अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या सोसायटीचं नाव सहजीवन सोसायटी आहे बहुतेक.
ह्या मालिकेतल्या सोहम उर्फ बबड्या ह्या कॅरॅक्टरचा राग येऊन मी ही मालिका रात्री 8:30 च्या स्लॉट मध्ये बघणं बंद केलंय.
कारण त्या वेळेस माझा 9वर्षांचा मुलगाही माझ्यासोबत ही मालिका बघत असे.
त्याच्या नकळत्या वयात त्याच्यासमोर सोहम चं असं वागणं त्याला दाखवणं मला बरोबर वाटलं नाही म्हणून मी आता 8:30वाजता त्यांच्यादेखत ही मालिका बघत नाही. जमल्यास रिपीट बघते नाहीतर नाही.

रुचा..बरोबर आहे!
सोहम चं वागणं अतिरेकी दाखवलं आहे....
मुलं नको तेच पटकन पिक अप करतात!

माझ्या दोन्ही मुली (७ & ४ इयत्तेत शिकणाऱ्या) माझ्यासोबत हि सिरीयल बघतात पण त्यांना सोहंम अजिबात आवडत नाही. उलट त्याचे असे उफराटे वागणे त्यांना खटकते आणि विशेष करून आजोबा त्या दोघीना आवडत असल्यामुळे त्या सोहमचा राग राग करतात.

माझी लेकीला सिरीयलच्या सुरुवातीचे भाग बघून बबड्या आवडायचा. मी मोठी होऊन बबड्याशीच लग्न करीन, एवढं ते बबड्याप्रेम.
आता मात्र बबड्या नको म्हणते.

आंबटगोड >>हो मलाही असंच वाटतं, वाईट असलेलं मुलं फार पटकन शिकतात.
अजनबी आणि माउमैया तुमच्या दोघिंच्याही मुली समजदार आहेत.

धन्यवाद, me_rucha. मुलांना आपण नीट कल्पना दिली कि वाईट/खोटं सुरुवातीला कितीही चांगले वाटले तरी त्याचा शेवट लवकर होतो त्याउलट खर /चांगलं हे लॉन्ग लास्टिंग असते तर मुलांना लवकर उमगत.

नवीन प्रोमो पाहिल्यावर वाटत की,इतकी बालिश आणि टुकार कल्पना यांना सुचतेच कशी? ..रागावणारी बाहुली.झीम ला भीकेचे डोहाळे लागले आहेत.
सिरियलला नारळ द्या लवकर.
दरम्यान नवीन मालिकेतला तो हिरो विराजस कुलकर्णी आहे का? बावळट वाटला ,गौतमी आवडली,अँक्टिंग मध्ये कशी आहे, हे नाही माहित.

कुठे होतेय नवीन सिरीयल सुरू, गौतमी छान अभिनय करते, गातेही छान.

झी म वर असेल तर मी काढून टाकले ते चॅनेल, नेटवर बघेन.

फालतु सिरीयल झालीय... आसा अन बबड्याच्या एक एक ठेवुन द्यावि असं वाटतं.. आजकलच्या आई इतक्या भाबड्या अन नकळत्या असतात का?

सोहमचं character असं दाखवून झी ला नक्की काय साधायचय?
आईला वापरून घेतोच आहे. पण आजोबांना ठसका लागला तरी पाणी न देणारा हा कसला नातू..??!!

शुभ्राला लग्नाआधी काहीच झलक दिसली नसेल याच्या स्वभावाची?

नसेल दिसली.
झीची पात्रं अचानक सुधरतात अचानक बिघडतात. एकदम टोकाचं वाईट वागणार लग्गेच सुधरतो. तसं बबड्या एकदम लग्गेच वाईट वागु लागलाय.

नताशा हो हो मला तेच म्हणायचय.. Happy
या सगळ्यात शुभ्रा जरा बरी दाखवली आहे... अन सोशिक सुनेचं काम राजे सांभाळत आहेत.. खरं तर ८.३० ला छान हिंदी मालिका असतात पण घरातले नाहि न देत चॅनेल बदलायला.. Happy

बिच्चारे राजे. आसाने डोसाही दिला नाही, चान्गला फ्रेन्च टोस्ट करत होते तर तेही करु दिले नाही.

