धाग्याच्या शीर्षकाविषयी - मायबोलीवरील अन्य एका धाग्याने हा धागा काढण्याची प्रेरणा दिली आहे!
सध्या LockDown असल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. परंतु काही दिवसांत परिस्थिती निवळेल आणि पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु होईल.
ज्या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम नाही आणि बहुतांश लोक जिथे प्रामुख्याने खाजगी वाहने (दुचाकी / चारचाकी) वापरतात त्या शहरातील लोकांना कदाचित हा धागा म्हणजे हास्यास्पद वाटेल. परंतु मुंबईसारख्या शहरात जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जास्त होतो तेथील लोकांना या धाग्यातील मर्म आणि धागा लेखकाची व्यथा निश्चितच समजेल!!!
तर सध्या आधी स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या, शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणामध्ये स्त्री-पुरुष समानता आदी मुल्ये शिकवल्या जाणाऱ्या समाजातील काही वास्तव पाहू.
१. मुंबईतील बेस्ट बस - चालकाच्या केबिनमागील ६ आसने महिलांसाठी राखीव (एकूण १२ महिला); पुरुषांसाठी बाबाजीका **
२. मुंबईतील बेस्ट बस - गर्दीच्या वेळी काही मार्गावर 'केवळ महिलांसाठी' बस (उदा. बसमार्ग क्र. ७९); पुरुषांसाठी बाबाजीका **
३. मुंबईतील लोकल ट्रेन्स - १२ डब्ब्यांच्या ट्रेनमध्ये ४ डब्बे महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
४. मुंबईतील लोकल ट्रेन्स - गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
५. मुंबई मेट्रो - वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांना एखादी सुविधा दिली जात असेल तर तीच सुविधा पुरुषांना का दिली जात नाही?
वास्तविक स्त्री आणि पुरुष ही समाजनामक एकाच रथाची (किंवा आजच्या काळातील उदाहरण द्यायचे तर एकाच स्कूटरची!) दोन चाके आहेत. त्यामुळे दोघांना समान न्याय मिळाला पाहिजे. ज्याप्रमाणे स्त्रीविना सृष्टी चालू शकत नाही, त्याचप्रमाणे पुरुषांविनाही सृष्टीचे चक्र सुरु राहू शकत नाही. स्त्री ही जर सृष्टीचे इंजिन असेल तर पुरुष हा स्टार्टर आहे! तुम्ही स्कूटरच्या एका चाकात वेळोवेळी हवा भरत आहात, oiling करत आहात, bearings खराब झाल्या तर त्या बदलत आहात आणि दुसऱ्या चाकाकडे दुर्लक्ष करत असाल तर ती स्कूटर नीट चालणारच नाही. त्यासाठी दोन्ही चाकांकडे समान लक्ष दिले पाहिजे. (एखादे चाक आधीपासून खूप दुर्लक्षित असेल तर त्याकडे जरा जास्त लक्ष देणे समजू शकतो पण म्हणून दुसऱ्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?)
अ त्यं त म ह त्वा चे : येथे महिलांना दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घ्याव्यात असे कोठेही म्हटलेले नाही. महिलांना ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा पुरुषांनाही मिळाव्यात अशी रास्त अपेक्षा आहे.
म्हणजेच,
जर बसमध्ये ६ आसने (१२ व्यक्ती) महिलांसाठी आरक्षित असतील तर तितकीच आसने पुरुषांसाठी का नाहीत??
गर्दीच्या वेळी जशी 'खास महिलांसाठी' बस असते तिच्याच मागे/पुढे 'खास पुरुषांसाठी' बस का नाही???
लोकलमध्ये ४ डबे महिलांसाठी असतील तर तितकेच (४ डबे) पुरुषांसाठी आरक्षित का नाहीत???
गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी आरक्षित असेल तर त्याच्या मागे/पुढे पूर्णच्या पूर्णच्या पूर्ण ट्रेन पुरुषांसाठी का आरक्षित नाही???
मुंबई मेट्रोमध्ये वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी आरक्षित असेल तर घाटकोपर बाजूचा अर्धा डबा पुरुषांसाठी का आरक्षित नाही???
