Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजोबा आले मूळपदावर.>>हा हा हो
आजोबा आले मूळपदावर.>>हा हा हो आणि आ सा तिकडे राजस्थानला हरवली त्या बद्दल कोणीच काही बोललंही नाही आजोबांना वाटतंय ति राजेंमुळे हरवली.
कोंबडीच्या, आता तिला स्वत : चा संसार आहे. लग्न झालय तिच , आता तरी तिचा पदर सोड. ">>+11111
आज कधी नाही ते आजोबा आसावरी
आज कधी नाही ते आजोबा आसावरी ला म्हणाले तुझा संसार तू कर शुभ्राला तिचा करू दे.. अचानक शहाणपणा कसा काय सुचला? डब्द्या ला चांगलं सूनवायला पाहिजे होतं शुभ्रआने
आजोबा आधी पण आसाला बर्याच
आजोबा आधी पण आसाला बर्याच वेळा बोलले होते कि डबड्याचे अती लाड करू नको. आजही चांगले सुनावले. पण आसावरी लवकर सुधारणार नाही.
आसाने थालीपीठ घेऊन आजोबांकडे
आसा थालीपीठ घेऊन आजोबांकडे जाते आणि त्यांना खायला सांगते तेव्हा आजोबा तिची चांगलीच कानउघडणी करतात. काल आजोबा एकदम मस्तच बोलले. हां पण त्यांनी एकदातरी त्या खोंडयाला झापायला हवे होते.
बबडयाने आणि आजोबान्नी
बबडयाने आणि आजोबान्नी शुभ्राची ' दुसरी आसा' करुन ठेवली आहे. ' शुभ्रा हे दे , ते दे' त्यातल्या त्यात आजोबा स्वावलम्बी झाले ही चान्गली गोष्ट झाली.
आता तर बबडया चार दिवसात अस काहीतरी करणार आहे म्हणे जेणेकरुन आसा कायमची ह्याच्याकडे राहायला येणार आहे. त्यापेक्षा तोच का जात नाहीत राजेन्च्या बन्गल्यावर.
आसा बबडयाला मोजक्या शब्दात समजावते मात्र शुभ्राला मात्र ' संसारातल्या तडजोडीच' लेक्चर देते.
नि.जो. ने इतकी टुकार भूमिका
नि.जो. ने इतकी टुकार भूमिका का केलीये? झी मराठी वाल्यांना एक दुबळी बिनडोक नायिका दाखवल्याशिवाय चैनच पडत नाही का?
कधीतरी ती बबड्याच्या कानाखाली वाजवेल म्हणून सिरिअल बघतेय मी.....आता सोडूनच द्यावी लागणारे...
( वैताग)
निजोला या वयात तिला
निजोला या वयात तिला केंद्रस्थानी ठेवून म्हणजे नायिकेची भूमिका मिळाली यात ती खूष आहे. आजकाल सगळ्या वाहिन्या अशाच मालिका दाखवतात. झी मराठीचा प्रेक्षकवर्ग अजून मोठा आहे आणि चला हवा येऊ द्या वगैरे पण प्रसिद्धी मिळते. तिला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतात प्रत्यक्ष भेटल्यावर. कलाकारांच्या मताला कोणी विचारात घेत नाही, करायचं तर करा नाहीतर घरी बसा, मालिका अशाच बिनडोक असतात आजकाल.
आसा ला एवढी बनारसी टाइप साडी
आसा ला एवढी बनारसी टाइप साडी काय दिलीय नेसायला?
बहुतेक राजे श्रीमंत आहेत म्हणून आसा घरीही भारीतल्या साड्या नेसते असं दाखवायचा असेल....
राजेंच किचन छान आहे.
राजे पास्ता खातात तो प्रसंग छान होता.
राजे पास्ता खातात तो प्रसंग
राजेंच किचन छान आहे. राजे पास्ता खातात तो प्रसंग छान होता. >>>>>>>++++++११११११११११
आसाने पास्त्याची वाट लावली.
बबडयाने नोकरी सोडली ( दुसर्यान्दा बहुतेक) म्हणे. बिजनेस करायचाय त्याला. सोहम फक्त दोनच गोष्टी करतो दिवसभरात. आसा - राजे च्या विरोधात खलबते करणे नाहीतर मोबाईलवर गेम खेळत बसणे. बिजनेस कधी करतो ते तोच नाहीतर देव जाणे!
प्रज्ञा राजेन्ना सोडून बबडयाच्या मागे लागलीय. बबडया तिला ताई म्हणाला.
आत्ता एपी बघितला. बबड्या
आत्ता एपी बघितला. बबड्या ज्याप्रकारे शुभ्राला वागवत होता ते बघुन अक्षरशः तळपायाची आग मस्तकाला गेली. बबड्याला उचलुन आपटावस वाटत होत.
