दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी रंगभूमीचा अक्षरांचा बादशहा हरपला. सुलेखनकार श्री. कमल शेडगे ह्यांचे दुःखद निधन. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो .......

सुलेखनकार श्री. कमल शेडगे ह्यांचे दुःखद निधन. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो >> धनंजय आणी चंद्रकांत ह्या दिवाळी अंकाची नावे त्यांनीच सुलेखित केलेली.
विनम्र श्रध्दांजली

सरोज खान Sad

सुदौवाने एक संधी मिळाली सरोज खानना प्रत्यक्ष बघण्याची भेटण्याची. इथे न्यू जर्सी मधे त्यांनी एक डान्स वर्कशॉप घेतला होता. त्यात मी गेले होते. खूप कडक शिस्तीत सगळ्या बॅचेस चालू असायच्या कारण ४ दिवसात एवढ्या लोकांना शिकवून रिसायटल प्रोग्रॅम होणार होता. त्या प्रत्येकालाच खूप ओरडायच्या. म्हणत की मी माधुरी, ऐश्वर्या ला पण ओरडले आहे , काम म्हणजे काम. बाकी नंतर एकदम मस्त बोलत, जोक्स चालू असायचे. स्टेजवर मेरे हातो मे नौ नौ चुडिया वर सग्ळ्यांसोबत डान्स केला. छान आठवणी आहेत.

जगदिप! अतिशय टॅलंटेड अ‍ॅक्टर. काहि कलाकार त्यांच्या इंट्रिंसिक टॅलंट मुळे कायम लक्षात रहातात. जगदिप साहेब त्यातले एक. भावपुर्ण श्रद्धांजली...

सुशील गौडा
कन्नड अभिनेत्याची आत्महत्या

निवृत्त आयएएस अधिकारी, लेखिका नीला सत्यनारायण यांचे मुंबईत निधन झाले.*
*नीला सत्यनारायण यांचा अल्प परिचय.*
जन्म.५ फेब्रुवारी १९४९ मुंबई येथे.
नीला सत्यनारायण यांचे वडील वासुदेव आबाजी मांडके हे पोलीस खात्यात होते. नीला सत्यनारायण या १९७२ च्या बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त राहिल्या होत्या. नीला सत्यनारायण यांच्या आपल्या सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी मुलकी खाते, गृह खाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी खाते, वैद्यक, समाजकल्याण, ग्रामीण विकास यांसारख्या अनेक खात्यांत प्रमुख पदांवर काम केले. लोकप्रिय सनदी अधिकरी म्हणूनही त्यांची ओळख होतीच. आपल्या रुक्ष आणि अतिशय धकाधकीच्या कामात व्यग्र असतानाही त्यांनी आपली संवेदनशीलता जोपासली, वाढवली आणि लेखनातून त्या व्यक्त होत राहिल्या. कवयित्री म्हणून त्या अधिक परिचित असल्या, तरी याशिवाय त्या लेखिका पण होत्या. त्यांचे स्तंभलेखनही अनेकांना आवड असे. त्यांनी मराठीत सुमारे १५० हून अधिक कविता लिहिल्या असून, त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून ‘बाबांची शाळा’ हा मराठी चित्रपट निघाला होता. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते. नीला सत्यनारायण यांच्या ‘ऋण’कादंबरीवर आधारित समीर सुर्वेला यांनी ‘जजमेंट’हा मराठी सिनेमा बनवला. २०१९ मध्ये ‘खऱ्याखुऱ्या गोष्टी’ हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. सनदी सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्या समासेवेत कार्यरत होत्या. अनेक कार्यक्रम, महिलांविषयी उपक्रम आदी कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असायची. त्यांचे भाषण ऐकणे हे उपस्थितांसाठी एक पर्वणी असायची. त्या चांगल्या वक्त्याही होत्या. एका मुलाखतीदरम्यान, त्यांनी सांगितलं होतं की, “लहानपणापासूनच रंगमंचावर काम करण्याची माझी इच्छा होती. मात्र, आयएसआय होण्यासाठीचे बळ पतीने दिले आणि त्यामुळे आयएसआय झाले.”. स्पष्टवक्तेपणा आणि सडेतोड मत मांडण्याबाबत त्या प्रसिद्ध होत्या. ‘आरोही’ या कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी गरीब, गरजू व खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीचे तंत्र शिकवण्याचे, त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचे काम नीला सत्यनारायण यांनी हाती घेतला होता.त्यातून त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी अनेक गरीब, गरजू व खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीचे तंत्र शिकवण्याचे, त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचे काम केले. नीला सत्यनारायण यांना चारित्र्य प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार, २०१५ साली टाकीचे घाव या पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा ललित गद्यासाठीचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार, असीम या हिंदी कविता संग्रहाला केंद्र शासनाचा अहिंदी भाषी लेखक पुरस्कार, अमेरिकेतल्या मेरीलँड येथील 'इंटरनॅशनल लायब्ररी ऑफ पोएट्री'चे इंग्रजी कवितेसाठीचे एडिटर्स पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते.
नीला सत्यनारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
*सं|जी|व वे|ल|ण|क|र.*
९४२२३०१७३३

