नाक्यावरच्या भटकंतीची ठरलेली वेळ, संध्याकाळच्याच आसपासची. तोच रस्ता, तीच दुकाने, आजूबाजुला भटकणारी तीच ती माणसं. पण आज संध्याकाळी मात्र एका मुलीला पाणीपुरी खाताना बघत होतो. तुम्ही तर रोजच बघत असाल नाही, पण राव ऐका तर पुढे. भैय्याने पाणीपुरी वाटपासाठी एक प्लेट तिच्या हातात धरताच तिने त्याच्याकडून एक चमचा मागून घेतला. आता त्या पाणीपुरीच्या गाडी कम स्टॉलवर "विठ्ठल शिंदे पाणीपुरीवाला, आमची कुठेही शाखा नाही" असे शुद्ध मराठीत लिहिले असले तरी विठठल भाऊंनी पाणीपुरीवाटप करायला हाताखाली एक भैय्याच ठेवला होता. कारण आपल्याकडे भैय्याचा हात लागल्याशिवाय पाणीपुरीतला खारटपणा जाणवत नाही ना.. तर हा भैय्या तिची फर्माईश ऐकून किंचित हडबडून गेला, मात्र ग्राहक हईच हमार भगवान बोलत जवळच पडलेल्या एका खरकट्या प्लेटमधील चमचा बादलीभर पाण्यात बुचकळून तत्परतेने तिच्या हातात ठेवला.
आता ही बया त्या चमच्याचा अगदी नजाकतदारपणे वापर करून एकेक करत ताटलीतील पाणीपुरी उचलून उचलून खाऊ लागली आणि इथेच अंड्या विचारात पडला...
काय राव, अशी चमच्याने पाणीपुरी खाण्यात कसली मजा आलीय, अंड्याला नाही झेपले हे काही. जोपर्यंत ती पाणीपुरी न फुटता, त्यातील पाणी न सांडवता, कसरत करत तोंडापर्यंत नेत नाही आणि नेमके तोंडाजवळ आल्यावर त्यातील पाणी गळायला सुरुवात होऊन ओठांच्या किनार्याने ओघळत हनुवटीवर येत नाही अन त्यापासून शरीराच्या इतर भागाला वाचवण्यासाठी आपण तोंड पुढे झुकवत नाही तोपर्यंत पाणीपुरी हा प्रकार खाल्यासारखा वाटूच शकत नाही.
म्हणजे बघा हा, उद्या कोणी तुम्हाला वडापाव काटाचमच्याने किंवा नूडल्स हाताने खायला लावले तर मजा येईल का? वेज-पनीर-शेजवान रोल म्हणजे आजकाल फ्रॅंकी की काय बोलतात ते उलगडून चपातीभाजी सारखे खाऊ घातले तर..... तर कदाचित मूळ पदार्थाची चव तशीच राहील. मान्य. मात्र ते खाण्यातील लज्जत तशीच जाणवेल का? पण असतात एकेकाच्या खाण्यापिण्याच्या विचित्र सवयी. हे असले प्रकार करताना एकेक नग आजूबाजुला बरेच दिसतील. अहो सॅंडवीचमधील एकेक काकडी टमाटर वेचून खाणारे लोक पाहिलेत या अंड्याने. जाब विचारला तर म्हणतात की आमच्या जबड्यात अख्खे सॅंडवीच नाही घुसत. वा रे वा. मग घेता कशाला तसे बनवून. बिचार्या त्या सॅंडवीचवाल्याची ही मेहनतही वाया घालवता. त्यापेक्षा हारवाल्याकडून जसे देवाच्या हाराबरोबर सुट्टी फुले मागून घेतात तसे चटणीपावाबरोबर सुट्टे कांदा टमाटर अन काकडीचे तुकडे शेपरेट घ्या की राव..!!
बाकी काही जणांचे कॉंबिनेशनही हटके असतात राव. त्यातले काही प्रकार अंड्याच्या आकलनापलीकडलेच. अश्यापैकीच एक म्हणजे कोलसवलेला भात अन चपातीचा घास...
च्यामारी..!! अंड्याच्या आवडीची भाजी नसली तर अंड्या एकवेळ लोणचे चपाती खाईल पण डाळभाताबरोबर चपातीचा घास घेणे म्हणजे. काय राव, काय चव लागत असेल याची कल्पनाही नाही करवत. एका अश्याच महाभागाला मी विचारले तर तो उलट मलाच म्हणाला, "शेवटी सगळे पोटातच जाणार ना..."
