वर्णद्वेष आणि पोलिसांकडून होणारी हिंसा

Submitted by maitreyee on 2 June, 2020 - 11:02

अमेरिकेत मिनिआपोलिस येथे काही दिवसांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. अटक करत असताना जॉर्ज प्रतिकार करत नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हते. त्याला ४ सशस्त्र पोलिसांनी घेरले होते. त्यापैकी एकाने त्याला जमिनीवर दाबून स्वतःचा गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला होता. आपण गुदमरतोय असे जॉर्ज जिवानिशी ओरडत होता हे येणार्‍या जाणार्‍या लोकांनी घेतलेल्या फोन व्हिडिओ मधे स्पष्ट दिसतेय, ऐकू येतेय.
या घटनेनंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये या घटनेविरोधात निदर्शने घडत आहेत. अनेक शांततापूर्ण निदर्शने होत असतानाच काही ठिकाणी निदर्शकांनीदेखिल हिंसा , जाळपोळ सुरु केल्याचेही दुर्दैवाने पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी परिस्थितीचा फायदा घेऊन लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
पोलिसांच्याकडून घडणार्‍या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्‍या हिंसेचीही ही पहिली घटना नाही.
https://mappingpoliceviolence.org/
https://policeviolencereport.org/
पण या आणि इतर अनेक साइट्स च्या डेटा नुसार व्हाइट किंवा इतर कोणत्याही वर्णापेक्षा कृष्णवर्णीयांसोबत होणार्‍या हिंसेचे प्रमाण खूप जास्त आहे. अर्थात नेहमी ( डोळे उघडे ठेवून) बातम्या बघत असाल तर अशा स्टॅटिस्टिक्सच्या आधाराची गरज ही नाही.

**या विषयावर चर्चा NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण इथे सुरु झाली हिती. तीच सुरु ठेवायला म्हणून हा धागा उघडतेय.

Group content visibility: 
Use group defaults

>>
पोलिस हे काळ्या लोकांचे दुष्मन कारण काळ्या लोकांमधले गुन्हेगारीचे प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा कैक पट जास्त आहे. >> याला काही संख्याशास्त्रीय आधार आहे का? कारण काही पानं मागे गेलात तर राज यांनी दिलेल्या लिंकनुसार आफ्रिकन अमेरिकन लोकांमधे गुन्हेगारीचे प्रमाण व्हाईट लोकांइतकेच आहे असे दिसते.
<<

हे पहा. एफबीआयने २०१७ सालची आकडेवारी दिलेली आहे.
https://ucr.fbi.gov/crime-in-the-u.s/2017/crime-in-the-u.s.-2017/tables/...

खून आणि चोरी दरोडे ह्या गुन्ह्याकरता अटक केल्या जाणार्यात काळ्यांचे प्रमाण प्रचंड आहे. एकंदरीत लोकसंख्येत काळ्यांचे प्रमाण पाहिले तर त्याच्या तुलनेत गुन्हेगारीतले प्रमाण जास्त आहे.

