अमेरिकेत मिनिआपोलिस येथे काही दिवसांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. अटक करत असताना जॉर्ज प्रतिकार करत नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हते. त्याला ४ सशस्त्र पोलिसांनी घेरले होते. त्यापैकी एकाने त्याला जमिनीवर दाबून स्वतःचा गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला होता. आपण गुदमरतोय असे जॉर्ज जिवानिशी ओरडत होता हे येणार्या जाणार्या लोकांनी घेतलेल्या फोन व्हिडिओ मधे स्पष्ट दिसतेय, ऐकू येतेय.
या घटनेनंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये या घटनेविरोधात निदर्शने घडत आहेत. अनेक शांततापूर्ण निदर्शने होत असतानाच काही ठिकाणी निदर्शकांनीदेखिल हिंसा , जाळपोळ सुरु केल्याचेही दुर्दैवाने पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी परिस्थितीचा फायदा घेऊन लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
पोलिसांच्याकडून घडणार्या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्या हिंसेचीही ही पहिली घटना नाही.
https://mappingpoliceviolence.org/
https://policeviolencereport.org/
पण या आणि इतर अनेक साइट्स च्या डेटा नुसार व्हाइट किंवा इतर कोणत्याही वर्णापेक्षा कृष्णवर्णीयांसोबत होणार्या हिंसेचे प्रमाण खूप जास्त आहे. अर्थात नेहमी ( डोळे उघडे ठेवून) बातम्या बघत असाल तर अशा स्टॅटिस्टिक्सच्या आधाराची गरज ही नाही.
**या विषयावर चर्चा NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण इथे सुरु झाली हिती. तीच सुरु ठेवायला म्हणून हा धागा उघडतेय.
मी कधीही तुम्ही म्हणता तसं
मी कधीही तुम्ही म्हणता तसं लिहिलेलं नाही. इतरांनी लिहिलेलं असल्यास त्यांना जाऊन विचारा. भारतात 'माझं' लिंचिंग नक्कीच होऊ शकतं कारण त्याला 1948 चा precedent आहे. असो, आता इथे विषयांतर नकोय. बॅक टू द करंट इश्यू.
सुनिती,
सुनिती,
तुमच्या पोस्ट मधे पुरोगामी या शब्दामागे तथाकथित किंवा छद्म हा शब्द लावलात तर बरे होईल. आजकाल भारतात पुरोगामी पणाचे ही राजकीयीकरण झाले आहे. या लोकांना कोणाच्याच हत्येचे सोयरसुतक नाही, आपल्याला राजकीय दृष्ट्या सोयीची घटना असेल तर निषेध आणि नसेल तर पूर्ण दुर्लक्ष !
मुळात अशी तुलना करणेच अप्रस्तुत आहे असे वाटते. अमेरिकेतील घटनेमागे २०० वर्षांच्या शोषणाचा इतिहास आहे.
असो. या घटनेच्या मुळाशी रेसीझम आहे हे पुरेसे स्पष्ट आहे. त्यानंतर कधीही प्रतिक्रिया उमटली (हिंसा / जाळपोळ) तरीही मूळ घटनेतील परिस्थिती / तीव्रता बदलत नाही.
पोलिटीकल प्रेफरन्स: अमेरिकेत
पोलिटीकल प्रेफरन्स: अमेरिकेत लिबरल, भारतात अॅन्टी लिबरल अशी एक वेगळी कॅटेगरीच बनवायला हवी. खुपच लोक आहेत असे.
