Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डोळ्यात पाणी आलं, समजू शकते
डोळ्यात पाणी आलं, समजू शकते त्यांची घुसमट, का देवाने असं नेलं त्यांना. पहीला त्यांच्या मुलाचाच विचार आला मनात, ही बातमी समजल्यावर.
आदरांजली.
आदरांजली.
पहीला त्यांच्या मुलाचाच विचार
पहीला त्यांच्या मुलाचाच विचार आला मनात, ही बातमी समजल्यावर.> अगदी.
वाईट बातमी... मुलासाठी अजूनच
वाईट बातमी... मुलासाठी अजूनच वाईट वाटतेय.
हो अन्जू. विचारही करवत नाही
हो अन्जू. विचारही करवत नाही व हा प्रश्नही विचारायचे धाडस नाही की त्यांच्या मुलाला कोण सांभाळत आहे आता.
कुठेतरी वाचल की त्यांचा
कुठेतरी वाचल की त्यांचा मुलगाही positive, उपचार सुरु आहेत.
अतिशय दुर्दैवी त्यांचे पती व
अतिशय दुर्दैवी त्यांचे पती व मुलगा पॉजीटिव्ह आहेत तर मुलीला विलगीकरण कक्षात ठेवले आहे अशी बातमी होती. एक आयएएस ऑफिसर 2012 साली ज्यांच्या आसपास प्रचंड गर्दी व सतत फोन आणि अत्यन्त व्यस्त होत्या व महत्वाची जबाबदारी सांभाळत होत्या, त्यांच्या अंत्यसंस्काराला कोणीही येऊ शकले नाही. कोविड रुग्णाबाबत असलेल्या नियमावली नुसार महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे अंत्यसंस्कार करून व्हिडीओ कुटुंबियांना पाठवला असे बातमीत लिहिले होते.
त्यांचा परिवार यातून लवकर
त्यांचा परिवार यातून लवकर बारा व निरोगी होवो व सावरो. सदिच्छा.
त्यांचा परिवार यातून लवकर बरा
त्यांचा परिवार यातून लवकर बरा व निरोगी होवो व सावरो. सदिच्छा __/\__
नीला सत्यनारायण यांना
नीला सत्यनारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
खुप वाईट वाटलं. त्यांनी व्यक्त केलेली खंत सर्वच अपंग, विशेष मुलांबाबत खरी आहे.
त्यांचा परिवार यातून लवकर
त्यांचा परिवार यातून लवकर बारा व निरोगी होवो व सावरो.>>+१
नीला सत्यनारायण यांना
नीला सत्यनारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
खुप वाईट वाटलं. त्यांनी व्यक्त केलेली खंत सर्वच अपंग, विशेष मुलांबाबत खरी आहे.....+1
As a special need mother ह्रदयाचा थरकाप होतो असे काही ऐकले की...त्यांच्या मुलाला व नवऱ्याला लवकर बरे वाटो हीच प्रार्थना.
नीला सत्यनारायण यांना
नीला सत्यनारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
परिवारासाठी प्रार्थना.
परिवारासाठी प्रार्थना.
नीला सत्यनारायण यांना
नीला सत्यनारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खरच खूप वाईट वाटलं.
पुण्यातील स्व-रुपवर्धिनी या
पुण्यातील स्व-रुपवर्धिनी या सामाजिक संस्थेचे कार्यवाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ज्ञानेश पुरंदरे यांचं करोनाने निधन झालं आहे. करोना काळात ते प्रत्यक्ष फील्डवर काम करत होते. आणखी एक कोविद योध्दा गमावला. ओम शांती.
अरेरे
अरेरे
(No subject)
श्री. ज्ञानेश पुरंदरे यांचं
श्री. ज्ञानेश पुरंदरे यांचं निधन धक्कादायक आहे. १ एप्रिलपासून आम्ही बर्यापैकी संपर्कात होतो. दोनतीन आठवड्यांपूर्वी त्यांचा फोन आला तेव्हा मी रेल्वे स्टेशनवर होतो. मी तुम्हाला नंतर फोन करतो असं म्हणून मी फोन केलाच नाही.