>>
पोलिस दलावराचा पैसा कुठे खर्च करा म्हणताहेत ते वाचलं आणि लिहिलं असतं तर Sf मध्ये गुन्हेगारी का आणि कशी आहे आणि त्यावर पुलिसिंग हे उत्तर नाही हे समजलं असतं.
<<
काहीच्या काही. गुन्हेगारांना कुठलाही धाक राहिलेला नाही. सॅन फ्रॅन्सिस्कोचे प्रशासन हे पापभीरू, सरळमार्गी नागरिकांपेक्षा समाजकंटकांची जास्त काळजी घेते. त्यामुळे गुन्हेगार जास्त शेफारत आहेत. ड्रगच्या आहारी गेलेल्या लोकांना "मदत" म्हणून खास सरकारी ड्ग्ज पुरवले जातात. दुकानातून माल चोरी केला आणि मालाच्यी किंमत ९५० डॉ पेक्षा कमी असेल तर शिक्षा नाही. त्यामुळे असले चोर कमी किंमतीच्या अनेक चोर्या करतात. सॅन फ्रान्सिस्को आणि आजूबाजूच्या अनेक शहरातील पॉप मॉम शॉप ह्या प्रकारामुळे हैराण झाली आहेत. त्यांना इतक्या किंमतीची चोरी होऊ देणे परवडत नाही. पण कुणालाही पर्वा नाही. आता पोलिस दलच हटवणार असतील तर मग काय विचारू नका.
लिसा बेंडर ह्या नावाच्या मिनियापोलिसच्या सिटी कौन्सिलच्या सदस्याने CNN वर मुलाखत दिली. मुलाखत घेणारीने विचारले की "समजा जर अशा पोलिस मुक्त शहरात माझ्या घरात मध्यरात्री कुणी घुसला तर आता मी काय करायचे?"
बेंडरबाईनी बाणेदारपणे सांगितले की "सुरक्षित वाटणे ही एक चैन आहे. ती फक्त काही मूठभर गोर्‍या लोकांच्याच ती नशिबी होती. पण आता यापुढे सगळ्यांनीच अशा असुरक्षिततेची सवय करायला हवी."
त्यामुळे असे वाटते आहे की एखाद्याच्या घरात कुणी दरोडेखोर वा लिंगपिसाट घुसला आणि त्याने ९११ नंबर फिरवला तर शहराचे प्रशासन समाजसेवक/सेविका पाठवेल आणि तो/ती आपल्याला वर्णभेद कसा वाईट ह्यावर व्याख्यान देईल. म्हणजे वर्णभेदही नष्ट होईल आणि पोलिसी अत्याचारही होणार नाहीत. Win win!

कुणीतरी रिसोर्सेस मागितले होते, त्यांच्या माहितीसाठी.....

From the American Psychological Association:
Discussing discrimination
https://www.apa.org/topics/keita-discussing-discrimination

From TED Talks:
A collection of TED Talks (and more) on the topic of Race
https://www.ted.com/topics/race
How to deconstruct racism, one headline at a time, Baratunde Thurston
https://www.ted.com/talks/baratunde_thurston_how_to_deconstruct_racism_o...
Why it's so hard to talk about the N-word, Elizabeth Stordeur Pryor
https://www.ted.com/talks/elizabeth_stordeur_pryor_why_it_s_so_hard_to_t...
The racial politics of time, Brittney Cooper
https://www.ted.com/talks/brittney_cooper_the_racial_politics_of_time

इतक्या मोठ्या प्रमाणात लुटालुट, मोडतोड, आग वगैरे झाली आणि बहुतेक माध्यमे, नागरिक टाळ्या पिटून ह्या "वंशवादाविरुद्ध केलेल्या आक्रोशाचे" कौतुक करत होते. हे कसे अहिंसक आहे असेही काही थोर विचारवंतांनी म्हटले आहे (निकोल हाना-जोन्स ह्या बाईंचे ह्या विषयावरील विचार खूपच मौलिक आहेत). एकंदरीत मुख्य प्रवाहाचे ह्याबाबतीतले धोरण ह्यांचे कौतुक करणे वा अगदीच तोंडदेखला विरोध करणे (लुटालूट टाळता आली असती तर बरे झाले असते ह्या प्रकारचे अत्यंत नाखुशीने केलेले विधान).

माझ्या मते ही लुटालूट कुठल्याही प्रकारे समर्थनीय नाही. वर्णद्वेषाविरुद्ध सुरु केलेले आंदोलन पहिला गैर प्रकार होताच स्थगित करायला हवे होते. पण अशी साधनशुचिता आंदोलकांना नकोच होती.

