अमेरिकेत मिनिआपोलिस येथे काही दिवसांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. अटक करत असताना जॉर्ज प्रतिकार करत नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हते. त्याला ४ सशस्त्र पोलिसांनी घेरले होते. त्यापैकी एकाने त्याला जमिनीवर दाबून स्वतःचा गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला होता. आपण गुदमरतोय असे जॉर्ज जिवानिशी ओरडत होता हे येणार्या जाणार्या लोकांनी घेतलेल्या फोन व्हिडिओ मधे स्पष्ट दिसतेय, ऐकू येतेय.
या घटनेनंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये या घटनेविरोधात निदर्शने घडत आहेत. अनेक शांततापूर्ण निदर्शने होत असतानाच काही ठिकाणी निदर्शकांनीदेखिल हिंसा , जाळपोळ सुरु केल्याचेही दुर्दैवाने पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी परिस्थितीचा फायदा घेऊन लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
पोलिसांच्याकडून घडणार्या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्या हिंसेचीही ही पहिली घटना नाही.
https://mappingpoliceviolence.org/
https://policeviolencereport.org/
पण या आणि इतर अनेक साइट्स च्या डेटा नुसार व्हाइट किंवा इतर कोणत्याही वर्णापेक्षा कृष्णवर्णीयांसोबत होणार्या हिंसेचे प्रमाण खूप जास्त आहे. अर्थात नेहमी ( डोळे उघडे ठेवून) बातम्या बघत असाल तर अशा स्टॅटिस्टिक्सच्या आधाराची गरज ही नाही.
**या विषयावर चर्चा NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण इथे सुरु झाली हिती. तीच सुरु ठेवायला म्हणून हा धागा उघडतेय.
>>$१४ ट्रिल्यन, विथ ए बिग टि.
>>$१४ ट्रिल्यन, विथ ए बिग टि. >> १००० ट्रिल्यन असली तरी अन एथिकल, ईमोरल मागणी म्हणत नाही आहात ह्यातच सगळे आले रे.<<
धन्यवाद. फोक्स ऑन दि अदर साइड ऑफ दि आय्ल मे अपियर टु बी हार्ड-हार्टेड, बट दे आर नॉट हार्टलेस...
>>
>>
>>> ते रेसिझम होते की नाही ते लीगल बाजूने सिद्ध व्हायचे तेव्हा होईल. पण एकूण पॅटर्न तोच आहे आणि शाळेत मुलांना समजवाण्याकरता तसे सांगणे यात काहीच चूक नाही. बाकी लुटालूट वगैरे ऑलरेडी गृहीत आहे की चुकीचे आहे. ते शाळेत कशाला सांगायला हवे. पण शाळेत रेसिझम बद्दल सांगणे आवश्यक आहे - एकतर शाळा/डिस्ट्रिक्ट हे चालू देणार नाही हे सांगण्याकरता व दुसरे म्हणजे सिस्टीमिक रेसिझम संपवायचा असेल तर मुले मोठी होतानाच याची कल्पना देणे आवश्यक आहे. जेव्हा आजूबाजूला असे प्रसंग घडतात त्याचा संदर्भ देउन असे समजावणे बरोबरच आहे.
मुळात इथे बहुतांश लोकांनी लुटालूट वगैरेंचे समर्थन केलेच नसताना पुन्हा पुन्हा तेच विषय काढायचे कारण काय.
<<
रेसिज्म चूक हे तिन्ही त्रिकाळ कानीकपाळी ओरडून सांगितले जातच असते. त्यामुळे तेच तेच तेच पुन्हा पुन्हा पुन्हा सांगून काय होणार? एक तर शाळेत गोरे आणि काळे हे नगण्य संख्येने आहेत. उलट जाळपोळ, विध्वंस हा २ मैलावरील मॉलमधे चालू आहे. कर्फ्यू हा सगळ्या काउंटीला लागू आहे. आता हजारो मैल दूर कुणीतरी कदाचित वंशद्वेषाने काहीतरी केले ते जास्त महत्त्वाचे का २ मैलावर हिंसक जाळपोळ लुटालुट चालली आहे ते महत्त्वाचे? गावात रहाणार्या विद्यार्थ्याला कुठली गोष्ट जवळून पहायची वेळ येऊ शकते? मग त्या हिंसक प्रतिक्रियेचा उल्लेखही न करण्याचे काय कारण? शांतता पाळा असे आवाहन केले असते तर काय काळे विद्यार्थी दुखावले असते का? पण नाही. ते अजेंड्याच्या विरुद्ध आहे.