दुर्दैवाने हे खरे आहे. याला सन्माननीय अपवादही बरेच आहेत पण तरीही. "भारतातून आलेल्या एका सन्यासी स्वामींबरोबर प्रशोत्तरे" असा कार्यक्रम एका घरात होता. मी सहसा जात नाही पण जावे लागले. सुदैवाने गेल्या गेल्या लहान मुलांनी माझा ताबा घेतला व मी त्यांना डायनासोर च्या गोष्टी सांगू लागलो. पाणी पीण्यासाठी दिवाणखान्यात गेलो तर नुकताच झालेल्या गौरी लंकेश च्या हत्येचा विषय चालू होता. कुणीतरी स्वामींना हे विचारले तर ते म्हणाले की हे काम फार आधीच व्हायला हवे होते. उपस्थितांनीही माना डोलावल्या. भगवी वस्त्रे परिधान करून व लग्न न करता सन्यासी झालेल्या व्यक्ती मध्ये empathy चा इतका अभाव ?
"अपना काम बनता, भाड मे जाये जनता" अशी ही मनोवृत्ती असावी. भारतातील एखाद्या व्यक्ती ने जॉर्ज फ्लॉयीड च्य हत्ये चा निषेध केला व त्याच वेळी भारतातील पोलीस बृटॅलिटी चा निषेध केला नाही तर दुटप्पी पणाच म्हणावा लागेल.
ता. क. न्यू यॉर्क टाईम्स ने ओपिनिअन पेज वर रिपब्लिकन सिनेटर टॉम कॉटन यांचा "सेंड इन द ट्रूप्स" हा लेख प्रसिद्ध केला. लेखात काय होते हे शीर्षकावरून लक्षात येइल. त्या लेखावरून फारच गदारोळ झाल्याने आता काही एडिटर लोकांचे राजिनामे घेतले गेले. तो लेख छापील आवृत्तीतूओनही गाळला गेला. हा मूर्खपणा आहे. एका सिनेटर ला आपले विचार मांडण्याचा पूर्ण हक्क असावा. फार तर त्या लेखाविरोधी आणखी एक लेख प्रसिद्ध करायला हवा होता.
खरंय विकु. देशातील एका
खरंय विकु. देशातील एका पुरोगामी राज्यात पोलिसांनी एका विरोधी विचारांच्या माणसाला उचलून एका कॅबिनेट मंत्र्यांच्या बंगल्यात नेलं आणि मंत्रीमहोदय यांच्या समोर बेदम मारहाण केली म्हणे. नंतर त्याच्यावर(जखमी माणसावर) व त्याच्या बायकोवर तक्रार दाखल झाली म्हणे. या घटनेत मंत्री महोदयांच्या समर्थनात पूरोगामी लोक उतरले होते, तसे हॅशटॅग चालवत होते. तो माणूस सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टी टाकून 'शाब्दिक हिंसा' करत होता म्हणून त्याला मारणं योग्य असंही लिहीत होते.तो उजव्या विचारांचा असल्यामुळे त्याला हीच भाषा कळते म्हणून असंच मारण्याचा प्रघात पडला पाहिजे अशी आशा व्यक्त करत होते.
काही पुरोगाम्यांनी निषेध केला असला तरी मंत्र्याच्या निषेधाची एकच छोटी पोस्ट आणि अमेरिकेतील घटनेवर तावातावाने 10 पोस्ट असाही प्रकार दिसला.
(आणि हो, 48-84 बद्दल पुरोगामी कसं स्पष्ट शब्दात निषेध करायला कचरतात, blame the victim community ही strategy वापरतात ते मायबोलीवरच्या त्या विषयावरील अनेक चर्चात दिसून आलं आहे.)
मी एन आर आय दुटप्पीपणा
मी एन आर आय दुटप्पीपणा धाग्यावर लिहिलं होतं. अमेरिकेतल्या रेसिझमला , पोलिस अत्याचारांना विरोध करणारे लोक भारतात ल्या दलित अत्याचारांबद्दल मूक असतात किंवा ते खोटं आहे, असं सांगतात. मुस्लिमां बद्दल बोलायलाच नको.
अमेरिकेत आता व्हाइट सुप्रिमसिस्ट लोक ज्या ज्या ऑर्ग्युमेंट्स आणि गोष्टी करत आहेत, त्या त्या यांनी भारतातल्या मुस्लिमांबद्दल केल्यात.
