अमेरिकेत मिनिआपोलिस येथे काही दिवसांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. अटक करत असताना जॉर्ज प्रतिकार करत नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हते. त्याला ४ सशस्त्र पोलिसांनी घेरले होते. त्यापैकी एकाने त्याला जमिनीवर दाबून स्वतःचा गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला होता. आपण गुदमरतोय असे जॉर्ज जिवानिशी ओरडत होता हे येणार्या जाणार्या लोकांनी घेतलेल्या फोन व्हिडिओ मधे स्पष्ट दिसतेय, ऐकू येतेय.
या घटनेनंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये या घटनेविरोधात निदर्शने घडत आहेत. अनेक शांततापूर्ण निदर्शने होत असतानाच काही ठिकाणी निदर्शकांनीदेखिल हिंसा , जाळपोळ सुरु केल्याचेही दुर्दैवाने पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी परिस्थितीचा फायदा घेऊन लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
पोलिसांच्याकडून घडणार्या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्या हिंसेचीही ही पहिली घटना नाही.
https://mappingpoliceviolence.org/
https://policeviolencereport.org/
पण या आणि इतर अनेक साइट्स च्या डेटा नुसार व्हाइट किंवा इतर कोणत्याही वर्णापेक्षा कृष्णवर्णीयांसोबत होणार्या हिंसेचे प्रमाण खूप जास्त आहे. अर्थात नेहमी ( डोळे उघडे ठेवून) बातम्या बघत असाल तर अशा स्टॅटिस्टिक्सच्या आधाराची गरज ही नाही.
**या विषयावर चर्चा NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण इथे सुरु झाली हिती. तीच सुरु ठेवायला म्हणून हा धागा उघडतेय.
जरा जपून भारतीय टार्गेट होतील
जरा जपून भारतीय टार्गेट होतील एवढं अतिरेक पण करून नका विरोध करताना.
नक्की काय घडलं आहे ह्याची माहिती घ्या पहिली.
नाही तर तात्या सर्किट आहे.
भारतीय लोकांना विसा देणेच बंद करायचा.
गरज त्यांना आहे म्हणून व्हिसा
गरज त्यांना आहे म्हणून व्हिसा देतात. आणि नाही व्हिसा दिला तर नुकसान त्यांचेच .
< इतर लोक सांगत असतानाही चालू
< इतर लोक सांगत असतानाही चालू ठेवणे यातून द्वेष किंवा काही आधीचे वैर किंवा डोक्याने स्टेबल नसणे अशी शक्यता दिसतेच.
जे सर्व चालू आहे ते संतापजनक आहे. >
------- तो डोक्याने स्टेबल नसेल तर अजुन अनेक प्रश्न निर्माण होतात (त्याचे वकिल हेच सिद्ध करायचा प्रयत्न करतील जेणेकरुन शिक्षा कमी मिळेल). पण निव्वळ बघ्याची भुमिका घेणारे त्याचे तिन पोलिस सहकार्यांबद्दल काय ?
सतत ९ मिनिटे गळा दाबणारा दोषी आहेच, पण त्याच्या सोबत असणार्या पोलिस सहकार्यांपैकी एकालाही या हत्येला अटकाव करावा असे वाटले नाही हे घटने एव्हढेच संतापजनक आहे. "अरे तु बळाचा अतिरिक्त वापर करतो आहेस, त्याचा जिव गुदमरतो आहे... अशाने तो मरेल... " असे आपल्या सहकार्याला तब्बल ९ मिनिटांत सांगावे असे त्यांना का वाटले नाही ?
एक मदत हवी आहे. BLM विरोधात
एक मदत हवी आहे. BLM विरोधात सध्या सुरू असलेल्या प्रोटेस्टसचे लोण इथेही पोहोचले आहे. आम्हाला पण या विषयाबद्दल माहिती आणि सहानुभूती आहे. पण टीन या विषयात वहरवले जाताहेत हे लक्षात येतंय. या वयातील मुलांशी या विषयावर संयमित चर्चा कशी करता येईल? काही चांगल्या लिंक्स असल्यास शेयर कराल का?
धन्यवाद!
https://edition.cnn.com/2020
" BLM विरोधात सध्या सुरू असलेल्या प्रोटेस्टसचे " विरोधात की बाजूने?
https://edition.cnn.com/2020/06/01/health/protests-racism-talk-to-childr...
ऑस्ट्रेलियात black lives matter च्या जोडीने aboriginal lives matter सुद्धा ट्रेंड करतंय.
