लॉकडाऊन कायम आहे.
पण दारूची दुकाने ऊघडत आहेत.
अगदी रेड झोनमध्येही उघडत आहेत. जणू काही हे जीवनाव्श्यक पेय आहे.
आता दारू काय करते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे.
दारू चढते. चढली कि लोकं दंगा करतात. बरेच मद्यपी असे असतील जे आधी बारमध्ये जाऊन प्यायचे. आणि बाहेरच ऊतरवून घरी येऊन मुकाट झोपायचे. आता ते घरी पितील. घरच्यांना त्रास देतील. आधीच त्यांची बायकापोरे लॉकडाऊनने त्रस्त असतील. त्यांचा त्रास आणखी वाढणार. जसे ड्राय डे असतो तेव्हाच लोकं दारूवर तुटून पडतात तसे आता खूप दिवसांनी मिळाल्यावर लोकं रोज पितील. त्याचे व्हॉट्सपवर शेअर करून एकमेकांना आणखी पिण्यास उद्युक्त करतील. म्हणजे जवळपास रोजच घरच्यांना त्रास. जो नवरा घरच्या कामात हातभार लावत असेल ते देखील कमी होईल. जे बाप आधी पोरांसमोर कधी प्यायले नसतील ते सुद्धा आता भले नाईलाजाने का असेना समोरच पितील. कित्येकांच्या घरी पैश्यांची अडचण असेल. ती आता आणखी वाढेल. दारूचा खर्च जास्तच असतो. पिणारा माणूस पैश्यांचा विचार कमीच करतो हे पाहिले आहे. एकूणच कित्येक कुटुंबांना याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका बसेल याची मोजदाद नसेल. डोमेस्टीक वॉयलेन्सची वेळ येऊ शकते, सोसायटीत वा वस्तीत राडा होऊ शकतो. जे या लॉकडाऊन काळात परवडण्यासारखे नाही.
बरं ती दारू चढते तेव्हा ती मेंदूचा ताबा घेते. माणसाची हिंमत वाढते. दारूच्या नशेत लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवणे सहज शक्य आहे. एकूणच दारू डोक्याला त्रास होऊ शकते.
सरकारला काय हवेय? महसूल? लोकांना दारू पाजून तो कमावणार? त्यासाठी एवढी रिस्क? या महसूल मुद्द्यावरून दारू पिणारे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत असे मेसेज व्हॉटसपवर फिरू लागलेत. पुढे याचे रुपांतर उन्मादात होऊ शकते.
मला कल्पना आहे की ईथल्या लोकांना वाटेल की आम्ही पितो लिमिटमध्ये. काही होत नाही असे. होऊ दे दुकाने चालू...
पण हा विषय तुमच्या किंवा माझ्या घरचा नाही. सध्या देशाच्या स्थितीचा विचार करा आणि प्रामाणिक मते मांडा.
धन्यवाद,
ऋन्मेष
धाग्यावेताळ नावाने प्रसिद्ध
धाग्यावेताळ नावाने प्रसिद्ध होता एके काळी ... सध्याच्या माबो पिढीला माहित नाही... धागे कमी होतायत...
बादवे - क्युट प्रोफाईल पीक ऋन्मेष...
ऋन्मेष, बऱ्याच दिवसांपासून एक
ऋन्मेष, बऱ्याच दिवसांपासून एक प्रश्न आहे मनात, पण विचारायचा राहून जातो.. माझ्या माहितीनुसार ऋन्मेष हे तुमच्या मुलाचे नाव आहे. कपोलकल्पित user id नाव असते, तर प्रश्न नव्हता पण ज्या नावाने तुम्ही तुमची पर्सनॅलिटी इथे मांडता त्यावर तुमच्या मुलाची, पर्यायाने खऱ्या आयुष्यातील ऋनमेशची हरकत असेल तर? आता तो लहान असावा, पण मोठा झाल्यावर आपलं नाव लावून आपल्या पित्याने मराठी आंतरजालावर चांगलं वाईट जे काही केलंय त्यावर त्याला हरकत असेल का? असली तरी बापाचेच उद्योग असल्याने तो ते बोलू शकेल का? अर्थात "मी आणि माझा मुलगा पाहून घेऊ, तुला काय त्याचे?" असे सोपे उत्तर तुम्ही किंवा तुमचे चाहते देतीलही, पण प्रश्न खरंच जेन्यूईन आहे. मायबोलीवरची पब्लिक जेव्हा रूनम्या म्हणते, तेव्हा तुमच्या मनात काहीच येत नाही का? आपल्या मुलाच्या नावाची एक पर्सनॅलिटी उभी करून ठेवून आपण त्याच्या आयुष्यातच एक प्रकारे invade करत आहोत असे वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही अनेकांचे धागे हायजॅक करण्याचे प्रयत्न करता, तुमच्या मुलाचेही आयुष्य हायजॅक करण्याचा तुमचा प्रयत्न आहे का?