शेंडेनक्षत्र यांनी ब्लॅक कम्युनिटीबद्दल जे जे लिहिलं ते सगळं हे लोक भारतात मुस्लिमांबद्दल लिहीत आलेत. ते आताच्या आंदोलनाबद्दल जे लिहिताहेत, तेच सी ए ए विरोधातल्या आंदोल नांबद्दल ही मंडळी लिहीत होती. पोलिसी मारहाणीचे व्हिडियो दिसल्यावर त्याच्या आधी असं झालं तसं झालं असेल म्हणून समर्थन करीत होती.
शेंडेनक्षत्र यांनी जॉर्ज फ्लॉयडबद्दल जे जे लिहिलं तसंच हे तबरेज आणि मॉब लिंचिंगच्या इतर बळींबद्दल लिहीत आलेत.
एवढ्यासाठी शेंडे नक्षत्र यांच्या कंसिस्टन्सीचं कौतुक करायला हवं.
मी वर दोन ट्वीट्स दिल्या आहेत. एकात गो र्या लोकांची झुंड कर्फ्युच्या काळात बेसबॉल बॅट्स घेऊन चालत निघालीय. हे चित्र जे एन यू त दिसलं होतं.
दुसर्या ट्वीटमध्ये (जे एका बातमीत कन्फर्म झालं होतं) नावचे बॅ जेस नसलेले पण सगळं संरक्षक गियर असलेले सशस्त्र लोक व्हाइट हाउसपाशी तैनात होते. हेही चित्र दिल्ली आणि उत्तर प्रदेशात दिसलं होतं.
एलिफंट्स लाइफ मॅटर्स कारण ते केरळमध्ये झालं. तो जिल्हा यांनी मुस्लिम बहुल केला. आरोपींची नावं स्वतःच ठरवुन टाकली. ते अपघाताने झालं तरी राळ उडवली. तेच हिमाचल प्रदेशमध्ये यांच्या लाडक्या गोमातेसोबत जाणू न बुजून झालं तर गप्प.
पालघरला साधूंचं मुलं चोर णारे म्हणून मॉब लिंचिंग झालं, आरोपींन अटक झाली तरी त्याबद्दल अजून गळे काढताहेत.
तेच उत्तर प्रदेशात साधूंचे खून झाले किंवा गे ल्या दोन वर्षांत गायीच्या नावावर किंवा मुलं पळवणारे म्हणून इतकी लिंचिंग्ज झाली तरी त्याबद्द्ल अक्षर नाही, उलट त्याच्म समर्थनच केलंय.
अमेरिकेतल्या रे सिज्मला विरोध
अमेरिकेतल्या रे सिज्मला विरोध का? तर ते फक्त ब्लॅकच्या विरोधात नाही. ब्राउनच्याही विरोधात आहे. उद्या आपल्यालाही झळ बसेल. बसणार नसती, तर मला काय त्याचं हे अगदी सुरुवातीच्या एका प्रतिसादात दिसलंच आहे. तेच न्युझीलम्डमधला व्हाइट सुप्रिमसिस्ट दहशतवादी बिचारा माथं फिरलेला माणूस . त्याचं माथं फिरायला कारण त्याचे व्हिक्टिम मुस्लिम लोकच. आम्ही कुठे व्हिक्टिम ब्लेमिंग करतो?
असो. हा धागा अमेरिकेतील आयुष्य या ग्रुपात आनि रेसिझमबद्दल आहे. तो भरकटवायची इ च्छा नाही. फक्त एक लक्षात ठेवा. उजव्या विचारसरणी जगभरच प्रबल ठरताहेत.
लगेगी आग तो आएंगे घर कई जद में, यहां पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है'.