जॉर्ज फ्लॉयडमुळे David Dungay च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
मेरा भारत महान
मेरा भारत महान
वाचा अन बाकी चालू द्या ! बौध्दिक चर्चा !!!
Let’s Talk About Racism ‘I am tired of being a black man in India’ -
https://m.hindustantimes.com/india-news/let-s-talk-about-racism-kallu-wa...
>>-
>>-
----- होय फॉर्म्युला आहे. आठ मिनिटे आणि ३२ सेकंद या पेक्षा जास्त काळ पोलिसाने काळ्या व्यक्तीचा (तो काळा आहे म्हणून) गळा दाबला तर तो रेसिझम ठरतो. त्याने ८ मिनिटे ३३ सेकंद त्याच्या गळ्यावर पाय ठेवला होता...
तब्बल ९ मि. गळा दाबला होता तरी त्याला रेसिझम म्हणवत नाही आणि दंग्यांचे समर्थन कुणी केले नसतांना ते तसे केले आहे असे म्हणून दिशाभूल कर ण्याचा उद्देश काय ?
<<
वरती अनेक ठिकाणि असे म्हटले आहे की मूळ रेसिज्मच्या तुलनेत होणारे दंगे हे "निरुपद्रवी" आहेत. जरी अनेक लोकांचे उद्योग राखरांगोळी होतात, अनेकांचे जीव जात आहेत तेही अमेरि़केत दूर दूर पर्यंत. तरी ते विशेष काही नाही. फक्त मिनियापोलिस मधे झालेला खून हा रेसिज्म आणि म्हणून तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा. मग प्रतिक्रिया देणार्यांनी कितीही उद्योग आग लावून नष्ट केले तरी ते क्षम्य. राजकारणी हेच म्हणत आहेत. माध्यमे हेच म्हणत आहेत आणि त्यांच्या मागे मेंढरांप्रमाणे चालणारे हेच म्हणत आहेत.
गळ्यावर किती वेळ पाय ठेवला हा रेसिज्मचा मीटर असतो का? तो पोलिस विकृत असेल. दुसर्याच्या वेदनेत त्याला आनंद मिळत असेल. आणि पोलिस दलात भरती करताना पुरेसे मानसशास्त्रीय तपास न करता घेतल्याने असले गणंग लोक भरती केले जात असतील. तुम्हाला अद्भूत दृष्टी प्राप्त आहे का की व्हिडियो क्लिपमधे त्या मारणार्या पोलिसाचे विचार तुम्हाला वाचता येतात? काय वाट्टेल ते छातीठोकपणे सांगणे ह्याला काही सीमा आहे का?
मेलेला माणूस हा निर्ढावलेला गुन्हेगार होता. (अर्थात तरी त्याच्या खुनाचे समर्थन होत नाहीच). २००२ पासून त्याच्या गुन्ह्याची मालिका (ज्यात तो पकडला गेला आणि शिक्षाही झाली आहे) दिसते. (अर्थात तरी त्याच्या खुनाचे समर्थन होत नाहीच). एका गुन्ह्यात त्याने एका गर्भवती, काळ्या महिलेच्या घरात ती एकटी असताना घुसून तिच्या पोटावर पिस्तुल दाबून धरले आणि गर्भाला गोळी झाडायची धमकी देत साथीदारांच्या मदतीने घर लुटले (अर्थात तरी त्याच्या खुनाचे समर्थन होत नाहीच). अनेकदा कोकेन बाळगल्याच्या आरोपावरून त्याला शिक्षा झालेली आहे. (अर्थात तरी त्याच्या खुनाचे समर्थन होत नाहीच). नंतर तो मिनियापोलिसला आला कारण इतक्या वर्षाच्या गुन्हेगारीमुळे ह्युस्टनमधे त्याची कीर्ती चांगली नव्हती. इथे तो इतकी वर्षे पकडला गेला नव्हता. पण ह्या प्रसंगात त्याने २० डॉ ची खोटी नोट चालवायचा प्रयत्न केला. (अर्थात तरी त्याच्या खुनाचे समर्थन होत नाहीच). मेथेन एम्फेटमीन आणि अन्य असलेच जालीम अमली पदार्थ सेवन केल्यामुळे तो मानसिकदॄष्ट्या अस्थिर वागत होता असे त्या अरबी दुकानदाराने सांगितले. जिथे त्याने बनावट नोट दिली ते दुकान एका पॅलेस्टीनी अरबाचे आहे (अर्थात तरी त्याच्या खुनाचे समर्थन होत नाहीच). त्या दुकानातील कॅशियरने पोलिसांना बोलावले. तेव्हा त्याला अटक झाली. त्यावेळेस त्याच्या खिशातून ड्रगची पुडी पडल्याची क्लिप आहे (अर्थात तरी त्याच्या खुनाचे समर्थन होत नाहीच).
