वर्णद्वेष आणि पोलिसांकडून होणारी हिंसा

Submitted by maitreyee on 2 June, 2020 - 11:02

अमेरिकेत मिनिआपोलिस येथे काही दिवसांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. अटक करत असताना जॉर्ज प्रतिकार करत नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हते. त्याला ४ सशस्त्र पोलिसांनी घेरले होते. त्यापैकी एकाने त्याला जमिनीवर दाबून स्वतःचा गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला होता. आपण गुदमरतोय असे जॉर्ज जिवानिशी ओरडत होता हे येणार्‍या जाणार्‍या लोकांनी घेतलेल्या फोन व्हिडिओ मधे स्पष्ट दिसतेय, ऐकू येतेय.
या घटनेनंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये या घटनेविरोधात निदर्शने घडत आहेत. अनेक शांततापूर्ण निदर्शने होत असतानाच काही ठिकाणी निदर्शकांनीदेखिल हिंसा , जाळपोळ सुरु केल्याचेही दुर्दैवाने पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी परिस्थितीचा फायदा घेऊन लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
पोलिसांच्याकडून घडणार्‍या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्‍या हिंसेचीही ही पहिली घटना नाही.
https://mappingpoliceviolence.org/
https://policeviolencereport.org/
पण या आणि इतर अनेक साइट्स च्या डेटा नुसार व्हाइट किंवा इतर कोणत्याही वर्णापेक्षा कृष्णवर्णीयांसोबत होणार्‍या हिंसेचे प्रमाण खूप जास्त आहे. अर्थात नेहमी ( डोळे उघडे ठेवून) बातम्या बघत असाल तर अशा स्टॅटिस्टिक्सच्या आधाराची गरज ही नाही.

**या विषयावर चर्चा NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण इथे सुरु झाली हिती. तीच सुरु ठेवायला म्हणून हा धागा उघडतेय.

Group content visibility: 
Use group defaults

>>सध्या सिस्टेमिक रेसिज्म असा एक शब्द चलनी नाण्यासारखा वापरला जात आहे. (buzzword). पण म्हणजे नक्की काय? <<
शेंडेनक्षत्र, अहो इथे कुठे सिस्टमिक रेसिझम काय आहे हे शिकवायचा प्रयत्न करताय? तेहि इथल्या पब्लिकला, ज्यांना सिलेक्टिव्/इंडिविजुअल केसेसमधे वर्णद्वेषाचा रंग देण्याची घाई झालेली असताना. शिवाय रेसिझमचं इंस्टिट्युशनलयझेशन अजुनहि बॅकडोअरने होत आहे, या बाबतीत मात्र हे सगळे टोटली अन्माइंडफुल. तुम्ही याच धाग्यावर दिलेलं सॅन होजे (बार्ट) चं उदाहरण अतिशय बोलकं आहे...

>>ढोंगी पुरोगामी लोकांचे आगमन झाले की धागा बंद मरणप्राय अवस्थेत जातो<<. +१
एक्विसाव्या शतकात, अजुनहि अमेरिकेत पावलो-पावली वर्णद्वेष राबवला जातोय असं चित्र उभं करणारे, आणि ते स्विकारणारे यांची आता कींव यायला लागली आहे. अरे हि माणसं एकविसाव्या शतकात पोचली का अजुन ६०/७०ज मध्येच अडकली आहेत? ऑर दे आर जस्ट प्लेन अब्लिवियस टु देर सराउंडिग्ज...

संशयाने बघितलं, ईमेल्स ना रिस्पाँस दिला नाहि म्हणजे रेसिझम. आता पुढे ईमेल्स बाउंस झाल्या तर त्याचं खापर सुद्धा सिस्टमिक रेसिझम वर फोडणार काय? कोषातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करा, प्रेजडिस गळुन पडतील...

स्वाती२ +१
भरत तुमची पोस्ट सुटी वाचली, अमेरिकेत मृत्युदंड आहे.
ट्रोल्सला वाचायची इच्छा नाही सो सायकॅझम असेल किंवा काही वेगळा संदर्भ असेल तर समजलं नाही, सॉरी.