घ्या.. आता काय बोलणार.. राजा मग पाणी ही ओत की त्यात आणि सारेच एकत्र कोलसवून खा. ते तरी कशाला वेगळे पितोस..
आता आमच्या घरातही असे काही महाभाग भरले आहेत. माझा दूरचा भाऊ आहे एक, जो चहात फरसाण किंवा खारी कुस्करून टाकतो आणि हातात फावडे धरल्यासारखे चमचा घेऊन त्याचा फडशा पाडतो. एवढेच नव्हे तर केकसुद्धा बिस्किटसारखा चहात बुडवून खातो. नशीब यासाठी तो क्रीमचा नाही तर माव्याचा केक वापरतो. पण यासाठी त्याला अंड्याचा केकही चालतो. त्याचेच पाहून मी देखील एकदा ट्राय केले आणि....................................... बॉक बॉक बॉक..!!
डॉक्टर म्हणाला, बे अंड्या, अंड्याचा केक चहात बुडवून खाल्लास त्यानेच मळमळले की.. बस्स तोच पहिला आणि शेवटला प्रयोग. अंड्याने त्या दिवशीच अंड्याशी कोणताही खेळ न करायचे ठरवले. अन या सार्यातून एकच चांगले झाले की माझे बघून आणि डॉक्टरचा सल्ला ऐकून त्या धास्तीने माझ्या भावानेही अंड्याचा केकच खाणे सोडले.
.............मात्र फरसाण तो अजूनही चहात टाकून खातोच. खास करून तिखट शेव. जाब विचारला तर कारण बघा अन काय देतो, "असे फरसाण चहात टाकून खायला भारी मजा येते ती येतेच, मात्र त्यातील मसाला चहात मिसळल्याने चहाचीही मस्त तिखट झणझणीत मसाला चाय बनते."
............अरे राजा, मसालादूध, मसाला चाय म्हणून वेगळा असा खास प्रकार मिळतो रे जगात, त्यासाठी असला काही प्रयोग करायची गरज नाही, हे त्याला आता कोण समजवणार. उद्या फिल्टर कॉफीला बरर्रफ मार के कोल्ड कॉफी बनवशील तर कसे चालेल.
चहा वरूनच आठवले, की एकवेळ हे परवडले पण काही जणांना ग्लुकोजच्या बिस्किटांचाही चहात लिबलिबित लगदा करून खायची सवय असते. आता दात नसलेल्या आजोबांचा नाईलाज असतो म्हणून त्यांनी शोधलेला हा खाद्यप्रकार. पण त्यांच्या दात आलेल्या नातवंडांना कसा गिळवतो हे एक अंड्याला न उलगडलेले कोडे.
पण काही जणांना असे वेगवेगळे प्रयोग करायची सवयही असते बरं का. फार लांब कशाला जा, आमच्या घरचे काकाच आहेत असे. पावामध्ये फरसाण घालून खातात आणि त्याला सुका मिसळपाव बोलतात. भातामध्ये तर काय काय घालतील याचा नेम नाही. फोडणीच्या भातात द्राक्षे अन डाळिंबाचे दाणे घालणे म्हणजे कहर बोलू शकतो. नशीब आता त्याला दाबेलीभात नाही बोलत.
कधी कधी अश्यांचे प्रयोग आवडून ही जातात हे ही खरेय. याच काकांमुळे मी पावभाजीची भाजी आणि पावाच्या जागी साधा डोसा हे हटके कॉम्बिनेशन खायला शिकलो. हॉटेलमधील वेटरही अश्यावेळी कौतुकाने बघतात हा माझा यावरचा अनुभव. मी तेवढ्यावरच थांबलो मात्र काकांचे आजही हक्का नूडल्स, वेज मंच्युरीअन, अमेरीकन चॉप्सी असे नाना प्रकार डोश्यामध्ये लपेटून खायचे प्रयोग चालूच आहेत. आनंदा, कधीतरी हे अमुकतमुक नक्की ट्राय करून बघ असे अधूनमधून सुचवतही असतात.