एकंदरीत ह्या इसमाच्या पार्श्वभूमीवरून हा कुणी संतमहात्मा वा समाजसुधारक वा नेता नव्हता (अर्थात तरी त्याच्या खुनाचे समर्थन होत नाहीच). त्यामुळे पोलिस असे रेकॉर्ड असणार्या माणसाशी हळूवार वागतील ही अपेक्षाच चुकीची आहे. (अर्थात तरी त्याच्या खुनाचे समर्थन होत नाहीच). शिवाय ड्रग्च्या सेवनामुळे (दोन्ही मेडिकल रिपोर्टमधे ह्या मुद्द्याला पुष्टी मिळते) त्या माणसाचे आरोग्यही यथातथा असू शकते. (अर्थात तरी त्याच्या खुनाचे समर्थन होत नाहीच). त्यामुळे रेसिज्म आणि रेसिझ्म हेच ह्यामागचे कारण आहे असे ठासून सांगण्याइतपत पुरावा नाही. कोर्ट, कायदे, चौकशा ह्यांना वेळ दिलाच पाहिजे. "निरुपद्रवी" अराजकसदृश दंगे होणे कुणाच्याही फायद्याचे नाही. काळ्यांच्याही नाही आणि हो पुन्हा एकदा सांगतो त्याच्या खुनाचे समर्थन होत नाहीच.
जरी त्याच्या खुनाचे समर्थन होत नसले तरी हा कुणी मार्टिन ल्युथर किंगचा अवतार असल्याचा आव आणून त्यावर स्तुतीसुमने उधळली जात आहेत ती अस्थानी आहेत. त्याच्य नावाची मुरल्स काय , पोस्टर काय आणि टी शर्ट काय! कुण्याही व्यक्तीला अगदी काळ्या व्यक्तीला ह्या माणसाचे जीवन अनुकरणीय वाटू नये. (अर्थात तरी त्याच्या खुनाचे समर्थन होत नाहीच).
ज्या माणसाने खून केला आहे त्याला सर्व पुरावे आणि साक्षींची छाननी करून शक्य तितकी कडक शिक्षा द्यावी. शक्य तितक्या त्वरेने द्यावी. पण निव्वळ रेसिज्म रेसिज्म म्हणून ऊर बडवून अजून आगलावेपणाला उत्त्तेजन देऊ नये.
रेव्यु, अत्यंत वाईट अनुभव आहे
रेव्यु, अत्यंत वाईट अनुभव आहे.परदेशात हौसेने शिकायला, नोकरीसाठी आलेल्या कोणालाही अश्या पूर्वग्रहाला सामोरे जावे लागू नये.
जमल्यास याबाबत जास्तीत जास्त परिणामकारक व्हॉटसप फेसबुक पोस्ट लिहून सगळीकडे फिराव्यात.
माझ्या प्रत्यक्ष संपर्कात अजून आफ्रिकन वंशाचे कोणीही आले नाही.पण आल्यास हा पूर्वग्रह बाजूला ठेवून वागण्याचा, माझ्या आजूबाजूला असं कोणी वागत असेल तर त्याला परावृत्त करण्याचा नक्की प्रयत्न करेन.
रंगावरून कोणावर टिप्पणी शाळा कॉलेजात माझ्याकडून आतापर्यंत झालीच असेल.याबद्दल वाईटही वाटते.
(अर्थात तरी त्याच्या खुनाचे
(अर्थात तरी त्याच्या खुनाचे समर्थन होत नाहीच).
हे इतके वेळा लिहिलं यातच काय ते आलं.
खुनाचे समर्थन न करून खूप उपकार करताय.
अजूनही खून चूक होता असं म्हणताय का?
अपेक्षाही नाही तशी.
काळा असू नाही तर गोरा.
काळा असू नाही तर गोरा.
सावळा असू नाही तर पिवळा.
आरोपी ला पकडण्याची अमेरिकेत हीच पद्धत असावी.
आरोपी मग कोणी ही असू चांगल्या treatment chi apeksha ठेवू नये.