आता शिकागो आणि मिनियापोलिस भागातील अनेक दुकाने, अन्नधान्याची (ग्रोसरी), औषधाची (फार्मसी), पेट्रोल पंप ही बंद पडलेली आहेत. ती दीर्घकाळ उघडली जाणार नाहीत. कदाचित काही कधीच उघडली जाणार नाहीत. कारण वर्णद्वेषाविरुद्ध कितीही तिरस्कार असला तरी अशा प्रकारे दुकानांचा विध्वंस कुणालाही परवडत नाही. परिणाम काय? त्या मुख्यतः काळ्यांची वस्ती असलेल्या लोकांना दैनंदिन व्यवहारातील खरेदी करता १-२ मैलाऐवजी १५-२० मैल दूर जायला लागत आहे. गरीब, म्हातारे, लहान मुले ज्यांच्याकडे कार नाहीत त्यांना रडतखडत बस पकडून हे व्यवहार करावे लागत आहेत. कोरोनामुळे बसेस कमी केल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंग, संसर्गाचा धोका ह्या पीडा आहेतच. एकंदरीत ह्या आवेशपूर्ण, विध्वंसक वर्णद्वेषविरोधी आंदोलनाचा फटका कुणाला सर्वाधिक बसणार आहे तर सामान्य काळ्या लोकांना! शिवाय ह्या सर्व दुकानात नोकरीला असणारे काळे लोक , त्यांचा रोजगार बुडला. म्हणजे ते बेकार. ज्या भागात लुटालुट, जाळपोळ होते आहे तिथल्या घरांच्या किंमती झपाट्याने घसरत आहेत कारण असल्या जागेत कुणाला घर घ्यायची इच्छा होईल? त्यामुळे इथे ज्यांची घरे आहेत त्यांची गुंतवणूक मातीमोल!

कदाचित वर्णद्वेषाविरुद्ध लढाई करताना "थोडेफार" नुकसान त्रास तर होणारच असा युक्तिवाद काही विद्वान लोक करतील. पण मला तरी तो पटत नाही.
जाळपोळ, लुटालुट हे आवश्यक कार्यक्रम नाहीत. काही मूठभर गुंड लोक आपली तुंबडी भरून घ्यायला ते करतात. लुटारू लोक १ आठवडा, १ महिना फारतर ६ महिने ह्या लुटीच्या मालावर चैन करतील. पण त्याचे दूरगामी परिणाम अत्यंत वाईट आहेत. आंदोलन म्हटले की हे अनिष्ट कार्यक्रम होणारच असला पायंडा पडू नये.

आंदोलन म्हटले की हे अनिष्ट कार्यक्रम होणारच असला पायंडा पडू नये
>>>>
सहमत.

(कुठलेही)आंदोलन हिंसक होण्यामागे काय करणे असावीत?

१. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी (राजकीय नेत्यांनी) आंदोलन हिंसक करणे.(मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधी)

२. तरुणांची माथी भडकल्यामुळे ( किंवा भडकवल्यामुळे)
आंदोलन हिंसक होणे.

३.सरकारी किंवा प्रशासकीय अकार्यक्षमतेमुळे काही लोकांची अशी धारणा होते की आपण आंदोलन जर शांततेत केले तर आपली दखलच घेतली जात नाही,पण हिंसक केले तर दाखल घेतली जाते.

अशी असंख्य कारणे असतील,पण जेव्हा शांततेत सुरू असलेले आंदोलन जेव्हा हिंसक होते तेव्हा मनाला खूप यातना होतात.
याचे दुःख जे शांततेत आंदोलन करत असतात त्यांना अधिक होते.
पण दुर्दैवाने त्यांना तितकेच दोषी मानले जाते.

तुम्ही हे थांबवत का नाही? तुमच्यामुळेच हे सुरू झाले. अशा असंख्य प्रश्नांना त्यांना सामोरे जावे लागते.

आणि मग ,
हिंसक आंदोलन हा काळा डाग इतका मोठा होतो की मूळ प्रश्न दिसेनासा होतो.

सध्या प्रॉब्लेम असा आहे की ही आंदोलने स्कॅटर्ड स्वरुपात आहेत. ठिकठिकाणी ज्यांना जसे उमगतेय तसे ते प्रोटेस्ट करतायत. यातलेच कोणी फक्त संधीचा फायदा घेऊन लुटालूट करण्यात मग्न आहेत. मूळ कॉज ला त्यांच्यामुळे उलट इजा पोहोचतेय याची त्यांना फिकिर ही नसणार. एक मोठे कारण म्हणजे या आंदोलनांना कोणीही समर्थ नेतृत्व नाहीये की जो/जी योग्य दिशा दाखवेल, ज्याच्या /जिच्या शब्दाखातर लोक एकत्रित येतील्/हिंसा थांबवतील वगैरे.
या घटनांना उत्तर म्हणून पोलिस डी-फंडिंग ची मागणी हे मात्र मला झेपले नाहीये. रीफॉर्म्स ,चोक होल्ड बॅन, शारिरीक बळाचा वापर करण्याबद्दाल नियम हे ठीक वाटते.

