Submitted by मंगेश विर्धे on 10 June, 2020 - 15:43
तसे तर मला काडीचाही त्रास नाही
पण वाटते आयुष्य हा माझा घास नाही
उगाच चंद्र-सूर्याची ये-जा रोज बघत आहे
दिशांचा श्वासांना माझ्या कसलाच अदमास नाही
गात्र-गात्र एकवटेल ज्याच्या साधनेसाठी
गवसला कुठलाच असला अजून ध्यास नाही
माझ्या या अवस्थेचा उपहास करू तितका कमी
शंभर कड्या दाराला, छत माझ्या घरास नाही
उत्तरे मिळतील असे स्वतःस सांगत असतो
जिवंत आहे कारण, घेतला अजून गळफास नाही
- मंगेश विर्धे
(टीका प्रोत्साहित.)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
गवसला कुठलाच असला अजून ध्यास
गवसला कुठलाच असला अजून ध्यास नाही
शंभर कड्या दाराला, छत माझ्या घरास नाही
आयला काय लायनी लिहिल्या आहेत राव तुम्ही !
@प्रभुदेसाई _/\_ तुम्हाला
@प्रभुदेसाई _/\_ तुम्हाला आवडल्या याचा आनंद आहे.
छान
छान
मात्रांचा गोंधळ आहे का? मला
मात्रांचा गोंधळ आहे का? मला फार कळत नाही.
कल्पना आणि सगळ्याच ओळी लाजवाब!
आवडली.
आवडली.