>>
>>
महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर लगेच कार्यवाही होवून मोहम्मद नूरला शिक्षा झाली. मिनेसोटात पोलिस अधिकार्याला ड्युटीवर असताना हातून घडलेल्या गुन्ह्यामुळे थर्ड डिग्री मर्डरच्या चार्जखाली झालेली ही पहिली शिक्षा.
याच्या तुलनेत कितीतरी राज्यात अधिक सबळ पुरावे असताना सुटलेले गोरे अधिकारी अधिक दिसतील.
<<
हे निट्पिकिंग आहे. वंशद्वेष हा फक्त अमेरिकेत जन्मलेले लोक आणि तेही गोरेच करतात हा निष्कर्ष कसा काढला? सोमाली माणसाने गोरी बाई आहे म्हणून द्वेषाने मारले असू शकते. आणि लगेच शिक्षा झाली म्हणजे काय? दोन दिवसात? दोन वर्षे लागली निकाल यायला. इथे दंगली कधी सुरु झाल्या? दुसर्या दिवशी. न्यायालय काय निर्णय देते, पुरावे काय सांगतात, कोरोनर रिपोर्ट काय सांगतात ते न बघता पिसाट लोकांनी जाळपोळी, लुटालुट, खून आणि विध्वंस सुरुही केला. मिनेसोटा सरकार आपल्या परीने चढत्या श्रेणीने गुन्ह्यांची कलमे लावते आहे. परंतू आगलाव्या लोकांनी आधीच ठरवले आहे की न्यायालय हे उत्तर नाही. विध्वंस हेच उत्तर. आणि डेमॉक्रॅट आणि प्रस्थापित माध्यमे ह्या सगळ्यांना समर्थन देत आहेत.
>>
>>
"पोलिसांच्याकडून घडणार्या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्या हिंसेचीही ही पहिली घटना नाही" असं चर्चाप्रस्तावात स्पष्ट लिहिलेलं असताना गोर्या माणसाला पोलिसांनी मारल्याची बातमी 'गंमत म्हणून' द्यावीशी वाटण्याचं जे कारण आहे तेच.
<<
पोलिस फक्त काळ्या लोकांना आकसाने मारतात आणि त्यामागे वर्णद्वेष असतोच असतो असा एक ठाम विचारप्रवाह ह्या चर्चेत एका बाजूने मांडला जातो आहे. त्यामुळे गोर्या लोकांची झालेली हत्या ही दोन घटका करमणूक, गंमत म्हणून उदाहरण दिले. कारण त्यांच्या मृत्यूला कःपदार्थ लेखले जाते. रिव्हर्स रेसिज्म मुळे गोर्या लोकांचे मरण कसे स्वस्त झाले आहे त्याचे एक उदाहरण. (अर्थात दोष त्यांचाच आहे!)
>>
>>
एकंदरीत अत्यंत अव्यवहार्य मागणी. >> अव्यवहार्य म्हटले होय, चूक, अन एथिकल, ईमोरल वगैरे नाही म्हटले. interesting.
<<
अव्यवहार्य का? कारण ज्यांनी गुलाम बाळगले त्यांना शिक्षा झाली पाहिजे. जे गुलाम होते त्यांच्या वंशजांना मोबदला दिला पाहिजे. पण हे सगळे ठरवणे इतके सोपे आहे का? एखादा गुलाम बाळगणारा निपुत्रिक मेला तर काय? एखादा गुलाम निपुत्रिक मेला तर काय? एखाद्या गुलाम पूर्वज असणार्याने गुलाम बाळगणार्याच्या वंशजाशी लग्न केले तर मग काय करायचे? अर्धा अफ्रिकन आणि अर्धा अमेरिकन (उदा. ओबामा) ह्यांना मोबदला द्यायचा का दंड लावायचा? नंतर उशीरा युरोपातून अमेरिकेत आलेले लोक दंड देणार का? किती?
