दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास?
हे प्रकरण नक्की आहे तरी काय?
विकासाच्या नावाखाली आरे येथे मोठी वृक्षतोड होणार. मुंबईची फुंफ्फुसे निकामी करणार. त्याविरोधात चला पेटीशन साईन करूया म्हणून उत्साहात मी सुद्धा माझे वृक्षप्रेम आणि त्याहून कांकणभर जास्त असे मुंबईप्रेम दाखवत त्याला समर्थन दिले. माझ्यासोबत चार लोकांना जबरदस्ती द्यायला लावले.
पण आता आरेला कारे करत बातमीची दुसरी बाजू काही अभ्यासू लोकं समोर घेऊन येत आहेत. आरे वाचवा म्हणणारयांवर बेगडी पर्यावरणप्रेमीचा शिक्का मारला जात आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी वृक्षतोड किती गरजेची आहे हे सांगत आहेत.
त्यात आज सकाळीच एक बातमी कानावर आली की या विकांताला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबईतील उच्चशिक्षित विकासप्रिय नागरिक मेट्रो समर्थनासाठी जमणार आहेत.
बर्रं बातमीसोबत सोबत एक भावनिक आवाहन होते,
तुमचा एक तास वसई-कल्याण च्या लोकलमधून पडणाऱ्याचा जीव वाचवू शकतो.
एकंदरीत दोन्ही बाजूंनी मला भावनिक करून टाकले आहे.
यात माझे एक सूक्ष्म निरीक्षण असेही आहे की मित्रयादीतले भाजप समर्थक मेट्रो झिंदाबाद टीमकडून उतरले आहेत तर सरकार विरोधक आरे बचाव गटात सामील आहेत.
आणि जेव्हा असे एखाद्या विषयात राजकारण येते तेव्हा काय खरे आणि काय खोटे हे जाणून घेणे माझ्यासाठी अवघड होते.
मायबोलीचर्चेत नेहमीच चांगली आणि योग्य माहीती मिळते हा आजवरचा अनुभव म्हणून मुद्दाम ईथे हे विचारतोय.
माझे वैयक्तिक मत म्हणाल तर आपण विकासाच्या रस्त्याने विनाशाकडे जात आहोत. पण याचा अर्थ असा नाही की मी मेट्रोला वा विकासाला विरोध करतोय. विनाश असा ना तसा आज ना उद्या होणारच आहे. तर त्याआधी विकास उपभोगून घेतलेला काय वाईट
@बोकलत,
@बोकलत,
हेलिपॅड कुटं कुटं बांधायचे? का पॅरॅशूट ने उतरायचे?
२१ ऑक्टोबरच्या आंत, झाडं
२१ ऑक्टोबरच्या आंत, झाडं पाडून हेलिपॅड तयार करू नये म्हणून नविन आंदोलन सुरू होणार तर.
<<< मेट्रो मुळे लोकल मधली
<<< मेट्रो मुळे लोकल मधली गर्दी कमी होण्याबरोबरच दक्षिण मुंबईतल्या मध्यम व ऊच्च मध्यम वर्गीय लोकांनी त्यांच्या चारचाकी गाड्या रस्त्यावर ऊतरवणे कमी केले तर ते सुद्धा चांगलेच आहे. >>>
माफ करा, पण मेट्रो मुळे लोकलमधली गर्दी कमी होण्याचा भाबडा आशावाद बघून हसायला आले. काहीही करा, लोकलमधली गर्दी कमी होणार नाहीये, उलट मेट्रो पण भरभरून वाहाणार आहे, हे लक्षात घ्या.
उपाशी बोका +१
उपाशी बोका +१
मूळ मुद्दा भरमसाठ लोकसंख्येचा व रोज शहरात नव्याने भर टाकणाऱ्या स्थलांतरितांचा आहे. जितक्या जास्त सोई द्याल तितके 'अरे वा बरं आहे , इथेच राहू' म्हणून अधिकाधिक लोक येऊन राहणार!
मेट्रोने प्रदूषण कमी होत असते
मेट्रोने प्रदूषण कमी होत असते तर दिल्लीतील प्रदूषण केव्हाच कमी झाले असते.
