Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद! माहेर सातारा फलटण,
धन्यवाद! माहेर सातारा फलटण, सासर सांगायला रत्नागिरी खेड पण आतापर्यंत 4 पिढ्या पुण्यात वास्तव्यास आहेत. होळी ला जातो गावी.
< img src="https://www
प्र का टा आ
< img src="https://www
.
वाह! काय मस्त फोटो आहेत. आज
वाह! काय मस्त फोटो आहेत. आज नेमका ब्रेकफास्ट नाही, लंच पण मॅगी त्यामुळे हे फोटो पाहून अजूनच भूक खवळली.
मी तळलेले मासे
मी तळलेले मासे
2nd photo बांगडा आहे का
2nd photo बांगडा आहे का
बोकलत, त्या खेकड्याची रेसेपी
बोकलत, त्या खेकड्याची रेसेपी टाका हो !!
2nd photo बांगडा आहे का
2nd photo बांगडा आहे का
>>>
रावस आहे
मला सुरमय वाटली.... मजा आहे.
मला सुरमय वाटली.... मजा आहे.
मांस-मच्छर सोडलय एक महिना....
ऋ, जबरी फोटो. आत्ता तुकडा
ऋ, जबरी फोटो. आत्ता तुकडा तोंडात टाकावा वाटतोय.
बोकलत, त्या खेकड्याची रेसेपी
बोकलत, त्या खेकड्याची रेसेपी टाका हो !!>>>संध्याकाळी टाकतो.
Today's special beetroot
Today's special beetroot कोशिंबीर, अख्खा मसूर
आज मस्त पैकी गरम वाफाळता
आज मस्त पैकी गरम वाफाळता भात, तूप आणि कोकण स्पेशल कुळथाचं पिठलं
Yummy.. तांदूळ कोणता आहे?
Yummy.. तांदूळ कोणता आहे?
जिरेसाळ आहे
जिरेसाळ आहे
यम्मी!!!
यम्मी!!!
ममो ते मिरची लोणचं राहीले.
वा ममो. किती दिवसात कुळथाच
वा ममो. किती दिवसात कुळथाच पीठलं खाल्ले नाही.
धन्यवाद शीतल पाफा, स्वस्ति.
धन्यवाद शीतल पाफा, स्वस्ति.
स्वस्ति घरी ये झकास पैकी कु पि करून वाढते .
व्वाह मस्त ! कुळथाच पिठलं !!
व्वाह मस्त ! कुळथाच पिठलं !!
गरमागरम घ्यावं वाफाळत्या भातावर.. त्यासोबत दोन लांबसडक सुके बोंबील भाजून शेजारी ठेवावेत.. आणि तिखट चवीसाठी लाल ठेचा !!
मग खिडकी उघडावी आणि पावसाल म्हणावे आता कोसळ
कोसळला खरोखर तर खिडकीतच बसून चार घास गरमागरम खाऊन घ्यावेत.. हा एकंदरीतच माझा आवडीचा ऊद्योग.. जो जुन्या घरात दर पावसाळ्याच्या सीजनला वारंवार चालायचा !
आणि हा माझा कुळथाचा झब्बू.
बरंच सॉफ्ट वर्जन आहे. काही दिवसांपूर्वी एका मित्राला कुळथाची पिटी काय असते हे दाखवायला फोटो काढलेला. सोबत सुक्या बोंबलाची चटणी आहे. तेवढी चपाती ऐवजी तांदळाची भाकरी हवी होती.
शेवटचे दोन्ही मेनु... खतरनाक.
शेवटचे दोन्ही मेनु... खतरनाक.
कुळीथ पिठलाबरोबर, जवळा चटणी ( कव्चा कांदा आणि कच्चे तेल घालून) आणि भाकरीच पाहिजे. भात वाफाळताच हवा.
कु.पि. जगात भारी पदार्थ आहे!
कु.पि. जगात भारी पदार्थ आहे! अहाहा!
वरचे मासे तर कातिल दिसताहेत.
धन्यवाद ममो.
धन्यवाद ममो.
माझा झब्बा
माझा झब्बू कुळीथ उकडलेले ड्राय शेंगोळे. येता जाता तोंडात टाकता येतात. नेहमीप्रमाणे भरपूर कांदा लसूण घालून.
बाईंडिंग चांगले व्हावे म्हणून दोन चमचे बेसन.
कुळीथ पिठलं रेसिपी टाकाल का?
कुळीथ पिठलं रेसिपी टाकाल का?
वा पाफा मस्त... हा प्रकार
वा पाफा मस्त... हा प्रकार नाही खाल्ला कधी.. रेसिपी द्या की तोडकीमोडकी
कुळीथाची पिठी स्लर्प
कुळीथाची पिठी स्लर्प
बोंबील चटणी भाहारीही. बरेच दिवसात केली नाहीये. उद्या करतेच. आणि ऋला झब्बू देणार
हा धागा मस्त आहे!!
हा धागा मस्त आहे!!
मी स्वतः अजिबात फुडी नाही पण फूडफोटो बघायला फार आवडतं. पाककृती धागेदेखील फक्त फोटो बघायला उघडत असते. आता ती हौस इकडे भागतेय
असेच फोटो टाकत रहा लोकहो!
बोंबील चटणी भाहारीही>>>>>>>>>
बोंबील चटणी भाहारीही>>>>>>>>> रेसिपी येऊ दे.
रच्याकने कु.पिठले आणि कु.पिठी वेगवेगळी आहेत.
कुळीथ पिठलं रेसिपी टाकाल का?
कुळीथ पिठलं रेसिपी टाकाल का? >>>
https://www.maayboli.com/node/55550 >> हे बघ इथे भरपूर चर्चा आहे.
पाफा खरच रेसिपी येऊ दे भारी दिसतायत.
ऋ फोटो भारी (ते बोंबील सोडून)☺
बोंबील चटणी ची काय ती रेस्पी?
बोंबील चटणी ची काय ती रेस्पी?
सुके बोंबील नीट करुन घ्यायचे. म्हणजे डोके आणि शेपटा कापुन बोटभर लांबीचे किंवा थोडे लहान तुकडे करुन घ्यायचे.
तव्यार सुकेच भाजुन घ्यायचे. पाण्यात भिजवून धुवुन घ्यायचे. मी बरेचदा त्याच्या मधला काटा काढते थोडा जास्त वेळ भिजवून. काटा न काढताही करते कधीकधी. भरपुर कांदा बारीक चिरुन जरा जास्तच तेलावर परतुन त्यात टोमॅटो बा चि परतुन मग २-३ हिरव्या मिरच्या मधे स्लिट देउन, कडीपत्ता घालावा. हे जरा मउ शिजलं की हळद, लाल तिखट, मीठ घालायचं. धुवलेले बोंबीलाचे तुकडे घालायचे सगळं नीट मिक्स करुन झाकण ठेवुन थोडं होउ द्यायचं. मग कैरी/कोकम घालायचं. मधेमधे परतत रहायचं. उलुसं पाणी घालायचं. थोडा वेळ शिजल्यावर वरुन कोथिंबीर घालायची. एक वाफ आली की झालंच. भाकरी बरोबर खायचं.
Pages