खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद! माहेर सातारा फलटण, सासर सांगायला रत्नागिरी खेड पण आतापर्यंत 4 पिढ्या पुण्यात वास्तव्यास आहेत. होळी ला जातो गावी. Happy

वाह! काय मस्त फोटो आहेत. आज नेमका ब्रेकफास्ट नाही, लंच पण मॅगी Sad त्यामुळे हे फोटो पाहून अजूनच भूक खवळली.

Today's special beetroot कोशिंबीर, अख्खा मसूर IMG-20200227-WA0005.jpg

यम्मी!!!
ममो ते मिरची लोणचं राहीले. Happy

व्वाह मस्त ! कुळथाच पिठलं !!
गरमागरम घ्यावं वाफाळत्या भातावर.. त्यासोबत दोन लांबसडक सुके बोंबील भाजून शेजारी ठेवावेत.. आणि तिखट चवीसाठी लाल ठेचा !!
मग खिडकी उघडावी आणि पावसाल म्हणावे आता कोसळ Happy
कोसळला खरोखर तर खिडकीतच बसून चार घास गरमागरम खाऊन घ्यावेत.. हा एकंदरीतच माझा आवडीचा ऊद्योग.. जो जुन्या घरात दर पावसाळ्याच्या सीजनला वारंवार चालायचा !

आणि हा माझा कुळथाचा झब्बू.
बरंच सॉफ्ट वर्जन आहे. काही दिवसांपूर्वी एका मित्राला कुळथाची पिटी काय असते हे दाखवायला फोटो काढलेला. सोबत सुक्या बोंबलाची चटणी आहे. तेवढी चपाती ऐवजी तांदळाची भाकरी हवी होती.

शेवटचे दोन्ही मेनु... खतरनाक.

कुळीथ पिठलाबरोबर, जवळा चटणी ( कव्चा कांदा आणि कच्चे तेल घालून) आणि भाकरीच पाहिजे. भात वाफाळताच हवा.

माझा झब्बू कुळीथ उकडलेले ड्राय शेंगोळे. येता जाता तोंडात टाकता येतात. नेहमीप्रमाणे भरपूर कांदा लसूण घालून.
बाईंडिंग चांगले व्हावे म्हणून दोन चमचे बेसन.

IMG-20200228-WA0004.jpgIMG-20200228-WA0003.jpg

कुळीथाची पिठी स्लर्प
बोंबील चटणी भाहारीही. बरेच दिवसात केली नाहीये. उद्या करतेच. आणि ऋला झब्बू देणार Happy

हा धागा मस्त आहे!!
मी स्वतः अजिबात फुडी नाही पण फूडफोटो बघायला फार आवडतं. पाककृती धागेदेखील फक्त फोटो बघायला उघडत असते. आता ती हौस इकडे भागतेय Lol
असेच फोटो टाकत रहा लोकहो!

कुळीथ पिठलं रेसिपी टाकाल का? >>>
https://www.maayboli.com/node/55550 >> हे बघ इथे भरपूर चर्चा आहे.

पाफा खरच रेसिपी येऊ दे भारी दिसतायत.

ऋ फोटो भारी (ते बोंबील सोडून)☺

बोंबील चटणी ची काय ती रेस्पी? Happy
सुके बोंबील नीट करुन घ्यायचे. म्हणजे डोके आणि शेपटा कापुन बोटभर लांबीचे किंवा थोडे लहान तुकडे करुन घ्यायचे.
तव्यार सुकेच भाजुन घ्यायचे. पाण्यात भिजवून धुवुन घ्यायचे. मी बरेचदा त्याच्या मधला काटा काढते थोडा जास्त वेळ भिजवून. काटा न काढताही करते कधीकधी. भरपुर कांदा बारीक चिरुन जरा जास्तच तेलावर परतुन त्यात टोमॅटो बा चि परतुन मग २-३ हिरव्या मिरच्या मधे स्लिट देउन, कडीपत्ता घालावा. हे जरा मउ शिजलं की हळद, लाल तिखट, मीठ घालायचं. धुवलेले बोंबीलाचे तुकडे घालायचे सगळं नीट मिक्स करुन झाकण ठेवुन थोडं होउ द्यायचं. मग कैरी/कोकम घालायचं. मधेमधे परतत रहायचं. उलुसं पाणी घालायचं. थोडा वेळ शिजल्यावर वरुन कोथिंबीर घालायची. एक वाफ आली की झालंच. भाकरी बरोबर खायचं. Happy

Pages