अमेरिकेत ट्रम्प रेसिस्ट आहे
अमेरिकेत ट्रम्प रेसिस्ट आहे म्हणून त्याला विरोध करणे , त्याचा निवडणुकीत पराभव व्हावा अशी इच्छा करणे हे पुरोगामी करत आहेत पण भारतातील विशिष्ट राज्यात पोलिसांकरवी अत्याचार करणाऱ्या मिनिस्टरवर कारवाई व्हावी, निदान त्याचं मंत्रिपद काढून घ्यावे अशी मागणी पुरोगामीनी केली का? जर राज्य सरकार उघड उघड त्याला पाठीशी घालत आहे तर मग राज्य सरकार सत्तेवरून जावे अशी मागणी किंवा प्रयत्न? उलट राज्य सरकार कित्ती चांगलं आहे हेच ठासून सांगताना दिसले.
असो. माझी भारत या विषयावर इथे ही शेवटची पोस्ट. मी भारताबद्दलच्या धाग्यांवर काही विशेष लिहितच नाही तर अमेरिकेबद्दलच्या धाग्यावरही भारताचाच विषय कशाला? इथे अमेरिकेबद्दल बोला. भारताबद्दल इतर धागे आहेतच की.
भारता मधील पुरोगामी लोकांचा
भारता मधील पुरोगामी लोकांचा दाखवायचा चेहरा वेगळा आहे आणि खरा चेहरा वेगळा आहे.
आमचा खरा चेहरा लोकांना ओळखता येणार नाही असा त्यांचा स्वतःचाच ठाम गैर समज आहे.
सामाजिक समता,न्याय,ह्याच्या शी ह्यांचा काही ही संबंध नाही.
अमेरिकेत घडलेल्या घटनेचा हे विरोध करतायत पण चीन मध्ये मुस्लिम लोकांना वेगळी वागणूक दिली जाते त्या वर ह्या लोकांनी मत व्यक्त केल्याचे ऐकिवात आहे का कोणाच्या.
ब्रह्मदेश वर आपल्या पुरोगामी मंडळी नी टीका केली आहे का.
ज्या ब्रह्मदेश नी मुस्लिम लोकांना जबरदस्ती देशाबाहेर काढले.
भारतावर एवढे हल्ले झाले पण पाकिस्तान विरोधी कधी ह्यांनी साधा मोर्चा तरी काढला आहे का.
पण अफजल गुरु साठी रडगाणे मात्र गायले होते.
हो आणि इथे मायबोलीवरच (ह्या
हो आणि इथे मायबोलीवरच (ह्या पुरोगामी अथवा लिब्रांडूना) गोळ्या घातल्या पाहिजेत, लाथा घातल्या पाहिजेत; इतकेच नव्हे तर दुसऱ्या एका धाग्यावर हे मेले तर बरे होईल किंवा करोना झाला तर बरेच होईल, अशा अर्थाच्या (पण याच शब्दांतच असे नव्हे) पोस्ट्स पडल्या आहेत.
आणि छद्म हे विशेषण तर अनेकांना लावता येईल. कारण छद्मीपणा अनेकांकडे आहे. उजव्यांना तर नक्कीच. कर्मठ धार्मिक आचरणाचा पुरस्कार करताना, गोवंशबंदीला हिंसक पाठिंबा देताना धर्मधुरीणांच्या कित्येक मठात काय चालते, नर बछडयांची आणि भाकड गायींची कशी वासलात लावली जाते ह्याचे तपशील भयावह आहेत. बीफचा व्यापारांत अथवा निर्यातीत, त्यावर बंदी येण्यापूर्वी कोणते लोक होते, रेव्हेन्यूमध्ये अफरातफर, सुपारी देऊन खून हे कोण करवते हा तपशील रोचक असेल.
कुठलेही तत्वज्ञान पूर्ण शुद्ध नसते. त्यात contradictions, stagnancy असतेच असते आणि ती प्रगतीला (इथे 'देशहितविरोधी' असेही म्हणता येईल) मारक ठरते. आणि ज्या तत्त्वज्ञानाचा ज्या काळात जयजयकार होत असतो ते तत्वज्ञान त्या काळात तितक्याच जोमाने अनुसरले जातेच असे नाही. कधी त्याला भविष्यात अनुयायी मिळतात तर कधी ते भूतकाळातील गौरवावर जगते.