Destruction unleashed by some in response to the horrible killing is unacceptable and those responsible for looting should be held fully accountable.

However, the collective mistreatment experienced by them for generations is the issue that needs addressing.

This is their way of expressing their discomfort.
And yes, this way of responding doesn't help a bit. Other ways too, probably don't help much.

Sum total unwillingness or failure of society to implement systemic meaningful change also feeds into it.

And as a result of their misbehavior, the same people who are either unwilling to make changes or indifferent to their plight justify the very mistreatment given to them in the first place, which they are protesting against.

And they will then continue to do the same things "others" dislike.

It's a vicious circle. And nothing good comes out of it.

एनी डॅम प्रोटेस्ट कॅन गो हेवायर. होप आय डोंट हॅव टु इलॅबरेट...

पण ह्या प्रोटेस्ट मागचं "कॉज" काय आहे? निव्वळ जॉर्ज फ्लॉय्डचं ब्लॅक असणं? उत्तर "हो" असेल तर वी ऑल स्टिल गॉट ए लॉट ऑफ ग्रोइंग अप लेफ्ट टु डु...

सध्या सिस्टेमिक रेसिज्म असा एक शब्द चलनी नाण्यासारखा वापरला जात आहे. (buzzword). पण म्हणजे नक्की काय? तर विविध क्षेत्रात दिसणारे रेसिज्म. जसे शिक्षण, पोलिस कारवाई, आरोग्य. पण याचबरोबर हेही पहायला पाहिजे की अमेरिकेत ८ वर्षे एका काळ्या राष्ट्रपतीने राज्य केले. त्याला मत देणारे बहुसंख्य गोरे होते. संरक्षण मंत्री पदावर काळे लोक होते. विविध उच्च सरकारी पदावर काळे लोक होते. सिनेटर, काँग्रेसमन हेही काळे होते. अनेक क्रीडापटू काळे आहेत. त्यांची लोकप्रियता जगातील कुणाही क्रीडापटूला हेवा वाटेल इतकी प्रचंड आहे. मायकेल जॉर्डन, शकील ओनिल, कोबी, टायगर वुड्स ही काही उदाहरणे. मनोरंजन क्षेत्रात ओप्रा, मॉर्गन फ्रीमन, मायकेल जॅक्सन, ख्रिस रॉक, एडी मर्फी, हॅली बेरी, व्हूपी गोल्डबर्ग, डेन्जेल वॉ., विल स्मिथ, सॅम्युअल जॅक्सन अशी कितीतरी उदाहरणे आहेत. जर अमेरिका इतकी सरसकट वर्णद्वेष्टी असती तर इतके सगळे लोक यशस्वीरित्या आपापल्या क्षेत्रात इतकी उच्चदर्जाची कामगिरी करू शकले असते का?

दुसर्‍या बाजूला काळ्या लोकांमधे शिक्षणाचा अभाव, सिंगल पेरंट फॅमिलीचे अतिरिक्त प्रमाण (https://www.afro.com/census-bureau-higher-percentage-black-children-live...), गुन्हेगारी ह्याचे काय? सगळे रेसिज्मच्या नावाखाली खपवणार का? मला पटत नाही.

जॉर्ज फ्लॉयडच्या खुनाबद्दल लोकांमध्ये आक्रोश उत्पन्न झाला , होतो आहे तेव्हा ज्यांनी कृती करणे अपेक्षित आहे त्या पॉवर्सची प्रतिक्रिया काय होती? प्रकरणाची चौकशी करू, अ‍ॅक्शन घेऊ. झालं ते चूक आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी पावले उचलणे, व्यवस्थेत बदल करणे असं नि:संदिग्ध आश्वासन दिलं का?

की या प्रकाराला दुसरीही बाजू आहे, असं म्हटलं? शांततेने चाललेल्या आंदोलनावरही पोलिसांनी बळाचा वापर केला? (तसे व्हिडियोज आहेत. एका आंदोलकाचा मास्क काढून त्याच्या तोंडावर पेपर स्प्रे मारला. घोषणा देणार्‍याला उचलून नेलं. घराच्या आवारात उभे असणार्‍यांवर पोलिसांनी हल्ले केले इ.इ.) वर्णद्वेष विरोधी आंदोलनाचं निमित्त साधून व्हाइट सुप्रिमसिस्ट जमाव रस्त्यावर उतरले का? (याचेही व्हिडियो आहेत, बातम्या आहेत).