बर अभिज किचनमध्ये ती डोसा घेऊन आली तेव्हा डोसा खाताना नवर्याशी चार प्रेमाच्या गोष्टी कराव्यात ना. पण नाही, तिथे हिने सुनेच्या कागाळया सुरु केल्या. काय तर म्हणे, ' तडजोड केली तरच नात बहरत, दुसर्यासाठी मन मारण्यातच खर सुख नात्यात असत' वगैरे वगैरे. तडजोड करायची म्हणजे काय करायच, शुभ्राने नोकरी सोडावी का? तिने जर नोकरी सोडली तर घरात ' ठणठणगोपाळ' होईल. बबडयाच्या कामधन्द्याचा काहीच पत्ता नाही.

मुळात आसाला बबडया आणि शुभ्रामध्ये भाण्डणे कोणामुळे आणि का होत आहेत हेच कळत नाहीये. त्यान्च अर्धवट भाण्डण ऐकून फालतू कनकल्युजन काढल हिने.

शुभ्राने नोकरी नाही तर नवर्याला सोडाव.

माझा एक आगावूपणाचा सल्ला:शुभ्राच्या आईवडिलांनी सहजीवन सोसायटीत रहायला यावे.म्हणजे आजोबांना सोबत होईल. त्यांनाही एकेकटे रहायला नको. बबड्यावर वचक बसेल

हो. शुभ्रच्या आईवडिलांना आणावे. + ते खमके दाखवायला हवेत. डबड्याला आणि आसावरीला बरोबर वठणीवर आणणारे. पण ते काही झीला सुचणार नाही.
झीची पात्रं अचानक सुधरतात अचानक बिघडतात. एकदम टोकाचं वाईट वागणार लग्गेच सुधरतो. >>>नाहीतर काय! डबड्याचा नालायकपणा १०० दिवस दाखवतील. त्याला कधीतरी कोणीतरी कानाखाली देईल, अद्दल घडवेल, बरोबर ओळखून सरळ करेल या आशेवर लोकं ते सहन करतील. मग अचानक कोणीतरी त्याला फुसका डोस पाजणार आणि तो लगेच चांगला होणार. १०० दिवस आपण जे सहन केलंय त्याचा बदला(कमीत कमी ९० दिवस त्याचा छळ) घेतल्याचे सुखही हे मिळू देणार नाहीत.

डबड्याच्या कानाखाली मारण्याचा मान झीम आसालाच देणार.सचिन पिळगावकरांच्या आत्मविश्वास प्रमाणे आसामध्ये कोणीतरी इतका आत्मविश्वास निर्माण करेल की मग जस आत्मविश्वास मध्ये नीलकांती पाटेकर जशी तिच्या बिघडलेल्या मुलाला सगळ्यांदेखत मार मार मारते, तसच आसा डबड्याला मारणार.
आसाला अभिनयाला भरपूर स्कोप दिलय झीमने.मग आसा झंशीच्या राणीसारखी मेरे घर को बरबाद होने नहीं दूंगी अस म्हणतक्षयलगार करणार.
आज चक्क आशाबाई भोसले यांनी आसाच कौतुक केल आहे की त्या ही मालिका बघतात आणि आसा त्यांना खूप आवडते.
आता झीमला बघायलाच नको.

शुभ्राचे आईवडिल कधीच कुठे दाखवत नाहीत. लग्नात तरी होते का आसा च्या?
आता विसरून पण गेले कोण कलाकार होते?

ही मालिका आता खरंच बघवत नाहीय. फक्त शुभ्राचं कॅरॅक्टर ठीक दाखवलंय आणि तिचा अभिनयही चांगला असतो. बबड्याचं खलनायकी वागणं अगदी साय्कोटाइप वाटतंय. ऑब्सेसिव, पझेसिव,खुनशी, स्वार्थी. त्याला निदान साय्को म्हणून एस्टॅब्लिश करा म्हणजे त्याच्या वागण्याला प्रेक्षकांच्या दृष्टीने कारण तरी मिळेल. सर्वसाधारण मुलगा इतका हीन वागू शकतो आणि त्याचं काहीच नुकसान होत नाही. म्हणजे टॅंट्रम्स यशस्वी ठरू शकतात हे ठसतंय यातून.

आसाला बबडयाला, राजेन्ना ओरडता येत नाही पण शुभ्रावर सासूगिरी करणे बरोब्बर जमते. Angry काल शुभ्रा तिला समजवायला गेली तर फक्त हाताने थाम्बवल तिला.