भारतीय पार्श्वभूमीवरचा प्रतिसाद अमेरिकासंबंधी धाग्यावर
लिहिल्याबद्दल क्षमस्व
गौरी लंकेश च्या हत्येचा विषय
गौरी लंकेश च्या हत्येचा विषय चालू होता. कुणीतरी स्वामींना हे विचारले तर ते म्हणाले की हे काम फार आधीच व्हायला हवे होते. उपस्थितांनीही माना डोलावल्या. भगवी वस्त्रे परिधान करून व लग्न न करता सन्यासी झालेल्या व्यक्ती मध्ये empathy चा इतका अभाव ?
अभिव्यक्ती स्वतंत्र च्या नावाखाली हिंदू धर्मावर खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर स्वामी च्या भावना तीव्र असणारच.
बाकी ठिकाणी तर सरळ फतवे निघतात खुले आम.
सलमान रश्दी आणि तस्लिमा ह्यांची प्रकरण पण झालेली आहेत ह्याचा विसर नसावा .
गौरी लांकेश आठवते पण सलमान रश्दी आठवत नाही.
ही तर खासियत आहे पुरोगामी लोकांची.
Submitted by भरत. on 8 June,
Submitted by भरत. on 8 June, 2020 - 09:35
>>>>+१
मला पण हे लिहायचं होतं. पण लिहू की नाही विचार करून राहून गेलं.
https://twitter.com
https://twitter.com/profmusgrave/status/1269724480731066375
Protesters Say Statue Tripped, Fell Into Water
चीन,ब्रह्मदेश,श्री लंकेत सरळ
चीन,ब्रह्मदेश,श्री लंकेत सरळ सरळ धार्मिक वादातून मुस्लिम लोकांवर अत्याचार झाले होते .
त्याचा ह्या लोकांनी कधी विरोध केला आहे का.
आता ट्रम्प ह्यांच्या जागी ओबामा असते आणि ही घटना घडली असती तर आपल्या पुरोगामी मंडळी नी चक्कर एक शब्द पण काढला नसता.
भरत यांनी दिलेली ट्विटर लिंक
भरत यांनी दिलेली ट्विटर लिंक अगदी वाचनीय आहे.
अशीच एक ब्लॅक ह्यूमर वाली काश्मीरी साईट.
https://dapaan.com/
पण लिंचींग मानवताविरोधी आहे
पण लिंचींग मानवताविरोधी आहे असा स्टॅड फक्त फुरोगामी लोकांनी घेतला. बाकी सगळे फुरोगामींची थट्टा, हेटाळणी करण्यात मशगुल. आता अमेरिकेत फुरोगामी व्हायला निघालेत. >> सुनिती. तुम्ही लिहिण्याच्या ओघात पुरोगामी च्या ऐवजी फुरोगामी म्हटलंय. फुरोगामी हेही थट्टेसाठीच म्हणलं जातं.
मुद्दाम लिहीलंय तसं. कारण
मुद्दाम लिहीलंय तसं. कारण इथल्या लोकांना फुरोगामी म्हणून चिडवतात आणि आता मात्र आम्ही किती पुरोगामी हे दाखवायला धडपडतात आहेत.
रेसिझम ची फक्त एकांगी चर्चा
रेसिझम ची फक्त एकांगी चर्चा करणे म्हणजेच दंगलीला समर्थन यात काही वाद नाही. >>> वटवृक्ष, हे कसे काय? >>>>>>>
फार एंड ,
जॉर्ज च्या दुर्दैवी हत्येमुळे तेथे उद्भवलेली दंगल सुदृष परिस्थिती भारतात निर्माण करण्यासाठी आवाहन करणाऱ्या तथाकथित विचारांनी उद्विग्न होवून लीहले होते ते !
प्रश्न असा पडतो भारतात आता पर्यंत शेकडो दंगली झाल्या , हजारो मृत्यमुखी पडले .