आंदोलनाचे + पोलिसी दमनशाहीचे वार्तांकन ,चित्रण करणार्‍या पत्रकारांवरही हल्ले केले

होणार्‍या सगळ्या हिंसेची जबाबदारी वर्णद्वेष विरोधकांवर किंवा फ्लॉयड हत्येने अस्वस्थ झालेल्या लोकांवर टाकून त्यांचे मार्ग चुकीचे म्हणजेच त्यांचं उद्दिष्टही चुकीची असा प्रचार सुरू केला गेला. हे सगळं पद्धतशीरपणे केलं गेलं, असं मानायला भरपूर वाव आहे.

https://www.theguardian.com/us-news/2020/jun/06/police-violence-protests...

( भारतात अगदी हेच दोन तीन महिने आधी सुरू होतं.- अजूनही आहे )

आंदोलन चिरडण्यासाठी / चिघळवण्यासाठी आणखी अत्याचार केले गेले या सत्याकडे दुर्लक्ष करणार्‍यांसाठी
The International Crisis Group, which monitors unrest around the world, said the police had used “excessive force”. The UN high commissioner for human rights, Michelle Bachelet, said: “All police officers who resort to excessive use of force should be charged and convicted for the crimes committed.”
One officer is seen using a baton to hit a man on the head, before he and another officer pin him to the ground.
police shot paint canisters at a woman who was standing on the porch of her own home. Footage showed an officer shouting, “Light ’em up” before police opened fire. Minneapolis police have also used teargas, flash-bangs and rubber bullets on a peaceful protests in the city.
a black woman who was kneeling with her hands in the air was shoved to the ground by police
a police car drove into a protester in Los Angeles, briefly trapping them underneath the engine,
CJ Montano, a military veteran, who said he had his hands up when he was shot in the head, hip, legs, stomach and ribs.
They found that that 15% of those shot with the bullets, or with beanbag rounds and other “less lethal” bullets, had suffered permanent injury.
journalists have been met with the same aggressive policing as demonstrators, and according to the Nieman Journalism Lab, police attacked journalists “at least 140 times”

जसे शिक्षण, पोलिस कारवाई, आरोग्य. पण याचबरोबर हेही पहायला पाहिजे की अमेरिकेत ८ वर्षे एका काळ्या राष्ट्रपतीने राज्य केले. त्याला मत देणारे बहुसंख्य गोरे होते. संरक्षण मंत्री पदावर काळे लोक होते. विविध उच्च सरकारी पदावर काळे लोक होते. सिनेटर, काँग्रेसमन हेही काळे होते. अनेक क्रीडापटू काळे आहेत. त्यांची लोकप्रियता जगातील कुणाही क्रीडापटूला हेवा वाटेल इतकी प्रचंड आहे. मायकेल जॉर्डन, शकील ओनिल, कोबी, टायगर वुड्स ही काही उदाहरणे. >>>>>>>>>>>
अगदी खरं आहे !!
या मंडळीनी यशाच्या शिखरावर पोहोचताना वर्ण द्वेषाचा त्रास झाला असे कधी बोलल्याचे ऐकवत हि नाही .
पण भारतातील बऱ्याच लोकांना नट राजकारणी लोकांना पैसा प्रसिध्दी , जनतेचे प्रेम आदर मिळून देखील देशात असुरक्षित वाटत , आणि त्याच ते भांडवल करून धार्मिक द्वेष वाढवितात . यात देशाचा उप राष्ट्रपती देखील सामील आहे याचे वाईट वाटते .

अमेरिकेत काही काळया नी दुकाने मध्ये लुटालुट तर केलीच पण गोऱ्या लोकांची घरे अगदी ठरवून लक्ष केली . त्याच प्रमाणे पोलिसांना गोळ्या घालून ठार केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
भर चौकात मशीन गन घेवून थांबलेल्या काळया तरुणांचे व्हिडिओ सुध्दा पाहण्यात आले .
अशा लोकांची बौद्धिक घ्यावीत असे जर कोणाला वाटत असेल तर ते झोपेतच आहेत असे म्हणावे लागेल.
त्या चार पोलिसांना फासावर लटकावे पर्यंत शांततेत आंदोलने केली असती तर त्या आंदोलन चे पूर्ण जगात कौतुक ही झाले असते .

