दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Vinarchचे ऐकल्यावर आधी अनन्याच आठवली. आई वडील तसेही जवळचे असतातच पण ह्या मायलेकीचे बॉंडींग आठवून खड्डाच पडला पोटात.....दैव इतके निर्दयी कसे होऊ शकते...

Sad Sad Sad Sad

अरे बापरे ! Sad
विनार्च यांना श्रद्धांजली.

>>विनार्चची बातमी धक्कादायक आहे. डोक्यातून जात नाहीये अजिबात.>> +१
श्रद्धांजली. अनन्याला आणि कुटुंबियांना या दु:खातून सावरण्यासाठी बळ मिळो.

श्रद्धांजली.
अनन्याला आणि कुटुंबियांना या दु:खातून सावरण्यासाठी बळ मिळो.
काल हे कळल्यापासून एक विचित्र बेचैनी आली आहे. विनार्चच्या लेखनातून एका प्रचंड सकारात्मक "आई"शी ओळख झाली होती. अगदीच अनपेक्षित आहे हे!

विनार्च यांना श्रध्दांजली.
धक्कादायक बातमी. फार वाईट.
अनन्याला आणि कुटुंबियांना या दु:खातून सावरण्यासाठी बळ मिळो.

Well-known West Indies cricketer Sir Everton Weeks passed away on 2 July at the age of 95. He played 40 tests and scored 4445 runs at an average of 58.62. He was knighted in 1995. He was one of three West Indies cricketers whose surnames began with the letter w. Those three were Everton Weeks, Clive Walcott and Frank Worrel.

सरोज खान यांना श्रद्धांजली. गाणी आवडायची त्यांची. सनी देवल आणि श्रीदेवी दोघांना एकाच गाण्यात नाचवायचे आणि तरी गाणे हिट करायचे काम फक्त त्याच करू जाणे.

सरोज खान . Sad RIP. खूप नव्या नव्या डान्स स्टेप्स बनवायच्या त्या प्रत्येक गाण्यासाठी.
वात्रट मेले लहानपणी पाहिलं होतं. लीलाधर कांबळी ना श्रद्धांजली.

सरोज खान श्रद्धांजलि

निगाहे मिलाने को जी चाहता है
ह्यात ती एक्स्ट्रा डांसर होती म्हणे

नाही. ते त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलेलं पहिलं गाणं.
वय तेरा.

सरोज खान चे नाच, ऍक्शन या भावना आणि लटके झटके ओरिएंटेड होत्या.ती ऍक्रोबॅटिक कवायत नसायची.(अर्थात ऍक्रोबॅटिक कवायत पण काही गाण्यांना सूट होते)
एम टीव्ही वर डान्स क्रू नावाच्या कार्यक्रमात तू साला काम से गया आणि ऐश्वर्या चं गुरू मधलं गाणं याची कोरिओग्राफी शिकवलेली पाहिली होती.एका विशिष्ट शब्दाला डान्सर चे एक्सप्रेशन, त्यानुसार स्टेप मधला आवेश कमी जास्त आणि बारकावे बरेच होते.

काल सह्याद्री वाहिनीवर सरोज खान यांची मुलाखत पुनःप्रक्षेपित केलचं. 'निगाहें मिलाने को' चं नृत्यदिग्दर्शन त्यांनी केलं आणि नूतनच्या मागे नाचणार्‍या मुलींतही त्या होत्या.

Pages