हा प्रश्न माझ्याही मनात आला
हा प्रश्न माझ्याही मनात आला होता
पण म्हणलं आपण कशाला इतकं पर्सनल विचारा
पण खरं सांगायचं तर मलाही ते खटकलं होतं आपल्या मुलाच्या नावाने इतकं त्रासदायक वागून लोकांचे शिव्या शाप खाणे कसे काय चालून जात असेल एक बाप म्हणून
आपल्या मुलाच्या नावाने इतकं
आपल्या मुलाच्या नावाने इतकं त्रासदायक वागून लोकांचे शिव्या शाप खाणे कसे काय चालून जात असेल एक बाप म्हणून
Submitted by आशुचँप on 5 May, 2020 - 23:51
इतर शंभर खोटेपणात हेही एखादं अजून १०१ वं खोटं असेल. पण तो चित्रातला मुलगा मात्र अबराम सारखी हेअरस्टाईल केलेला दिसतोय हे मात्र खरं.
नाही, बाकी तो सरार्स थापा
नाही, बाकी तो सरार्स थापा मारतो हे खरं असलं तरी हे नाव त्याच्या पोराचे आहे आणि हा फोटो पण त्याच्याच पिल्लांचा आहे. मी फेसबुकर पाहिलेले आहेत. दोन्ही पिल्लं एकदम गोंडस आहेत. तेही कधी कधी वाईट वाटते की इतकी छान पिल्ले असताना सदा सर्वकाळ मायबोलीवर पडीक राहायला कसे काय आवडत असेल.
म्हणजे पोराच्या नावाने आयडी
म्हणजे पोराच्या नावाने आयडी आहे.
कशा साठी हे सर्व
पोराच्या नावाने आयडी नाही...
पोराच्या नावाने आयडी नाही... आयडी च्या नावाने पोर आहे... आयडी आधी होता..
माफ करा, पण ऋन्मेश नावाच्या
माफ करा, पण ऋन्मेश नावाच्या आयडीवर, त्यामागे असलेल्या व्यक्तीवर, त्याच्या अवगुणांवर टीका/मस्करी करताना थेट त्याच्या लेकरांचे संदर्भ यावेत हे नाही आवडलं.
आत्ता वाचले प्रतिसाद. कोणाला
आत्ता वाचले प्रतिसाद. कोणाला खाली ओढायच्या हट्टापायी आपण स्वतः किती खाली जातोय हे कळत नाही का लोकांना?
सहमत.
सहमत.
आणि इथे ह्या धाग्यावर ऋन्मेष
आणि इथे ह्या धाग्यावर ऋन्मेष ह्या आय डीशिवाय इतरही काही आय्डी पडीक दिसत आहेत.
सहमत आहे
सहमत आहे
फॅमिली बद्दल लिहायची आवश्यकता नव्हती
सॉरी अभिषेक
चूक झाली
एखाद्या आयडी कडे दुर्लक्ष
एखाद्या आयडी कडे दुर्लक्ष करणे इतके का अवघड आहे ? यावरून एक जोक आठवला
एक महिला पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करते की शेजारच्या इमारतीतला तरुण उघडा बंब फक्त बर्म्युडा वर घरात फिरतो त्यामुळे लाजल्यासारखे होते. पोलीस तपास करायला तिच्या घरी जातात.
" अहो मॅडम त्याच्या घराची खिडकी तुमच्या घरातून दिसतही नाही "
" या स्टूल वर चढून बघा "
" ठीक आहे पण इमारत तशी लांबच आहे, अंधुक दिसते "
" या दुर्बीणीतून बघा "
ऑन अ सिरियस नोट, अल्कोहोलिझम हा एक आजार आहे. त्याकडे पहाताना सहानुभुतीचीही आवश्यकता आहे.