>>
मी ज्या गावात रहाते त्या गावात मोजकेच लोकं कलर्ड आहेत आणि ते उच्च शिक्षित, उच्च मध्यमवर्गिय आहेत. समाजकंटक म्हणून पकडले जाणारे लोकं हे कॉकेशियन असतात. अ‍ॅट रिस्क मुलं देखिल कॉकेशियन असतात. म्हणून सर्वच कॉकेशियनकडे संशयाने बघितले जाते का? तर नाही मग तोच न्याय कलर्ड लोकांना का नाही?
<<
कुठल्यातरी गावात गोरे लोक जास्त गुन्हे करतात. ठीक आहे. पण पूर्ण अमेरिकेचे रेकॉर्ड काय आहे? काळ्या लोकांचा खून आणि दरोडे ह्या गुन्ह्यात खूप जास्त सहभाग असतो (त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त) असे FBI ची आकडेवारी सांगते ती खोटी म्हणून धुडकावून लावणार का? असे का होते ह्यावर कुठला अल शार्प्टन वा अन्य काळा नेता बोलताना आढळत नाही. आणि आकडेवारी असे बोलत असेल तर सामान्य माणसाला पूर्वग्रह निर्माण होणे इतके भयंकर आणि अनैसर्गिक आहे का?

मी काही यशस्वी काळ्या लोकांची नावे दिली म्हणून मी सगळ्याच काळ्यांची भरभराट होते आहे असे सुचवत आहे असा काहींचा गैरसमज झाला आहे. तसे नाही. डूख धरून सगळ्या समाजाने असे ठरवले असते की कुठल्याही काळ्यांना पुढे येऊच द्यायचे नाही त्यांच्या अंगात कौशल्य असो वा नसो तर अशी उदाहरणे निर्माण झालीच नसती. त्यामुळे अशा प्रकारे टोकाचा वर्णद्वेष तरी अमेरिकेत नाही इतपत मान्य व्हावे.
एकूण एक सगळेच काळे लोक गडगंज श्रीमंत वा यशस्वी क्रीडापटू वा नट वा नेते झाले नाहीत तर तो समाज नक्कीच वर्णद्वेष्टा आहे असे दुसर्‍या बाजूचे मत नसेल अशी आशा!
ज्यांची मुले कॉलेजात आहेत त्यांना कदाचित माहित असेल की काळ्या वंशाचा असणे हे कॉलेजात (तेही उत्तम दर्जाच्या) प्रवेश मिळवण्याकरता प्रचंड उपयोगी असते. तुलनेने चिनी आणि भारतीय वंशाच्या लोकांना प्रचंड स्पर्धेला तोंड द्यावे लागते. कित्येक गुणी विद्यार्थी चांगल्या विद्यापीठात जाऊ शकत नाहीत. हार्वर्ड च्या विरुद्ध तशी फिर्याद दाखल केली होती (अर्थात हार्वर्ड विद्यापीठ केस जिंकले) . त्यामुळे निदान कॉलेजच्या बाबतीत एक ठळक रिव्हर्स रेसिज्म दिसते आहे.
काळ्या लोकांत जास्त गुन्हेगारी आहेत म्हणून पोलिस कमी करा हा अत्यंत उफराटा उपाय आहे. सगळे पोलिस वाईटच असतात आणि रेसिस्ट असतात असा आततायी निष्कर्ष काढला जात आहे. पोलिसात काळे लोक मोठ्या प्रमाणात असतात असा माझा अनुभव आहे. तेही रेसिस्ट?
पोलिसांची संख्या कमी आहे आता आपण आपले गुन्हे कमी करू या असे कुठला गुन्हेगार म्हणेल? उलट चांगली संधी आहे आणखी चोरी, दरोडे आणि अन्य गुन्हे करू या असेच तो/ती म्हणेल.
BLM आणि अँटिफा सारख्या लोकांनी रेसिज्मचा मुद्दा हायजॅक केला आहे. मोठ्या कंपन्या, श्रीमंत लोक ह्यांच्याकडून BLM च्या नावाखाली हप्ते गोळा केले जात आहेत असे वाटते. आणि उगाच रेसिज्मचा बट्टा नको म्हणून बरेचसे लोक निमूटपणे पैसे देत आहेत. आता ह्यातील किती पैसा काळ्यांच्या उद्धारासाठी आणि किती बड्या नेत्यांचे उखळ पांढरे करायला (हा वाक्प्रचार वर्णद्वेष्टा समजला जाणार नाही अशी आशा!) ते आपणच शोधा!

कृष्णवर्णीय असणे हे कॉलेजात (तेही उत्तम दर्जाच्या) प्रवेश मिळवण्याकरता प्रचंड उपयोगी असेलही, पण जगायला (तेही सामान्य दर्जाच्या) प्रचंड हानिकारक आहे Sad
असे नसावे एवढीच आंदोलनाची मागणी आहे.

>>पण जगायला (तेही सामान्य दर्जाच्या) प्रचंड हानिकारक आहे
अत्यंत अतिरंजित दावा. खरोखर अशी परिस्थिती नाही. सामान्य काळे लोक मोठ्या प्रमाणात मारले जातात ते काळ्या लोकांकडूनच. काळे लोक जिथे जास्त रहातात तिथे प्रचंड हिंसा असते. शेकडो लोक वर्षाला मरतात. ओकलंड, डिट्रॉईट, शिकागो इथली आकडेवारी पहा. पण फक्त पोलिसच काळ्या लोकांना अन्यायाने मारत असतात असे म्हणणे फ्याशनेबल बनत आहे. पोलिसही गुंड लोकांकडून मारले जातात. पण त्याची कुणाला पर्वा नसते. चालायचंच.

सामान्य कृष्णवर्णीय लोक काळे, गोरे, हिरवे, निळे कुणाकडूनही मारले गेले तरी जोवर इतरांपेक्षा जास्त मरत आहेत तोवर कृष्णवर्ण जगायला हानिकारकच ठरतो आहे. कृष्णवर्णीयांना कृष्णवर्णीयांनी मारले म्हणून बाकीच्यांची जबाबदारी कशी संपली? असं घडू न देणारं प्रशासन हवं ना...

>>
सामान्य कृष्णवर्णीय लोक काळे, गोरे, हिरवे, निळे कुणाकडूनही मारले गेले तरी जोवर इतरांपेक्षा जास्त मरत आहेत तोवर कृष्णवर्ण जगायला हानिकारकच ठरतो आहे. कृष्णवर्णीयांना कृष्णवर्णीयांनी मारले म्हणून बाकीच्यांची जबाबदारी कशी संपली? असं घडू न देणारं प्रशासन हवं ना...
<<
पोलिसांनी वर्णद्वेषाने मारलेल्या काळ्या लोकांची संख्या एकंदरीत काळ्या लोकांच्या हत्येच्या प्रमाणात जास्त असेल तर नक्कीच. पण आता चर्चा होते आहे ती पोलिसच हटवण्याची. मुळात ह्या मिनियापोलिस प्रकरणात रेसिज्म होते की नाही हे एकतर्फी जाहीर करणे साफ चुकीचे आहे. तपास , साक्षी, पुरावे झालेच पाहिजेत. मगच तो निष्कर्ष काढण्यात काही अर्थ आहे.
पोलिसांचा उन्मत्तपणा म्हणजे रेसिज्मच असा आगाऊ निष्कर्ष काढून पुढचे ढोल पिटले जात आहेत.
असे प्रशासन हवे म्हणजे कुठले हवे म्हणे? नवा राष्ट्रपती? स्थानिक प्रशासनाचे काय? जिथे काळे लोक जास्त आहेत तिथे कायम डेमोक्रॅट सत्तेवर आहेत. पण त्यांनी काहीही केलेले नाही. आता पोलिस खाते अजून कमकुवत करणार मग तर काय आनंदीआनंद!

मैलभर लांब गुन्ह्यांची यादी असलेल्या जॉर्ज फ्लॉईडला एखाद्या पराक्रमी वीराप्रमाणे खास सरकारी इतमामाने मिरवत अंत्यविधीकरता नेले. एका क्रूर खुनाचा बळी म्हणजे एक हुतात्मा आणि एक आदर्श व्यक्तिमत्त्व हे काय समीकरण आहे कळले नाही. उलट दंगलीत मारल्या गेलेल्या काळ्या लोकांच्या फ्युनरलला कुणी उच्चपदस्थ फिरकलाही नाही. ना सरकारी इतमाम ना काही मानसन्मान. उद्धवा अजब तुझे सरकार!

ट्रम्पचे नवीन रत्न- पोलिसांनी प्रोटेस्टमध्ये ज्याला ढकललं तो 75 वर्षांचा माणूस म्हणे मुद्दाम ढकललं गेल्याचं नाटक करत होता. त्याला तितक्या जोरात ढकललं नव्हतं असं ट्रम्पचं मत आहे. म्हणजे त्याने स्वतःहून खाली पडून रक्त येईपर्यंत स्वतःचं डोकं फोडून घेतलं असं ट्रम्पला वाटत आहे.
आता ट्रम्प समर्थकांची पुढची लाईन म्हणजे बहुधा जॉर्ज फ्लॉईडच्या मानेवर गुडघा तितक्या जोरात ठेवलाच नव्हता , अगदी नाजूकपणे ठेवला होता. जॉर्जने मुद्दाम स्वतःला मारलं आणि आय कान्ट ब्रीद असं खोटंच म्हणत होता.