याचाच गैरफायदा घेऊन काही विशिष्ट लोक गुन्हेगारी क्षेत्रात आपली कारकीर्द घडवतात.

{{{ आता शिकागो आणि मिनियापोलिस भागातील अनेक दुकाने, अन्नधान्याची (ग्रोसरी), औषधाची (फार्मसी), पेट्रोल पंप ही बंद पडलेली आहेत. ती दीर्घकाळ उघडली जाणार नाहीत. कदाचित काही कधीच उघडली जाणार नाहीत. }}}

आपल्याकडेही ठराविक रंगाचे झेंडे असलेल्या वस्त्यांजवळ पापभीरु सज्जन माणसे व्यवसाय करत नाहीत. तिथे अरेला नुसते कारे नाही तर हात पाय तोडण्याची धमक असलेले आणि प्रत्यक्षात तशा कृत्यांचं रेकॉर्ड असलेलेच तिथे रेशनिंग वगैरेंची दुकाने उघडतात आणि काळा बाजारही करतात. शेवटी तोटा कोणाचा होतो?

तुम्ही कितीही रडा, अमेरिकेत पोलीसच शांत आंदोलकांवर अधिकाधिक जुलूम करताहेत हा संदेश सगळीकडे व्यवस्थित पोचतोय.

रडत तर तुम्ही आहात. ज्या ज्यूंनी सर्वाधिक वंशद्वेष सहन केला त्यांचे राष्ट्र गेल्या पन्नासहून अधिक वर्षे सर्वशक्तिमान ही ओळख मिरवत आहे. आमच्यावर अन्याय झाला / होतोय अशी रडारड ते करत नाहीत. अफ्रिकेतले बहुसंख्य देश मात्र आर्थिक / सामाजिक पातळीवर मागास, भ्रष्टाचारात अग्रेसर, बलात्कार व इतर गुन्हेगारीत वरच्या क्रमांकावर अशा वर्णनाने ओळखले जात आहेत.

एका व्यक्तिने एका व्यक्तिचा खून केला या सिंग्युलर घटनेला एका वर्णाच्या व्यक्तिने एका वर्णाच्या व्यक्तिचा खून केला असा प्ल्युरल रंग देणारेच (आणि त्याच्या निषेधाच्या नावाखाली मल्टिपल क्राईम्स करुन त्याचे समर्थन करणारे) खरे वर्णद्वेष्टे आहेत.

तुम्ही कितीही रडा, अमेरिकेत पोलीसच शांत आंदोलकांवर अधिकाधिक जुलूम करताहेत हा संदेश सगळीकडे व्यवस्थित पोचतोय
त्याची प्रतिक्रिया जगात योग्य प्रकारे उमटेल.
आर्थिक क्षेत्रात ब्लॅक लोकांना कधीच घुसून दिले जाणार नाही.
गरीब आहेत तर गरीबच ठेवले जाईल.