भारतीय, चिनी लोकांचे काय? स्थानिक मूलनिवासी अमेरिकन लोकांना का नको? त्यांचाही मोबदला वा दंड कसा ठरवायचा? इ. इ. अनंत समस्या आहेत. त्यामुळे तत्त्वतः कितीही योग्य असले तरी न्याय्य अंमलबजावणी अशक्य आहे.
"Wow. Cops killed a black man
"Wow. Cops killed a black man. Look at this video, he was begging for his life and they were laughing."
""That's terrible. But fortunately, they can be prosecuted for murder.
"Oh, my. You're new to America, aren't you? The prosecutor will decline to indict."
"What? Why?"
Prosecutorial discretion."
"Uh…ok, that's…not great. They can be fired, at least."
"The police union will fight for their right to stay on the job; 50-50 they get reinstated with back pay."
The courts will determine that because there was no clearly established constitutional right to not be strangled to death by a knee in Minneapolis in late May, the cops get qualified immunity and your case is thrown out."
"You're just making this up."
“Google 'qualified immunity'."
"What the fuck? I'm going to protest."
"Will you do it properly?"
"Ugh, 'properly'. Yes. Me and my friends will organize regular peaceful protests in multiple cities."
"Nobody will care, it won't make the news."
We'll get athletes to join in; they're visible."
"You will offend people's divine right to watch sports without thinking about uncomfortable issues like people getting murdered."
"That sounds like something I don't care about."
"That's the spirit. Of course, your poster-child athlete will be blackballed from the sport and the others won't dare continue."
"Mother—"
"Another man just got killed by cops. No arrests, no firings."
"I'm going to vote every clown that enables this out."
"By an incredibly unfortunate coincidence, every voter registration center in your vicinity is permanently closed. The closest one is an hour drive away."
"I can't really afford to take time off work, but this is life and death. I'll go"
"I hope you can afford the fee."
Now I *know* that's illegal! It's a poll tax!"
"You should try suing."
"I'm about to break some things!"
This immediate resort to violence is proof that you are not really dedicated to resolving the issue, but instead are simply using it as an excuse to indulge in your criminal instincts. Fortunately, we have cops to handle that sort of behavior."
I’m going to frustrate every avenue of justice available until you lose your temper and break the law and then I can characterise you as another typical criminal.
आता हजारो मैल दूर कुणीतरी
आता हजारो मैल दूर कुणीतरी कदाचित वंशद्वेषाने काहीतरी केले ते जास्त महत्त्वाचे का २ मैलावर हिंसक जाळपोळ लुटालुट चालली आहे ते महत्त्वाचे? >> मुलांना दंगलीबद्दल सांगू नका असे कोण म्हणत आहे! पण ते पालकांचे काम आहे. रेसिझम बद्दल शाळेत सांगायची गरज का आहे ते वरच्या पोस्ट मधे मी लिहीले आहे.
आणि "हजारो मैल दूर कोणीतरी कदाचित" मधे जे तुम्हाला ट्रिव्हियलायझेशन करायचे आहे ते उघड आहे. हा बाफ रेसिझम च्या चर्चेबद्दल उघडला आहे. अमेरिकाभर रेसिझम अजूनही आहे हे उघड आहे (इव्हन बे एरियामधेही आहे). चार दोन लोकांना ते मान्य असल्या नसल्याने काही फरक पडत नाही. हा बाफ त्याच चर्चेबद्दल उघडला आहे. तेथे येउन तुम्ही दंगलीबद्दल तेच तेच पुन्हा सांगताय, जिचे मुळातच कोणी समर्थन केलेले नाही. (किमान बहुतांशानी. नाहीतर एखादी कोपच्यातली लाइन काढाल इथे प्रातिनिधिक म्हणून!)
भारतीय म्हणून आपल्याला काय
भारतीय म्हणून आपल्याला काय फरक पडतो? गोऱ्याने काळ्याला मारले का पिवळ्याला? कुठे कोणी ब्राऊन रेसिझम आणि त्यातही भारतीय स्पेसिफिक असेल, जसं की मुसलमान समजून शीख लोकांच्या हत्या किंवा त्रास देणे तर ठीक आहे.