चायनीज फूडबद्दल तर बोलायलाच नको, मुळात तो आपला भारतीय खाद्यप्रकार नसल्याने प्रत्येक जण आपापल्या स्टाईलने खातो. लहान असताना चायनीजच्या गाड्या रस्तोरस्ती दिसायच्या, तेव्हा ते नवीनच फॅड होते. आमच्या पॉकेटमनीमध्ये तेव्हा फक्त सूपच परवडायचे म्हणून तेच खाल्ले जायचे. कधीतरी पार्टी असल्यास वाढीव बजेट नुसार फ्राइड राइस घेतला जायचा. तेव्हाही आमच्यात सूप हे राईसच्या आधी घ्यायचे की नंतर यावरून नेहमी वाद व्हायचा. अर्धे जण त्याला स्टार्टर मानून आधी प्यायचे तर अर्धे जण डेझर्ट मानून नंतर. मी मात्र नेहमी आधीच घ्यायचो आणि याचे कारण म्हणजे त्यातील अर्धे सूप पिऊन अर्धे मी फ्राइड राईसमध्ये टाकायचो अन्यथा तो सुकासुका तळलेला तेलकट भात माझ्या घशाखाली नाही उतरायचा. आता हे कधी कोणाला विचित्र वाटले नाही आणि वाटले असते तरी अंड्या काही सोडणार नव्हता, ना आजवर ही सवय सोडलीय.
काही प्रकार एखाद्या ठिकाणची खासियत असते, मात्र इतरांना नाही झेपत ते. अश्यापैकीच एक म्हणजे मिसळीच्या जोडीला स्लाईस पाव. मध्यंतरी बाहेरगावी एके ठिकाणी जाणे झाले होते तेव्हा या प्रकारच्या मिसळपावचा अनुभव आला. साधारण गोडूस चवीचे असणारे हे स्लाईस ब्रेड कसे लोक मिसळीबरोबर खाऊ शकतात देव जाणे. कदाचित जवळपास चांगले पाव मिळत नसतील किंवा चांगले बनवता येत नसतील, कदाचित मिसळच काही खास नसावी ज्याबरोबर मग पाव खा किंवा ब्रेड खा एकच, अथवा मुद्दाम वेगळेपणा दाखवायचा अट्टाहास असावा वा तेथील ग्राहकांचीच अशी आवड असावी, जे काही कारण असेल ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. अंड्याला मात्र मिसळ किंवा पावभाजीसारखा तिखट झणझणीत प्रकार असो वा चिकन-मटण वा अंड्याची भुरजी, त्याबरोबर भट्टीचे पावच लागतात. शेवटी मॉरल ऑफ द स्टोरी काय तर हा चवीचा मामला आहे, आपल्या आपल्या चॉईसचा मामला आहे..!!
- आनंद उर्फ अंड्या
--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------
अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या - http://www.maayboli.com/node/41484
अंड्याचे फंडे २ - फर्स्ट क्लास - http://www.maayboli.com/node/41751
अंड्याचे फंडे ३ - छंद - http://www.maayboli.com/node/41925
अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद - http://www.maayboli.com/node/42171
अंड्याचे फंडे ५ - शर्यत - http://www.maayboli.com/node/42319
अंड्याचे फंडे ६ - शॉपिंग मॉल - http://www.maayboli.com/node/42594
--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------
पातळ पोह्याचा चिवडा आणि दही
पातळ पोह्याचा चिवडा आणि दही असे काँबिनेशन फारच आवडते++१११ मलाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@TI>> उपवास आहे हो! अश्या
@TI>> उपवास आहे हो! अश्या तोंपासु प्रकारांची आठवण नका काढु..
@ मन्या ऽ, Lol, upas sutla
@ मन्या ऽ, Lol, upas sutla ki chivda dahyavar tutun pada!
आज नक्की!
चहात शेव/ फरसाण खायची सवय मला
चहात शेव/ फरसाण खायची सवय मला लहानपणापासून आहे.
व्हेज फ्राईड राईस व दाल फ्राय हे कॉम्बिनेशन कोणी ट्राय केलंय का?
वरण भाताचा गोळा ( साऊथ
वरण भाताचा गोळा ( साऊथ वाल्यांच्या १/१०) मला चपातीच्या तुकड्यात गुंडाळून खायला आवडतो. तसेच बाजरीच्या भाकरी बरोबर साबुदाणा खिचडी खायला आवडते.
मला चहा व सध्याच्या दिवसात
मला चहा व सध्याच्या दिवसात करतो तो तिळाचा लाडू हे कॉम्बो प्रचंड आवडते. एक घोट चहाचा, सोबत एक लाडवाचा तुकडा असे करत खाते/पिते.
अफगाणिस्तातात असाच चहा पितात,
अफगाणिस्तातात असाच चहा पितात, असं वाचलं होतं. ज्याला परवडेल ते पाकवलेले बदाम आणि गरीब जनता साखरफुटाण्यांसारखं गोड काही तोंडात ठेवतात आणि बिनसाखरेचा चहा पितात म्हणे.
