दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केरळमध्ये भुकेल्या गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला देऊन तिला तडफडवून मारले Sad Sad

जगभरात दु:ख आणि संतापाची लाट:
Angry

https://www.bbc.com/marathi/india-52902211

हत्तीणीचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे.
हत्तीणीला तो अननस खाऊ घातला हे वृत्तांकन चुकीचे आहे.
यामागे मानव विरुद्ध प्राणीजगत हा संघर्ष आहे.

शेते, बागा यांचे नु कसान करणार्‍या जंगली जनावरांना प्रतिबंध म्हणून फळांमध्ये स्फोटके लपवण्याचा अघोरी उपाय योजला जातो. असेच एक अननस त्या हत्तीणीच्या खाण्यात आले.

मुंबई: केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या मातोश्री व भाजपच्या माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. चंद्रकांता गोयल यांच्या निधनाबद्दल पीयुष गोयल यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

श्रद्धांजली

गुणी अभिनेता होता.
34 हे काही आयुष्य संपायचं वय नव्हे
का केलं असेल असं?ईश्वर आत्म्याला शांती देवो.

Sushant Singh Rajput

केवळ आणि केवळ धक्कादायक..... Sad Sad

चांगला अभिनेता.
प्रसिद्धीच्या शिखरावर असणार्या आणि स्वत:चा चाहतावर्ग असणार्या माणसालाही आयुष्य विफल वाटते हा किती दैवदुर्विलास आहे.
आयुष्यात मिळाली नाही निदान आतातरी त्याच्या आत्म्याला शांती मिळू दे हीच प्रार्थना.

छि चो रे.. आत्महत्या विरोधात संदेश देणारा सिनेमा ज्याने नुकताच केला
त्यानेच असं करावं म्हणजे Sad

काही असो व नसो, मन शांत हवं

कदाचित हा घातपात/अंडरवर्ल्ड धमकी/खंडणी देता न आल्याने आत्महत्येला प्रवृत्त असाही प्रकार असू शकतो(असं वाटलं.खरं तर अजूनही इतक्या तरुण, उमेदीच्या माणसाने स्वतः च्या मर्जीने हे पाऊल उचललं असेल यावर विश्वास ठेवावा वाटत नाहीये.असो.कॉन्स्पिरसी थिअरी वगैरे सर्व आता बाजूला.आत्म्याला शांती लाभो.घरच्यांना हे दुःख सहन करण्याचं बळ मिळो.)

विश्वास बसत नाही. इंजिनिअर, फिजिक्स ऑलिम्पियाड जिंकलेला, अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपट केलेला माणूस निराशेच्या गर्तेत जाऊन असे पाऊल उचलू शकतो असा विचारही करवत नाही. मृतात्म्यास शांती लाभो.

खूपच धक्कादायक.
पवित्र रिशतामधील मानव देशमुख म्हणून कायम लक्षात राहिल. बिहारी असूनही मराठी मुलगा म्हणून शोभला होता. पुढे त्याचे अनेक चित्रपट बघितले पण मानवचाच प्रभाव राहिला.
करोनानंतर मानसिक विकारांचं pandemic येऊ घातलंय असं एक डॉक्टर मैत्रीण अलीकडेच फोनवर बोलताना म्हणाली होती.
त्यानंतर परवाच माझी आवडती this is us मालिका- त्याची सह लेखिका Jas Waters हिने 39 व्या वर्षी राहत्या घरी गळफास लावून घेतल्याची बातमी आली आणि आज सुशांतची.
लवकर संपू दे हे दुष्टचक्र.

खूप शॉकिंग आहे हे.
बुद्धीमत्ता, कष्ट, यश, पैसा, प्रसिद्धि, कौतुक सगळं काही असताना किती मोठं दुःख घेऊन वावरत असेल तो.
काय त्रास असेल की त्यातून मार्ग निघणार नाही, बाहेर पडता येणार नाही, मृत्यू हाच एकमेव मार्ग आहे, असं वाटलं त्याला.
ईश्वर त्याला शांती देवो.
अशा बातम्या ऐकल्या की खूप हताश वाटतं.

परवाच माझी आवडती this is us मालिका- त्याची सह लेखिका Jas Waters हिने 39 व्या वर्षी राहत्या घरी गळफास लावून घेतल्याची बातमी आली आणि आज सुशांतची.
लवकर संपू दे हे दुष्टचक्र. ~~~~ + १२३४५

हो मला वाटतं फक्त एका वृत्त वाहिनीने एका वाक्यात सांगितले. मी फक्त कळत नकळत बघितलाय. ते आता काम करत नसतील किंवा कुणाच्या संपर्कात नसतील. फोटोही खूप जुना दाखवत होते.

न्या चे कराटे मॅचेस चे न्यारे किस्से सांगणारी उत्साही आई, कलाकार, न्यारे मसाले ची सर्वेसर्वा आणि आपली मायबोलीकर विनार्च हिचे काल रात्री दुःखद निधन झाले आहे.
परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याचे बळ देवो.

बाप रे ! ही खरंच धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. मी पर्सनली ओळखत नसुनही, विनार्चच्या असंख्य धाग्यांमधून अनन्या आणि विनार्च अतिशय ओळखीच्या झाल्या होत्या. खूपच वाईट वाटलं. श्रद्धांजली ! Sad

Pages