जसे शिक्षण, पोलिस कारवाई, आरोग्य. पण याचबरोबर हेही पहायला पाहिजे की अमेरिकेत ८ वर्षे एका काळ्या राष्ट्रपतीने राज्य केले. त्याला मत देणारे बहुसंख्य गोरे होते. संरक्षण मंत्री पदावर काळे लोक होते. विविध उच्च सरकारी पदावर काळे लोक होते. सिनेटर, काँग्रेसमन हेही काळे होते. अनेक क्रीडापटू काळे आहेत. त्यांची लोकप्रियता जगातील कुणाही क्रीडापटूला हेवा वाटेल इतकी प्रचंड आहे. मायकेल जॉर्डन, शकील ओनिल, कोबी, टायगर वुड्स ही काही उदाहरणे. >>>>>>>>>>>
तिथे पोहोचण्यासाठीही या मंडळींना भरपूर संघर्ष करावा लागला. मुळात सेग्रीगेशन थांबवेले गेले तेच मुळी टप्प्याटप्प्याने.
१९४८ मधे प्रेसिंडेंट ट्रुमन यांनी मिलीटरीतले सेग्रेगेशन थांबवण्यासाठी कायदा पास केला. त्यानंतर पब्लिक स्कूलमधले सेग्रेगेशन थांबवण्यासाठी १९५४ हे साल उजाडावे लागले, यासाठी ब्राऊन वि. बोर्ड ऑफ एज्युकेशन असा सुप्रिम कोर्टात लढा दिला गेला. इतर ठिकाणी सेग्रेगेशन कायम होतेच. उदा. बसमधे पाठीमागे वेगळी जागा, रेस्टॉरंट्समधे प्रवेश नसणे, वेगळ्या रेस्टरुम्स वगैरे बरेच काही होतेच. कोलिन पॉवेल यांचीच आठवण आहे. प्रवास करताना त्यांच्या गर्भवती पत्नीला रेस्टरुम्स मिळू शकली नाही कारण मार्गात असलेल्या रेस्टरुम्स या फक्त कॉकेशियन लोकांसाठी होत्या. संपूर्णपणे सिग्रेगेशन थांबवण्यासाठी लढाच द्यावा लागला. लढ्याची टाईम लाईन.
रेसिझम हा लोकांच्या मनात असतो आणि तो व्यवहार करताना वर्तनात येतो. भारताची पंतप्रधान एक स्त्री होती, भारताची एक राष्ट्रपती देखील एक स्त्री होती, भारताचे काही राष्ट्र्पती हे मुस्लिम होते, घटनाशिल्पकार हे दलित समाजातील होते हे याचा अर्थ इतरांना लिंग भेद, धर्म-जात भेद सोसावा लागत नाही असे होत नाही. अमेरीकेत तर केवळ तुमच्या त्वचेचा रंग तुम्हाला वेगळी वागणूक मिळवून देतो. खेळाडू काय किंवा उच्च पदस्थ काय सगळ्यांनाच या वर्णभेदाचा सामना करत वाटचाल करावी लागते. गाडी थांववल्यावर पॅसेंजर कोण आहे हे बघितल्यावर माफी मागणे वर सहीही मागणे असेही होते. प्रत्येक बातमी सोशल मेडीयावर , स्मार्ट फोनने विडीओ पुरावे हे सगळे होण्याआधी बर्‍याच घटना स्थानिक पातळीवर सिमित रहात. मनात रेझिझम असेल तर तो वावरात येतो. सिस्टिम म्हणजे कुणी निर्जिव वस्तू नाही. सामन्य माणसे या सिस्टिममधे असतात, पूर्वग्रहाने वावरतात आणि त्यातून सिस्टेमिक रेसिझम होतो.
https://www.cnn.com/2020/06/08/opinions/black-police-fbi-racism-mcgregor...
https://www.cnn.com/videos/us/2020/06/09/charles-brown-first-black-milit...
बर्‍याच ठिकाणी एक कोड ऑफ सायलेंस पाळला जातो. आपला माणूस असे म्हणत अन्याय्य वर्तन करणार्‍या व्यक्तीला पाठिशी घातले जाते , जे विरोध करतात त्यांना बाजूला सारले जाते. बरेचदा युनियनच्या दबावामुळे वाईट वर्तन असलेल्या व्यक्तीला कामावरुन कमी केले जात नाही. बर्‍याच केसेसमधे सिटी आर्थिक भरपाई देते, टॅक्स पेअर्सवर ओझे पडते मात्र मूळ प्रश्न तसाच रहातो.