काही वर्षे पूर्वी एका भारतीय वकीलातीमधील अधिकारी बाईला उगीच अटक केली, खटला भरला तेव्हा मला काही इथे असं जाणवलं नव्हते की भारतीयांविरुद्ध रेसिझम चा प्रकार आहे असा उद्वेग!
इथला वाद बघून तिथे भारतीय ब्राऊन अगदी सुखनैव जगत आहेत, गोऱ्या अमेरिकन्स च्या खांद्याला खांदा लावून आहेत असे चित्र दिसते. तसं खरेच असेल तर मला प्रचंड आनंद आहे.पण मग भारतीय अधिकारी विरुद्ध रेसिझम केला तेव्हा अशी जाळपोळ, निदर्शने, आंतरराष्ट्रीय पातळीवर गोऱ्या अमेरीकन चा निषेध केला गेला का?
<भारतीय म्हणून आपल्याला काय
<भारतीय म्हणून आपल्याला काय फरक पडतो?>
माणूस असाल तर फरक पडायला हवा.
<यातही भारतीय स्पेसिफिक असेल, जसं की मुसलमान समजून शीख लोकांच्या हत्या किंवा त्रास देणे तर ठीक आहे.>
मुसलमानाला मुसलमान आहे, म्हणून मारलं तर ते उत्तमच आहे. बरोबर?
<< भारतीय अधिकारी विरुद्ध
<< काही वर्षे पूर्वी एका भारतीय वकीलातीमधील अधिकारी बाईला उगीच अटक केली >>
<< भारतीय अधिकारी विरुद्ध रेसिझम केला तेव्हा अशी जाळपोळ, निदर्शने, आंतरराष्ट्रीय पातळीवर गोऱ्या अमेरीकन चा निषेध केला गेला का? >>
त्या अधिकाऱ्याला (देवयानी खोब्रागडेला) अटक करण्यामागे न्यूयॉर्कचा प्रोसिक्युटर, प्रीत भरारा, हा भारतीय वंशाचाच माणूस होता. शिवाय देवयानी खोब्रागडे यांनी नोकराला पगार दिला न्हवता, ही माहिती खरी असू शकेल, असे भारतीय लोकांचे मत होते. त्यामुळे तो भारतीय अधिकाऱ्याविरुद्ध रेसिझम न्हवता.
याउलट, ती अधिकारी मागासवर्गातील होती म्हणून तिच्याविरुद्ध मुद्दाम हे षडयंत्र रचण्यात आले, असे म्हणून भारतातील काही लोकांनी मेणबत्ती मोर्चा का काढला नाही आणि अमेरिकन दूतावासासमोर निदर्शने का केली नाहीत?
कुठल्याच प्रकारचं
कुठल्याच प्रकारचं डिस्क्रिमिनेशन (वर्ण, जात, लिंग, भाषा, प्रांत, राष्ट्रीयत्व) हे कुठल्याच context मधे समर्थनीय असू शकत नाही. एक नेतृत्व म्हणून अशा अनेक डिस्क्रिमिनेशन च्या केसेस मधे ट्रंप कमकुवत ठरला आहे किंवा स्वतःच जवाबदार आहे. एक मॉडरेट कॉन्झर्व्हेटीव्ह (मी) म्हणून मला ट्रंपचं नेतृत्व खूप मोठं अपयश वाटतं. नोव्हेंबरमधे तो व्होट-आऊट व्हावा अशी इच्छा असणार्या रिपब्लिकन व्होटर्स पैकी मी नक्कीच एक आहे.
माणूस असाल तर फरक पडायला हवा.
माणूस असाल तर फरक पडायला हवा.---- भारतातले human rights problems संपले का?
मुसलमानाला मुसलमान आहे, म्हणून मारलं तर ते उत्तमच आहे. बरोबर?---- म्हणजे त्या लंडन एअरपोर्ट वर बॉम्बस्फोट करणाऱ्या भावांबद्दल बोलताय का? त्याच्या चुलत भावाला बहुतेक फक्त चुलत भाऊं आहे म्हणून ऑस्ट्रेलिया मध्ये अटक केली होती त्याला आणलं की परत.