काही वर्षांपूर्वी नीला सत्यनारायण यांचं पूर्ण अपूर्ण हे पुस्तक वाचलं होतं. अवघ्या एका दिवसात संपवलेलं आठवतंय. ह्या पुस्तकात नीलाजींनी त्यांच्या स्पेशल चाईल्ड व त्यांचा आई म्हणून २० वर्षांचा प्रवास मांडला आहे. हे पुस्तक फारच मनाला भावलं होतं. त्या अशा कोरोनामुळे जाव्यात ही बाबच खटकतेय. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!

{{{ त्यांच्या स्पेशल चाईल्ड व त्यांचा आई म्हणून २० वर्षांचा प्रवास मांडला आहे. हे पुस्तक फारच मनाला भावलं होतं. त्या अशा कोरोनामुळे जाव्यात ही बाबच खटकतेय. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो! }}}

आपल्या मुलाला बाहेर फिरायला घेऊन जाता येत नाही व त्याची मनस्थिती बिघडते अशी तक्रार करत त्यांनी लॉकडाऊनला विरोध केला होता.

आपल्या मुलाला बाहेर फिरायला घेऊन जाता येत नाही व त्याची मनस्थिती बिघडते अशी तक्रार करत त्यांनी लॉकडाऊनला विरोध केला होता.>>>>

त्यांचा मुलगा डाऊन्स सिंड्रोमग्रस्त आहे, त्याला कदाचित घरात बसणे शक्य होत नसेल. असे कित्येक पालक असतील ज्यांचे आधीच कठीण झालेले आयुष्य या लोकडाऊनमुळे अजून कठीण झाले असेल. मायबोलीवर अतुल ठाकूर यांनी अशा काही पालकांवर लेख लिहिलेला आहे.

नीला सत्यनारायण यांचं जाणं फार चटका लाऊन गेलं Sad .

एक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि आपल्या स्पेशल मुलाला जिद्दीने उभं करणारी आई गेली.

आपल्या मुलाला बाहेर फिरायला घेऊन जाता येत नाही व त्याची मनस्थिती बिघडते अशी तक्रार करत त्यांनी लॉकडाऊनला विरोध केला होता. >>> काही स्पेशल मुलांना खरंच घरात बसून कंटाळा येतो आणि सोसायटीतल्या सोसायटीत फिरवलेलंही चालत नाही आणि त्यांना समजत नाही की का जायचं नाही. माझ्या मैत्रीणीच्या मुलीला कंटाळा येतो. माझा मुलगा घरकोंबडा असल्याने मला तसं सुसह्य झालं.

आई ग! डोळ्यात पाणी आलं ... खरंच आता त्या मुलाचं कोण करत असेल? त्याला आई नाही दिसत तर अजून सैरभैर होईल ना .... फार वाईट झालं ... कित्ती शांत सोज्वळ व्यक्तिमत्व होतं!

Pages