Submitted by आभा on 4 July, 2019 - 12:39
भारतातुन परत परदेशात घरी जाताना तुम्ही काय काय घेऊन जाता? ह्यात खाद्यपदार्थ, कपडे, औषधे इत्यादी सर्वच गोष्टींबद्दल चर्चा करूयात. हा धागा पहिल्यांदा जाणाऱ्या लोकांना उपयोगी आहेच पण अधिक कालावधीसाठी बाहेर राहिलेल्या लोकांना सुद्धा उपयोगी असेल. शिवाय वर्षभरात आपल्या गावात काही नवीन पदार्थ देखील आले असतील. त्याची सुद्धा इथे माहिती मिळू शकते.
चला लोक्स मग चर्चा करूयात.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सीमंतिनी, मिलियन डॉलर वर्षाला
सीमंतिनी, मिलियन डॉलर वर्षाला कामावणारा माणूस अगदी लॉस अल्टोस हिल्स नाही तरी saratoga/ लॉस gatos ला बरंस घर घेईल की (सिंगल फॅमिली नाही तरी स्टार्टर होम म्हणून टाऊन परवडेल;)) रोज ट्रेसीहुन येण्यापेक्षा! आणि यायचंच असेल तर मॉफेट फील्ड पर्यंत ढगातून येईल…

अर्थात मुद्दा समाजला.
बाकी कामवाल्या नाहीत वर कसली इतकी चर्चा! आणि इकडे कामं नाहीत??? स्नो थ्रो करणे, आणि गवत कापणे ही कंबरेची वाट लावणारी कामं प्रत्येकी सहा महिने केली की कधी एकदा लॉन मोअर आत टाकून स्नो थ्रोवर मध्ये गॅस भरतोय असं होतं.
हल्ली काहीही आणत नाही भारतातून (तरी बॅगा कशा भारतात इतक्या? अस कुजकट लोकं म्हणतात ते सोडा) भारतात गेल्यावर लगेच काही कार्यक्रम असेल तर बाकरवडी, काजूकतली असलं इकडूनच तिकडे न्यावं असा विचार आहे. इकडे 24 तास सगळं मिळतं आणि गाडी चालवता येते.
नातेवाईक आणि जवळच्या माणसांना मिस करतो. त्यांना नेता आलं तर न्यावे. पण त्यांना त्यांची कामं असतात. सो ठेविले अनंते...
आणि बेझोज आणि गेटस रोज डिशवॉशर लावतात. चोर्स केली की काही तरी होतं म्हणे. बेझोज आता दुसरी कडे लावेल डिश वॉशर
राजेश, व्रुत्तीत फरक पडतोच अस
राजेश, व्रुत्तीत फरक पडतोच अस नाही. बरेच पुरुष बायको कडुन अगदी भारताप्रमाणे काम करवून घेताना पाहिले आहे. सरंजामशाही वृत्ती निघणे अवघड आहे आपल्या मेंटॅलिटी मधून.
कामवाली बाई नकोस वाटण ह्याला मुख्य कारण प्रायव्हसीची सवय होण हे आहे माझ्यापुरत विचार करायचा झाला तर. ती काम करतीये ते नको आहे किंवा मी भांडी घासण्याच काम एंजॉय करती आहे अस असण्यापेक्षा मला तीचा वावर घरात नको आहे. त्या ऐवजी भांडी डिश वॉशर मध्ये लावण कंअफरटेबल वाटत. प्रायव्हसी साठी, घरात परक्या माणसाचा वावर कंसिस्टंटली नसावा , मेड वर अवलंबून रहाव लागू नये इत्यादी बरीच कारण . मग थोडा त्रास सहन करण्याची तयारी आहे. कपडे वाळत घालण हे भारतात कटकटीच काम आहे. इथे ड्रायर मुळ ते सोप होतय. धुळ कमी आहे. भारतासारख ,रोज सगळ घर झाडलच पाहिजे अस नाही.
दुसरं म्हणजे भारतापेक्षा किचन मध्ये काम करण सोप आहे. (कमीवेळखावु)इशु इतर कामांचा जास्त वाटतो. जस कि , मुलांना सोडणे, ट्रान्स्पोर्टेशन सोय नसली कि २ तास स्वःता ड्राईव्ह करण, आजारी पडल तर कुणी मदत करायला नसण, बाळ लहान असताना त्याला एक पाच मिनिट घ्यायला घरात दोघांशिवाय कुणी नसणं.
इस्त्री ,लाँड्री,लॉन मो वगैरे (थोडे पैसे झाले, स्थिर स्थावर झाले आणि अॅफॉर्ड करु शकत असाल तर) हायर करता येते. मेड येवुन डीप क्लिनिंग करते.