बबड्याने दोन बादली पाणी ओतून
बबड्याने दोन बादली पाणी ओतून दिले. किती वाईट आहे हे. असे प्रसंग का दाखवतात. प्रज्ञा म्हणते आम्हाला ताजे पाणी लागते. सिरिअसली जिथे पाऊस पडत नाही तिथे हे बघितलं तर येऊन मारतील लेखक-दिग्दर्शकाला.
शुभ्राने सोहमशी घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करावे आणि आजोंबानी असावारीकडे राहायला जावे. पोळी एव्हडी करपलेली कोण खातं.
पोळी एव्हढी करपलेली कोण खातं.
पोळी एव्हढी करपलेली कोण खातं.>>> >>>मी स्वतः केलेली असेल तरच खाऊ शकते.
बबड्याच्या पापांचा घडा कधी
बबड्याच्या पापांचा घडा कधी भरणार आहे?
शुभ्राने सोहमशी घटस्फोट घेऊन
शुभ्राने सोहमशी घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करावे आणि आजोंबानी असावारीकडे राहायला जावे.>>किमान शुभ्राने पण आसावरीकडेच राहायला जावे. राहूदे बबड्याला एकटे.
शुभ्रा एवढे जरीचे ड्रेसेस
शुभ्रा एवढे जरीचे ड्रेसेस घालून ऑफिसमधे जाते का? रोज तिच ती कर्ल्स हेअरस्टाईल बघून कंटाळा आला. किचनमधे पण काम करताना केस मोकळे, ओढणी लोळतेय
किचनमधे पण काम करताना केस
किचनमधे पण काम करताना केस मोकळे, ओढणी लोळते >>>+१
कधीतरी ती बबड्याच्या कानाखाली वाजवेल म्हणून सिरिअल बघतेय मी.....आता सोडूनच द्यावी लागणारे...>>+१
कोणीतरी खरेच त्याच्या कानाखाली द्यावी.
आणि हा बबड्या बिझनेसमन झाला
आणि हा बबड्या बिझनेसमन झाला कधी, घरात तर कोणाला पत्ता आहे असं वाटत नाही.
आता आसा शुभ्रावरच घसरेल, तिला मुलाची कधी चूक वाटतचं नाही. इतकं कसं कोणी आंधळं प्रेम करू शकतं ?
बबड्या, प्रज्ञाच्या किट्टी
बबड्या, प्रज्ञाच्या किट्टी पार्टीचा मेम्बर झाला (इनशॉर्ट प्रज्ञाला पैसे खर्च करणारा बकरा मिळाला). काय ना आयजीच्या जीवावर बायजी उदार. (इथे आयशीच्या जीवावर पोरगा उदार).
त्या किट्टी पार्टीवाल्या
त्या किट्टी पार्टीवाल्या बायका बबड्याला घोळात घेतात आणि हा मोठं मोठे ढाचे द्यायला लागतो. अगदीच हसू आले. सोहमने आजोबांशी तरी असे वागायला नको होते। अचानक आजोबांना काय झाले कोणास ठाऊक स्वतःचे नाव, गाव विसरले.
आता आसा शुभ्रावरच घसरेल, तिला
आता आसा शुभ्रावरच घसरेल, तिला मुलाची कधी चूक वाटतचं नाही. इतकं कसं कोणी आंधळं प्रेम करू शकतं ? >>>>>>>> नैतर काय! बबडया हिला फालतू कारणान्साठी सदानकदा बोलावतो तेव्हा बरी हि धावत येते घरी, पण शुभ्रा आणि आजोबान्ना खरी गरज असते तिची तेव्हा ही गायब!
राजेन्ना म्हणत होती की मी रिकाम्या घरात एकटी असते, घर खायला उठत वै वै. इतका कन्टाळा येत होता तर जायच होत ना आजोबान्ना चेकअपला घेऊन. वान्गयाच भरीत मह्त्वाच की चेकअप?
अचानक आजोबांना काय झाले कोणास ठाऊक स्वतःचे नाव, गाव विसरले. >>>>>>>>> अगदी अगदी. म्हातारपणी विस्मरणाचा आजार होतो म्हणा. पण हा आजार त्यान्नी टप्याट्प्याने दाखवायला हवा होता.
पहिला टप्पा आजच होता
पहिला टप्पा आजच होता
पण शुभ्रा आणि आजोबान्ना खरी गरज असते तिची तेव्हा ही गायब!>> तिला माहितच नाही कि बबड्याने हा घोळ घातला आहे.
बबडया हिला फालतू कारणान्साठी सदानकदा बोलावतो तेव्हा बरी हि धावत येते घरी,>>+११११ आजोबा, राजे यांनी तिला सांगितले कि अशी लगेच पळत जात जाऊ नको पण ती त्याकडे व्यवस्थित दुर्लक्ष्य करते. बबड्याने कार्ड घेतले होते हे सुद्धा राजेंपासून लपवते.