पण आज पर्यंत भारतातील परिस्थितीला अनुसरून तेथे एक ही दंगल झाली नाही आणि त्यांना त्याचे काही घेणे देणे ही नाही .
मग आपल्या येथील काही ट्विटर बहद्दराना अमेरिकेतील रेसिझाम चा इतका कळवळा का ?
आणि त्यावरून इथे दुफळी का निर्माण झाली आहे ?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=v4amCfVbA_c
मी एन आर आय दुटप्पीपणा
मी एन आर आय दुटप्पीपणा धाग्यावर लिहिलं होतं. अमेरिकेतल्या रेसिझमला , पोलिस अत्याचारांना विरोध करणारे लोक भारतात ल्या दलित अत्याचारांबद्दल मूक असतात किंवा ते खोटं आहे, असं सांगतात. मुस्लिमां बद्दल बोलायलाच नको. >>>> हे नक्की इथल्या कोणा स्पेसिफिक आयडींबद्दल लिहिले आहे का ? की नुस्ताच स्ट्रॉमॅन ? हा बाफ मी काढला. मला तरी आठवत नाही कधी भारतातल्या मॉब लिंचिंग ला सपोर्ट केल्याचं. इथे लिहिणार्या आयडींपैकी मला माहित असलेल्या आयडींनीही तसे लिहिल्याचे आठवत नाही. मग हे असे पोस्ट स्पेसिफिक्स न देता जनरलायजेशन करून लिहिण्यामागे काय विचार आहे?
अमूक झाले तेव्हा निषेध का नाही केला? भारतात तमके झाले तेव्हा का नाही बोललात असेच अर्ग्युमेन्ट असेल तर सिंपल उत्तर हे आहे की भारतातले राजकारण फॉलो केले जात नाही त्यामुळे काही बोलले लिहिले जात नाही. याचा अर्थ तिथल्या अमु़क घटनेला सपोर्ट केला असा घेतला असेल तर ते विनोदी होईल फारच.
समझनेवाले समझ गए है.
समझनेवाले समझ गए है. तुम्ही भारतातल्या घडामोडींबद्दल कधी रिअॅक्ट झाला नसाल, होत नसाल तर सोडून द्या.
>>शेंडेनक्षत्र, राज हे दोन्ही
>>शेंडेनक्षत्र, राज हे दोन्ही ठिकाणी राइटविंग च्या बाजूने बोलतात यावरून त्यांची ( कशी का असेना) कन्सिस्टंट विचारसरणी आहे हे लक्षात येते.<<
आम्हि दोघेहि स्ट्रेट शूटर आहोत. उगाच समोरच्याला काय वाटेल याचा विचार करण्या ऐवजी आम्हि काय लिहितो त्यात तथ्य असल्याने रोखठोक लिहितो. याप्रयत्नात काहि मनं दुखावतात, तर काहिंचे बुरखे फाटतात, पण त्याला नाईलाज आहे. सद्यपरिस्थितीत हा स्टँड काहिसा "सेंटर-राइट" कडे झुकणारा असल्याने तुमचं निरिक्षण बरोबर आहे. ओह बाय्दवे, पण जेंव्हा पटंत नाहि तेंव्हा ट्रंप्/मोदिंवर टिका हि करतो, फुरोगाम्यांसारखं ब्लॅंकेट समर्थन अथवा द्वेष करत नाहि...
>> न्यू यॉर्क टाईम्स ने
>> न्यू यॉर्क टाईम्स ने ओपिनिअन पेज वर रिपब्लिकन सिनेटर टॉम कॉटन यांचा "सेंड इन द ट्रूप्स" हा लेख प्रसिद्ध केला. लेखात काय होते हे शीर्षकावरून लक्षात येइल. त्या लेखावरून फारच गदारोळ झाल्याने आता काही एडिटर लोकांचे राजिनामे घेतले गेले. <<
ताज्या घडामोडिंची दूसरी बाजु लोकांसमोर यावी, या उद्देशाने न्यु यॉर्क टाइम्स्चं ऑप-एड हे सदर चालवलं जातं. या पुर्विहि अनेक लेख, तालिबान सहित या सदरात प्रसिद्ध झाले आहेत. हे सदर म्हणजे तटस्थ पत्रकारिता कशी असावी याचा सुंदर दाखला आहे.. वेल, होता असं म्हणावं लागेल आता...
