संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सरकारने करोना व्हायरसचा बंदोबस्त करण्याआधी, देशभर पसरलेल्या हिरव्या जिहादीं व्हायरसचा बंदोबस्त आधी करायला हवा.
जगावर किती जरी मोठ्ठ संकट आलं तरी ह्यांचा हिरवा द्वेष कधी कमी होणार नाही. अगदी प्रलय जरी आला तर ह्यांच्या तोंडी रामाचं नाव नसेल तर हिरव्या रंगाला शिव्या असतील.
Dont hate in Plurals.

अरे काबो मग पाळा ना कायदा कानून. भरत उगवला नाही अजून? काल्या दादाची बातमी वाचली/पाहिली काय?

पाच कोटींच्या देशात सहा हजार रुग्ण आणि एकशे तीस कोटींच्या देशात सातशे कसे?

भारतात जेवढे मेले आहेत त्यापेक्षा बरे झालेल्यांची संख्या चौपट कशी?

Lockdown ला तर तीन चार दिवसच झाले आहेत आणि तेही धड पाळले जात नाहीये.

यात काही चुकत असल्यास अवश्य सांगावे व चुकत नसल्यास जाणकारांनी शंका निरसन करावे

(व्यक्ती टू व्यक्ती संपर्क आपल्याकडे इतर देशांच्या तुलनेत आधीच प्रचंड प्रमाणात झालेला असणार.)

नक्की माहीत नाही

1. हा रोग प्रामुख्याने शीत भागात जास्त पसरला आहे , उदा उत्तर चीन , युरोप आणि ऑस्ट्रेलिया
2. जे मेलेत ते प्रामुख्याने म्हातारे आहेत , भारतात इतके आयुर्मान कदाचित नसेल
3. जिथली आरोग्य यंत्रणा कार्यक्षम आणि प्रामाणिक असते , तिथल्या कागदावर जास्त केसेस येतात , क्रोनाने मेला हे कळूनही किंवा कदाचित न कळल्याने न्यूमोनिया वगैरे निदान 'दाखवले' तर ती केस काऊंट नाही होणार , चीन नेही आधी अननोन न्यूमोनिया वगैरे कारणे दाखवली होती, अर्थात त्यांनाही तेंव्हा नक्की जनटू अजून माहीत नव्हता
4. ज्या भागात मलेरिया जास्त दिसतो तिथे करोना कमी आढळतो , असेही एक निरीक्षण समोर येत होते , पण अधिकृत पुरावा नाही ,
https://www.outlookindia.com/newsscroll/no-evidence-countries-with-malar...

उलट कदाचित पुढचा नंबर आपण आणि आफ्रिका असेल

( हे वाचल्यापासून रात्री माच्चरदाणीत झोपू की नको हा एक नवीन गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. )

5. रोग निदान पुरेसे नाही , म्हणजे संशयित , त्यांचे कुटुंबीय , त्याम्चे संपरकीत लोक सर्वांच्या टेस्ट व्हायला हव्यात , आपल्याकडे ह्यातले निम्मे लोक गायब होतात , टेस्ट देखील घशातील व नाकातील द्रव अशा दोन प्रकारे होऊ शकते , पण त्यातही फक्त 2/3 केसेस निदान होते , उरलेल्या पॉझिटिव्ह असूनही निगेटिव्ह येतात, अगदी अचूक निदान व्हायला फुफुसात दुर्बीण घालून द्रव मिळवतात , त्याचीही पॉझिटिव्ह येण्याची क्षमता 95 % च आहे , आणि ती अगदी खरचीक आहे

पण तसेही अजून आपले पूर्ण पिक्चर समोर आले नाही , लोकसंख्याही भरपूर आहे, नक्की काय कुणालाच माहीत नाही

जितक्या तपासण्या झाल्या तितकेच आकडे उपलब्ध

तपासण्याच मुळात फार कमी झाल्या असणार

BLACKCAT उत्तम प्रतिसाद

Submitted by दीजो on 27 March, 2020 - 22:28 >>

याच्यावरून आठवलं... आपले उदात्त विचाराचे उदय भौ काय करतात हल्ली? कुठे गायब झालेत?

तपासण्याच मुळात फार कमी झाल्या असणार.सहमत. who पण हेच सांगत आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात भारतातील चाचण्या सर्वात कमी आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने कर्फ्यु 30 एप्रिलपर्यंत चालू ठेवा असे अंतरिम आदेश दिले आहेत असे आज वाचनात आले. हे खरं आहे का?

https://www.maharashtratoday.co.in/interim-court-orders-in-maha-to-conti...

बातमीत केसेस ना स्थगिती दिली यावर जास्त भर असल्याने नीट क्लिअर होत नाहीये.

ब्लॅककॅटने लिहिल्यापैकी वा इतर जे कारण आहे ते ... पण भारतात हे फैलावु नये हीच प्रार्थना. खरंच चीनने काही केले असेल का? जगभरातल्या सर्व मोठ्या कंपन्यांचे स्टॉक्स कोसळेलेले असताना त्यानी विकत घेतलेत त्यामुळे प्रचंड प्रमाणावर आर्थिक नाड्या त्यांच्या हातात आल्यात हे सगळं खरं असेल तर काय याची भिती वाटू लागलीये.
इथे ट्रं ज्या पद्धतीने हाताळत आहे ते पाहुन मोदी सरकारने उत्तम केले आहे हे अजुनच जाणवते. फक्त गरज नसताना लोक घरी बसले तर उत्तम.