decommodifying_police.jpeg

काल #शटडाऊनअकॅडमिक्स होतं. त्यासाठी सुट्टी घेऊन बरंच काही वाचलं आणि थोडंफार ऑनलाईन पाहीलं देखील. वर्णभेदाचा गहन प्रश्न थोडा समजून घ्यायचा प्रयत्न करू शकलो. 13th नावाची डॉक्युमेंटरी पाहिली नसेल तर जरुर पहा. नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे. खाली एक कार्टून देतो आहे त्यातलं बीग कॉर्पोरेशन बद्दलच्या काही गोष्टी मला कळल्या नव्हत्या म्हणून लोकांना विचारल्यानंतर त्या डॉक्युमेंट्रीचा रेफरन्स मिळाला. हे कार्टून बघून पण बरेच काही शिकण्यासारखे आहे. पोलिसिंग जे असतं ते आपण साधारणतः फक्त गुन्ह्यांसाठी म्हणून समजतो पण अमेरिकेत बराचसा भाग मेंटल हेल्थ रिलेटेड गोष्टींसाठी असतो आणि महत्त्वाचं म्हणजे शहरांचा बरंच बजेट यामध्ये इनएफिशियंटली खर्च होतं. त्या गोष्टी जर वेगळ्या करता आल्या तर बरेच पैसे वाचतील आणि वर्णभेद होतो आहे तो पण कमी होईल. अर्थातच पोलीस खाते पूर्णपणे बाद करता येऊ शकत नाही, तसे व्हायलाही नको. पण पोलिसांनी ज्या गोष्टी करायला हव्या त्याच त्यांना काम म्हणून दिल्या तर जास्त चांगले. जसे भारतामध्ये शिक्षकांवर मुलांना खाऊ घालण्याची जबाबदारी असते त्यामुळे कदाचित अनेकांचं लक्ष शिकवण्यातून कमी होऊ शकतं तसाच थोडाफार हा प्रकार आहे. पोलिसांनी केवळ पोलीसगिरी केली आणि ती ह्यूमनिजमच्या अंगाने केली म्हणजे जिथे शिक्षा व्हायला पाहिजे तिथे व्हायलाच पाहिजे अन्यथा समजून-उमजून गोष्टी व्हायला पाहिजेत.

"काळ्या वंशाचा असणे हे कॉलेजात (तेही उत्तम दर्जाच्या) प्रवेश मिळवण्याकरता प्रचंड उपयोगी असते. "
ही अंशतः भरपाई आहे. त्याच्याकडे बोट दाखवून ' मिळतंय त्यांनाही'असे कसे म्हणता येईल? इथे भारतातही आरक्षणाविषयी असाच सूर असतो. 'आम्हां करदात्यांच्या जीवावर चालल्यात ह्या उड्या. ह्यांचा भुर्दंड आणि ताण आम्हांला सोसायला लागतोय,
ह्यांच्यामुळे आमच्या संधी हुकताहेत' वगैरे. पण समाजाचा एक मोठा हिस्सा गरीब, अशिक्षित, अप्रगत, अविकसित राहणे हा संपूर्ण समाजाला अधिकच मोठा ताण नाही का?

'आम्हां करदात्यांच्या जीवावर चालल्यात ह्या उड्या. ह्यांचा भुर्दंड आणि ताण आम्हांला सोसायला लागतोय,
ह्यांच्यामुळे आमच्या संधी हुकताहेत' वगैरे. पण समाजाचा एक मोठा हिस्सा गरीब, अशिक्षित, अप्रगत, अविकसित राहणे हा संपूर्ण समाजाला अधिकच मोठा ताण नाही का? >>>>>
इथे ही जे एन इन् यू / अलीगढ सारख्या इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांनी राजकीय प्रश्न हाताळायला जास्तच सुर वात केली , आणि ते सुद्धा शर्जील इमाम सारख्या देशविरोधी लोकां बरोबर !
तेंव्हा करदात्यांच्या भडका उडाला.

खरं म्हणजे असल्या संस्था मधून शिक्षण घेणारे फक्त राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी प्रयत्न करतात , म्हणून सर्वात अगोदर येथील सगळ्या सबसिडी आणि आरक्षण बंद केले पाहिजे .
पुढारी होण्याची खूपच खाज असेल तर भरतील दर्जेदार संस्था मध्ये पैसे !
राज्य पातळीवर आरक्षण द्वारे शिक्षण घेवून देशसेवा आणि अर्थार्जन करून वेगवेगळ्या मार्गाने लाखो जण पुढे गेले आणि त्यांनी समाजाची उंची वाढवली .

