Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आसावरीच्या त्याच त्याच
आसावरीच्या त्याच त्याच अभिनयाचा आणि सुराचा कंटाळा आलाय. शिवाय ते इतकं अतिरंजित आणि काळाशी विसंगत वाटतंय की एखादा सोशल पीरियड ड्रामा बघतोय की काय असं वाटू लागलंय.
कथालेखक सदैव वामकुक्षी घेत असतात काय?
आसावरीच्या त्याच त्याच
आसावरीच्या त्याच त्याच अभिनयाचा आणि सुराचा कंटाळा आलाय. >> सगळ्यात जास्त काय टोचतं कानाला तर ते बाबा बाबा करणं, वाक्याची सुरुवात बाबाने आणि शेवटही बाबाने, असं कोणी बोलतं का
बाबा वेळेवर औषधं घ्या हं बाबा
बाबा वेळेवर जेवण कराल नं बाबा
आजोबांचा चेहेरा ओढल्यासारखा
आजोबांचा चेहेरा ओढल्यासारखा दिसायला लागलाय..
बाबा वेळेवर औषधं घ्या हं बाबा
बाबा वेळेवर औषधं घ्या हं बाबा
बाबा वेळेवर जेवण कराल नं बाबा>>>अगदी+१+१
आजोबांचा चेहेरा ओढल्यासारखा
आजोबांचा चेहेरा ओढल्यासारखा दिसायला लागलाय....
या लोकांच्या अशा वागण्यामुळे !!!!
बाबा बाबा
बाबा बाबा
तोचतोचपणा बद्दल सहमत.
तोचतोचपणा बद्दल सहमत.
बाबा बाबा - एखाद्याची बोलण्याची सवय असू शकते की अशी
आज आजोबान्ना बघून वाईट वाटल
आज आजोबान्ना बघून वाईट वाटल. आजोबान्ना घ्यायला येणारे आपटे 'तुपारे' मध्ये परान्जपे होते.
आजोबान्च आणि कारखानीकाकान्च बोलण छान दाखवल.
दर्जेदार मालिका देण्यापेक्षा
दर्जेदार मालिका देण्यापेक्षा वर्षानुवर्षे एकच मालिका चालवणे हा निकष असल्याने तोचतोचपणा ही झी टीव्हीची खासियत झालेली आहे.
आजोबांचा सगळा ताठा उतरला आहे.
आजोबांचा सगळा ताठा उतरला आहे.
या सगळ्यांमध्ये फक्त शुभ्राची
या सगळ्यांमध्ये फक्त शुभ्राची व्यक्तिरेखा कणखर आणि वास्तववादी वाटते. आणि ती सुरुवातीपासून आतापर्यंत फार बदलली नाहीये. फक्त बबड्याच्या बाबतीत आत्ता कुठे शहाणी झालीय.
(No subject)
हे अजून एक नेट वर पाहिले, दवणीय अंडे पेज वर, जाम भारी पेज आहे
आता आळीमिळी चा प्रोमो पाहिला
आता आळीमिळी चा प्रोमो पाहिला,या आठवड्यात गिरिष ओक येणार आहेत.पण त्यांची मुलगी गिरिजा ओक आहे ना,आणि जी मुलगी त्यात आहे ती तर शाळकरी आहे.एवशी लहान कशी?.अगदी पहिला डिवोर्स झरी झाला असेल तरी तो खूप आधी झाला असेल ना,मग मुलगी मोठी असायला हवी होती.
आता आळीमिळी चा प्रोमो पाहिला
आता आळीमिळी चा प्रोमो पाहिला,या आठवड्यात गिरिष ओक येणार आहेत.पण त्यांची मुलगी गिरिजा ओक आहे ना,आणि जी मुलगी त्यात आहे ती तर शाळकरी आहे.एवशी लहान कशी?.अगदी पहिला डिवोर्स झरी झाला असेल तरी तो खूप आधी झाला असेल ना,मग मुलगी मोठी असायला हवी होती>> ती त्यांची धाकटी मुलगी दुर्गा आहे. दुसरी पत्नी पल्लवीची मुलगी
गिरिजा ओक तिच्या मुलाबरोबर
गिरिजा ओक तिच्या मुलाबरोबर टायटल साँग मधे दिसली होती.
गिरिजा आली होती तिच्या मुलाला
गिरिजा आली होती तिच्या मुलाला घेऊन अळीमिळी मध्ये.
गिरीश ओक यांची दुसरी पत्नी
गिरीश ओक यांची दुसरी पत्नी पल्लवी, रविंद्र मंकणीच्या भावाची बायको दाखवली होती अवंतिका सिरीयलमधे. मला मागेच कोणीतरी सांगितलं.
अळीमिळी चांगला असतो का, झी ५ वर बघू का.