देवयानी खोब्रागडेला-- येस, नाव आठवत नव्हते आणि लिहिण्याच्या भरात google करायचा कंटाळा आला.
देवयानी खोब्रागडे यांनी नोकराला पगार दिला न्हवता, ही माहिती खरी असू शकेल, असे भारतीय लोकांचे मत होते. --तेच आपल्यावर अन्याय झाला की शेपूट घालून पळ काढायचा. तेव्हा काळ्या लोकांनी निदर्शने केली का? ब्राऊन विरुद्ध अन्याय झाला म्हणून.
भारतातील काही लोकांनी मेणबत्ती मोर्चा का काढला नाही आणि अमेरिकन दूतावासासमोर निदर्शने का केली नाहीत? --- आफ्रिकेतील काळे करत आहेत का हे मोर्चे? मला फक्त सगळीकडे (अमेरीका सोडून) गोरे निदर्शने करत आहेत असं दिसतंय - अजूनही मी बातम्या बघत नाहीये!
मध्यम प्रदेशात एका इसमाची
मध्यम प्रदेशात एका इसमाची पोलिसांनी माफी मागितली - आम्ही तुला मुसलमान समजून चुकून मारलं.
गेल्या महिन्यातली घटना.
फेरफटका, जे तुम्हांला अपयश
फेरफटका, जे तुम्हांला अपयश वाटतं ते आणखी कुणाला यश वाटतं असेल .
देवयानी खोब्रागडे प्रकरणी
देवयानी खोब्रागडे प्रकरणी देशभर आणि मायबोलीवर ही भरपूर चर्चा झाली होती.
भारत सरकारनेही काही stand घेतला होता.
भरत, खरंय. पण माझा मतदानाचा
भरत, खरंय. पण माझा मतदानाचा अधिकार मीच बजावणार आहे ना!
प्रदेशात एका इसमाची
प्रदेशात एका इसमाची पोलिसांनी माफी मागितली - आम्ही तुला मुसलमान समजून चुकून मारलं. ---- म्हणजे
1. इसमाला मारायला नको ?का
2. मिस्लिम म्हणून मारायला नको?
परत मला ही बातमी माहीत नाही.
भारतात अनेकदा हातकड्या
भारतात अनेकदा हातकड्या लावलेल्या असतानाही आरोपी पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून जातात. का? कारण आपल्याकडे आरोपीच्या हातांवर समोरुन हातकड्या लावल्या जातात. याउलट अमेरिकेत हात पाठीमागे घेऊन त्यावर बेड्या अडकवल्या जातात त्यामुळे हातकड्या अडकवलेल्या स्थितीत पळून जाणे तितकेसे सोपे नसते. पण आरोपीचे हात पाठीमागे घेऊन बेड्या अडकविणे ही प्रक्रिया थोडी कठीण असते. आरोपी हात पाठीमागे घेऊ देत नाही अशा वेळी त्याला खाली जमिनीवर पाडतात आणि त्याचे हात बळ लावून मागे ओढतात. दोन्ही हात जवळ आणून मग त्यांवर हातकडी चढविली जाते. अशा वेळी त्या आरोपीला पोटावर पाडलेले असते आणि एकाच पोलिसाला हे काम करायचे असेल तर त्याला स्वतःचे दोन्ही हात आरोपीच्या हातांना जवळ आणून बेड्या अडकविण्याकरिता गुंतवावे लागतात आणि अशा वेळी आरोपी ताकदवान आणि आवरता येत नसेल तर त्याच्या शरीराच्या इतर अंगावर स्वतःचे गुडघे / पाय यांचा प्रयोग करावा लागतो. ह्या अशा प्रयत्नात फार शक्ती खर्च करावी लागते अशाच प्रयत्नांत असताना तो आरोपी गुडघ्याखाली गळा दाबला जावून मरण पावला.