>>सामान्य माणसाला पूर्वग्रह निर्माण होणे इतके भयंकर आणि अनैसर्गिक आहे का?>>
पूर्वग्रहामुळे जर विशिष्ठ वंशाच्या सामान्य व्यक्तीकडे सातत्याने गुन्हेगार म्हणूनच बघितले जाणार असेल, न्याय नाकारला जाणार असेल तर ते भयंकरच म्हणायला हवे. त्यातून जेव्हा व्यक्ती अधिकाराच्या पदावर असते तेव्हा ती सामान्य रहात नाही तर तिच्या हातात सत्ता असते. सत्ताधारी आणि पूर्वग्रहदुषित नजर हे एकत्र असेल तर अजूनच भयंकर !
गुन्हा केला तर शिक्षा हवीच पण ती गुन्ह्याचे स्वरुप बघून हवी. त्यात वर्णावरुन भेदभाव आणि बळाचा गैरवापर नसावा. केवळ विशिष्ठ वंश-जात म्हणून शिक्का मारुन मग कन्विक्शन मिळवण्यासाठी अजून अन्याय्य वर्तन असे जे चालते ते नसावे.

हारवर्डची केस अपिलात गेली आहे ना? आधी जर भेदभाव केला नसता तर खरे तर अफर्मेटिव अ‍ॅक्शन, रेस कॉन्शस अ‍ॅडमिशन वगैरे करायची वेळच आली नसती. मला स्वतःला लिगसी अ‍ॅडमिशन प्रकार मान्य नाही आणि अफर्मेटिव अ‍ॅक्शन ही पहिल्यांदाच कॉलेजला जाणारी पिढी यांच्यासाठी मर्यादित असावे असे वाटते. पहिल्यांदा कॉलेजला जाणारी पिढीतील मुले , मग ती अगदी कॉकेशियन असली तरी त्यांचाही मार्ग खूप कठीणच असतो उच्चशिक्षित आफ्रिकन अमेरिकन किंवा लॅटिनोज पालकांच्या मुलांसाठी गुणांत सवलत नसावी.

>> डूख धरून सगळ्या समाजाने असे ठरवले असते की कुठल्याही काळ्यांना पुढे येऊच द्यायचे नाही त्यांच्या अंगात कौशल्य असो वा नसो तर अशी उदाहरणे निर्माण झालीच नसती.>>
समाजात काही लोकं नैतिकदृष्ट्या योग्य वागणारे असतात आणि काही नैतिक दृष्ट्या अयोग्य! इथे आपण नैतिक दृष्ट्या अयोग्य वर्तन करणार्‍या, वर्णद्वेशाने वागणार्‍या आणि बळाचा गैर वापर करणार्‍या लोकांबद्दल बोलतोय ना? जे लोकं नैतिकदृष्ट्या योग्य वागतात ते मदत करतात, अन्याया विरोधात लढतात, समस्या समजून घेवून सोडवायचा प्रयत्न करतात. अशा लोकांबद्दल कृतज्ञतेने आफ्रिकन अमेरिकनही आवर्जून सांगतात.

@ Swati 2 - a genuine q - bhartiye/Latino mulana shalet kitpat racism sahan karave lagte????

<अशा प्रकारे टोकाचा वर्णद्वेष तरी अमेरिकेत नाही इतपत मान्य व्हावे.> काळ्या ढगाची सोनेरी किनार म्हणावी का? अमेरिकेत किंचित का होईना वर्णद्वेष आहे असं मान्य आहे म्हणावं का?
मुळात यांचे सगळे प्रतिसाद वर्णद्वेषाने ओतप्रोत भरलेले आहेत.
आधी काळ्या लोकांच्या दुर्गुणांची यादी, मग फ्लॉयडच्या गुन्ह्यांची यादी, तो अत्याचाराचा बळी = सिंबोल झाला म्हणजे आदर्श झाला असा कांगावा, शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या जुलुमाकडे दुर्लक्ष, व्हाइट सुप्रिमसिस्ट हा शब्द तर कधी ऐकलाच नाही.

अ‍ॅफर्मेटिव्ह अ‍ॅक्शनबद्दलची चर्चा वाचून बरं वाटलं. जगात भारताशिवाय कुठ्ठे कुठ्ठे आरक्षण नाही, अशी पोपटपंची करणार्‍यांसाठी अंजन.