लग्नाच्या जेवणात मला वरण भात,
लग्नाच्या जेवणात मला वरण भात, बुंदी आणि मटकी एकत्र करून खायला आवडते. एकाच घासात तिखट, गोड आणि वरणाची चव मस्त लागते.
तसेच आमटी भातात गुळशिरा/ साखरशिरा कालवून खायला आवडते.
आज फोटो काढला तेव्हा हा धागा
आज फोटो काढला तेव्हा हा धागा आठवला
खारीचा चुरा + चकली + चहा = डेडली कॉम्बिनेशन
अवांतर - हा माझाच आयडी आहे हे आधीच सांगतो. उगाच कोणी नव्याने शोध लाऊ नका.
अरे कशाला सांगितले . तेवढाच
अरे कशाला सांगितले . तेवढाच अज्ञात आणि वाटशोधे ना टाईमपास मिळाला असता![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सरकारी आयडीची ओळख कधी देणार
Id तुमचाच आहे असं तुम्ही
Id तुमचाच आहे असं तुम्ही मागच्याच पानावर सांगितलं आहे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पण ते जाऊदे,मला सांगा घरात 2 लहान मुले असताना 4 5 महिने तुमचे कप कसे सेमच राहतात
माझ्याकडे दर महिन्याला 4 लोकांना 2 डझन लागायचे कप शेवटी आता वैतागून स्टील चे आणले
जुनाच फोटो टाकत असेल....
जुनाच फोटो टाकत असेल.... किंवा कपाचे ड्यू आयडी असतील...
किती ही प्रसिध्दी. पब्लीकला
किती ही प्रसिध्दी. पब्लीकला घरातले कप पण ओळखीचे झालेत.
पण ते जाऊदे,मला सांगा घरात 2
पण ते जाऊदे,मला सांगा घरात 2 लहान मुले असताना 4 5 महिने तुमचे कप कसे सेमच राहतात Sad
>>>>>
वर्ष झाले त्या कपाला. ऑफिसचा आहे. म्हणून जपतो.
पोरांचे वेगळे डिझायनर कार्टून कप असतात. ते का माझ्या काचेच्या कपाच्या नादी लागतील.
बाकी काचेचे कप आपसूकच सांभाळले जातात आणि काम होताच जागच्या जागी ठेवले जातात याचे कारण कप जपणे नसून ते पोरांकडून फुटले तर त्यांनाच काच लागायची भिती असते.
बाकी पोरं फार गुणी आहेत माझी.
माझ्या शब्दाबाहेर नाहीत.
त्यांना मी आधीच सांगून ठेवलेय. जोपर्यंत तुम्ही कमावत नाहीत तोपर्यंत या घरातील प्रत्येक वस्तू माझी आहे. माझ्या परवानगीशिवाय एकाही व्स्तूला हात लाऊ नये. विषय संपला.
त्यांना मी आधीच सांगून ठेवलेय
त्यांना मी आधीच सांगून ठेवलेय. जोपर्यंत तुम्ही कमावत नाहीत तोपर्यंत या घरातील प्रत्येक वस्तू माझी आहे>>>accha मग बरोबर, कप टिकणारच,असो हे सांगणे काही माझ्याकडे होणार नाही सो मी आपली स्टील चेच कपच जिंदाबाद करते
आमच्या मामाकडेही स्टील कप
आमच्या मामाकडेही स्टील कप जिंदाबाद होते.
पण मी कधीच त्यातून चहा प्यायलो नाही.
कारण आमच्या जुन्या बिल्डींगमध्ये एक बेवडे काका मित्रमंडळ होते. ते स्टीलच्या कपातून कसलीशी देशी दारू प्यायचे. त्यातच पावही बुडवून खायचे. त्यामुळे स्टील कप बघितले की तेच मला आठवायचे. पण हे कारण मी मामाच्या घरी कधी सांगितले नाही.
त्यापैकी एका बेवडेकाकांवर मी तुमचा अभिषेक या आयडीतून व्यक्तीचित्रण सर्धेत लेखही लिहिलेला आदूस की. आदूमामा नावाचा.
अवांतर - तो वरचा जोक होता. पोरांवर तुझा जरा धाक नाही म्हणून रोज बायकोच्या शिव्या खातो.
बायकोवर धाक ठेवा मग.
बायकोवर धाक ठेवा मग.
बायकोवर धाक
बायकोवर धाक
हा हा हा
नवीन धागा काढावा लागेल
Pages