नाव सार्थकी लावले
नाव सार्थकी लावले
नाव सार्थकी लावले
नाव सार्थकी लावले
Submitted by BLACKCAT on 22 April, 2020 - 13:19
खुप विचार करून घेतले आहे हे युजरनेम!!!
रच्याकने दोन्ही समाजघटकांना समान न्याय मिळाला पाहिजे या मागणीमध्ये 'विक्षिप्त' काय आहे ते कळले नाही!
मला वाटत्ं की महीला किंवा
मला वाटत्ं की महीला किंवा पुरुषांना राखीव आसन ठेवण्याऐवजी रांग न मोडता जर चढता आले तर जो
पहीला चढेल त्याला जागा मिळेल. यामुळे महिलांनाही
त्रास नसेल. फक्त व्रद्ध, दिव्यांग आणि गरोदर/लहान
बालक सोबत असलेल्यांना राखीव आसन असावे.
गाडी भरली तर पुढच्या गाडीत चढण्याची सोय आहेच.
पण मग असे आसन नसल्यामुळे थोडीही विश्रांती
न मिळालेल्या महीला थकुन घरी पोहोचतील तेव्हा
घरकामाचा वाटाही फक्त त्यांच्यासाठी राखीव नसावा.
किंवा ज्यांना राखीव आसने हवी आहेत, त्यांनी तो
वाटाही उचलण्याची तयारी दर्शवावी.
ही तुमच्यावर/ तुमच्या विचारांवर /इन जनरल पुरुषांवर
टीका नाहिये. जर सुधारणा करायचिच आहे तर मुलभुत गोष्टीपासुन व्हावी हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे
एखाद्या गोष्टीतील असमानता नष्ट झाली तर अशा
वरवरच्या मलमपट्ट्यांची (उदा. राखीव जागा पुरुष
आणि स्त्रिया दोघांसाठीही) गरज भासणार नाही.
हो ना. उजवीकडची सर्व आसने
हो ना. उजवीकडची सर्व आसने स्त्रियांची आणि डावीकडची पुरुषांची करा.
कोणालाच स्त्री असू नाही तर
कोणालाच राखीव आसने असू नयेत .
फक्त वयस्कर लोक,गरोदर स्त्रिया,5 वर्षाच्या आतील मुल बरोबर असेल तर स्त्री असू नाही तर पुरुष फक्त ह्यानाच राखीव आसने असावीत.
स्त्री ला राखीव आसने देण्या मागची कारण माझ्या मते एकच आहे.
गर्दी मध्ये स्त्री च्या शरीराला स्पर्श करणे,स्त्री भोवती गर्दी करून तिच्या शरीराला चीकटायचा प्रयत्न करणे .
अशा वृत्तीच्या लोचट पुरुष मुळे राखीव आसने ठेवली आहेत.
पण त्याचा काही स्त्रिया गैर फायदा घेत आहेत.
ग्रुप नी प्रवास करणाऱ्या स्त्रिया पहिल्या पुरुषांची सीट वर बसतात आणि स्त्री ची आसने मोकळीच ठेवतात .
पुरुषांवर ह्या मुळे अन्याय होतो.
ह्यात अन्याय काय ?
ह्यात अन्याय काय ?
8 जागा स्त्रियांना , म्हणजे उरलेल्या सगळ्या जागा पुरुषांना नसतात , त्या दोघांनाही असतात
हे न्यायाच्या तत्त्वानुसार
हे न्यायाच्या तत्त्वानुसार चुकीचं आहे.
समाजातील ३ऱ्या घटकाकड़े
समाजातील ३ऱ्या घटकाकड़े दुर्लक्ष झालेय तर त्यासाठी प्रत्येक बस आणि ट्रेनला काय सोय करणार ? का डावीकडे लेडीज उजवीकडे जेंट्स आणि मध्ल्यांनी मध्येच उभ्याने प्रवास असे काही लॉजिक आहे का !!
इंजिन आणि स्टार्टर उपमाच
इंजिन आणि स्टार्टर उपमाच आवडली!
छान धागा..
छान धागा..
निदान १८ ते २६ वयोगटाच्या स्त्रियांना किंवा अविवाहीत स्त्रियांना तरी सीटचे आरक्षण देऊ नये असे वाटते.