प्रत्येक गोष्ट ओढूनताणुन भारताशी जोडायची गरज आहे का? तसेच वटवृक्ष इ. लोकांना खिजवून काय आनंद मिळतो?

अ‍ॅफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन म्हणजे आरक्षण नाही, उलट तो कायदा आरक्षणाच्या अगदी विरूद्ध आहे. त्यामुळे अ‍ॅफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन, भारत, आरक्षण आणि पोपटपंची ह्याचा संदर्भ/आशय समजला नाही.

अश्चिग, चांगली पोस्ट. मला अजून "डिफंड" हा विषय विस्तॄत वाचायला वेळ मिळाला नाही. मी वरवर चाळलेल्या भागात जरा बर्‍या गोष्टी वाटल्या म्हणजे पोलिसांची अवांतर कामं कमी होतील. मी याची तुलना भारतात शिक्षकांना खिचडी बनवा, जनगणना करा ते मी लहान असल्याच्या काळात संततीनियमनाच्या वर्षाला किमान तीन (की पाच?) केसेस बनवा अशा कामांशी करेन. असो. अजून वाचन वाढवायचा प्रयत्न करेन. अश्चिगने सांगितलेली डॉक्युमेंटरी लिस्टवर ठेवली आहे.

आजची ही बातमी आणि त्यातले काही परिच्छेद टाकतेय. इकडच्या जाणकारांनी प्रकाश टाकावा.

Former Minneapolis police officer Derek Chauvin could receive more than $1 million in pension benefits during his retirement years even if he is convicted of killing George Floyd.

But Chauvin still stands to benefit from a pension partially funded by taxpayers. While a number of state laws allow for the forfeiture of pensions for those employees convicted of felony crimes related to their work, this is not the case in Minnesota.

Public pensions are paid for through a combination of contributions from taxpayer-funded local governments and workers themselves, as well as investment returns. Public safety pensions are typically some of the most generous and have caused local and state budgets to balloon around the country.

But they are almost impossible to reduce or take away from workers who have been promised them in public employment contracts, and police unions have fought hard to protect worker pensions.

धन्यवाद, आस्चिग.
मलाही डीफन्डिंग हा भाग अजून नीट कळलेला नाही, समजून घ्यायचा प्रयत्न करते आहे. तसंच डॉक्युमेन्टरीही पाहाते शोधून.

इथे हसन मिनाजची लिंक दिली होती का कोणी?

WHAT IS POLICE DEFUNDING

“Defunding the police recognizes that we’re giving funding to the police to perform functions that they’re not necessarily well-positioned or well-equipped to perform,” Owusu-Bempah said.

“We’ve been asking them to do more and more over time and there are organizations and agencies that are better equipped to do some of the tasks that police are doing,” he said, referring to issues arising from mental illness, poverty and substance abuse.

Voisin thinks that defunding police helps to keep the force accountable.

“When their budget continues to grow and becomes unchecked, it leads to the development of what we call the super cop, the militarization of police, which is arming the police to deal with social issues,” he said. “You can’t really deal with these social problems through increased policing.”

Redirecting funds toward what Voisin calls some of the “structural drivers” of crime and mental health — poverty, unemployment, homelessness, race-related racism — can “create a much better outcome,” he said. “It’s part of a larger conversation that the public-policy approaches around public safety have not been equally serving all communities.

https://nationalpost.com/news/calls-to-defund-and-dismantle-police-force...

प्रत्येक गोष्ट ओढूनताणुन भारताशी जोडायची गरज आहे का? तसेच वटवृक्ष इ. लोकांना खिजवून काय आनंद मिळतो? >>>
छान निरीक्षण !
पण mandar इतरांची नावे न घेवून खिजवने च केले की !
कंपू बाजी ?

>>@ Swati 2 - a genuine q - bhartiye/Latino mulana shalet kitpat racism sahan karave lagte????>>