ह्या घडणेतील आरोपी निरपराध असेल तर त्याच्या साठी लोकांनी विरोध करणे योग्य आहे .
पण फक्त त्याच प्रसंग पुरता आणि त्याच पोलिस अधिकाऱ्याच्या विरोधी.
दोन्ही समाजाला त्या मध्ये एकमेका विरूद्ध उभे राहण्याची काही गरज नाही.
ऑस्ट्रेलियात BLM = ALM
ऑस्ट्रेलियात BLM = ALM
माझा या प्रकारच्या प्रोटेस्टस ना पाठिंबा नक्कीच आहे. आयुष्यात कोणालाच कधीही रेसिझम वाट्याला येऊ नये! पण हे प्रोटेस्टस शांततापूर्ण असावेत, दंगेधोपे, पोलिसांवर थुंकणे (मेलबर्न मध्ये प्रोटेस्टर्स अस करणार होते पण इथल्या मुखमंत्र्यानी तसे न करण्याचे आवाहन केले आणि तसे करताना कोणी आढळल्यास त्वरित action घेतली जाईल असे सांगितले आहे) असे करून काय साध्य होणार आहे? यासंदर्भात एखादी matter of fact सांगणारी लिंक मी शोधतेय.
शेंडेनक्षत्र, तुम्ही दिलेली
शेंडेनक्षत्र, तुम्ही दिलेली माहिती खरी आहे?
शेंडेनक्षत्रजी, ‘रिझनेबल डाऊट
शेंडेनक्षत्रजी, ‘रिझनेबल डाऊट‘ तयार करण्याचा प्रयत्न केल्यासारखी तुमची पोस्ट आहे. पण जॉर्ज फ्लॉईड ची वैय्यक्तिक पार्श्वभूमी त्याच्या खूनाच्या संदर्भात irrelevant आहे. फक्त कंसातलं वाक्य तितकंच relevant वाटतं.
कटप्पा, अमेरिकेला गरज आहे म्हणून व्हिसा देतात, नाही दिला तर त्यांचच नुकसान आहे ही टोकाची भूमिका आहे. it’s a mutually beneficial arrangement.
) असे करून काय साध्य होणार
) असे करून काय साध्य होणार आहे?
दोन्ही समाजात नेहमीच दरी राहो आणि ती वाढत जावो.
अशी इच्छा असणारे असे वागतात..
इथे फक्त त्या पोलिस अधिकाऱ्याचा संबंध आहे विरोध तेवढंच मर्यादित असावा.
नाही तर साध्य काहीच होणार नाही उलट दरी अजुन रुंदावेल.
भारतात असे घडत गेले आहे .
समाज एकमेकांपासून खूप दूर जात चालला आहे .
त्याला हीच कारणे आहेत.
<< गळ्यावर किती वेळ पाय ठेवला
<< गळ्यावर किती वेळ पाय ठेवला हा रेसिज्मचा मीटर असतो का? तो पोलिस विकृत असेल. दुसर्याच्या वेदनेत त्याला आनंद मिळत असेल. आणि पोलिस दलात भरती करताना पुरेसे मानसशास्त्रीय तपास न करता घेतल्याने असले गणंग लोक भरती केले जात असतील. तुम्हाला अद्भूत दृष्टी प्राप्त आहे का की व्हिडियो क्लिपमधे त्या मारणार्या पोलिसाचे विचार तुम्हाला वाचता येतात? काय वाट्टेल ते छातीठोकपणे सांगणे ह्याला काही सीमा आहे का? >>
------- गळ्यावर पाय कशाला ठेवावा लागतो ? तेही तब्बल ९ मिनिटे ?
तो एक पोलिस विकृत असेल हे क्षणभर मानले तरी इतर ३ पोलिसांनी त्याला प्रतिबंध केला नाही हे काय दर्शवते?
जॉर्ज फ्लॉयडच्या बॅकग्राऊंडचा पाढा कशासाठी वाचावा वाटतो ? तो मागच्या काळात कसा होता, त्याचा बॅकग्राऊंड हा मुद्दाच नाही आहे. कुठेतरी गेलेला व्यक्ती तेव्हढाही चांगला नव्हता हे तर सिद्ध करायचा उद्देश नाही ना ?