स्वतःच्या मुलाच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष्य करते तेही जाऊदे पण जो माणूस आपल्यावर प्रेम करतो, कशाला नाही म्हणत नाही, कधी मोठ्या आवाजातही बोलत नाही त्याला तरी फसवू नये.
आजोबा, राजे यांनी तिला
आजोबा, राजे यांनी तिला सांगितले कि अशी लगेच पळत जात जाऊ नको पण ती त्याकडे व्यवस्थित दुर्लक्ष्य करते. बबड्याने कार्ड घेतले होते हे सुद्धा राजेंपासून लपवते.
स्वतःच्या मुलाच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष्य करते तेही जाऊदे पण जो माणूस आपल्यावर प्रेम करतो, कशाला नाही म्हणत नाही, कधी मोठ्या आवाजातही बोलत नाही त्याला तरी फसवू नये. >>>>>>>>++++++१११११११११
आसाने काल माबो वाचल वाटत. सारख ' मीच आजोबान्ना घेऊन जायला हव होत, मी चुकले' म्हणत होती. ती शुभ्रावर ओरडली त्याचा राग तर आलाच, पण सर्वात जास्त राग कारखानीस काकान्चा आला. त्यान्नी स्वतः बबडया आणि प्रज्ञाला एकत्र येताना पाहिल होत, हे त्यान्नी सान्गितलच नाही आसाला. तोण्डाला कुलूप लावून गप्प उभे होते तमाशा बघत.
शुभ्राने बबडयाला कोण्डीत पकडल, गप्प बसली नाही हे चान्गल केल.
करण अर्जून झालेल्या मुलान्ची कामे छान झाली होती. मजेशीर वाटला त्यान्चा सीन.
घडलेल्या प्रकारानन्तर राजे आता सगळयान्ना त्यान्चा घरी घेऊन जाणार वाटत.
करण अर्जुन काय, कधी झालं हे.
करण अर्जुन काय, कधी झालं हे.
सर्वात जास्त राग कारखानीस
सर्वात जास्त राग कारखानीस काकान्चा आला. त्यान्नी स्वतः बबडया आणि प्रज्ञाला एकत्र येताना पाहिल होत, हे त्यान्नी सान्गितलच नाही आसाला. तोण्डाला कुलूप लावून गप्प उभे होते तमाशा बघत.>>>हो.
करण अर्जुन काय, कधी झालं हे.
करण अर्जुन काय, कधी झालं हे. >>>>>>>> आजोबान्ना लुटण्यासाठी त्यान्ना दोन चौदा वर्षाची मुले ' करण अर्जुन' नावे सान्गतात स्वत: ची. त्यान्च्या विस्मरणाचा फायदा घेऊन त्यान्ना फिरायला नेतात. परवाच्या आणि कालच्या भागात झाल हे.
धन्यवाद सुलू. करण अर्जुन नाव
धन्यवाद सुलू. करण अर्जुन नाव सांगतात तो प्रसंग मी बघितला नसेल पण बाकी माहितीये. राजेंच्या घरी मजा सगळ्यांची, टाळ्या वाजवत बसतील सगळे.
शुभ्रानेच सोलावं चांगलं
शुभ्रानेच सोलावं चांगलं सोहमला, तरी तो निर्लज्ज आहेच म्हणा तसाही. ती एवढं बोलल्यावर तिलाच उलटपालटं बोलत होता.
आजोबा पण नको तेव्हा गप्प बसतात. हाल होतात तुमचे तर लगेच अॅग्री झाले. बिचारी शुभ्रा एवढं सगळं तर करते की आजोबांसाठी.
आता राजे तरी घरजावई म्हणून येतील किंवा ही सगळी वरात त्यांच्या घरी नेतील.
आता राजे तरी घरजावई म्हणून
आता राजे तरी घरजावई म्हणून येतील किंवा ही सगळी वरात त्यांच्या घरी नेतील.>>+१
डबड्या आणि आसावरी दोघेही सुधारणार नाहीत.
हो बिलकूलच नाही सुधारणार. जशी
हो बिलकूलच नाही सुधारणार. जशी खाण तशी माती.
आता राजे तरी घरजावई म्हणून
आता राजे तरी घरजावई म्हणून येतील किंवा ही सगळी वरात त्यांच्या घरी नेतील. >>>>>
हो राजे त्यांच्या राजमहालात नेतील बहुदा सर्व वरात. त्या गुलमोहोर सोसायटीचे एक वर्षाचे ऍग्रिमेंट संपले असेल तसे पण दोन दोन फ्लॅट (आसा आणि ते दुसरे चष्मा फुटलेले काकांचे घर ) चे भाडे नसेल परवडत.
Pages