अमेरिकेतली अजून एक कॉमन प्रॅक्टीस म्हणजे आरोपीला खाली पाडून पोटावर झोपवल्यावर त्याच्या सर्वांगाची (अगदी गुदद्वाराचीही) झडती घेतात. देवयानी खोब्रागडे ही एक किरकोळ शरीरयष्टी असलेली (वजन फार तर ४० / ४५ किग्रॅ असावे असे छायाचित्र पाहिल्यावर लगेच जाणवते) महिला असूनही (म्हणजे त्यांच्याकडून पोलिसांवर उलट हल्ला होण्याची अजिबात शक्यता नसतानाही - आणि शिवाय त्यांच्यावर कुठलाही फौजदारी आरोप नसतानाही) त्यांच्यासोबतही सेम प्रोसिजर फॉलो केली गेली होती. (व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. अस्पष्ट व धूसर असली तरी प्रोसिजर समजून येत होती. आणि ती प्रोसिजर पाहूनच भारतीय जनता चिडली होती.) धिप्पाड शरीरयष्टीच्या कृष्णवर्णीय आरोपीला अशा प्रकारे नियंत्रणात आणून त्याच्या हातांना पाठीमागे बेड्या अडकविणे हे काम सोपे आहे असे कुणाला वाटते का? प्रचंड बल लावावे लागते. अंदाज चुकून कमी बल लागले तर पोलिसाचा जीव धोक्यात येणार. या केसमध्ये चुकून जास्त बल लागल्याने आरोपी मृत झाला असल्याने सदोष मनुष्यवधाचे कलम लागेल असे वाटते (जसे भारतात नवज्योत सिद्धूवर लागले).
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-actress-kangana-ranau...
इथे ओ जे सिंपसन च्या केसचा
इथे ओ जे सिंपसन च्या केसचा उल्लेख झाला आहे तर त्याला कडक शिक्षा व्हावी असे सगळ्यांनाच वाटत होते. आधी डोमेस्टिक अॅब्यूझ आणि नंतर एक्स वाईफ , तिचा बॉय फ्रेंड यांची हत्त्या अशा गुन्ह्यातून तो सुटला तेव्हा प्रचंड चिडचिड झाली होती.
देवयानी खोब्रागडे केसमधे भारतीय वंशाच्या व्यक्तीला दोमेस्टिक हेल्पर म्हणून कागदपत्रे करुन नेले आणि त्यातील नियमानुसार पगार दिला नाही. ही केस फेडरल होती. नियमाप्रमाणे पगार दिला असता तर पगार दिल्याचा पुरावा हा बँकस्टेटमेंट्समधून दिसला असता आणि तक्रार दाखलच झाली नसती. दुसर्या देशाच्या एंबसीत काम करणार्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करताना आली लहर असे प्रॉसिक्युटर करत नाहीत. सबळ पुरावा होता म्हणूनच केस झाली. राजनैतिक अधिकार्यांना इम्युनिटी असते मात्र ती कार्यालयिन कामासंबंधी असते. घरगुती व्यवहाराबाबत नाही. त्यात तक्रार करणार्या व्यक्तीला विसाचे नियम वापरुन दुसर्या देशातून आणले होते त्यामुळे त्यासंबंधीचे जे कडक नियम आहेत त्याचेही उल्लंघन झाले होते. अटक करतात तेव्हा पॅट डाऊन करुन अंगावर शस्त्र नाही ना याची खात्री करतात. जेव्हा कार्यालयात नेवून बुक करण्याची प्रक्रिया पूर्ण करतात तेव्हा बॉडी कॅविटीची झडती घेतात. आमच्या शेजारच्या गावात अशीच डोमेस्टिक हेल्प बाबत केस झाली होती तेव्हाही अशीच कारवायी झाली होती, फक्त सगळे याच देशातले होते त्यामुळे इमिग्रेशन संबधित चार्जेस नव्हते.
अमेरीकेत अटक करताना हात मागे घेवून बेड्या घालतात मात्र दर वेळी खाली पाडून बेड्या घालत नाहीत. माझ्या जुन्या शेजारणीला अटक झाली तेव्हा मी यार्डमधेच होते. पोलीस आले. घराची बेल वाजवली आणि दरवाजा ठोठावला. मोठ्याने येण्याचे कारणही सांगितले. शेजारीण बाहेर आल्यावर तिला का अटक करत आहे सांगत हात मागे घ्यायला सांगितले आणि बेड्या घातल्या. शेजारणीला लहान मुलगा. पोलीसाने शेजारणीला माहिती विचारुन नातेवाईकाला फोन लावला. मुलाला घ्यायला नातेवाईक येइपर्यंत पोलीस मुलाला सांभाळत पोर्चमधे बसले होते. नवर्याच्या हाताखालच्या दोघांना अटक झाली तेव्हाही खाली पाडणे वगैरे केले नव्हते. ऑफिस वेहिकल, दुसर्या राज्यात कामासाठी प्रवास-हॉटेल वास्तव्य असे असताना अटक झाल्याने नवर्याला निस्तरावे लागले म्हणून माहिती.