<< ज्या माणसाने खून केला आहे
<< ज्या माणसाने खून केला आहे त्याला सर्व पुरावे आणि साक्षींची छाननी करून शक्य तितकी कडक शिक्षा द्यावी. शक्य तितक्या त्वरेने द्यावी. पण निव्वळ रेसिज्म रेसिज्म म्हणून ऊर बडवून अजून आगलावेपणाला उत्त्तेजन देऊ नये. >>
----- कुठलाही ठोस पुरावा सादर न करता, साक्षी पुराव्या अभावी जॉर्ज फ्लॉयडला २० $ ची बनावट नोट प्रकरणांत तुम्ही गुन्हेगार ठरवले आहे.
तुमच्याच शब्दात, "मेलेला माणूस हा निर्ढावलेला गुन्हेगार होता. .... २० ची बनावट नोट चालवण्याचा प्रयत्न केला"
आज तो निरपराधित्व सिद्ध करायला येणे शक्य नाही. पण सर्वांसमक्ष निरपराध्याची निर्घुण हत्या करणार्या पोलिसाला वेगळा न्याय... आणि हाच रेसिझम आहे.
येवढ्या सगळ्या गदारोळात ट्रंप
येवढ्या सगळ्या गदारोळात ट्रंप महाशयांनी जे घडले ते चूक होते, पोलिसांनी वर्तणूक सुधारणे आवश्यक आहे, माझा याला पाठिंबा नाही, आवश्यक त्या सुधारणा मी करेन असे म्हणले आहे काय?.
Submitted by shendenaxatra on
Submitted by shendenaxatra on 6 June, 2020 - 10:58>>>>>
विजय यांनी मागच्या पानावर लिहिलेल्या Othering या संकल्पनेचे ऊदाहरणासहीत स्पष्टीकरण दिल्याबद्दल धन्यवाद.
Quote
“Othering नावाची एक संकल्पना समाजशास्त्रात आहे. समाजाच्या एका घटकाचे पद्धतशीरपणे Othering करून त्यांना dehumanize केले की मग त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे काहीच वाटेनासे होते. ”
“एखाद्या घटकाचे असे Othering झाले की मग पोलीस, न्याय यंत्रणा वगैरे सारेच भेदभाव करू लागतात. सवयच होते. एखाद्या व्यक्तीवर अन्याय झालाच तर त्या व्यक्तीचेच काही चुकले असेल असे मानले जाते.”
Unquote.
इथे कुणीही हिंचाचाराचे समर्थन
इथे कुणीही हिंचाचाराचे समर्थन केलेले नाही. सुरवातीला शांततेने प्रोटेस्ट सुरु होत्या. नंतर त्यात हिंसाचार झाला. हिंसाचाराबद्दल सातत्याने बोलायचेच असेल तर खालच्या बातम्याही वाचाव्यात.
https://www.cbsnews.com/news/thomas-mcclay-denver-police-officer-fired-l...
https://www.wthr.com/article/woman-evicted-after-allegedly-throwing-ice-...
https://abcnews.go.com/US/breonna-taylor-kentucky-emt-allegedly-killed-p...
https://abcnews.go.com/US/timeline-impact-george-floyds-death-minneapoli...
मी आधी लिहिलं आहे की property
मी आधी लिहिलं आहे की property damage आणि murder या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. याचा अर्थ property damage करणे समर्थनीय आहे असा नाही. पण 'आम्ही मर्डर केला, तुम्ही property damage केली, झाली फिटमफाट' हे मला योग्य वाटत नाही. या agitation कडे बोट दाखवून, त्यालाच मुख्य इश्यू करून- जो रेसिझममधून मर्डर झाला त्याला rationalise व side step करायचा प्रयत्न मला पटत नाही.
आता मागच्या वर्षी Texas मध्ये एका white nationalist रेसिस्ट तरुणाने लॅटिनोजना टार्गेट करून Walmart मध्ये 23 शॉपर्सचे खून पाडले होते.
लॅटिनोज झाले, ब्लॅक्स झाले. एक पॅटर्न दिसून येतोय.
>>कुठलाही ठोस पुरावा सादर न
>>कुठलाही ठोस पुरावा सादर न करता, साक्षी पुराव्या अभावी जॉर्ज फ्लॉयडला २० $ ची बनावट नोट प्रकरणांत तुम्ही गुन्हेगार ठरवले आहे.<<
उदयशेठ, ताज्या बातम्या तुम्हि वाचलेल्या नाहित, बहुदा. असो.
