अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मालिका म्हणू नका चित्रपट म्हणू नका सगळीकडे तीच तर्‍हा.
दोघे अगदीच नवखे नाहीत. त्यातून येव्हढा मोठा पलंग.. दोन टोकाला दोघे आरामात झोपले असते. पण नाही.

Submitted by sonalisl on 22 January, 2020 - 15:10 >>> अरे ह्यांना कोणी हिंदी बिग बॉस १३ दाखवा रे , म्हणजे किमान पलंगाच्या दोन टोकावर तरी पडतील Proud

वीज कडाडून घाबरायचा काळ गेला वाटतं.. फुगा विजेची भूमिका करणारे नि आसावरी घाबरून बिलगणे वगैरे डोक्यात असेल का राजेंच्या?

 

अग्गोबाई.. ह्या डबड्याला तर most desirable men असा अवॉर्ड देऊ केला आहे 10 व्या नंबर आहे हा डबडा (lol..) आता हा वशिल्याचा टट्टूला अजून कोणकोणते अवॉर्ड देणार..
कठीण आहे बुवा..

नवीन बायकोला फुगा फोडून घाबरवलं. >> सिरीअसली, असे काही दाखवलेय का? कित्ती बालीश.

Submitted by VB on 23 January, 2020 - 00:18

बालिशपणा काय त्यात ... नाहीतरी आसा घाबरटच आहे,नवीन घरात जरा अवघडतो माणूस आणि काळोखात अचानक असा आवाज झाल्यावर कोणीही घाबरणारच.
matured लोकांनी काय बालिशपणा करू नये. का गुढघ्यांना तेल लावत बसावे पहिल्या रात्री आणि किस्से सुनवावे गुजरे जमाने के.

@ Ajnabi

तुम्ही पाहता का तुर्की सिरिअल्स?
मला आवडतात. kara sevda माझी सगळ्यात आवडती तुर्की सिरीयल आहे. मी अगदी प्रेमात आहे त्या सिरिअलच्या.

@ Ajnabi

तुम्ही पाहता का तुर्की सिरिअल्स? >>>> हो Ashwini_९९९, पाहते पण हिंदी डबडं. द प्रॉमिस हि दुसरी याआधी ब्रेव्ह अँड ब्युटीफुल पाहिली त्यातले सगळे कलाकार खूप खूप आवडतात हिरो तर खूपच.

सेम पिंच अजनबी ... मग तर kara sevda पहाच...
मी इंग्लिश subtitle असलेल्या पाहाते. ....सध्या kara para ask pahtiye

बालिशपणा काय त्यात ... नाहीतरी आसा घाबरटच आहे,नवीन घरात जरा अवघडतो माणूस आणि काळोखात अचानक असा आवाज झाल्यावर कोणीही घाबरणारच.
matured लोकांनी काय बालिशपणा करू नये. का गुढघ्यांना तेल लावत बसावे पहिल्या रात्री आणि किस्से सुनवावे गुजरे जमाने के. >>>>>>> ++++++१११११११ मला तरी ते बेड शेअर न करण पटल. त्यान्च्यात तेवढी कम्फर्ट लेव्हल नाहीये अजून. सो ठीक आहे. अगदी आल्या आल्या लगेच बेड शेअर केलेल दाखवल तर ते ऑकवर्ड वाटल असत बघायला.

सरन्जाम्यान्नी व्हिला राजेन्ना विकला वाटत. ते पिन्कीमावशीच फेवरिट झुम्बर सुद्दा तिकडे आहे.

आजोबा म्हणतात आता ते झुम्बर आसालाच साफ कराव लागेल. का? घरात नोकरचाकर नाहीये का? राजे म्हणत होते की ते आसाला राणीसारख ठेवतील.

मी कोरियन सिरिअल्स पाहते इंग्लिश subtitle असलेल्या. बादवे ह्या तुर्की सिरियल्स लागतात कुठे?

मी कोरियन सिरिअल्स पाहते इंग्लिश subtitle असलेल्या. बादवे ह्या तुर्की सिरियल्स लागतात कुठे?