हो. शुभ्रच्या आईवडिलांना आणावे. + ते खमके दाखवायला हवेत. >>>>>>>>> सहमत. ते येतीलही पण आजोबान्ना चालेल का नातसुनेच्या माहेरच्यान्नी सासरी राहण? त्यात आसा आणि राजेसुद्दा विरोध करायला आहेतच.

शुभ्राचे आईवडिल कधीच कुठे दाखवत नाहीत. लग्नात तरी होते का आसा च्या? >>>>>>>> अगदी अगदी. शुभ्राची चौकशी करायला साधा फोनही करत नाही, आणि तिही करत नाही. बोलण्यात सुद्दा ती आईवडिलान्चा उल्लेख करत नाही. आसाच्या लग्नाबाबत त्यान्ची मतेही विचारली नाही. लग्नात सुद्दा दिसले नाही.

फक्त पहिल्या भागात शुभ्राच्या लग्नात दिसलेले. तिचा धाकटा भाऊही दाखवला होता ना. तो तर पिण्ट्याची कॉपी करत होता. Lol

ही मालिका आता खरंच बघवत नाहीय. >>>>>>>>> ++++१११११११११

शुभ्रावर सासूगिरी करणे बरोब्बर जमते. Angry काल शुभ्रा तिला समजवायला गेली तर फक्त हाताने थाम्बवल तिला.>>>>आणि म्हणते कशी शुभ्रा, जेवताना भांडू नये. अन्नाचं विष होतं.असा राग आला ना मला. आपला मुलगा काय गुणांचा आहे हे माहिती नाही का?त्याने सांगितलेले सगळे खरे वाटते तिला. तरी परवा एकदा माफी मागावी लागली होती

मंगळागौरीला शुभ्राची आई आली होती. त्यानंतर एकदाही नाही दिसली. वडील तर शुभ्राच्या लग्नानंतर दाखवलेच नाहीत

शुभ्राची ओढाताण खरी वाटते.
नोकरी सांभाळून घर सांभाळायची कधी सवय नाही. आता प्रयत्न करतेय तर डबड्याची काडीची मदत नाही.
पण ती नुसतीच तक्रार करतेय.
'आई नाश्त्याची प्लेट हातात द्यायची' म्हटल्यावर खरतर तिने 'हवतर उठ आणि घे ' सांगायला हवं होतं. कशाला आणखी लाड करायचे.
रच्याकने , ती कुठल्या field मध्ये काम करते ?
Work from home म्हटल्यावर पहिल्यादा IT वाटलं. पण असे भरजरी कपडे ??

इथलं वाचून ती गोष्ट आठवली, तो एक मुलगा चोर होतो पकडला जातो आणि शिक्षा होते, तेव्हा तो जजना सांगतो की पहिली शिक्षा माझ्या आईला करा ( का स्वतःच आईचा कान चावतो ते आठवत नाहीये ) , कारण आईनेच लहानपणी पहिली चोरी करतो तेव्हा कौतुक केलेलं असतं.

तसेच लहानपणापासून बबड्याला डोक्यावर चढवून अति लाड करून पाठीशी घातलं असेल आ सा ने तर तिलाच पहिली शिक्षा व्ह्यायला हवी मग त्याला.

इथलं वाचून ती गोष्ट आठवली, तो एक मुलगा चोर होतो पकडला जातो आणि शिक्षा होते, तेव्हा तो जजना सांगतो की पहिली शिक्षा माझ्या आईला करा ( का स्वतःच आईचा कान चावतो ते आठवत नाहीये ) , कारण आईनेच लहानपणी पहिली चोरी करतो तेव्हा कौतुक केलेलं असतं.

तसेच लहानपणापासून बबड्याला डोक्यावर चढवून अति लाड करून पाठीशी घातलं असेल आ सा ने तर तिलाच पहिली शिक्षा व्ह्यायला हवी मग त्याला. > +१. सगळं आयुष्य बाबा औषधं, तुम्हाला त्रास होईल, बबड्या खाऊन घे, बबड्या तुला आवडतय म्हणून भजी केल्ये, बबड्याचे बूट उचल आणि तत्सम बावळट गोष्टींवर खर्च केल्यामुळे माणूस म्हणून आपला मुलगा फार उत्तम राहू दे पण निदान वाईट होणार नाही याकडे साफ दुर्लक्ष केलय

माणूस म्हणून आपला मुलगा फार उत्तम राहू दे पण निदान वाईट होणार नाही याकडे साफ दुर्लक्ष केलय >>> अगदी अगदी. तेच ना, तीच जास्त दोषी आहे.

Pages