>>> मूळ मुद्दा भरमसाठ
>>> मूळ मुद्दा भरमसाठ लोकसंख्येचा व रोज शहरात नव्याने भर टाकणाऱ्या स्थलांतरितांचा आहे. जितक्या जास्त सोई द्याल तितके 'अरे वा बरं आहे , इथेच राहू' म्हणून अधिकाधिक लोक येऊन राहणार! >>>
+ १
मग येऊ दे की.. आणखी झाडे कापू
मग येऊ दे की.. आणखी झाडे कापू.. आणि सर्वांची सोय लाऊ
आधीची झाडे कापायला दिलीत तर आता का नाही हा मुद्दा तेव्हा आणखी स्ट्रॉग झाला असेल
>>>> २१ ऑक्टोबरच्या आंत, झाडं
>>>> २१ ऑक्टोबरच्या आंत, झाडं पाडून हेलिपॅड तयार करू नये म्हणून नविन आंदोलन सुरू होणार तर.
Happy>>>>
@भागवत हाहाहा
धन्यवाद भरत व हायझेनबर्ग.
धन्यवाद भरत व हायझेनबर्ग. यादी व चित्रावरुन खुप सहज माहिती मिळाली.
मुंबईची नसले तरी २ वर्षे सीप्जमधे मालाड वरुन लोकलने जाऊन नोकरी केलीये व गर्दीची भयंकरता रोज अनुभवलीये त्यामुळे याबद्दल खुपच उत्सुकता आहे.
साला, मजाक बना के रख्खा है...
साला, मजाक बना के रख्खा है... > जोकर, डॉलर मोडुन खा
एस पी कॉलेज , पुणे
एस पी कॉलेज , पुणे
मा मोदीजी सभा आहे , म्हणून झाडे कापत आहेत म्हणे
आरेवाले कुठे गेले ?
रोबोटमधला पक्षिराजन यायला
रोबोटमधला पक्षिराजन यायला पाहिजे आणि सगळ्यांना धुतला पाहिजे.
लेटेस्ट न्यूज काय आहे?
लेटेस्ट न्यूज काय आहे? कारशेड झाले का बांधून?
मेट्रो मुळे लोकलमधली गर्दी
मेट्रो मुळे लोकलमधली गर्दी कमी होण्याचा भाबडा आशावाद बघून हसायला आले. काहीही करा, लोकलमधली गर्दी कमी होणार नाहीये, उलट मेट्रो पण भरभरून वाहाणार आहे, हे लक्षात घ्या.>>>>>
बरोबर. रोजच्या रोज लोंढे येऊन आदळताहेत. कामाची तयारी असेल तर मुंबईत कोणी उपाशी झोपत नाही, मुंबई जगवते ही आशा देशभरातील जनतेच्या मनात भरलेली आहे. लोंढे थांबवायला हवेत पण जिथून लोक येतात तिथली परिस्थिती सुधारल्याशिवाय हे शक्य नाही. लोक जीव जगवायला इथं येतात, त्यांचाही नाईलाज आहे. स्मार्ट सिटीबीटी ठीक आहे पण गावे जगवायचे कामही हाती घ्यायला हवे सरकारने. तोवर शहरे मरत राहणार ओझ्याखाली.
(No subject)
आरे करशेड कामावर स्थगिती
आरे करशेड कामावर स्थगिती
आंदोलकांवरील गुन्हे मागे
महाविकासाआघाडी सरकार मध्ये आरेचे भवितव्य बदलेल का?
याचा आता फार मोठा आर्थिक फटका पडेल अशीही एकीकडे बोंबाब्बोंब आहे
हवी तेवढी झाडे तोडून झाली
हवी तेवढी झाडे तोडून झाली आहेत असं न्यायालयाने पुढील झाडतोडीला स्थगिती दिल्यावर सांगण्यात आलं होतं.
तेव्हा कारशेड वर फक्त स्थगिती आणुन काही होणार नाही, तोडलेल्या जंगलाचं पुनर्वसन करणार असतील कारशेड दुसरीकडे हलवून तर गोष्ट वेगळी. तो खरा उद्देश असेल तर स्वागत आहे निर्णयाचं.
याचा आता फार मोठा आर्थिक फटका
याचा आता फार मोठा आर्थिक फटका पडेल अशीही एकीकडे बोंबाब्बोंब आहे
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 3 December, 2019 - 00:55 >>>
म्हणजे आर्थीक फटका पडणार नाही असं तुमचं मत आहे का ?
कारशेड दुसरीकडे हलवून तर
कारशेड दुसरीकडे हलवून तर गोष्ट वेगळी. तो खरा उद्देश असेल तर स्वागत आहे निर्णयाचं.>>>>
ती दुसरीकडे हलवायचे पर्यायही न्यायालयाने तपासून बघून नंतर निर्णय दिलेला असे वर वाचलेले आहे.