नवीन Submitted by सूलू_८२ on 23 January, 2020 - 07:20 >>>>

मी mx player वर बघते त्यात सध्यातरी our story , the promise, cennet , feriha, my favourite brave & beautiful आहेत.
हिंदीत छान डब केल्यात मी एकदा कोरियन मध्ये ट्रॅक चेंज करून बघायला गेले पण तो आवाज त्या क्यारेक्टेर्सचा मूळ आवाज असू शकतो हे सहनच करू शकले नाही इतका हिंदी ब्लेंड झालाय.

आजोबा आणि सोम्याच्या लबाडीच्या त्या १० लाख प्रकरणाचा शेवट काय झाला ?

Submitted by रावी on 23 January, 2020 - 05:53 >>>
ते फक्त कन्फयुजन निर्माण करून लग्न टाळण्यासाठी सॊहमचा प्लॅन होता। सध्यातरी आजोबांना माहित आहे त्यांनी त्याला विचारले सुद्धा. आसाला आणि शुभ्राला माहीत नाही.

धन्स अजनबी Happy

कुठली कोरियन सिरियल पाहिली हिन्दी डबिन्गमध्ये?

लग्नातले दहा लाख तर खोटे खोटे होते पण राजेंनी सोहमला खरे नऊ लाख दिले आहेत त्याचं काहीच नाही दाखवत. लेखकाच्या लक्षात असेल तर दाखवेल. राजेंनी विचारलं तरी आसावरी म्हणेल, जाऊ द्या हो, काही बोलू नका माझ्या बबड्याला, झाले असतील खर्च त्याच्याकडून.

राजेंचं म्हणणं पटलं, की दोघं गेली बरीच वर्ष एकटे एकटे आहेत. सो एकदम असं एका बेडवर झोपणं ऑकवर्ड वाटेल. आधी आपण एकमेकांना समजून घेऊ, थोडा वेळ घालवू एकत्र मग ह्ळूहळू होईल सवय. विच इज क्वाईट करेक्ट.

सोहमचा मित्रही त्याच्याइतकाच बालिश आहे. हे असं लहान मुलं चिडवतात एकमेकांना. आजकाल तर लहान मुलांनाही लवकर समज येते. कधी वाढणार हे ठोंबे बुद्धीने. प्रज्ञा म्हणते साली आधी घरवाली Uhoh

@अजनबी

मी मुद्दाम इंग्लिश subtitle असलेल्या बघते. त्या कॅरॅक्टरचा मूळ आवाजच ऐकायला छान वाटतो.

@ सुलु
तुर्की सिरिअल्स you tube वर available आहेत. इंग्लिश subtitle आहेत.

धन्स अश्विनी Happy

राजेंचं म्हणणं पटलं, की दोघं गेली बरीच वर्ष एकटे एकटे आहेत. सो एकदम असं एका बेडवर झोपणं ऑकवर्ड वाटेल. आधी आपण एकमेकांना समजून घेऊ, थोडा वेळ घालवू एकत्र मग ह्ळूहळू होईल सवय. विच इज क्वाईट करेक्ट. >>>>>>>> ++++++१११११११११

कालचा एपिसोड आवडला. राजे आणि आसामधला सटल रोमान्स दाखवला.

आसा तिच्या माहेरी पहाटे जाते. किचनमध्ये काम करते तरीही शुभ्रा , सोहम आणि आजोबान्ना जाग कशी आली नाही भाण्डयान्च्या आवाजाने? इतके साखरझोपेत होते का हे तिघे?

बर तिकडे आसा किचनमध्ये काम करतेय आणि राजे गाढ झोपले. जराही मदत नाही केली बायकोला.

ते फुन्कर मारुन केसाची बट उडवण आणि चहाचा सिन ह्याआधी कितीतरी सिरियल्समध्ये बघितलय. काहीतरी नवीन दाखवा.