तसेच रिक्षाबाबतही बराच अन्याय होतो.
शेअर रिक्षामध्येही एकतर नियम मोडून तीनच्या जागी चार ब्सवतात.
आणि त्यात चौथ्या प्रवाश्याला रिक्षावाल्याच्या मांडीला मांडी लाऊन बसावे लागत असल्याने नाईलाजाने पुरुषालाच बसावे लागते. त्यामुळे होते काय की तुम्ही पुरुष असाल तर भले आधी येत रिक्षात छान विंडोसीट अडवून बसलात तरी तीन जण भरताच जर मागून चौथी मुलगी महिला बाई वगैरे आली तर तुम्हाला अदबीने ईज्जत देत मागून हाकलए जात आणि पुढे ढकलले जाते. भले मग तुम्ही रांगेच्या नियमानुसार आधी का असेना.
बर्र त्यातही जर तो रिक्षावाला होमोसेक्शुअल वृत्तीचा असेल तर त्याच्या मांडीला मांडी लाऊन बसायचे वेगळेच टेंशन
अश्यात जर पावसाळा असेल आणि पाऊस सुरू झाला.. तो पण साला हल्ली कधीही सुरू होतो.. तर मग तुम्हाला ना बाहेर सरकता येत ना आत रिक्षावाल्याच्या जवळ सरकता येत. पुरुषांच्या आब्रूला तसेही या समाजात कवडीचीही किंमत कोणी देत नाही.
निम्मे डबे पुरुषांसाठी आणि
निम्मे डबे पुरुषांसाठी आणि निम्मे डबे बायकांना! सगळीकडे निम्मी वाटणी करायची. तृतीयपंथी स्वतःला ज्या जेंडर बरोबर जास्त identify करतात त्या डब्यातून प्रवास करू शकतात.
स्त्री आणि पुरुष प्रवासी
स्त्री आणि पुरुष प्रवासी ह्यांच्या संख्येनुसार ,( रेल्वे पास वरून ती संख्या समजेल) वरून त्या प्रमाणात स्त्री आणि पुरुषांना वेगळे डब्बे रेल्वे मध्ये नक्की ठेवावेत ती आदर्श व्यवस्था असेल.
पण हा नियम strict asel .
१३ Varsha khalil मुल आणि मुली कोणत्या ही डब्यात प्रवास करू शकतील.
त्या पेक्षा जास्त वय असलेली स्त्री पुरुष डब्यातून बिलकुल प्रवास करू शकणार नाही.
जो नियम पुरुषांना तोच स्त्री ला.
स्त्रिया पुरुषांच्या डब्ब्यात प्रवास करतात त्या मुळे पुरुषांची कुचंबणा होते .
आणि पुरुषांवर अन्याय सुद्धा होतो.
सर्रास गर्दी च्या वेळी सुद्धा स्त्रिया पुरुषांच्या डब्ब्या तून प्रवास करतात.
वयस्कर स्त्रिया पुरुषांच्या डब्ब्यात प्रवास करतात त्यांचा हेतू असतो तिथे बसायला जागा मिळेल.
पुरुष स्त्री दक्षिण्या म्हणून वयस्कर स्त्रिया ना स्वतः जागेवरून उठून जागा देतात त्या त्या स्त्रिया स्त्रियांच्या डब्ब्यात चढल्या तर त्यांना कोणतीच माणुसकीची वागणूक मिळत नाही.
कडू आहे पण सत्य आहे.
पुरुषांचा स्वतन्त्र डबा नाहीच
पुरुषांचा स्वतन्त्र डबा नाहीच
आणि दोन इंजिन/गार्डडबे
आणि दोन इंजिन/गार्डडबे लावायचे
एक स्त्री चालकाला आणि एक पुरुष चालकाला.
एक स्त्री गार्डला एक पुरुष गार्डला.
बर्र त्यातही जर तो रिक्षावाला
बर्र त्यातही जर तो रिक्षावाला होमोसेक्शुअल वृत्तीचा असेल तर त्याच्या मांडीला मांडी लाऊन बसायचे वेगळेच टेंशन>>
तुमच्यावर असा बाका प्रसंग तर ओढावला नाही ना कधी.