कंपेअर करण्यात काही अर्थ नाही. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे दोन्हीकडे अंतिम सत्य आहे.
बेझोज आता दुसरी कडे लावेल डिश
बेझोज आता दुसरी कडे लावेल डिश वॉशर >>>
बाय द वे, या बाफचे शीर्षक "भारतात ट्रीप ला आल्यावर परत जाताना" या संदर्भाने आहे हे माहीत नव्हते. त्यामुळे वरची माझी व इतर अनेकांच्या पोस्ट्स गैरलागू आहेत. मला वाटले कोणालातरी पहिल्यांदा परदेशात जाताना काय न्यावे त्याबद्दल माहिती हवी आहे.
आता त्या अर्थाने दर ट्रीपला
आता त्या अर्थाने दर ट्रीपला हे हमखास नेतो.
- मराठी पुस्तके
- कोकम वगैरे
- घरगुती वड्या वगैरे
बाकी फारसे नाही. सुरूवातीच्या ट्रीप्स मधे खजिना आणल्यासारखे वाटे इकडे आल्यावर बॅगा उघडल्या की. आता इतके काही नसते, कारण इथे बरेच मिळते. ते मधे कस्टम वाले "जीरा" का विचारत माहीत नाही. इण्डिया कॅश अॅण्ड कॅरी मधे सहज मिळत असताना. अर्थात परवा एकदा सनीवेलच्या दुकानात गेलो होतो तेव्हा तिथली गर्दी पाहता त्यापेक्षा भारतातून आणणे सोपे वाटेल
एकदा माठही आणला होता. प्रवासात टिकला होता व्यवस्थित. बहुधा कॅरी ऑन मधून पण कोणत्या बॅग मधून आणि कसा आणला ते लक्षात नाही. आणला होता नक्की. अजून आहे टिकलेला. कधी तरी हुक्की आली की धुवून काही दिवस वापरतो. मग तो पुन्हा कोठेतरी कोपच्यात जातो.
सीमा
सीमा
तूमच्या मताशी सहमत .
थोडे अवांतर आहे मी लिहितो आहे ते.
श्रीमंत लोकांच्या घरात प्रत्येक कामाला वेगळे नोकर असतात म्हणजे
मुल सांभाळण्यासाठी maid,जेवण बनवणारे,जेवण वाढणारे ,साफसफाई करणारे ही सर्व नोकर मंडळी २४ तास त्याच घरात राहतात त्यांच्या रूम वेगळ्या असतात .
४ माणसाचे कुटुंब असेल तर नोकर मंडळी ५/६ असतात.
परत ड्रायव्हर, सेक्युरिटी हे वेगळे .
त्या नुसार घराची रचना सुद्धा असते किचन हे पूर्णतः वेगळ्या माळ्यावर असते आणि family room aani bedroom वेगळ्या माळ्यावर
त्या मुळे privacy la कुठेच धोका पोचत नाही .
त्या नंतर घरी शिकवायला येणारे शिक्षक ह्या लोकांचे पण येणे जाणे असते .
म्हणजे कुटुंबातील व्यक्ती व्यतिरिक्त ह्या सर्व लोकांचा घरात वावर असतो .
आणि रोजचाच संबंध असल्या मुळे त्यांची उपस्थिती खटकत नाही .आणि अशी श्रीमंत कुटुंब मुंबई मध्ये खूप आहेत .आणि महत्त्वाचं
ह्या लोकांना लहानपणा पासून ह्या वातावरणा ची सवय असते त्या मुळे नोकर लोकांची उपस्थिती .खटकत नाही.
पण आयुष्याच्या दुसऱ्या टप्यावर जर श्रीमंत झालो तर आपली मानसिक ता वेगळी असल्यामुळे .नोकरांच्या उपस्थिती चा त्रास होतो
एकदा माठही आणला होता.
एकदा माठही आणला होता. प्रवासात टिकला होता व्यवस्थित.
>>>
या वाक्याच्या वरती जीरा, इंदिया कॅश अँड कॅरी वगैरे संदर्भ असल्याने मी माठ (लाल) भाजी आणली असावी या अंदाजाने वाचले. पुढे "अजून आहे टिकलेला. कधी तरी हुक्की आली की धुवून काही दिवस वापरतो. " हे वाचून भंजाळलो. माठाची गड्डी काय फक्त वास घेऊन परत गुंडाळून ठेवता की काय असे वाटले
एकदा माठही आणला होता. अजून
एकदा माठही आणला होता. अजून आहे टिकलेला. >> अशी वाक्ये वाचुन खाली सही सौ. फारेंड आहे की काय म्हणुन बघितले. न्हवती.
फा ला दिव्याची गरज नाही. 
आज काही खरं नाही फाचं.