शेंडेनक्षत्र यांचा लेटेस्ट मुद्दा जॉर्ज फ्लॉय्डचं उदात्तीकरण, त्याला हुतात्मा बनवु नका हा आहे. त्यांना वेगळ्याच कारणांवरुन टार्गेट करण्याआधी या मुद्द्यावर काय म्हणणं आहे तुमचं आणि इतरांचं? "ब्लॅक लाइव्ज मॅटर" या मुद्द्यावर अनुकंपा दाखवणारे डेविड डॉर्न च्या हत्येबाबत उदासिन का? शेंडेनक्षत्र सोडुन एकालाहि यात काहि वावगं वाटु नये? कुठे गेली तुमची माणुसकि, जी दाखवण्याची इथे चढाओढ लागलेली असते. डेविड डॉर्न्स लाइफ डोंट मॅटर, कारण त्याने पॉनशॉप रॉबरी थांबवण्याचा प्रयत्नात आपला बळी दिला म्हणुन? कि तो एक्स-कॉप असल्याने हि इज नॉट ब्लॅक इनफ फॉर यु गाय्ज?...
इथल्या कोणत्या प्रतिसादात
इथल्या कोणत्या प्रतिसादात जॉर्ज फ्लॉयडचं उदात्तीकरण केलं आहे? की तो गुन्हेगार असल्याची पार्श्वभूमी असल्याने त्याला पोलिसी अत्याचाराचा बळी न होण्याचा हक्क नाही?
त्याच्याकडे पोलिसी अत्याचाराचा बळी म्हणून पाहणं हे उदात्तीकरण? धन्य!
गुन्हेगार व्यक्ती ला हक्क
गुन्हेगार व्यक्ती ला हक्क देणे म्हणजे पीडित व्यक्तीचे हक्क नाकारणे असा अर्थ होतो
त्याला हुतात्मा बनवु नका>> तो
त्याला हुतात्मा बनवु नका>> तो हुतात्मा झाला आहे. इट इज टू लेट नाउ.
आपल्या इथे अफजल गुरू ला पण
आपल्या इथे अफजल गुरू ला पण हुतात्मा बनवले जाते.
>>इथल्या कोणत्या प्रतिसादात
>>इथल्या कोणत्या प्रतिसादात जॉर्ज फ्लॉयडचं उदात्तीकरण केलं आहे?<<
इथल्या प्रतिसादावरुन ते लिहिलेलं आहे हा निश्कर्ष घाईघाईत काढण्या पुर्वि ताज्या बातम्या वाचल्या असत्या तर हा प्रश्न पडला नसता...
जो मुद्दा इथे आला नाही,
जो मुद्दा इथे आला नाही, त्यावरून इथे झोडपण्यात काय अर्थ आहे?
आधी दंगली आणि आता त्याचे आधीचे गुन्हे हे दोन्ही संदर्भहीन मुद्दे आलेत.
वर एक प्रश्न विचारलाय. पुन्हा विचारतो.
तो गुन्हेगार असल्याची पार्श्वभूमी असल्याने त्याला पोलिसी अत्याचाराचा बळी न होण्याचा हक्क नाही?
>>तो गुन्हेगार असल्याची
>>तो गुन्हेगार असल्याची पार्श्वभूमी असल्याने त्याला पोलिसी अत्याचाराचा बळी न होण्याचा हक्क नाही?<<
घ्या, एव्हढं रामायण झालं तरी रामाची सीता कोण? जॉर्ज फ्लॉय्ड हा पुलिस ब्रुटॅलिटिचा बळी आहे हे आम्हि अगदि सुरुवातीपासुनच सांगतो आहे? यु डिडंट गेट द मेमो?..
शेंडेनक्षत्र यांना तसं
शेंडेनक्षत्र यांना तसं वाटल्याचंही दिसलेलं नाही. नाही तर त्यांनी त्याची हिस्टरी इथे लिहून " तरीही खुनाचं समर्थन नाही" असं दहादा लिहिलं नसतं.
रेसिजम हा मनुष्यस्वभाव आहे,
रेसिजम हा मनुष्यस्वभाव आहे, मनुष्याला रेसिजम करू नकोस, नैतिकदृष्ट्या ते योग्य नाही असे कितीही शिकवले तरीही तो रेसिस्टच राहणार. स्वतः रेसिजम अनुभवलेले लोक इतरांशी रेसिस्ट वागणार नाहीत, त्यांना समजून घेणार असे अजिबात होत नाही, त्यांनाही संधी मिळताच ते रेसिस्ट वर्तन करतात, कित्येकदा हे इतके सटल असते की ते करणाऱ्याच्या लक्षात येत नाही पण ज्याच्याबाबतीत होते त्यालाच ते झोंबते. इ इ हेमावैम .
Pages