स्त्रियांसाठी वेगळ्या 12 सीट
स्त्रियांसाठी वेगळ्या 12 सीट असायला हरकत नाही परंतु आत शिरल्यावर स्त्रियांनी प्रथम त्यांच्या आरक्षित स्थानांवर बसावे आणि नंतर इतर ठिकाणी.
अनेक वेळेस मी हे पहिले आहे की स्त्रिया सर्वांना असलेल्या सीटवर बसतात आणि मग स्त्रियांसाठी असलेल्या जागा रिकाम्या असल्या तरी पुरुषांना उभे राहावे लागते.
जागा रिकामी असेल तर बसावे ,
जागा रिकामी असेल तर बसावे , स्त्री आल्यास उठावे
निम्मे डबे पुरुषांसाठी आणि
निम्मे डबे पुरुषांसाठी आणि निम्मे डबे बायकांना! >> +१ परफेक्ट प्रतिसाद.
निम्मी निम्मी वाटणी पुरेशी
निम्मी निम्मी वाटणी पुरेशी नाही. जर वाहतूक व्यवस्था सरकारी असेल तर प्रत्येक डब्यातसुद्धा सरकारी नियमांनुसार आरक्षण मिळाले पाहिजे. (महाराष्ट्रात १३% SC, ७% ST, १९% OBC, ३६% इतर आरक्षित, बाकीच्यांनी उभ्याने प्रवास करावा). फक्त खाजगी वाहतुकीला आरक्षण लागू नसेल.
अ त्यं त म ह त्वा चे: येथे कुणालाही दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घ्याव्यात असे कोठेही म्हटलेले नाही. सर्व सरकारी सोयींमध्ये सुविधा आरक्षणानुसार मिळाव्यात अशी रास्त अपेक्षा आहे. इतर सरकारी बाबतीत अजून कुठे कुठे आरक्षण देता आले, तर त्या कल्पनांचे पण स्वागत आहे.
तुमच्यावर असा बाका प्रसंग तर
तुमच्यावर असा बाका प्रसंग तर ओढावला नाही ना कधी.
नवीन Submitted by वीरु on 22 April, 2020 - 22:20
>>>>>
ओढवलाय म्हणून तर अनुभवाचे बोल लिहितोय. ते देखील भर पावसात. अखेर असह्य झाले आणि चालत्या रिक्षतून ऊडी मारली. ते ही टायमिंग ईतके गंडले की डोके नेमके डबक्यात पडले. त्याचमुळे ईतर कितीही स्त्री पुरुष समानता मी केले तरी या सीट आर्क्षणाच्या विरोधात आहे
अनेक वेळेस मी हे पहिले आहे की
अनेक वेळेस मी हे पहिले आहे की स्त्रिया सर्वांना असलेल्या सीटवर बसतात आणि मग स्त्रियांसाठी असलेल्या जागा रिकाम्या असल्या तरी पुरुषांना उभे राहावे लागते.
>>>>>
माझ्या माहीतीप्रमाणे जर स्त्रिया नसतील तर तुम्ही बसू शकता त्या सीटवर.
म्हणजे मी तरी बसतो.
प्रॉब्लेम खरा ट्रेनमध्ये होतो.
महिलांचा डब्बा रिकामा असतो पण तरी काही महिला पोरी जनरलमध्ये ग्रूपसोबत असल्याने असतात.
सेकंडच्या डब्यात चौथी सीट बसायची प्द्धत आहे. पण सीटवर स्त्री असली की त्याचेही वांधे होतत.
हल्ली बसमधील महिलांच्या सीट
हल्ली बसमधील महिलांच्या सीट वाढवल्यात का गेल्या काही वर्षात?
माझा बसचा रेग्युलर प्रवास चौथीपर्यंतच व्हायचा. पाचबीपासून ट्रेनने. तरी ईथे तिथे फिरायला बसने जाणे व्हायचे. कॉलेजनंतर ते सुद्धा सुटले. त्यामुळे हल्लीची कल्पना नाही...