हे तुम्ही कुठे रहाता, तिथल्या मेजॉरिटी लोकांची मानसिकता आणि स्थानिक लिडरशिपचा दृष्टीकोन यावरुन ठरते. त्याशिवाय विविध मायनॉरिटीचे एकमेकांशी असलेले संबंध आणि मेजॉरिटीशी संवाद याने देखील फरक पडतो. आम्ही ज्या गावात रहातो ते गाव आणि काउंटीतील इतर लहान गावं ही व्हाईट सुप्रिमसी, रेसिझम अशा वाईट गोष्टींना शिरकाव करु द्यायचा नाही यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. इथल्या मेजॉरिटीने आणि मायनॉरिटीनेही आम्हाला नविन असताना सहजतेने सामावून घेतले आणि आम्हीही मैत्रीसाठी पुढे आलेले हात पकडले. माझ्या मुलाला आणि त्याच्या लॅटिनो तसेच आफ्रिकन अमेरीकन मित्रांना शाळेत रेसिझमचा त्रास झाला नाही. त्याच्या फ्रेंड सर्कलमधे सर्व वर्णांची मुले होती. प्रीस्कूल ते बारावी सगळे एकत्र. मुलगा आता दुसर्‍या राज्यात रहातो मात्र गावाशी आणि शाळेशी असलेले बंध अजुनही तितकेच घट्ट आहेत.

आमच्या इथे जवळच्या दुसर्‍या काउंटीत परीस्थिती वेगळी आहे. तिथल्या एका गावाची या बाबत वाईट किर्ती आहे. आमच्या गावची मुले जेव्हा गेम्ससाठी जातात तेव्हा तिथल्या प्रेक्षकांच्या कॉमेंट्स मधून ते चांगलेच जाणवते. म्हणजे भारतीय वंशाचे असल्यास ते ठीकठाक आहेत पण लॅटिनो आणि आफ्रिकन अमेरीकन्सशी नाही. त्यामुळे मग आम्ही गावकरीही त्यांच्याशी अंतर राखून रहातो.

दोन्ही बाजूने संवाद साधायची, समजून घ्यायची तयारी हवी. त्यांनी मला सामावून घ्यावे असे म्हणताना आपले गाव, आपली शाळा या भावनेने आपणही वागणे गरजेचे. तुम्ही स्वतःसाठी रेसिझम नको अशी अपेक्षा करताना इतर मायनॉरिटीजशी फटकून वागणार असाल, आर्थिक स्तर/समाजातील स्थान यावरुन इतर मुलांना नाकारणार असाल तर मग कसे व्हावे?

तर मंडळी, पुलिस डिपार्टमेंट मधे रिफॉर्म आणण्याच्या दृष्टिने एसएफपिडि ने सुरुवात केलेली आहे. नान-क्रिमिनल कॉल्स्ना रिस्पाँसच द्यायचा नाहि. थोडक्यात फुटकळ तक्रारींकडे दुर्लक्ष करायचं, पुलिस फोर्सच पाठवला नाहि तर पुढे एक्सेसिव फोर्स लावण्याचा प्रश्नच उद्बवणार नाहि, अशी काहिसी धारणा त्यामागे असावी. पुलिस रिफॉर्म करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे रिडक्शन इन फोर्स (हि एच आर टर्म आहे, गैरसमज नसावा), ओवरहेड्स हि वाचतात. एका दगडात दोन पक्षी. सुरुवात जरी चूकिच्या किनार्‍या पासुन झाली असली तरी सगळ्या वर्गातुन या धाडसाचं स्वागत आणि कौतुक होइल अशी चिन्ह दिसत आहेत...

वेका, डेव्हिल इज ऑलवेज इन दि डिटेल. पेन्शन १.५ मिलियन ओव्हर ३० इयर्स असे बातमी म्हणते. म्हणजे वर्षाला $५०,०००. १८ वर्षाच्या सर्व्हिस नंतर इतना तो बनता है, बॉस.
आता गुन्हा घडला म्हणून ते पेन्शन फोरफिट करायचे का? नाही. (अर्थात मी नाही म्हणून उपयोग नाही राज्य सरकारच्या नियमानुसार काय ते घडेल. Happy पण चर्चेत माझे २ आणे-) इतर नागरिकांना सोशल सिक्युरिटी मिळते तसे पोलिसांना, अग्निशामन दल इ कर्मचार्‍यांना पेन्शन मिळते. ६२ वर्षावरील सामान्य नागरिक गुन्हेगार असेल पण तुरूंगात नसेल तर त्याला/तिला सोशल सिक्युरिटी मिळते. तसेच तुरूंगात असतानाही बायका-मुलांना सोशल सिक्युरिटीचा काही भाग मिळत रहातो. हे नियम न्याय वाटतात. वाईट, अकार्यक्षम पोलिसाला शिक्षा व्हावी पण कुटूंब भरडले जाऊ नये.