मुलगा ऑफ कँपस घर रेंट करुन रहात होता तेव्हा एक हाऊसमेट कॉकेशिअस आणि एक आफ्रिकन अमेरीकन होता. या आफ्रिकन अमेरीकन मुलाला काहीही कारण नसताना पुलओवर केले होते. असे झाल्यास काय करायचे ते त्याच्या पालकांनी नीट समजावून सांगितले होते तरी प्रसंग आला तेव्हा त्याला प्रचंड भीती वाटली होती. त्यानंतर ग्रोसरी वगैरे साध्या कामासाठी माझा लेक आणि हा मुलगा असे दोघे लेकाची गाडी घेवून जात. हा मुलगा डबल मेजर (त्यातला एक एरोनॉटिक्स) , पायलट लायसन्स असलेला होता. या मुलाबरोबर घर शेअर करुन, त्याला राईड देवून माझा मुलगा आणि दुसरा कॉकेशियस मुलगा स्वतःला अडचणीत आणत आहेत असे बर्याच देशी लोकांना वाटले, कारण त्याचा वंश आणि सुक्यासोबत ओले जळायची भीती.
आय व्ही लिग कॉलेजच्या रेसिडेंस हॉलमधल्या लाउंजमधे आफ्रिकन अमेरीकन विद्यार्थिनी विश्रांती घेत होती. कॉकेशियस वंशाच्या विद्यार्थिनीनी ते पाहून लगेच ती घुसखोर असावी असे अनुमान बांधून पोलीस बोलावले. त्या मुलीकडे आयडी दाखवण्याची मागणी केली गेली. कारण मुलीचा वंश!
न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क मधे स्वतः नियम मोडून वर रेसिस्ट वागणार्या स्त्री बाबत बातमी
https://www.theguardian.com/us-news/2020/may/26/central-park-new-york-wh...
https://www.nbcnews.com/news
https://www.nbcnews.com/news/all/three-men-connected-boogaloo-movement-t...
>>भारतीय म्हणून आपल्याला काय
>>भारतीय म्हणून आपल्याला काय फरक पडतो? गोऱ्याने काळ्याला मारले का पिवळ्याला? कुठे कोणी ब्राऊन रेसिझम आणि त्यातही भारतीय स्पेसिफिक असेल, जसं की मुसलमान समजून शीख लोकांच्या हत्या किंवा त्रास देणे तर ठीक आहे.>>
मला स्वतःला एक माणूस म्हणून लिंग, जात, वंश, सेक्शुअल ओरिएंटेशन, धर्म, मूळ देश यावरुन भेदभाव मान्य नाही. 'मुसलमान समजून शीख'? व्यक्ती निरपराधी मुसलमान असेल आणि तिची हत्या झाली तर?
राजसी, हा धागा अमेरिकेतील
राजसी, हा धागा अमेरिकेतील आयुष्य या ग्रुपमध्ये आहे त्यामुळे भारतातील घडामोडींबद्दल इथे लिहीत नाही. तसंही तुम्ही बातम्या न वाचून सुखी आहात. तशाच रहा.
>>भारतीय म्हणून आपल्याला काय
>>भारतीय म्हणून आपल्याला काय फरक पडतो? गोऱ्याने काळ्याला मारले का पिवळ्याला? कुठे कोणी ब्राऊन रेसिझम आणि त्यातही भारतीय स्पेसिफिक असेल, जसं की मुसलमान समजून शीख लोकांच्या हत्या किंवा त्रास देणे तर ठीक आहे.>>
एकतर आपल्याला माणुसकीच्या नात्याने फरक पडायला हवा. मग तो कोणत्याही वर्णाचा माणूस असो अथवा एखादा हत्ती.