त्या आजारावर मात केलेल्या पूजा भट हिचे ट्वीट्स चिंतनिय आहेत.
हा युक्तिवाद काही वर्षापूर्वी
हा युक्तिवाद काही वर्षापूर्वी जसाच्या तसा वाचल्याचा आठवतोय
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तेव्हाही सेम सगळेजण बाजू घेत धावून आले होते दुर्लक्ष करा म्हणून
काय योगायोग आहे ना सोलीड
सेम आयडी होता तेव्हाही
किती छान युक्तिवाद चालू आहे
किती छान युक्तिवाद चालू आहे ना, की मुलाबाळांना मध्ये आणू नका वगैरे.
...पण या व्यक्तीने त्याच्या मुलाच्या नावाने आयडी घेतलाय, आणि जेव्हा या व्यक्तीचा खोटारडेपणा उघडा पडतो तेव्हा त्या आयडीला लोक बोल लावतात. तरीही या माणसाला काहीच कसं वाटत नाही, इतका निगरगट्टपणा माणसाच्या अंगी असूच कसा शकतो.
रुन्मेष हे आभासी व्यक्तिमत्त्व. ओके. पण त्याच नावाची एक खूप जवळची व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे, आणि तिच्या नावाने वावरताना काहीवेळा लोक त्याच नावाने आपल्याला शिव्याही घालतात, ही जाणीव एक बाप म्हणून असू नये?
तरीही अभिषेक यांच्या प्रत्येक गोष्टीला डिफेन्ड करायला काही आयडी कायम तयार असतात. नाहीतर कटप्पा अवतार आहेच. अजून किती अवतार असतील देव जाणे!
मात्र एका माणसाला श्रद्धांजली द्यायला काढलेल्या धाग्यावर अभिषेक मनसोक्त गोंधळ घालतो, आसुरी आनंद घेतो, तेव्हा अभिषेकला कुणी विरोध केल्याचं आठवत नाही. आणि वाईट गोष्टीला विरोध केला तर 'लगेच तुम्ही दुर्लक्ष करत नाही. पिच्छा पुरवतात, अभिषेक बाळ किती गुणी' हे पालुपद लावायला काही जण तयारच असतात.
असो! रुन्मेष या नावाला आजपर्यंत माझ्याकडून काही वाईट बोललं गेलं असेल, तर मी आज तुमची माफी मागतो. कारण याआधी मला माहिती नव्हतं की एका गोंडस मुलाचं हे नाव आहे. यापासून रुन्मेष नाही, तर अभिषेक नावानेच उल्लेख करेन.
बादवे, पिल्ले गोंडस आहेत. जीव लावा त्यांना. आणि स्वतःची काळजी घ्या. लवकर बरे व्हा...
इथल्या काही प्रतिसादातून
इथल्या काही प्रतिसादातून ऋन्मेषच्या फॅमिलीला मध्ये आणले असा अभिनिवेश दिसतोय, तुमचा हिरमोड करण्याबद्दल माफी मागतो, पण कोणत्याही प्रकारे माझ्या प्रश्नातून त्याच्यावर किंवा त्याच्या घरातील सदस्यांवर कोणताही आरोप, चिखलफेक वा अपमानास्पद टिप्पणी झालेली नाही; तसे तुम्हा लोकांना जाणवत असल्यास तो तुबुदोस. माझा प्रश्न सोपा आणि सरळ आहे, ऋ - फॅन्सनी त्याचे निरनिराळे अर्थ लावून माझी प्रतिमा मलिन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये.
मात्र एका माणसाला श्रद्धांजली
मात्र एका माणसाला श्रद्धांजली द्यायला काढलेल्या धाग्यावर अभिषेक मनसोक्त गोंधळ घालतो, आसुरी आनंद घेतो, तेव्हा अभिषेकला कुणी विरोध केल्याचं आठवत नाही.
—->>> सॉरी अज्ञातवासी. तिथे कोणीच गोंधळ घातला नव्हता. तुम्ही इरफान ला मोठे दाखवण्यासाठी शाहरुख ला कमी दाखवले. परदेसाई यांनी कमेंट केली ती मीच करणार होतो. मुद्दा बरोबर होता. धागा इरफानचा होता आणि राहिलाही असता. ड्यू आयडी कडे चर्चा तुम्ही वळवलीत .
गोंधळ खरे तर तुम्ही घालत होतात .