नेहेमी प्रमाणे पुस्तकाचं फक्त शीर्षक वाचुन आतला गाभा ओळखणार्यांनी गदारोळ माजवला, आणि लेख मागे घ्यायला लावला. न्यु यॉर्क टाइम्स स्वतःची क्रेडिबिलिटी कशी घालवुन बसत आहे त्याचं अजुन एक उदाहरण.
हे आहे टॉम कॉटनचं ट्विट...
मैत्रेयी, तुम्ही भारतातल्या
मैत्रेयी, तुम्ही भारतातल्या घटनांवर जर बोलला नसाल तर प्लीज मी लिहिलेलं मनाला लावून घेऊ नका. ते तुमचासाठी नाही.
जॉर्ज च्या दुर्दैवी हत्येमुळे
जॉर्ज च्या दुर्दैवी हत्येमुळे तेथे उद्भवलेली दंगल सुदृष परिस्थिती भारतात निर्माण करण्यासाठी आवाहन करणाऱ्या तथाकथित विचारांनी उद्विग्न होवून लीहले होते ते ! >>> ओके. भारतातही याबद्दल लोक ट्विट करत आहेत इतके वाचले आहे पण त्यापलीकडे मला कल्पना नाही तेथे काय रिअॅक्शन आहे.
भारतातही याबद्दल लोक ट्विट
भारतातही याबद्दल लोक ट्विट करत आहेत? खरेच? मला तर कोणी दिसले नाही ट्वीटरवर. फेसबुकवर पण फारशी हालचाल नाही जाणवली. अजुनही कोरोना मुडच कायम आहे असे दिसतय.
सध्या अमेरिकेतील पुरोगामी
सध्या अमेरिकेतील पुरोगामी नेते ह्या जॉर्ज फ्लोईड प्रकरणावर "उपाय" म्हणून पोलिस दलावर खर्च होणारा पैसा कमी करण्याबद्दल गंभीर विचार करत आहेत असे ऐकून आहे. काही खूप खूप पुरोगामी लोक तर असे सुचवत आहेत की पोलिस दल रद्दच करा. त्या ऐवजी BLM सारख्या संघटनेला शहराच्या सुरक्षेची जबाबदारी द्या! धन्य धन्य आहे. म्हणजे समजा चुकून आपल्या दाताखाली जीभ आली तर पुन्हा असे होऊ नये म्हणून सगळे दात काढून टाकण्यासारखे आहे!
आमच्या सॅन फ्रॅन्सिस्को शहरात छोट्या मोठ्या गुन्ह्यांचा इतका सुळसुळाट होता (कोरोना प्रकरण सुरु व्हायच्या आधी) की विचारू नका. दर २२ मिनिटाने एक कार फोडून त्यातील ऐवज लुटला जातो असे आकडेवारी सांगते. ड्र्ग वापरणारे, रस्त्यात मलमूत्र विसर्जन करणारे, डोके फिरलेले लोक कायम फिरत असतात. अनेकदा अशा लोकांनी एकट्या दुकट्या स्त्रीवर हल्ला केल्याचे प्रसंग आहेत. शहराच्या काही भागात संध्याकाळी ७ नंतर जाणे धोकादायक मानले जाते. बार्ट सारखी रेल्वे देखील असल्या उपद्रवी लोकांनी गांजलेली आहे. कार फोडली तर पोलिस तक्रार लिहून घेतात पण हेही सांगतात की आम्ही ह्या गुन्ह्याचा तपास करायला असमर्थ आहोत. तुम्ही आणि तुमचा इन्शुरन्स काय करायचे ते करा! जवळपासच्या अनेक शहरात अशीच स्थिती आहे. कॅलिफोर्नियात असा नियम आहे की ९५० डॉलर च्या खालच्या रकमेची चोरी झाल्यास तो गंभीर गुन्हा समजला जाणार नाही. त्याचा तपास वगैरे फारसा केला जाणार नाही. मग चोर मंडळी दुकानातून ७००-८०० किमतीचे ऐवज चोरतात. अशा विविध प्रकारे आमचा कॅलिफोर्निया गुन्हेगारीवर उपाय शोधत असतो. बहुतेक मोठ्या शहरात पोलिस अपुरे पडतात. आता ह्या फ्लॉईड प्रकरणानंंतर पोलिस दल आणखी कमी करणार अशी लक्षणे दिसत आहेत. म्हणजे अजून अंदाधुंद, गुन्हेगारी, लुटालूट.