सी,
>>हे नियम न्याय वाटतात. वाईट, अकार्यक्षम पोलिसाला शिक्षा व्हावी पण कुटूंब भरडले जाऊ नये.
हे कळलं. मला वाटतं तू तो भाग वाच जो मी बोल्ड केलाय. पुन्हा कॉपी करते आणि मला समजायला मदत कर म्हणजे ते तसं असेल तर मला समजेल तुला काय म्हणायचं ते.

number of state laws allow for the forfeiture of pensions for those employees convicted of felony crimes related to their work,
इतर स्टेट वर्कर्स (किंवा इतर स्टेटमध्ये) या गुन्ह्यांना वेगळा न्याय आणि पोलिसांना वेगळा असं मी वाचतेय. चुकत असल्यास खरंच सांग.
आणखी हवं तर ट्रेव्हर नोआचा How to Fix Police Unions व्हिडिओ पहा. कदाचीत तुला कळेल मी काय सांगू पाहातेय.
https://www.youtube.com/watch?v=fe509BFCxYE

याची दुसरी बाजू पण दाखवायचा प्रयत्न केलंस हे खरंच चांगलं केलं. अशा चर्चांनी निदान पुर्नविचाराची दिशा मिळते. सो करत रहा. Happy

Amemdment 13 ही डोकिमेंट्री उत्तम रेफेरेअन्स आहे.. आफ्रिकन अमेरिकन समाजात असलेल्या जास्त गुन्हेगारी ला बऱ्याच अंशी अँटी स्लेवरी कायद्या मध्ये असलेल्या तरतुदी जबाबदार आहेत..जेव्हा गुलाम ठेवणे,खरेदी विक्री करणे या वर बंदी आली तरी गुन्हेगार सिद्ध झाल्यास त्यास गुलाम ठेवण्यात येत होते.. याद्वारे हजारो कृष्णवर्णीयांची जेल मध्ये रवानगी झाली आणि पुढे पिढ्यानपिढ्या गुन्हेगारीचा शिक्का घेत जगात आली...जगण्याचे सर्वसामान्य मार्ग अश्या रीतीने बंद झाल्यावर या समाजात गुन्हेगारी वाढली नाही तर नवल...पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर जे काही सिव्हिल राइट मोमेंट ने दिले त्यात सरकारने दोन्ही समाज समान आहेत हे मानूंन कायद्यात बदल केले आणि हे सर्व समाज लगेच स्वीकारेल असे समजून पुढे गेले..काही शे वर्षात निर्माण झालेली दरी कमी करण्यासाठी कोणतीही विशेष तरतूद केली नाही..आजही प्रत्येक बाबतीत दोन्ही समाज दोन टोकावर आहेत..शिक्षण,आरोग्य,वार्षिक उत्पन्न, स्व मालकीचं घर इत्यादी....जो पर्यन्त या दरी ला कमी करण्यासाठी काही विशेष केलं जात नाही,तो पर्यन्त हा प्रश्न सुटेल याची शक्यता खूपच कमी दिसते..
दुसरे कारण , भारत आजही गावात चोरी झाली की पोलीस आजही ठराविक समाजातील लोकांना चौकशी साठी बोलावतात.. अविश्वास आणि शतकानुशतके तयार झालेले समाजविषयीचे मत हेच त्यामागे कारण दिसते..अमेरिकेतही पोलीस आणि कृष्णवर्णीय मधील अविश्वास या मागे ही अजून एक कारण आहे असे वाटते..

>>>भारत आजही गावात चोरी झाली की पोलीस आजही ठराविक समाजातील लोकांना चौकशी साठी बोलावतात.. अविश्वास आणि शतकानुशतके तयार झालेले समाजविषयीचे मत हेच त्यामागे कारण दिसते

प्रत्येक गोष्ट ओढूनताणुन भारताशी जोडायची गरज आहे का?

मान्य..ओढून ताणून जोडायची अजीबात गरज नाही..साम्य असेल तरच..इथे ते दिसले म्हणून संदर्भ आला..बाकी काही कारण नाही..

नियमितपणे इथले प्रतिसाद वाचते आहे. स्वाती२ यांच्या
प्रतिसादांशी सहमत. Black lives matter. या सगळ्या चळवळींचा मूकमोर्चांचा उपयोग व्हावा. पुन्हा कुठल्याही व्यक्ती वर त्याच्या वर्णामुळे अन्याय होऊ नये हीच सदिच्छा आहे मनात. यासाठी मी काही करू शकत असेल तर जरूर विपु मधून कळवा. सुरवातीचे काही दिवस इतके अस्वस्थ वाटत होते की काही लिहू शकण्याच्या मनस्थितीत नव्हते. धन्यवाद.

Pages