स्थगिती नुसती घोषणेपुरती, तिकडे काम सुरू आहे हेही काल परवा वाचले आहे. आणि विरोध जो वृक्षतोडीकरता होता ती तोड आधीच झालेली आहे.
असो, बघू आता काय होतंय ते. आमच्या नव्या मुंबईतील मेट्रोच्या दीर्घ स्थगिती मिळालेली आहे, ती कधी उठणार व काम कधी सुरू होणार देव जाणे.
ती दुसरीकडे हलवायचे पर्यायही
ती दुसरीकडे हलवायचे पर्यायही न्यायालयाने तपासून बघून नंतर निर्णय दिलेला असे वर वाचलेले आहे. >>>
हो, पण त्या निर्णयाचा अर्थ फक्त तिथेच बांधले पाहिजे इतरत्र नाही असा तर नाही ना? स्थगिती जर इतरत्र हलवण्याच्या आणि जंगलाच्या पूर्वसनाच्या उद्देशाने आणली असेल तरच काही अर्थ आहे.
स्थगिती नुसती घोषणेपुरती,
स्थगिती नुसती घोषणेपुरती, तिकडे काम सुरू आहे हेही काल परवा वाचले आहे.
>>>>
काम चालू आहे ते मेट्रोचे की कारशेडचे?
तसेही आरेची आशा लोकांनी आता सोडलीच आहे..
आणि मुख्य म्हणजे आरेच्या बाजूचे पर्यावरणप्रेमी कमी आहेत आणि मेट्रोबाजूचे विकासप्रेमी जास्त आहेत.. त्यामुळे मतपेटीचा विचार करता आरे मरू दे मेट्रो होऊ दे हेच धोरण सरकार अवलंबेल असे वाटते.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/mumbai-news/explain-the-exclusion-of-2-hectares...
हे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादासमोरही आहे.
>>महाराष्ट्रातील राजकारणाला
चला, हे तिकडी सरकार पुन्हा नव्याने डाव मांडणार अशा अनेक प्रकल्पांचा. ज्यांचे पैसे गुंतलेत त्यांचे वाईट दिवस सुरू. जे सत्तेच्या जवळ आहेत व ज्यांना पैसे गुंतवायचे आहेत त्यांचे चांगले दिवस सुरू. मधल्या मध्ये सामान्य लोक, झाडे, रस्ते, यांची अवस्था वाईट होते ते जाऊदेत. गंमत म्हणजे हे सर्व प्रक्ल्प सुरू करण्यात जितके सार्वजनिक व राजकीय आणि सरकारी श्रम, शक्ती, पैसा, बुध्दी, वेळ जे काही खर्ची पडले त्या सर्वावर एका आदेशाने बोळा फिरवायचा. (आली लहर केला कहर!) वैयक्तीक दुस्वास आणि भाजपा वरचा राग या नादात हे असेच सुरू राहिले तर हे सरकार राज्याला शंभर पावले मागे नेऊन पुन्हा दहा पावले पुढे जाण्याचे नाट्यमय अंक सादर करत राहणार. यांचा कॉमन मिनीमन प्रोग्रॅम काय आहे हे आता 'ऊघड' आहे. मग ईकडचे भक्त तिकडच्या भक्तांना त्यामागचे लॉजिक सुनावणार (काय तर मग तुम्ही काय वेगळे केले, वगैरे!), सत्तेतील पब्लिक मलिदा खाणार, ईथे नविन दिल पुकारे बाफ निघणार, मग पुन्हा भक्तमंडळीत हाणामारी ... आज आरे ऊद्या कारे... कुणिही कुणालाही कसलेही ऊत्तर द्यायला जबाबदार नाही. पण लोकशाहीचे सर्व छान व सुरळीत सुरू आहे. आरे स्वताचे काय ते बघून घेईल तेव्हा कारेंनी चिंता करायची गरज नाही.
(आता कुणितरी भक्त लिहीतलचः मग सरदार पुतळा प्रकल्प काय लोक विकासासाठी होता का? त्याचे ऊत्तर नाही असेच आहे. पण म्हणून मेट्रो सारखे आवश्यक प्रकल्प चुलीत घालून मत्स्यालया सारखे अनावश्यक प्रकल्प ऊभे करणे हे त्याचे ऊत्तर असू शकत नाही. तसेच अख्खा लवासा लवादाकडे पडून आहे, त्याची चौकशी आधी करा असेही कुणितरी म्हणेल.. पण हेही ऊत्तर असू शकत नाही.)
उगाच कशाला हातभर लांब
उगाच कशाला हातभर लांब कांगावखोर प्रतिसाद लिहिताय?