अवांतर - त्या डबलडेकर बस ज्यत वरच्या मजल्यावर पहिल्या सीटवर वरचा ड्रायव्हर असल्याच्या थाटात पण समोरची खिडकी ऊघडी सोडून बसल्यावर जो मस्त वारा लागायचा... अहाहा.. त्या बस आता बंदच झाल्या का?
अवांतर - त्या डबलडेकर बस ज्यत
अवांतर - त्या डबलडेकर बस ज्यत वरच्या मजल्यावर पहिल्या सीटवर वरचा ड्रायव्हर असल्याच्या थाटात पण समोरची खिडकी ऊघडी सोडून बसल्यावर जो मस्त वारा लागायचा... अहाहा.. त्या बस आता बंदच झाल्या का?
नाही - अंधेरी पूर्व ते कुर्ला स्थानक, सांताक्रूझ पूर्व ते कुर्ला स्थानक (मुंबई विद्यापीठासमोरून) तसेच वांद्रे पूर्व ते कुर्ला स्थानक (बीकेसी मार्गे) अशा काही मोजक्याच मार्गांवर डबलडेकर सध्या धावत आहेत.
नशीब, त्या पुढच्या सीटवर आरक्षण नाही ठेवले!!!
तिकडे नरीमन पॉइंट लाही एक आहे
तिकडे नरीमन पॉइंट लाही एक आहे डबल डेकर
बर्र त्यातही जर तो रिक्षावाला
बर्र त्यातही जर तो रिक्षावाला होमोसेक्शुअल वृत्तीचा असेल तर त्याच्या मांडीला मांडी लाऊन बसायचे वेगळेच टेंशन>>
बरोबर आहे ..आधी मला असलं काही टेंशन येत नव्हतं पण एकदा असा बाका प्रसंग आला होता.. ठाण्याला शेअर ऑटोमध्ये पुढे बसून जात असताना. रिक्षावाला सारखा मुदादाम खेटून बसला होता..सरक थोडं म्हटलं तर 2 मिनिटे सरकायचा आणि परत ये रे माझ्या मागल्या.. नंतर नंतर मुददाम छातीवर बाहूने दाब द्यायला लागला.. टाळकचं सणकलं मग मात्र रिक्षा थांबवली..घाल घाल शिव्या घातल्या..
खरंतरं एक ठेऊनच देणार होतो पण वयस्कर होता म्हणून फक्त शिव्याच देऊन उतरलो.
बिचाऱ्या पुरुषांवर सार्वजनिक
बिचाऱ्या पुरुषांवर सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनात खूप लैंगिक अत्याचार होतात.
एक तर स्त्रिया पुरुषांच्या डब्यात चढतात त्यामुळे पुरुषांनी किती ही अंग चोरायचा प्रयत्न केला तरी स्पर्श होतोच.अंग चोरुन किती चोरणार.
मग संयम ठेवणे अतिशय अवघड काम पुरुषांना करावे लागते खूप त्रास होतो.
सम लैंगिक लोक गर्दी चा फायदा घेवून किती तरी पुरुषांचा विनय भंग करतात .
जबरदस्ती करतात पुरुष वर .
बिचाऱ्या पुरुषांच्या भावना कोण्ही समजून घेत नाही.
एवढं सर्व सहन करून तोच बदनाम होतो.
घोर अन्याय आहे हा
ऋन्मेऽऽषच्या एका धाग्याला
ऋन्मेऽऽषच्या एका धाग्याला पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता म्हणून 'उपाशी बोका' यांनी ऋन्मेऽऽषचाच दुसरा एक धागा वर काढला. त्याच आगीत अजून तेल ओतण्यासाठी (!) मी माझा धागाही वर काढत आहे!!!
prashant255
prashant255
आपण कोणत्या बसने करता प्रवास
आज असलेल्या 'जागतिक पुरुष
आज असलेल्या 'जागतिक पुरुष दिनाच्या' निमित्ताने हा धागा वर काढत आहे!
च्यायला... आज जागतिक पुरुष
च्यायला... आज जागतिक पुरुष दिन होता आणि हे कळले पण नाही
पुरुषदिनाला काही महत्व आहे की नाही.. पुरुषांना काही ईज्जत आहे की नाही..
यावर एक रात्री वेगळा धागा काढतो.
Pages