी आई होणं अशक्य आहे. मुळात डबड्या बाबा व्हायच्या लायकीचा झाला नाहिये. त्याला सुधारणे हा मुद्दा आहे.

शुभ्राचा ब्लाउज तिचा एक ब्लु कलरचा कुर्ता होता तो तिनी ब्लाउज म्हणून घातला होता. >>>>>>>>> अगं पण कुर्त्यावर साडी कशी नेसली असेल?? Happy

राजे पण इतके रिकामटेकडे आहेत काय? बघावं तेव्हा भेटवस्तू घेऊन दारात हजर!! आज तर चक्क ट्रंक घेऊन आले होते.>>हो खरंच ते किती हास्यास्पद वाटत होतं.
त्यांनी आसाची चप्पलही ठेवली होती (yucks!)

अगं पण कुर्त्यावर साडी कशी नेसली असेल??सोप्पंय.
कुर्त्यावर लेगिन्स घालायची आणि नेहमीसारखी साडी नेसायची.
हे लोक लेगिन्स वर साडी नेसतात.

आसाच्या चेहऱ्यावर तर असे भाव होते जसं काही सोहमला फाशी देत आहेत. कुर्ता किती मोठा असतो, त्याखाली साडी कशी नेसणार Uhoh

कुर्ता लेगिन्स च्या आतमध्ये घालायचा. म्हणजे थोडक्यात कुर्ता in करायचा लेगिन्स मध्ये.
आणि वरतून साडी नेसायची असं काहीतरी केलं असेल.
त्या लोकांकडे भरपूर हॅक्स असतात असे जुगाड करायला.
Stylists are experts in doing such jugad.

'तू आई झाल्यावर तुला कळेल' हे बोलून आसाने सूनेला गप्प केले. शुभ्राने पण लगेच माघार घेतली. Angry
म्हणायचे ना कि डबड्या चुकतोय आणि तुम्हीही. हे कळायला मला आई व्हायची गरज नाही. डबड्या असाच वागत राहिला तर मी आई होणं अशक्य आहे. मुळात डबड्या बाबा व्हायच्या लायकीचा झाला नाहिये. त्याला सुधारणे हा मुद्दा आहे. >>>>>>> +++++++++११११११११ शुभ्राने म्हणायला हव होत की आधीच दोन बाळे ( सोहम आणि आजोबा) साम्भाळायला नाकीनऊ येतात, त्यात हे तिसर इतक्यात तरी नको बाई!

अभिजित राजेंनी डबड्याला चार ठेवल्या की नाही?.....अहो अभिजित रांजेंच काय घेऊन बसलात,नवीन प्रोमो बघा.
आ गया ,वो समय आ गया.अपनी आसावरी बन जायेगी झांसी की रानी होली में

मला वाटलं स्वप्नच असेल डबड्या पोलिसात आणी राजे त्याला चक्क सुनावत आहेत. राजे बोलले का घरी फायनली? कि नुसतं बाहेरच ऐकवलं आणि प्रत्यक्ष घरी आल्यावर फुस्स

मला वाटलं स्वप्नच असेल डबड्या पोलिसात आणी राजे त्याला चक्क सुनावत आहेत. >>>>>>>> सेम पिन्च. चान्गल झापल डबडयाला राजेन्नी आणि शुभ्राने. बर एवढा मार खाऊनही ह्याचा माज काही गेला नाही. आईवरच डाफरला. Angry तरी नशीब, राजेन्ना थॅन्कस म्हणाला वाचवल्याबद्दल.

ह्या प्रज्ञाला कुणीतरी दुबईत पाठवा रे नवर्याकडे!

तेप्रचा राजेन्बरोबरचा सीन छान झाला. बोलता बोलता अचानक फ्रस्टेट होऊन रडते ते छान दाखवल.

वो समय आ गया.अपनी आसावरी बन जायेगी झांसी की रानी होली में >>>>>>>>> भान्ग प्यायली असेल. खरच तिने झाशीच्या राणीच्या अवतार धारण केला असेल तर तो अवतार डबडयाला दाखव. भलत्याच माणसान्वर ( राजे, शुभ्रा, प्रज्ञा) नको. नाहीतर असही व्हायची की नेहमीप्रमाणे ही ऐनवेळी अवसानघातकीपणा करायची. नवीन प्रोमो नाही पाहिला अजून.

अजनबीची लिन्क बघितली. निजो डिट्टो आसा आणि तो टीनएजर डबडया. Lol

काल दिसला थोडा भाग, त्या सोम्याचे काय प्रज्ञा सोबत लफडे दाखवलंय का?
ते प्र , प्रज्ञाला उष्टे खाल्ले म्हणाली त्यावरून तसेच वाटले

लफडे नाही आहे. आसा-शुभ्राला त्रास द्यायला व डबड्याकडून हवा तसा पैसा उकळायला प्रज्ञा त्याचे गोडवे गाते. तसेच डबड्याला 'तू किती चांगला आहेस' असे सांगणारे दुसरे कोणीच नाही. त्यामुळे जरा स्तुती ऐकली कि हा राजेंच्या कार्डवर लगेच खर्च करतो.

नाहीतर असही व्हायची की नेहमीप्रमाणे ही ऐनवेळी अवसानघातकीपणा करायची. >>> मलाही तसेच वाटते. कानाखाली मारली कि लगेच स्वयंपाक घरात जाऊन त्या हाताला चटके देईल.

mady बाई काल दिसल्या ! खरंच खूप छान वाटते ती आली कि , इंनोसन्स खूप छान दाखवते ती !
उद्याच्या भागात असे म्हणून जे दाखवलं होते ते दाखवलेच नाही , हि फसवणूक आहे

Pages