फक्त आरे कारशेडचं काम थांबवलंय. मेट्रोशी संबंधित बाकी सगळी कामं सुरू आहेत.
रात्रीत झाडे तोडण्याचा आततायी निर्णय घेणाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी.
>> पण हेही ऊत्तर असू शकत नाही
>> पण हेही ऊत्तर असू शकत नाही.
>>रात्रीत झाडे तोडण्याचा आततायी निर्णय घेणाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी.
लिस्ट मोठी आहे...
विचार न करता शो ऑफसाठी
विचार न करता शो ऑफसाठी आली लहर केला कहर टाइप मोठमोठे प्रोजेक्ट लॉंच करायचे आणि मग ते आतबट्ट्याचे ठरायचे .यापेक्षा योग्य वेळी पुनरावलोकन होतंय, हे बरंय.
भारतातली पहिली म्हणून निवडणुकांच्या तोंडावर लॉंच केलेली रोरो सेवा विकायला काढलीय भारतातल्या आदर्श विकास राज्यात.
कसलं आलय पुनरावलोकन...!
कसलं आलय पुनरावलोकन...! शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, स्मारक आणखिन काय काय बांधू म्हणून सेनेने काहुर माजवलं होतं... त्या प्रकल्पांमूळे कुणाचं भलं होणार होतं? ईथे निव्वळ एकेमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रकार सुरू आहे. केंद्रातून मदत मिळणार नसेल तर केंद्राच्या आशीर्वादाने सुरू केलेया प्रकल्पांना मंजूर झालेल्या निधीला कुलूप ठोकणं एव्हडच सुरू आहे.
आता अचानक महाराष्ट्राच्या (शिवरायांच्या) गड किल्ल्यांबद्दलची कळकळ देखिल जागी होईल.
हे तेच महाशय आहेत ज्यांनी मुलाच्या बालहट्टापाई मुंबई (भायखळा झू) मध्ये पेनग्वीन आणून बसवले आणि एकाच महिन्यात त्यातले एक पेन्ग्वीन मेले देखिल. याने कुणाचे भले झाले हे वेगळे लिहायचे का? आता पेन्गिन गेले आणि सत्तेचे पेन हाती आले.
मातोश्री वरून बाळासाहेबांनी आदेश करायचा आणि शिवसैनीकांनी तो अमलात आणायचा... मग ते काहिही असो. जे अशाच वातावरणात वाढलेले आहेत त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा देखिल नाहीत. सत्तेच्या आसनावर बसून हे शक्य नाही कारण तिथे जाब द्यावा लागतो हे बाळासाहेबांना माहित होते त्यामूळे त्यांनी रिमोट कंट्रोल चा पर्याय पसंत केला. पण तेव्हडे शहाणपण व धूर्तपणा ईतरांनी दाखवायलाच हवा असे नाही.
तेव्हा, भाजपा ला माहाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून फार काही करावेसे लागेल असे दिसत नाहीत... मनमौजी सरकार लवकरच सर्व कुर्हाडी स्वताच्या तीन पायावर मारून घेईल यात शंका नाही. असो.
विचार न करता शो ऑफसाठी आली
विचार न करता शो ऑफसाठी आली लहर केला कहर टाइप मोठमोठे प्रोजेक्ट लॉंच करायचे आणि मग ते आतबट्ट्याचे ठरायचे .
>>>>
बुलेट ट्रेन
थांबवा ती आणि ते पैसे मेट्रोत टाका आरे वाचवा
>>> शिवाजी महाराजांचा भव्य
>>> शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, स्मारक आणखिन काय काय बांधू म्हणून सेनेने काहुर माजवलं होतं... त्या प्रकल्पांमूळे कुणाचं भलं होणार होतं? >>>
महापौर निवासस्थान बळकावून तिथे बाळ ठाकरे स्मारक करणार आहेत. बाळ ठाकरे स्मारक, शिवाजी महाराज स्मारक, आंबेडकर स्मारक या प्रकल्पांवर लाखो कोटी रूपये खर्च होतील व त्यातून जनतेला काहीही फायदा होणार नाही.
चार दिवसांच्या कार्यक्रमासाठी
चार दिवसांच्या कार्यक्रमासाठी योगी सरकार करणार ६३ हजार झाडांची कत्तल – https://www.loksatta.com/desh-videsh-news/yogi-govt-to-cut-down-64000-tr...
हे खरे असेल तर अवघड आहे.
यांना तर रोखणेही अशक्य.
Pages