शाळेमधे केवळ मुलाच्या वर्णाकडे बघून शिक्षेचे स्वरुप बदलणार असेल तर तो रेसिझम असतो. इतर मुलांनी केले तर सोडून दिले जाते मात्र तू केलेस तर नाही असे शिकत ही मुले मोठी होतात. काय करायचे नाही याची एक यादीच असते. अगदी कपडे , केस सगळ्या बाबतीत काळजी घ्यावी लागते.
इनोसंट अंटिल प्रोवन गिल्टी या ऐवजी सतत मी इनोसंट आहे, कायदे पाळतो, चोरी करायला आलो नाहीये, ड्रग विकत नाहिये हे प्रुव करत रहावे लागते कारण तुमचा वर्ण! साध्या कपड्यात शेजारच्या गावातल्या दुकानात गेल्यास पोलिस, फायरफायटर असलेल्या व्यक्तीकडीही संशयाने बघितले जाते कारण तुमचा वर्ण. याला सिस्टेमिक रेसिझमच म्हणणार ना!
आम्ही रेशियल प्रोफाईलिंग थांबवणार आहोत असे जेव्हा एखाद्या यंत्रणेला म्हणावे लागते तेव्हा ते आधी रेशियल प्रोफाईलिंग करत होते आणि ते अन्याय्यच होते.
मी ज्या गावात रहाते त्या गावात मोजकेच लोकं कलर्ड आहेत आणि ते उच्च शिक्षित, उच्च मध्यमवर्गिय आहेत. समाजकंटक म्हणून पकडले जाणारे लोकं हे कॉकेशियन असतात. अ‍ॅट रिस्क मुलं देखिल कॉकेशियन असतात. म्हणून सर्वच कॉकेशियनकडे संशयाने बघितले जाते का? तर नाही मग तोच न्याय कलर्ड लोकांना का नाही?
पोलिसांना काम करताना कशा प्रकारच्या धोक्याला सामोरे जावे लागते याची मला पूर्ण कल्पना आहे. आमच्या काही फ्रेंड्सचे हे कार्यक्षेत्र आहे. जेव्हा ओफिसर डाऊन अशी बातमी येते तेव्हा 'आपले कुणी' या भितीने हातपाय गळतात. मात्र अमेरिकेत सिस्टेमिक रेसिझम आहे हेही सत्य आहे.

स्वाती2, प्रतिसाद अतिशय आवडला. माझ्याही डोळ्यांसमोर इंदिरा गांधी, प्रतिभाताई , फकरुद्दीन आली अहमद. झाकीर हुसेन. डॉ आंबेडकर यांचीच उदाहरणे आली होती.
मूठभर लोक सहा इंच उंच होण्यापेक्षा हजारो लोक दोन इंच उंच झाले तर समाजाची उंचीची सरासरी अधिक वाढेल.

मलाही आवडला स्वाती२ यांचा प्रतिसाद.

हीरा - सर्वांना समान संधी असेल तरी काहीच लोक फक्त खूप प्रगती करणार, काही मागेच राहणार आणि इतर असंख्य "मध्यम" असणार. फक्त ते जात, धर्म, लिंग, त्वचेचा रंग वगैरेंवरून ठरू नये इतकेच. मी ज्या एरियात वाढलो तेथे सर्वजातीय रिकामटेकडे व सदा कोपर्‍यावर उभे असणारे लोक होते. एन्टायटल्ड फीलिंग, कुवतीच्या मानाने हजारपट- आपण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही छाप- इगो, काबाडकष्ट करणार्‍या आईबापांच्या जीवावर बाइक्स उडवणे (व त्यातून पोरी पटतात असा समज असणे Happy ), किंवा कधीतरी आपलं तकदीर खुलणार आहे अशा समजात काहीच न करणारे असे असंख्य लोक होते. उनका कुछ नही हो सकता.

खरे आहे. पण मला म्हणायचे होते की काही लोकांनी प्रगतीचे शिखर गाठले म्हणजे 'त्यांचा' सगळा समाज प्रगत झाला असे नाही. काही खेळाडू, एखादा राष्ट्राध्यक्ष, काही स्त्रिया प्रगत झाल्या म्हणजे त्या त्या समाजाचे अथवा सर्व स्त्रियांचे लिबरेशन झाले असे नाही.
बाकी, विषमता ही राहणारच. पण ती जातीधर्मवंशरंग यावर आधारित असू नये इतकेच.

पण मला म्हणायचे होते की काही लोकांनी प्रगतीचे शिखर गाठले म्हणजे 'त्यांचा' सगळा समाज प्रगत झाला असे नाही. >>> नक्कीच. पूर्ण सहमत आहे.

सिस्टीमिक रेसिझम आहे म्हणजे काय सरसकट वर्णद्वेष्टे आहेत असा टोटल स्ट्रॉमॅन शेंडे यांनी उभा केला आहे Happy

माकडाच्या हातात कोलीत
ह्या म्हणीचा अर्थ काय.
आर्थिक प्रगती मध्ये माकडाच्या हातात कोलीत नको

Pages