खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साबुदाणा वडे एकदम मस्त दिसताहेत. कालच रणवीर ब्रारने केले होते Happy

फणसाची सांदणेही छान दिसताहेत. मला आंब्याची करून पहायचीत.

झंपी, angat panyat: rediscovering traditional maharashtrian recipes असा ग्रुप आहे. खूप प्रसिद्ध आहे पण बहुतेक closed ग्रुप आहे. तुम्हाला ओळखणारे मेम्बर्स invite देऊ शकतात.

साधना जबरदस्त दिसतोय ब्रेड.
बाकी सगळ्या पाककृती की कलाकृती म्हणू ?सुंदरच.

ह्यावर्षी कोरोनामुळे कोकणात जाण तर सोडाच पण चार आंबे तरी मिळतील अस वाटत नव्हतं. पण पर्वा आला एक छोटा बॉक्स. त्यामुळे आज मऊ लुसलीशीत घावन आणि थोडा थोडा आमरस .

IMG_20200520_130336134~2.jpg

@piku - खूप सुंदर झालेत सगळे पदार्थ
@प्राचीन - कचोरी लाळगाळू दिसतेय
मी_वैदेही - ताकातले पोळे करुन बघणार
माबोवरच्या सुगरणी पाहून उत्साह वाढलाय Happy

@भरत - हो. मावस / चुलत कुठलीही बहिण.
छान होते ही डिश.
रणवीरची रेसिपी.

@किल्ली = आळण कशाचे?
तुमच्या खारोड्या पण मस्त. बालपण मराठवाड्यात गेलंय त्यामुळे खूप आवडता प्रकार.
आईने आजच केल्यात, बाजरी भिजवून, भरडा काढून,शिजवून. Happy

@ऋन्मेऽऽष- खाल्ले का समोसे फायनली?
>>>>
हो, चांगली बाई आहे तशी माझी बायको. ईच्छा उत्पन्न झाली ती पुर्ण केली.

काल सकाळी पोरगा रडत उठला.. पेढे पेढे करत.. फार आवडीचे त्याच्या, लॉकडाऊनने बंद केलेत. म्हणून रडत रडत परत झोपला

पुन्हा उठला तेव्हा फर्स्ट टाईम घरच्या घरी पेढे तयार होते Happy

धन्यवाद कटप्पा.
इथले मेनु बद्दल काय बोलायचं, इतके सुरेख...

ममोंचा मेनु तर जेवून झोपायचा आहे. सुंदर! ब्रेड वगैरे मस्तच.

Pages