Prasar Bharati
@prasarbharati
Please share your pictures watching Ramayan and Mahabharat on Doordarshan through twitter and facebook with #ThanksPMThanksDD

मध्यमवर्ग आणि वरच्यांसाठी ही पगारी सुट्टी आहे. उन्हाळी सुटीत मुलांसाठी संस्कारवर्ग लावतात तसे यांच्यासाठी संस्कारवर्गही सुरू झालेत.

त्यात तुला वाईट काय दिसतय भरत? रामायण लोकांनीं पाहिले तर फुरोगाम्याना पोटशूळ का उठावा? त्यात लोकांना हिंसाचाराची वा अत्याचाराची शिकवण मिळतेय का?

छान

सेलिब्रिटीजचे हात धुण्याचे, थाळ्या ब डवण्याचे, व्यायाम करतानाचे व्हिडियो झाल्यावर आता मध्यम वर्गाचे टीव्ही बघतानाचे फोटो अपलोड करूया.
मज्जानु लाइफ.

रिकाम्या वेळात "जिहाद" ची शिकवण घेऊन, निरपराध जनतेला ठार मारण्यापेक्षा टीव्हीवर रामायण पाहाण्यात काय वाईट आहे?

तसेही सुप्रीम कोर्टाने रामजन्मभूमी खटल्याचा निकाल बहुमतांने "हिंदू"च्या बाजूने दिल्यापासून, रामाचे नाव ऐकल्यावर आजकाल बर्याच पुरोगामींच्या पोटात पोटशूळ उठतो.

https://www.thehindu.com/news/national/other-states/coronavirus-governme...
पाटण्याच्या नालंदा मेडिकल कॉले जला करोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी निवडलेलं आहे. तिथल्या ज्युनियर डॉक्टरांनी सेफ्टी इक्विपमेंट्स ची मागणी केली होती. त्यांतल्या ८३ जणांना रोगाची लक्षणे दिसत आहेत आणि त्यांनी एकान्तवासात राहू देण्याची मागणी केली होती. दोन दिवस झाले तरी ती मान्य न झाल्याने आजारी अवस्थेतच ते रुग्णसेवा करत आहेत.

https://caravanmagazine.in/health/bihar-junior-doctors-forced-to-continu...

घरी राहून आम्ही पण स्ट्रीमिंग च करतोय. भारतीयांची धाव भुक्कड रामानंद सागर पेक्षा नक्कीच पुढे आहे. रामानंद सागर!!!! प्लीजच!!!

@अमितव, तुम्हाला माहीत नाहीय अस दिसतय, सरकारने रामायण बघा म्हणून कोणावरही सक्ती केलेली नाहीय. त्यामुळे टीका ना करता तुम्हाला जे बघायचं आहे ते बघू शकता..

रिपोर्टिंग होत नसावे असे वाटते>>>

ज्यांना संशयित म्हणून तपासणीसाठी इस्पितळात घेतले तेही पळून जाताहेत.

इथे कोणालाही कोरोनाचा शिक्का मारून नकोय, त्यामुळे तपासणीसाठी कोणी जात नसणारच. आजारी पडले तरी मला काहीही झाले नाही अशी स्वतःचीच समजूत काढली जात असेल.

दुसऱ्या बाजूने, इतरत्र ज्या वेगात साथ पसरली तशी ती भारतात पसरली नसेलच. भारतीयांची प्रतिकारशक्ती कोरोनाला तोंड देण्याइतपत मजबूत असेलही.

तितके रुग्ण दिसत नाहीत म्हणजे सरसकट खोटेच आहे असे मानूनच चालायला असे कुठे आहे.

आणि लोक झुंडीने जसे बाहेर फिरताहेत तसेच स्वतःच्या घरात गप्प बसलेलेही असंख्य आहेत. आम्हाला तर आता दर दिवशी दोन वेळा ऑफिस वेबसाईटला रिपोर्ट करावे लागतेय की आम्ही घरातच आहोत आणि कोरोनाची जी लक्षणे आहेत त्यापैकी एकही आमच्यात अजून दिसत नाहीये म्हणून.

भारतीयांची धाव भुक्कड रामानंद सागर पेक्षा नक्कीच पुढे आहे>>>

तुम्ही स्वतावरून भारतीयांची परीक्षा का करताय??? भारतात किमान 500 तरी चॅनेल्स असावीत आणि त्यातली निम्म्यानवर ज्या मालिका रोज दिसतात त्या मालिकांपेक्षा रामायण महाभारत बोमकेश सर्कस वगैरे बरेच बरे आहे. चित्रीकरण बंद असल्यामुळे सगळीच चॅनेल्स जुन्या मालिका दाखवताहेत. त्यात सर्व दर्जाच्या लोकांची सोय त्यांना बघावी लागणार. तुम्ही फक्त 'द ओल्ड फॉक्स' बघणारे असाल, पण बाकीच्यांना त्यातले एक अक्षर कळत नसेल पण रामायण आवडत असेल त्याला काय करणार???

मध्यमवर्ग आणि वरच्यांसाठी ही पगारी सुट्टी आहे. उन्हाळी सुटीत मुलांसाठी संस्कारवर्ग लावतात तसे यांच्यासाठी संस्कारवर्गही सुरू झालेत>>>

चांगले आहे. संस्कार हवेतच.

मुंबई उच्च न्यायालयाने कर्फ्यु 30 एप्रिलपर्यंत चालू ठेवा असे अंतरिम आदेश दिले आहेत असे आज वाचनात आले. हे खरं आहे का?>>>

मूळ निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचा आहे का??? निर्णय सरकारचा आहे. न्यायालय फारतर निर्णय चूक की बरोबर हे सांगेल, तेही कोणी विचारले तरच.

Pages