टण्या - हो ते आधी लिहीले
टण्या -
हो ते आधी लिहीले होते आणि मग वरती बाकीचे अॅड केले त्यामुळे झाले असावे
एकदा माठही आणला होता. अजून आहे टिकलेला. >> अशी वाक्ये वाचुन खाली सही सौ. फारेंड आहे की काय म्हणुन बघितले. >>>
सीमंतिनी, मिलियन डॉलर वर्षाला
सीमंतिनी, मिलियन डॉलर वर्षाला कामावणारा माणूस अगदी लॉस अल्टोस हिल्स नाही तरी saratoga/ लॉस gatos ला बरंस घर घेईल की (सिंगल फॅमिली नाही तरी स्टार्टर होम म्हणून टाऊन परवडेल;)) रोज ट्रेसीहुन येण्यापेक्षा! आणि यायचंच असेल तर मॉफेट फील्ड पर्यंत ढगातून येईल… Proud >> वेळ, पैसा, आणि आवड ह्या त्रैराशिकाची उदाहरणं देत होते.
ट्रेसी मध्ये महाल घेता येत असेल तर कम्युट कमी करणारं टाऊन होम घ्या... अशाने दमलेल्या बाबाची कहाणी काय चातुर्मासात वाचायला ठेवायची का

. " हे वाचून भंजाळलो. >>
. " हे वाचून भंजाळलो. >> टण्याचा माठ झाला असा वाक्प्रचार रुढ होईल हां अशाने
एकदा माठही आणला होता. अजून
एकदा माठही आणला होता. अजून आहे टिकलेला. >>
मला वाटल हे नोकराला रागारागाने उद्देशून लिहिलय. उलट्या पोस्टी वाचल्यामुळ अस होतं. LOL
माठाची ऐने अकबरी होतेय की काय
माठाची ऐने अकबरी होतेय की काय आता
आता लगेज मधून माठ कसा आणावा
आता लगेज मधून माठ कसा आणावा यावर धागा निघू शकतो
कॅरीऑन म्हणून आणायचा. गिटार
मला वाटल हे नोकराला
मला वाटल हे नोकराला रागारागाने उद्देशून लिहिलय. >>>
बाय द वे, इथे इस्त्र्या करू तेव्हा करू. पण भारतातून येताना मात्र इस्त्री लागणारे जितके कपडे बॅगेत टाकायचे आहेत तितक्या सगळ्यांना तेथे इस्त्री करून घेतो. तेवढेच एकदा कष्ट कमी
मग नंतर कधीतरी तो इस्त्री केलेला शर्ट उलगडला की इस्त्रीवाल्याने त्यात खुपसलेला वर्तमानपत्राचा तुकडा बाहेर पडून चालू वातावरणाशी कसलाही संबंध नसलेली भारतातील एखादी रॅण्डम बातमी किंवा लेख आपल्यासमोर अचानक येतो. इंदापूर भागात पेरणी सुरू वगैरे.
हो. इस्त्रीकेलेले कपडे मी पण
हो. इस्त्रीकेलेले कपडे मी पण घेऊन जातो.
>>इंदापूर भागात पेरणी सुरू वगैरे. >>
"इंदापूर भागात पेरणी सुरू
"इंदापूर भागात पेरणी सुरू वगैरे." -
एकदा माठही आणला होता. अजून
एकदा माठही आणला होता. अजून आहे टिकलेला. >> हे अशक्य आहे.
इंदापूर भागात पेरणी सुरु >>> सही आहे. एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. तो पेपर चा तुकडा वाचल्याशिवाय फेकवत नाही.
जपानमधलं स्वावलंबन ते सिंगापुर मध्ये मेड मिळणं दोन्ही अनुभवते आहे. चॅलेन्जस आणि फायदे तोटे दोन्ही सिस्टिम मध्ये आहेतच परंतु मुलं लहान असताना मदत मिळाली तर तो वेळ कदाचित अधिक चांगला सत्कारणी लागला असता असा वाटतंय. अमेरिकेचा स्वानुभव नाही परंतु प्रत्येक देशाप्रमाणे हळुहळू मोल्ड व्हावे हे उत्तम.
सिंगापुरात शाळेत मुलांना
सिंगापुरात शाळेत मुलांना मारतात का हो? सिंगापूर म्हटलं की कायम तेच डोळ्यासमोर येतं.
>>एकदा माठही आणला होता.
>>एकदा माठही आणला होता. प्रवासात टिकला होता व्यवस्थित. <<
आय थिंक धिस टॉप्स अमंग्स्ट दि बिझार आय्टम्स ब्रॉट इनटु मेनलँड. अमेरिकन लोकांना माठ हा प्रकार अजिबात माहित नाहि. झिरो एनर्जी कंझम्शनच्या या उपकरणाचं तेंव्हाच पेटंट घेतलं असतंत तर आज मल्टाय-मिल्यनर झाला असता...
