अमेरिकेत मिनिआपोलिस येथे काही दिवसांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. अटक करत असताना जॉर्ज प्रतिकार करत नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हते. त्याला ४ सशस्त्र पोलिसांनी घेरले होते. त्यापैकी एकाने त्याला जमिनीवर दाबून स्वतःचा गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला होता. आपण गुदमरतोय असे जॉर्ज जिवानिशी ओरडत होता हे येणार्या जाणार्या लोकांनी घेतलेल्या फोन व्हिडिओ मधे स्पष्ट दिसतेय, ऐकू येतेय.
या घटनेनंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये या घटनेविरोधात निदर्शने घडत आहेत. अनेक शांततापूर्ण निदर्शने होत असतानाच काही ठिकाणी निदर्शकांनीदेखिल हिंसा , जाळपोळ सुरु केल्याचेही दुर्दैवाने पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी परिस्थितीचा फायदा घेऊन लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
पोलिसांच्याकडून घडणार्या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्या हिंसेचीही ही पहिली घटना नाही.
https://mappingpoliceviolence.org/
https://policeviolencereport.org/
पण या आणि इतर अनेक साइट्स च्या डेटा नुसार व्हाइट किंवा इतर कोणत्याही वर्णापेक्षा कृष्णवर्णीयांसोबत होणार्या हिंसेचे प्रमाण खूप जास्त आहे. अर्थात नेहमी ( डोळे उघडे ठेवून) बातम्या बघत असाल तर अशा स्टॅटिस्टिक्सच्या आधाराची गरज ही नाही.
**या विषयावर चर्चा NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण इथे सुरु झाली हिती. तीच सुरु ठेवायला म्हणून हा धागा उघडतेय.
शेंडेनक्षत्र, सावंतबाई आणि
शेंडेनक्षत्र, सावंतबाई आणि महापौर डर्कन यांच्यात तुम्हि वर्तवल्या नुसार कॅटफाइटला सुरुवात झालेली आहे. डर्कनबाईंच्या मतानुसार सावंतबाईंनी त्यांच्या घरासमोर रॅलिज/निदर्शनं करुन त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेवर घाला घातलेला आहे. अँड वि ऑल थॉट प्रोटेस्टिंग इज अवर बर्थराइट. डँग!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
डर्कनबाईंनी चंगच बांधला आहे सावंतबाईंची काउंसिल मेंबर्शिप कँसल करण्याचा. व्हाय दे आर डुइंग धिस हुपला, जस्ट फॉर ए पोलिटिकल थिएटर? इफ सो, गाडस्पीड सिएटल...
कालच सँपल बॅलट माझ्या
कालच सँपल बॅलट माझ्या नावावरती आलं म्हणजे मत देता येणारे.
कोणाला (रिपब की डेमो) कळत नाहीये.
सर्व चर्चा वाचते आहे.
उत्तम चर्चेत विषय भरकटव
उत्तम चर्चेत विषय भरकटव स्पेशालिस्ट जमेल तसे तेल ओतत आहेत
पाच वर्षे केविलवाणी आदळआपट आणि सहाव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी एक अभिनंदनपर धागा, महान कार्य!
दुर्दैवी मृत्यूबद्दल (खरे तर खुनाबद्दल) वेदना व्यक्त करून थांबतो
थोडे अवांतर आहे -
थोडे अवांतर आहे - अर्थव्यवस्थेवर चर्चा करताना अमेरिकेत काळ्या पैशाला काय संबोधतात? ब्लॅक मनी हा शब्द तेथे बोलताना वापरता येतो का? विशेषतः आफ्रिकन-अमेरिकन वर्णाच्या लोकांशी
कोणाला (रिपब की डेमो) कळत
कोणाला (रिपब की डेमो) कळत नाहीये.
सर्व चर्चा वाचते आहे.
सामो,
मतदानापर्यंत मायबोलीवरील निवडणुकविषयी कोणतेही धागे वाचु नका. आपल्या केलेल्या प्रणापासुन ढळवायची ताकद या धाग्यांमधे ठासुन भरलेली आहे.
ब्लॅक मनी हा शब्द तेथे
ब्लॅक मनी हा शब्द तेथे बोलताना वापरता येतो का? >>> इथे फारसा प्रचलित नाही. इल्लिगल वगैरे म्हणतात पण ब्लॅक मार्केट/ब्लॅक मनी या टर्म्स भारताप्रमाणे इथे नेहमीच्या वापरात नाहीत.
ब्लॅक शब्दाचे इतर प्रचलित वापर आहेत. ते सगळे वाईट संदर्भाने नाहीत. उदा: ब्लॅक फ्रायडे.
धन्यवाद, दुपारी रेडिटवर एक
धन्यवाद, दुपारी रेडिटवर एक क्रिन्ज विडिओ पाहत होतो. त्यात एका कृष्णवर्णीयांनी भरलेल्या सभेत वक्ता अर्थव्यवस्थेवर बोलताना ब्ल्याक मनी म्हणून जातो आणि नन्तर लगेच सारवासारव करतो. त्यामुळे ही शंका आली. विडिओ कोणत्या देशातला होता ते नाही सांगता येणार पण बोलण्यावरून अमेरिकेतीलच असावा.
ब्लॅक शब्दात काही वाईट आहे का
ब्लॅक शब्दात काही वाईट आहे का?
ब्लॅक शब्दात वाईट नाही काही
ब्लॅक शब्दात वाईट नाही काही पण सध्या रेडिटवर तेथील चालू घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील व्हीडिओज समोर येत राहतात. मुळ व्हिडिओची लिंक नाही सापडत पण गुगलवर शोध घेतल्यावर आख्खी बातमीच सापडली ज्यात व्हिडिओही आहे. apparently ती सभा निवडणुकीशी संबंधीत दिसतीये.
https://www.washingtonexaminer.com/news/buttigieg-accidentally-refers-to...
https://www.marketwatch.com
https://www.marketwatch.com/story/cisco-sued-for-bias-based-on-indian-ca...
शब्दच नाहीत![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages