संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भारताबाहेर राहनाऱ्या लोकांनी आपले अनूभव शेअर करावेत की तिथे कशी परिस्थितीआहे,सरकार काय करीत आहे ,तुम्ही कसं मँनेज करीत आहात वगैरे

बहुतेक ठराविक वेळेत चालू राहतील.

आमच्या इथे आज दुकानात गर्दी करू देत नव्हते. दोर घेऊन दारात माणूस होता. इतकेच आत जाउद्या, ते बाहेर आले की पुढची बॅच. बाहेर उभे असलेल्याना योग्य अंतर ठेवून उभे राहा सांगत होते. हे शेजाणिकडून ऐकले. मी काल शेवटची गेले होते. महिनाभर पुरेल इतका साठा आहे.
>>>>>>
किराना,भाजीपाला सकाळी ८-११ वा.पर्यंत,पेपर सकाळी ७.००वा. पर्यंत
>>>>>>
धन्यवाद.

>>>>भारताबाहेर राहनाऱ्या लोकांनी आपले अनूभव शेअर करावेत की तिथे कशी परिस्थितीआहे,सरकार काय करीत आहे ,तुम्ही कसं मँनेज करीत आहात वगैरे>>>> न्यु जर्सी - बाहेर पडत नाही. टॉयलेट पेपर्स कमी झाले की पॅनिक होतोय Happy दुकानात कॅ श्यर नाही तर टॉयलेट पेपर्स पाशी पोलिस उभे केलेत.
बाकी बरीच ग्रोसरी घेउन ठेवलेली आहे.
काही हेल्थ फ्रीक व तरुण लोकं अजुनही जॉगिंग करताना दिसतात क्वचित.

घसरणारं शेअर मार्केट अजून पडायला नको, लोकांनी पॅनिक नको व्हायला म्हणून ट्रम्पने ते विधान केलंय.

संकटकाळी आपण गणपतीला हाक मारतो आणि २१ दुर्वांच्या जुड्या वाहतो. हे २१ दिवस त्या दूर्वांचं प्रतीक आहे.

किराना,भाजीपाला सकाळी ८-११ वा.पर्यंत,पेपर सकाळी ७.००वा. पर्यंत>>> कुठे बघितले? मी बघत होते तेव्हा काहीच सांगत नव्हते. घरातलं समान ८ दिवस पुरेल एवढे च आहे. साबा साबू, दोन लेकरं त्यातला लहान अडीच वर्षाचा आणि आम्ही दोघे. विचार केलेला की एक दोन दिवसात जाऊन किराणा समान भरू पण आज ही lockdown chi बातमी आली. '२१ दिवस घरातून बाहेर पडणे विसरून जा ' हेच सारखे कोट करून दाखवत होते. म्हणून समान आणायला बाहेर पडलो तर रस्त्यावर ही गर्दी. दुकानात तर लायनी लागलेल्या. D Mart वैगरे बंद. मेडिकलच्या बाहेर पण लायनी. शेवटी एव्हडी गर्दी पाहून तसेच परत घरी आलो. लोक खूपच पॅनिक होत आहेत. गर्दी बघून पण त्यात सामील होत आहेत. मला वाटतं की मोदींच्या भाषणात जीवनावश्यक गोष्टींबद्दल सविस्तर सांगितले पाहिजे होते.

कोंबडीचे अंडे २१ दिवसात उबवून पिल्लू बाहेर येते. आपणही अंड्यावर बसावे आता २१ दिवस, आता तेच काम आहे.

>>लोक खूपच पॅनिक होत आहेत. गर्दी बघून पण त्यात सामील होत आहेत. मला वाटतं की मोदींच्या भाषणात जीवनावश्यक गोष्टींबद्दल सविस्तर सांगितले पाहिजे होते.

+११११ अगदी हेच ! त्या वरच्या गाईडलाईन्स पाहिल्या तेंव्हा कुठे जीव भांड्यात पडला म्हणून लगेच शेअर केलेय.
थोडक्यात: Essential commodities shall be available so don't panic and hoard things

सूर्यगंगा, तुम्ही जी माहिती सांगितलीय ती फेक न्युज होती. असं कोणतंही वेळापत्रक नाही.
https://twitter.com/CPMumbaiPolice/status/1242295066313363456
मुंबई पोलिस कमिशनरनी स्पष्ट केलं आहे.
रिपब्लिक चॅनेलनेही ही अफवा पसरवली असं दिसतंय.

मार्केट यार्डात शेतकऱ्यांच्या मालाला व्यापारी तयार नाही,कारण हाताळणी करणारे मजूर नाही. वाहतूक बंद असल्यामुळे मजूर येऊ शकत नाही . आठवडाभरात कठीण परिस्थिती होईल. लवकरच लॉकडाऊन शिथील करावे लागणार असे दिसते. २१ दिवसाच्या लॉकडाऊनमागे फार विचार केलेला दिसत नाही.

तेलंगणा मध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितले आहे कि लोकांनी जर ऑर्डर फॉलो करून सहकार्य केले नाही तर जरुरत पडल्यास दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश सुद्धा देण्यात येतील

आत्ताच हि अवस्था. अजून वीस दिवस काढायचे आहेत Uhoh

..

लोक टीव्हीवर, रेडियोवर "एकवीस दिवस घराबाहेर पाऊल टाकू नका" हे ऐकताच साडेआठला पळाले किराणा आणि मेडिकल स्टोर्सकडे.
यांनी नऊ वाजून दहा मिनिटांनी जे ट्वीट केलं तेच भाषणात नीटपणे सांगते तर!

महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात सध्या एकही कोरोना रुग्ण आढळला नसेल आणि अजून आठवडाभरात एकही केस नोंदवली गेली नाही तर त्या जिल्ह्यात नियम शिथील करावे.

आताच फेसबूकवर वाचण्यात आले, महत्वाचे वाटले म्हणून शेअर करतो.

आज गुडीपाडवा आहे
बाहेर पडणाऱ्यांनी जाताना फक्त तांब्या आणि कापड न्या ...

.

बांबू पोलीस घेऊन उभे आहेतच Lol

इथे मोदींवर टीका करून काय होणार आहे? जिथे विकसित देश फेल जाताहेत तिथे एक अवाढव्य विकसनशील देश त्याला योग्य वाटेल असे प्रयत्न करत आहे. तर त्यात अमुक एक केले नाही म्हणून ओरडणारे कुठलीतरी एक स्टॅंडर्ड प्रोसिजर सांगू शकतील का ज्यामुळे एकही माणूस मूर्खासारखा वागणार नाही, सगळे मिळणार हे वारंवार सांगूनही दुकानात गर्दी करणार नाही, सगळे बंद असतानाही इकॉनॉमि वेगाने वाढेल इ इ .

वेगळा धागा काढा आणि तिथे द्वेषाची कांडी घेऊन बसा उगाळत सहाणेवर. हा धागा राहूदे, ज्यांना कुठे काही माहिती हवीय ते विचारायला व त्यांना मदत करू इच्छिणाऱ्या लोकांपर्यंत त्यांचे प्रश्न पोचायला. नाहीतर असले फालतू मेसेज बघून लोक यायचे थांबतील.

.
.
.

शहरातील सर्व ऑनलाइन किराणा दुकानदारांनी जसे बिग बास्केट, बिग बझार इत्यादींनी त्यांचे नवे जास्तीचे नंबर जाहीर केलेले आहेत. धान्ये, भाज्या ऑर्डरप्रमाणे घरपोच केल्या जातील. फक्त डिलिव्हरी आल्यावर ते सामान घरात घेताना पिशवीतले सामान काळजीपुर्वक काढून घेऊन पिशव्या एकतर टाकून द्या नाहीतर साबणाच्या द्रावणातून धुवून घ्या.

भाज्या वगैरे थेट फ्रीजमध्ये न ठेवता व्यवस्थित धुवून घ्या न नंतर फ्रीजमध्ये ठेवा.

आणि भाज्यांचे भाव वगैरे अजिबात वाढलेले नाही. नेहमीच्या किमतीला भाज्या मिळताहेत. उलट थोड्या स्वस्त आहेत.

ब्लॅककॅट हे वारंवार मोदींना प्रत्येक धाग्यात कमी दाखवण्याचा जानूनबूजून प्रयत्न करत असतो. खरे तूम्ही आगीत तेल ओतू नका.

दुकानात कॅ श्यर नाही तर टॉयलेट पेपर्स पाशी पोलिस उभे केलेत. >> तुम्हाला पुलिसिंग करताहेत असं म्हणायचं आहे ना? का ऍपल स्टोअर सारखे वर्दीत पुलिस बोलावले बारात? : D

Sadhna can you please share big bazar and big basket numbers for home delivery. I tried big basket app but it is not working.

Is it allowed for us to walk to shops for grocery shopping?

Plan for 63 ,meals * number of people in the house.

दुकाने उघडी, परंतू ब्रेड बिस्किटे खतम. नवीन स्टॉक येण्याची खात्री नाही. छोट्या बेकऱ्या बंद. लॉक डाऊन घोषणा करून मोकळे. उत्पादन कसं करणार. अजून २१ दिवस काढायचे आहेत. छोट्या शहरात खरेदी करता बाहेर पडले तर रट्टे पडतात. सगळं काही आपोआप सुरळीत होईल असा सरकारला ठाम विश्वास.

Pages