सिंगापुरात शाळेत मुलांना
सिंगापुरात शाळेत मुलांना मारतात का हो? सिंगापूर म्हटलं की कायम तेच डोळ्यासमोर येतं. >>> असं काही होत नाही.
अमितव असं काहीही होत नाही हो.
अमितव असं काहीही होत नाही हो..माझ्या दोन्ही मुली लोकल स्कुल मध्येच आहेत .अभ्यास खूप असतो पण टीचर खुप सपोर्ट करतात..
माठ>>
माठ>>
भारतातुन यताना अजुनही मी आईच्या हातची था.भाजणी,च्कली भाजणी, नाचणिच पिठ, नागलिचे पापड, साबुदाण्याच्या चकल्या, हातशेवया, दगडु तेली मसाला (पुर्वी आइ करुन द्यायची मसाला), बुध्याची आन्बा बर्फी, पेढे अस सगळ आणते
एकतर उन्हाळी पदार्थ बाइ लावुन किलोकिलोने बनतात त्यात माझा वाटा आधिच वेगळा काढुन पॅक असतो नाही म्हणायला स्कोप आनी कारण दोन्ही नसत.
माठ इंदापूर भागात पेरणी सुरू
माठ

इंदापूर भागात पेरणी सुरू
फारेण्डे माठ घडविला.
फारेण्डे माठ घडविला.

यावेळेस आम्ही ते परत आणल. 

सौ. फारेण्डे माठ नेला
आमच्या चिरंजिवांनी गेल्या वेळेस पोळ्या बनवायच इलेक्ट्रीक मशीन नेल होत.
आता त्यांच्या सिव्हीवर स्पयंपांक येतो अशी नोंद आहे, याची जाणकारांनी नोंद घ्यावी.
अरे बापरे विषय काय आणि चर्चा
अरे बापरे विषय काय आणि चर्चा काय.
माठ आणला वाचून स्पिचलेस झाले. कुठल्या काळातील गोष्ट आहे? का साबांनी अहेर दिलेला पहिलीच अमेरीका वारी म्हणून नाकारता आला नाही? की उगीच एक तुळशी बागेतील आठवण असे कायच्या काय प्र श्ण पडले आणि लिहूनच टाकले.
बा की अॅपल आणि ऑरेंजेस तुलना
बा की अॅपल आणि ऑरेंजेस तुलना वाचून सलाम.
ते पण काम अमेरीकेत ज्यास्त का भारतात. आसो.
माठ .... इंदापूर भागात पेरणी
माठ
.... इंदापूर भागात पेरणी सुरू
...
फारएण्ड, दंडवत आहे!
माठ
माठ


अशी वाक्ये वाचुन खाली सही सौ. फारेंड आहे की काय म्हणुन बघितले>>
इंदापूर भागात पेरणी सुरू >>
पहिले मुंबई वरून गिरणी कामगार
पहिले मुंबई वरून गिरणी कामगार गावी जायचे तेव्हा मसाले,खोबरं,ती विशिष्ट मिठाई,आणि अगदी साबण पासून सर्व घेवून जायचे काळ बदलला गाव बदली आता मुंबई कर गावी जाताना फक्त एक छोटी बॅग घेवून जातो .
सातारा कडची लोक मुंबई ला येताना आता सुधा गहू,ज्वारी,घेवढ्याची डाळ,आणि सर्व सामान घेवून मुंबई ला येतो
तसेच भारता मधून अमेरिका किंवा कोणत्याही देशात जाताना काय घेवून जावे हे काळानुसार बदलत गेले आहे फक्त लोणची,पापड,मसाला हे बदललं नाही .
आता २१ वाव्या शतकात सर्व देशात सर्व वस्तू उपलब्ध होवू शकतात .
तसेच बिहारी आणि यूपी वाले मुंबई वरून गावी जाताना रिकामे रंगाचे डब्बे,ड्रम,झाडून सर्व saman असे मिळून १०० kg cha बोजा तरी घेवून जातात .
कारण त्यांच्या कडे वस्तूंचा तुडवडा आहे .
अमेरिका हा एक प्रगत देश आहे तिथे कोणत्या च वस्तूची कमतरता नाही त्या मुळे भारता मधून काय घेवून जाणार .
बिहारी ,यूपी वाले गावा वरून येताना मोकळे येतात तसेच आपण भारतीयांनी अमेरिकेला जाताना मोकळेच जावे.
पण अमेरिकी मधून भारतात येताना भरपूर सामान घेवून यावे .
नुसतंच घेणे नको तर आपण देशाचे देणे पण लागतो ह्याची जाणीव असावी
Pages