आसावरी लाल साडी नेसून झोपते आणि मग अचानक आठवण आली चला म्हणून माहेरी टपकते. शुभ्रा आणि सोहम दाखवलेच नाहीत. घरी कधी परत येतात वगैरे काहीच नाही आणि कोणत्या तरी दिवशी आसावरी सकाळी गाऊन घालून उठते. दोन्ही प्रसंगाची काहीच सांगड नाही. आसावरी असंही म्हणाली नाही की मला स्वप्न पडले होते. एडिट करणारा डुलक्या काढत होता बहुतेक Proud

हो ना काही झेपलंच नाही. मध्यरात्री ३ वाजता माहेरी जाऊन काम वगैरे. मग शुभ्रा सोहम ला न भेटताच आले का घरी? आसा तिच्या नव्या घरी येऊन झोपली.

सोम्या ने आतापर्यंत भरपूर पैसे मारलेत. ९ लाख राजेचे. शिवाय आईच्या मंगळसूत्र आणि राजेच्या घड्याळ प्रकरणात मधल्या मध्ये मारलेले. शिवाय आजोबांनी आजीचे दागिने त्याच्या हाती दिले होते १० लाख जमवायला. ते परत घेतलेले बघितले नाहीत. आज लग्नाच्या present पाकीट आणि शुभ्राचा हार यावर डल्ला मारलेला दाखवला. पुढे आईचा मोबाईल आणि पैसे यावर हात मारणार असे वाटते आहे.

एक कळत नाही की हा बाळ्या एवढ्या पैशाचे काय करतो. कोणते व्यसन दिसत नाही. सबंध वेळ मोबाईल वर गेम खेळत बसलेला असतो. आणि त्याच्या सुपर स्मार्ट बायकोला हा असला मनुष्य आहे म्हणून कसे काय कळले नव्हते बरीच वर्षे ओळख असतानाही?

शुभ्राला आसावरीच्या चेहेऱ्याची रेष न रेष ओळखता येते पण नवरा आईचं लग्न लावायला खूष नाही हे तिला ओळखता येत नाही. ती म्हणते त्याला लग्नाच्या कामांचं टेन्शन आलंय म्हणून तो असा दिसतोय. नोकरी करणाऱ्या स्मार्ट शुभ्राकडे इमिनिटेशन ज्वेलरी नाही का, आज काय तर म्हणे दागिनेच नाहीत. त्या दिवशी तर फुकट असल्यासारखे दागिने घेत होते पेडणेकरांकडे. आईचे दागिने लांबवायचा विचार दिसतोय बबड्याचा. राजस्थानला कधी जाणार. काहीतरी चांगलं दाखवा तिकडे, कट कारस्थानं नकोत.

Happy
पण तेजश्री किती छान अभिनय करते..!! नुस्तं डोळ्यांतून बोलते, एक्स्प्रेशन्स दाखविते!
अगदी गोड दिसते!
आसावरीचं मुळुमुळू व गोग्गोड बोलणं जरा अती नाही होते का आता?
लग्न तर केलं ना स्वतःला हवं होतं ते....तेव्हा नाही का डबड्याला एकदाही विचारावसं वाटलं?
-----------------------------------

लग्नानन्तर शुभ्राला आसासारख वागायला लावताहेत का? कशी गुळमुळीत, रडत बोलत होती डबडयाशी. सरळ धडधडीतपणे भाण्डायच ना त्याच्याशी नेकलेसवरुन. दागिने चोरण्याची त्याची हिस्ट्री माहित नाही का हिला?

पण तेजश्री किती छान अभिनय करते..!! नुस्तं डोळ्यांतून बोलते, एक्स्प्रेशन्स दाखविते! >>>>>>> अगदी अगदी. पण तीसुद्दा कधी कधी लाडे लाडे बोलते ते डोक्यात जात.

एक कळत नाही की हा बाळ्या एवढ्या पैशाचे काय करतो. >>>>>> मित्राबरोब गॅम्बलिन्ग करतो अस दाखवल होत ना एका भागात.

राजस्थानला कधी जाणार. काहीतरी चांगलं दाखवा तिकडे, कट कारस्थानं नकोत. >>>>>>>>> पण तिकडे सुद्दा डबडया आहेच.

Pages