दुसरं म्हणजे ट्रम्प समर्थक white nationalist लोक हे फक्त काळ्यांच्या विरोधात आहेत हा गोड गैरसमज आहे. त्या लोकांच्या सोशल मीडियावर नजर टाकली तर लक्षात येतं की ते सर्व कलर्ड लोकांच्या विरोधात आहेत including Indians. एखादा सुंदर पिचाई टेक्नॉलॉजी क्षेत्रातला लीडर समजला जातो पण रेसिस्ट ट्रम्प समर्थकांच्या मते 'why don't we have a real american to lead Google?'.
Nicki Haley सारखी अमेरिकेत जन्मलेली , वाढलेली, अमेरिकन माणसाशी लग्न केलेली ट्रम्पच्या पक्षातली त्याची सहकारी. पण जेव्हा तिने घेतलेली एखादी राजकीय भूमिका पटत नाही तेव्हा 'डिपोर्ट हर टू इंडिया' चा गजर होतो. हा रेसिस्ट undercurrent बे एरिया किंवा तत्सम मेट्रो एरियात राहणाऱ्या लोकांना जाणवत नसेल पण रेड स्टेट मधील भारतीयांना 2016 नंतर फरक कदाचित जाणवला असेल.
चुकून जास्त बल चुकून जास्त
चुकून जास्त बल चुकून जास्त काळासाठी लागलं. ८ मिनिटे३० सेकंद.
https://www.youtube.com/watch?v=vksEJR9EPQ8
एकीकडे सगळे माणूस-माणूस म्हणत
एकीकडे सगळे माणूस-माणूस म्हणत आहेत आणि विषय रेसिझम चाललाय. माणसाला मारलं हा विषय असता तर मी पण म्हणाले असते वाईट झालं. पण मग माणसं सगलीकडेच मरत आहेत. हा माणूस मायबोलीवर discuss होण्याइतका special कसा? फरक पडायला हवा मान्य आहे पण आपण करतो का रेसिझम? आपण भारतीय म्हणून रेसिझम चे शिकार (चांगला शब्द आठवत नाहीये) नसतो का? भारतीयांवर अन्याय होतो तेव्हा का असं काही होत नाही. काळे भारतीयांच्या बाजूने निदर्शने का करत नाहीत. आता मला सांगू नका मी सगळ्या माणसांच्या मारण्यावर धागा काढावा.
आफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून
आफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून बोटी भरून आणलं होतं. कधीतरी वेठबिगारीतली गुलामगिरी संपली ना अमेरिकेत? मग ते परत आपापल्या देशांत का नाही गेले? तिथेच का खितपत राहिले?
राजसी, अमेरीकेत भारतीय
राजसी, अमेरीकेत भारतीय वंशाच्या लोकांवर शतकानुशतके अन्याय होतोय. कायदे करूनही होतोच आहे अशी परिस्थिती नाही. भारतीय व्यक्तीच्या वर्णावरून आजिबातच भेदभाव होत नाही असंही नाही. पण बहुतेक लोलक हा कमी भेदभावाकडे झुकतो. म्हणून असे होत नाही. जितकी अन्यायाची तीव्रता अधिक तितकी अधिक प्रमाणात प्रतिक्रिया.
राजसी, तुमचे प्रश्न उपरोधिक
राजसी, तुमचे प्रश्न उपरोधिक किंवा र्हिटॉरिकल आहेत अशी मला शंका, नव्हे आशा वाटली आधी. तुम्ही खरंच हे सगळे प्रश्न विचारत आहात का?
अरे पण राजसी च्या मतांवर आपण
अरे पण राजसी च्या मतांवर आपण चर्चा का करावी ? त्या बातम्या वाचत/ ऐकत नाहीत. या पर्टिक्युलर इश्यू बद्दलही काही माहिती नाही, वाचलेले नाही हेही म्हणतायत. देवयानी खोब्रागडे वगैरे उगीच पिल्लू सोडले तेही त्याबद्दल न वाचताच. अशात आपण मुद्देसूद उत्तरे वगैरे देत बसलो तर आपणच येडे नाही का?
Pages