लॉस एन्जेलिस, शिकागो, न्यू यॉर्क इथेही हेच होणार.
एका वर्णाच्या लोकांकडून चांगले काही होऊ शकते हे अपेक्षितच नाही हाही एक प्रकारचा वंशवाद आहे ( racism of low expectation) तो इथे दिसतो आहे. पोलिस हे काळ्या लोकांचे दुष्मन कारण काळ्या लोकांमधले गुन्हेगारीचे प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा कैक पट जास्त आहे. मग ह्याला उपाय ही आकडेवारी बदलणे हा नसून पोलिस हटवणे हा!
पोलिस दलावराचा पैसा कुठे खर्च
पोलिस दलावराचा पैसा कुठे खर्च करा म्हणताहेत ते वाचलं आणि लिहिलं असतं तर Sf मध्ये गुन्हेगारी का आणि कशी आहे आणि त्यावर पुलिसिंग हे उत्तर नाही हे समजलं असतं. गुन्हेगारांना गेली कित्येक वर्षे पोलिस पकडतच आहेत, अजून सक्त अंमलबजावणी करायला पुलिस दुप्पट केले तरी जोपर्यंत मूळ कारणाच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय निघत नाहीत तोवर बे एरियात गुन्हेगारी कमी होईल असं तुम्हाला ही वाटत नसेल याची मला खात्री आहे.
ती कारणं काय ते व्हॅली पेक्षा उत्तम प्रकारे कुठे अधोरेखित (magnify) होईल?
पोलिस हे काळ्या लोकांचे
पोलिस हे काळ्या लोकांचे दुष्मन कारण काळ्या लोकांमधले गुन्हेगारीचे प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा कैक पट जास्त आहे. मग ह्याला उपाय ही आकडेवारी बदलणे हा नसून पोलिस हटवणे हा ! >>>>>
१००० % सत्य दिसतंय .
काळया नी जॉर्ज च्या मृत्यू नंतर ज्या उदात्त विचारांनी प्रेरित होवून दुकाने लुटून त्यांनी जॉर्ज ला श्रद्धांजली वाहिली ते सर्वांनी पाहिले आहेच .
पोलिस हे काळ्या लोकांचे
पोलिस हे काळ्या लोकांचे दुष्मन कारण काळ्या लोकांमधले गुन्हेगारीचे प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा कैक पट जास्त आहे. >> याला काही संख्याशास्त्रीय आधार आहे का? कारण काही पानं मागे गेलात तर राज यांनी दिलेल्या लिंकनुसार आफ्रिकन अमेरिकन लोकांमधे गुन्हेगारीचे प्रमाण व्हाईट लोकांइतकेच आहे असे दिसते.
गेल्या pach दिवसात अमेरिकेत
गेल्या पाच दिवसात अमेरिकेत चाकूने भोसकून
( Multiple stabbing ) मारण्याच्या घटनेत किती गोऱ्यांचा बळी गेला आहे कोणाकडे माहिती ?
ट्विटर वर २५ चा आकडा रिट्विट होत आहे .
आय बी अंकित शर्मा चीच आठवण झाली !!!
Pages