विनम्र श्रध्दांजली!
विनम्र श्रध्दांजली!
विनम्र श्रद्धांजली !
विनम्र श्रद्धांजली !
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
माजी केंद्रीय गृह सचिव व
माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांचा आज मृत्यू झाला.अत्यंत हुशार आणि विद्वान असे हे गृहस्थ होते. इंदिराजींच्या हत्येनंतर व ऑपरेशन ब्लु स्टार नंतर जेंव्हा पंजाब धगधगत होत आणि राजीवजींनी सत्ता सांभाळली होती तेंव्हा देशावर वेगळ्या खलिस्तान च संकट घोंगावत होत,त्यावेळी राजीवजींनी हे संकट टाळण्यासाठी काय करता येईल अशी विचारणा राम प्रधान यांना केली होती.त्यावेळी राम प्रधान हे केंद्र सरकारचे मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते.
त्यांनी क्षणाचाही विलंब न करता,"या संकटात शरद पवारच मदत करू शकतात,अस राजीवजींनी निक्षून सांगितले होते..!"
यानंतर राजीवजींनी या संकटावर मात करण्यासाठी पवार साहेबांना आमंत्रित केले होते.आणि साहेबांनी पुढच्या 2 महिन्यात या संकटावर तोडगा काढत देशाच विभाजन होण्यापासून वाचवलं होत..!
एका अर्थाने हे संपूर्ण श्रेय राम प्रधान याचंच होत असे म्हटल्यास वावग ठरणार नाही.
राम प्रधान यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
भावपूर्ण श्रद्धांजली ..
भावपूर्ण श्रद्धांजली ..
अमर सिंग
अमर सिंह
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. राजेश टोपे यांच्या आईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्या ७४ वर्षाच्या होत्या. जवळपास दीड महिन्यापासून पासून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. एकीकडे आईची काळजी घेणे आणि दुसरीकडे करोनाची लढाई लढणे अशी दुहेरी कसरत गेल्या काही दिवसांपासून राजेश टोपे करत होते.
ज्येष्ठ नाट्यकर्मी इब्राहिम
ज्येष्ठ नाट्यकर्मी इब्राहिम अल्काझी काळाच्या पडद्याआड
भारतीय नाट्यसृष्टीत क्रांतीकारी बदल घडवणारे ज्येष्ठ नाटककार इब्राहिम अल्काझी यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालं. अनेक कलाकार त्यांनी घडवले आहेत. १९६२ ते १९७७ या १५ वर्षांच्या कालावधीत ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक होते.
https://www.loksatta.com/manoranjan-news/ebrahim-alkazi-credited-for-rev...
इब्राहिम अल्काझींना
इब्राहिम अल्काझींना श्रद्धांजली.
त्यांचं नाव सर्वात आधी मी पुलंच्या लिखाणात ( बहुतेक अपूर्वाई) वाचलं होतं.
सई परांजप्यांनी त्यांच्या आत्मवृत्तात फार छान उभं केलं आहे अल्काझींचं व्यक्तिमत्त्व.
मिपाकर अविनाश कुलकर्णी उर्फ
मिपाकर अविनाश कुलकर्णी उर्फ अकुकाका यांचे ३० ता. ला निधन झाले. ते मायबोलीवर होते की नाही ते माहित नाही पण मिसळपाववर फारच प्रसिद्द्ध होते. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. भावपुर्ण श्रद्धांजली..
अरे अविनाश कुलकर्णी गेले??
अरे अविनाश कुलकर्णी गेले?? ओर्कुटच्या काळात कवितांच्या ग्रुप मधून एकदा भेट झाली होती. (मायबोलीवर सुद्धा होते बहुतेक. पण फार active नसावेत बहुतेक. एकदोन लेख वाचल्यासारखे वाटतात) भावपुर्ण श्रद्धांजली..
Pages