Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Wow
Wow
खत्रा बोकलत !
खत्रा बोकलत !
आवरा!
आवरा!
बोकलत, लै भारी.
बोकलत, लै भारी.
बनवणारी सुगरण कोण आहे? की हॉटेल?
घरीच बनवलंय. बायको बनवते. मी
घरीच बनवलंय. बायको बनवते. मी पाय तोडून दिले फक्त. आंगडे कोळीणीने तोडून दिले. पाय तोडताना जरा वाईट वाटलं. ते खेकडे हातात घेतल्यावर पळायला पाहत होते. बोलत होते अरे जाऊ दे आम्हाला कशाला पाय तोडतोस आमचे. त्यांचे आंगडे पाय तोडल्यावर त्यांना वेदना होत नाही असं मध्यंतरी कुठेतरी वाचल्यासं आठवलं आणि माझ्या मनाची समजूत करून घेतली. पुढच्या काही वर्षांत मी प्युअर वेज होईल. नाही झालो तर खेकडे, मटण, चिकन सोडून देईन. मासे, कोलंबी यांच्याविषयी मला काही वाटत नाही.
असं काही लिहु नका ओ.
असं काही लिहु नका ओ.
खेकड्याचा रस्सा मस्त तर्रीदार दिसतोय. तांदळाची भाकरी सोबत स्लर्प....
बोकलत,तुमच्याशी सहमत!मलाही
बोकलत,तुमच्याशी सहमत!मलाही कुर्ल्या करताना हाच त्रास होतो.खायला आवडतात,पण ते पाय तोडणे हॉरिबल वाटते.
मागे माझ्या हाताच्या फ्रॅक्चर पासून तर हा gilt वाढला आहे.
बाकी बनवलेली डिश ख ल्लास आहे.
बोकलत, काय फोटो ... काय
बोकलत, काय फोटो ... काय फोटो !! जबरा आहे एकदम.
त्यांचे आंगडे पाय तोडल्यावर
त्यांचे आंगडे पाय तोडल्यावर त्यांना वेदना होत नाही असं मध्यंतरी कुठेतरी वाचल्यासं आठवलं आणि माझ्या मनाची समजूत करून घेतली
>>>
हे खरे असले तरी आता पाय तुटल्यावर आपल्याला आयुष्यभर चालता येणार नाही ही मनाला होणारी वेदना काय असेल याचा विचार करा..
पाय तोडणारा आता आपल्यालाही संपवणार हे जेव्हा लक्षात येते तेव्हा होणारी भितीदायक वेदना काय असेल विचार करा...
एकेक करून आपले सवंगडी मरताना बघत आता आपला नंबरची वाट बघणे किती वेदनादायक असेल कल्पनाही करवत नाही...
आयुष्यातला एक भलामोठा कालखंड बकरयाची वेदना जाणवल्याने मी मटण खाणे सोडले होते. खायचा प्रयत्न केला तरी छातीत दुखायचे.
सुदैवाने यातून बाहेर पडलो. अन्यथा आजही शाकाहार करत आपले जीवन जगत असतो.
मटण भाकरी आणि वजडी फ्राय
मटण भाकरी आणि वजरी फ्राय
वा बोकलत ! येऊद्या रोज ...
वा बोकलत ! येऊद्या रोज ...
पण याला वजडी देखील बोलतात का? आमच्याकडे वजरी बोलतात...
मला फारशी आवडत नाही. सगळ्यांना हे प्रकरण झेपतही नाही. पण एक आत्या कडक बनवायची. तिच्या हातचे तेवढे खायचो. अध्येमध्ये डबा भरून पाठवायची. मला ही पावासोबत खायला आवडायची. खीमापाव तसे वजरी पाव.. पण आत्या गेल्यानंतर गेले चारेक वर्ष हा प्रकार खाल्ला नाही
पण याला वजडी देखील बोलतात का?
पण याला वजडी देखील बोलतात का? आमच्याकडे वजरी बोलतात...>>> मी पण खरं तर वजरीच बोलतो, पण जॉबला लागल्यापासून बाहेर हॉटेलमध्ये एक दोनदा खाल्ले तिथे वजडी बोलायचे. एक दोन मित्रांकडूनही वजडी ऐकलंय. त्यामुळे वजडी लिहिलं. आता बदल करतो. वजरीच बोलतात याला.
मी गुरुवारी खात नाही पण
मी गुरुवारी खात नाही पण शेजाऱ्यांनी दिल्यामुळे नाईलाज झाला
आठवड्यातला एखादाच वार
आठवड्यातला एखादाच वार पाळायचा. आणि तो दर आठवड्याला सोयीने बदलायचा. उद्या महाशिवरात्री आहे. पण शुक्रवारही आहे. ऑफिसमध्ये फक्त तीनच दिवस नॉनवेज असते सोमवार बुधवार शुक्रवार, त्यामुळे हे वार चुकवता येत नाही. नाईलाजाने खावेच लागते
काय लोकं हो महाशिवरात्रीचा
काय लोकं हो महाशिवरात्रीचा काय मेनू हाय का नाय
आमच्याकडे सकाळी घरी तळलेले बटाटा वेफर्स, दुपारी पोटाला आधार म्हणून साबुदाणा वडे, रात्री आटवलेले दूध
दुधात काय टाकलंय. भारी दिसतंय
दुधात काय टाकलंय. भारी दिसतंय खूप. सीताफळ ज्यूस वाटतोय.
काजू बदाम, बदाम थोडावेळ गरम
काजू बदाम, बदाम थोडावेळ गरम पाण्यात ठेवले आणि सोलून घेतले. उभे काप केले
(No subject)
(No subject)
आमचा आज शुक्रवार होता. दुपारी
आमचा आज शुक्रवार होता. दुपारी ऑफिसला जेवतो. आज मांसाहारी थाली होती. तीच खावी लागली. आता रात्री घरी मात्र साबुखिचडी खाल्ली. पापपुण्याची फिट्टमफाट्टम झाली
रात्रीचे अडीच वाजून गेलेत..
रात्रीचे अडीच वाजून गेलेत..
या अल्पोपहार करायला...
नुसती खिचडी खाऊन कोणाचे पोट काही भरत नाही
साबू वडे कातिल दिसत आहेत
साबू वडे कातिल दिसत आहेत
उपवास सोडायला या
उपवास सोडायला या
कोथिंबीर वड्या काय दिसताहेत
कोथिंबीर वड्या काय दिसताहेत!ताटात बासुंदी आहे का? तोंडाला पाणी सुटले.
धन्यवाद देवकी, बासुंदीच पण
धन्यवाद देवकी, बासुंदीच पण आटवली नाहीये. दुध गरम करून वेलची जायफळ साखर तूप एवढच.
<<साबू वडे कातिल दिसत आहेत>>
<<साबू वडे कातिल दिसत आहेत>> धन्यवाद आशु
आज आंबोळी कम डोसा
आज आंबोळी कम डोसा
(No subject)
(No subject)
वाह! मस्त रंग पोत आलाय
वाह! मस्त रंग पोत आलाय आंबोळीला...
गाव कुठले तुमचे?
Pages