अज्ञातवासी, आता जरा जास्त
अज्ञातवासी, आता जरा जास्त होतेय असे वाटत नाहीये का तुम्हाला. मी ऋन्मेष ची फॅन नाही, उलट त्याचा राग येणाऱयापैकी आहे. जोवर तुम्ही त्याच्या मुलांना मध्ये आणले नव्हते तोवर तुम्ही पण शशिकांत शशिराम सारखे झालात समजून इग्नोर केले होते. गेले काही दिवस तुम्ही आणि आशुचाम्प ज्या प्रकारे त्याच्या मागे लागलात ते बघून आधी मजा येत होती की त्याला छळणारे आले, पण हल्ली जरा जास्त होतेय. आशुचाम्प यांनी तरी दिलगिरी व्यक्त केली पण तुमचे अति होतेय. मला तर आजारी तुम्हीच वाटताय. आठवा जेव्हा शशिराम तुमच्या मागे लागले होते तेव्हा तुम्हाला काय वाटत होते. सध्या तुम्ही तसेच वागताय.
गेट वेल सून
धागा इरफानचा होता आणि
धागा इरफानचा होता आणि राहिलाही असता. ड्यू आयडी कडे चर्चा तुम्ही वळवलीत .
गोंधळ खरे तर तुम्ही घालत होतात .
Submitted by कटप्पा on 6 May, 2020 - 09:53>+11111
ऋन्मेष चा आजार तुम्हाला झालाय, म्हणून मुद्दाम असे वागताय
सॉरी पण इरफान चा धागा पण मला अटटेन्शन सिकिंग साठीचा वाटला
नमस्कार समाधी!
नमस्कार समाधी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बऱ्याच दिवसांनी दिसलात. काळजी घ्या
दिलगिरी काय, मी माफी मागितली चक्क!!!
असो! रुन्मेष या नावाला आजपर्यंत माझ्याकडून काही वाईट बोललं गेलं असेल, तर मी आज तुमची माफी मागतो
अजून काय हवं?
आणि आपल्या आयुष्यातली एक जवळची वाटणारी व्यक्ती सोडून गेली, आणि तिच्यावर धागा काढला तर अटेन्शन सिकिंग! त्यामागच्या भावना नसतातच म्हणा... बाकी दारू, बडे करावा का किंवा कसा करावा, परीक्षणे वगैरे सगळं जेन्यून. सलाम!
आणि मी मुलांना मध्ये आणले हा कांगावा चालू ठेवा. कांगावा करायला बेस्ट मुद्दा आहे हा, भलेही तसं काही नसेना.
चलो, मगरीचा वाटा संपला
मात्र एका माणसाला श्रद्धांजली
मात्र एका माणसाला श्रद्धांजली द्यायला काढलेल्या धाग्यावर अभिषेक मनसोक्त गोंधळ घालतो, आसुरी आनंद घेतो, तेव्हा अभिषेकला कुणी विरोध केल्याचं आठवत नाही.>> लिंक द्या या धाग्याची.
@अजिंक्यराव पाटील - तो धागा
@अजिंक्यराव पाटील - तो धागा मी स्थलांतरित करून एडमीनला उडवायला लावला. तो धागा उडालाय आता.
स्थलांतरित धागा तुम्ही इथे वाचू शकतात.
https://www.maayboli.com/node/74431
ओके म्हणजे सरकारला झक मारत
ओके म्हणजे सरकारला झक मारत धोरण बदलावे लागेल असा प्लान रेडी नसेल तर सरकारी धोरणांना विरोध करू नये वा निषेध नोंदवू नये
बरोबर !
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष>>>>
अर्थ लावणे ज्याच्या त्याच्या वकुबावर आहे. मी म्हणेन प्लॅन शोधा व सरकारला झक मारत तो अमलात आणायला लावा. टीका करणे सगळ्यात सोपे. त्यामुळे भारतात फक्त तेच होते.
असो.
सेलिब्रेटींना पर्सनल आयुष्य
.
सेलिब्रेटींना पर्सनल आयुष्य नसते
जेव्हा मला पर्सनली न ओळखणारे माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल चर्चा करतात तेव्हा मला खरोखरच सेलिब्रेटी असल्याचे फिलींग येते आणि मी सुखावतो
पण सेलिब्रेटी अश्या प्रश्नांना ऊत्तरे देत एंटरटेन करत नाहीत... ईथे मात्र मी मार खातो. कारण माझ्यात ती ऊत्तरे द्यायची हौस आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि ईथे तर दोन फुलटॉस दिसत आहेत.