रवींद्र मंकणीबरोबर अवंतिका
रवींद्र मंकणीबरोबर अवंतिका दुसरं लग्न करते ना? त्यांचा मुलगा होता त्यात ते आठवतंय पण भाऊ कोण दाखवला होता. भावाची बायको तर त्याहून आठवत नाही. त्या मालिकेत नंतर इतकं पाणी घातलं होतं की अगदी रटाळ झाली होती ती.
लग्न नाही दाखवलं त्यांचं, पण
लग्न नाही दाखवलं त्यांचं, पण बघून हसते असा शेवट केला. भाऊ कोण होता आठवत नाही मलाही, वहीनी म्हणून एक सडसडीत, उंच आठवते, व्हिलन होती वहीनी. इथेच दोघांची भेट झाली असावी.
दवणीय अंडे म्हणजे काय? कृपया
दवणीय अंडे म्हणजे काय? कृपया माहिती द्यावी.
शुभ्राने आसाला मस्त सुनावले.
शुभ्राने आसाला मस्त सुनावले. पण तिच्या डोक्यात प्रकाश पडायलाय असे काही तिच्याकडे बघून वाटले नाही.
आसा सध्या काळजी सोडून दुसरे
आसा सध्या काळजी सोडून दुसरे कोणतेच भाव चेहर्यावर आणत नाही. आजोबा बाकी बरे असताना गोळ्या, पाणी अगदी हातात कशाला ? बबड्या आणि शुभ्रा कायम घरीच पडीक असतात. कर्ता सवरता मुलगा नुसता फोनवर गेम्स खेळत बसतो, तरी कोणालाच काही वाटू नये ? बबड्याला राजेंकडून मिळणारा पैसा हवा पण राजे नकोत.
हा विषय किती छान हाताळता आला असता, झीने माती केली.
आसा सध्या काळजी सोडून दुसरे
आसा सध्या काळजी सोडून दुसरे कोणतेच भाव चेहर्यावर आणत नाही>> ते जमणार नाही. अभि नय करायचे काँट्रॅक्ट मध्ये नाही आहे. डंब सुंदर दिसायचे आहे. शिवाय बोटॉक्स मुळे चेहरा ताणून बसवल्या सार्खा आहे. राजे कपाल बडवती मोड मध्ये असावा.
काल आसा कडे बायका आल्या
काल आसा कडे बायका आल्या होत्या. हकु होते का? कारण डबड्या, पत्र्याचा डबा बडवल्यागत चिरकत होता. त्याला मसाला दूध हवे होते. आता याचे काय हातपाय मोडले होते? की मेंदी लावली होती, घ्यायचे ना स्वतः उठुन. किंवा शुभ्राला हाक मारायची. पण आसा आली नाही म्हणून त्याने मिसेस राजे म्हणून हाक मारली, तेव्हा मग आसा अवतीर्ण झाली. त्या आधी प्रज्ञाने भोचकपणा करुन आसाच्या आयुष्यातली महत्वाची घटना विचारली. जेव्हा डबड्या २ वर्षाचा होईपर्यंत कोकलत नव्हता, तेव्हा आसाला काळजी वाटली होती, पण एकदाचा तो आई म्हणून ओरडला तेव्हा माझ्या जन्माचे सार्थक झाले असे आसाने सांगीतल्यावर डबड्याचा क्रोध अनावर झाला. शुभ्राने सावरण्याचा प्रयत्न केला, पण डबड्याचे मन बडवले गेले असल्याने तो आणखीन वाजत सुटला. आसा धन्य आहे, किती ते कार्ट्याचे कौतुक आणी काळजी.
बाकी प्रज्ञा दात दाखवते तेव्हा शुर्पणखा वाटते.
रश्मी....
रश्मी....
मी पण नेमका तेवढाच भाग पाहिला काल.
माऊ
माऊ
शुर्पणखा
शुर्पणखा
बाकी प्रज्ञा दात दाखवते
बाकी प्रज्ञा दात दाखवते तेव्हा शुर्पणखा वाटते.>>रश्मी... भारीच उपमा.
रश्मी, मीही आत्ता फेसबुक वर
रश्मी, मीही आत्ता फेसबुक वर तेवढाच भाग बघून आलीय.
मी तर 8:30 वाजता ही मालिका बघणं कधिचंच बंद केलंय.
वाटलं तर रिपीट बघते (एकटी ) नाहीतर झी मराठी च्या फेसबुक वरून बघते व्हिडीओस.
पण जे काही दाखवतायेत ते फारच चीड आणणार आणि संतापजनक आहे.
आय मीन थिस इस जस्ट टू मच ऑफ इट....
रश्मी मानबा मधला अथर्व lपण
रश्मी मानबा मधला अथर्वपण एवढा चिडला नाही जेवढा बबड्या चिरकतोय. लहानपणीची बबड्याची दुखणी आता बाहेर येतायेत. तो हे ही विसरलाय की त्याला एक बायको आहे.
Pages