१) मी मुलाच्या नावाने आयडी कसा काढला?
२) मी एवढ्या गोंडस मुलांना वेळ द्यायचे सोडून मायबोलीवर का येतो?
पण ईथे ऊत्तर देण्यात मजा नाही
कारण हा धागा दारूचा आहे.
आता हा प्रश्न उपस्थित करणारयांचे ईथे दोन हेतू असू शकतात
१) खरेच माझ्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना रस असेल.
२) आपल्या आवडत्या दारूच्या विरोधात असलेला धागा भरकटवायचा असेल.
पहिला हेतू असणारयांना मलाही ऊत्तर द्यायला आवडतील.
पण दुसरा हेतू असलेल्यांसाठी हा धागा भरकटवायला हातभार लाऊ शकत नाही.
तर पहिला हेतू असणारयापैकी कोणीही नवीन धागा काढेल का?
अर्थ लावणे ज्याच्या त्याच्या
अर्थ लावणे ज्याच्या त्याच्या वकुबावर आहे. मी म्हणेन प्लॅन शोधा व सरकारला झक मारत तो अमलात आणायला लावा. टीका करणे सगळ्यात सोपे. त्यामुळे भारतात फक्त तेच होते.
>>>>
तो प्लान शोधायलाच चर्चेला धागा आहे
तुमच्या कोणाकडेही काही आयडीया काही प्लान असेल तर प्लीज शेअर करा.
पहिला हेतू असणारयापैकी कोणीही
पहिला हेतू असणारयापैकी कोणीही नवीन धागा काढेल का?
तूच काढ रे, तू आहेस तितका निगरगट्ट
बिनधास्त काढ
त्याला 100 पार न्यायची जबाबदारी माझी
त्याच्या फॅमिलीला का मध्ये
त्याच्या फॅमिलीला का मध्ये आणलं म्हणून रुदन करणाऱ्या मायबोलीकरांना त्याने पुन्हा एकदा तोंडघशी पाडलं आहे
तुम्हाला कदाचित त्रास होत असेल पण त्याच्या फॅमिलिबद्दल, मुलांबद्दल बोलल्याने तो सुखवतोय
त्याला शेळीब्रिटी असल्याचे फिलिंग येतंय
तुम्हीच आपले त्याचे एकतर्फी वकीलपत्र घेऊन भांडताय
तरीही माझा माफीनामा तसाच राहील कारण त्याला पिडण्यासाठी मी त्याच्या फॅमिलीचा वापर करण्याइतका टोकाला जाण्याइतका स्वभाव माझा नाही
बाकी त्याचा खोटारडेपणा, दांभिकपणा आणि दुटप्पीपणा भरपूर आहेत
पण यापुढे त्याच्या बाजूनं एकतर्फी बोलताना एकदा विचार करा इतकेच सांगू शकेन
आता हा प्रश्न उपस्थित
आता हा प्रश्न उपस्थित करणारयांचे ईथे दोन हेतू असू शकतात>> हे तुम्ही कोणत्या आधारावर ठरवले? माझ्या प्रश्नात हेतू वगैरे काहीही नाही. तूम्ही स्वयंमान्य सेलिब्रिटी आहात, तुमचा स्वर्ग तुम्हाला लखलाभ. माझ्यापुरता, माझा प्रश्न सोपा आहे. उत्सुकता म्हणून विचारले, उत्तर देता येत नसेल, तर तसे स्पष्ट सांगा. उगाच तुम्हाला आम्ही महत्व देतो असे वाटून घेऊन आमचा अपमान करू नका.
आणि हो, आमच्या प्रतिसादातील
आणि हो, आमच्या प्रतिसादातील "आम्ही" म्हणजे दस्तुरखुद्द मीच. आम्ही स्वयंमान्य आदरणीय व्यक्ती आहोत.
तूम्ही स्वयंमान्य सेलिब्रिटी
तूम्ही स्वयंमान्य सेलिब्रिटी आहात,
>>>
हो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला जर चॉईस मिळाला आणि पुनर्जन्म असला तर मला पुन्हा माझाच जन्म घ्यायला आवडेल ईतके प्रचंड प्रेम आहे माझे स्वत:वर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages