Submitted by आभा on 4 July, 2019 - 12:39
भारतातुन परत परदेशात घरी जाताना तुम्ही काय काय घेऊन जाता? ह्यात खाद्यपदार्थ, कपडे, औषधे इत्यादी सर्वच गोष्टींबद्दल चर्चा करूयात. हा धागा पहिल्यांदा जाणाऱ्या लोकांना उपयोगी आहेच पण अधिक कालावधीसाठी बाहेर राहिलेल्या लोकांना सुद्धा उपयोगी असेल. शिवाय वर्षभरात आपल्या गावात काही नवीन पदार्थ देखील आले असतील. त्याची सुद्धा इथे माहिती मिळू शकते.
चला लोक्स मग चर्चा करूयात.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाव घालता येत नाही म्हणून मी
नाव घालता येत नाही म्हणून मी भांड्याच्या बुडाला नेलपॉलिश /ऑइल पेंट चा एक टिकलीएवढा ठिपका लावलेला पाहिलंय .. काही ठिकाणी तर २ रंगांचं कॉम्बिनेशन हि पाहिलंय
मात्र चारही चेकईन बॅगमधे फक्त स्टीलची ही सगळी भांडी होती. थोडे नवे कपडे. बास. एक चकली पण आणु शकले नाही तेव्हा>> बाsss परे !! धन्यच
अति अवांतर : किल्लीच्या जुडग्यात खूप किल्ल्या एकत्र असतात त्यातून किल्ली पटकन सापडायला सुद्धा असा नेलपेंट चा ठिपका लावतात
किल्लीच्या जुडग्यात खूप
किल्लीच्या जुडग्यात खूप किल्ल्या एकत्र असतात त्यातून किल्ली पटकन सापडायला सुद्धा असा नेलपेंट चा ठिपका लावतात>>>>>>> म्हणूनच मी रोज टिकली लावते
मायबोली वर एकच किल्ली आहे
उत्तम विनोदबुद्दी किल्लीताई
उत्तम विनोदबुद्दी किल्लीताई
परदेशात जाणे होईल कि नाही ते माहित नाही पण प्रतिसादांची मजा येते.
किल्लीतै
किल्लीतै

नाव घालता येत नाही म्हणून मी
नाव घालता येत नाही म्हणून मी भांड्याच्या बुडाला नेलपॉलिश
हे मी भारतात सुधा बघितलं आहे जिथे कामगार एकत्र राहतात तिथे नावाचं आद्याक्षरे nail polish नी भांड्याच्या तळाला umtavayachi ओळखण्या साठी .
जे कधीच परदेशात गेले नाहीत.
जे कधीच परदेशात गेले नाहीत. साधा महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात गेलेले नाहीत. असे लोक या धाग्यावर लुडबुड करत आहेत हे अजिबात आवडलं नाही. हेच सांगायचे होते.
गोर्या लोकांचे बूट चाटणार नि
गोर्या लोकांचे बूट चाटणार नि आपल्या लोकांवर हडेलहप्पी करणार!
:- कशी चव लागते बुटांची? खारट, आंबट, तुरट, तिखट का? बहुतेक तुम्हाला गोड लागत असेल. हो ना?
जे कधीच परदेशात गेले नाहीत.
जे कधीच परदेशात गेले नाहीत. साधा महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात गेलेले नाहीत. असे लोक या धाग्यावर लुडबुड करत आहेत हे अजिबात आवडलं नाही. हेच सांगायचे होते.>> असे काही नाही, कोणीही लिहू शकते. उलट सगळ्यांनी लिहावे. आपण राजकारण, क्रिकेट बद्दल हिरीरीने लिहीतो तेव्हा थोडीच विचारतो तुम्ही राजकारणी आहात का किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहात का.
पण विषयाला धरून लिहिण्याचे जरूर करावे.
धागा वाचतेय. पण मी भारतातुन
धागा वाचतेय. पण मी भारतातुन बाहेर कुठेच गेले नाहीये त्यामुळे काही प्रतिसाद देत नव्हते.
पण माठ, खलबत्ता, मग तुम्हाला दाखवते कसे ट्रीट करतात ते हे प्रतिसाद अशक्य भारी आहेत.
राजेश१८८ नवीन अवतारकार्य आहे का?
सस्मितताई,मी पण नाही गेले
सस्मितताई,मी पण नाही गेले अजुन. पण सगळ्यांचे अनुभव भारीएत.
माठ कसा नेला तिकडे? ते अजुनही कळालेलं नाहीये.
Teleportation केले असेल
Teleportation केले असेल
हां का ना का
त्यांच्याकड़े टेस्ला टेक्नोलॉजी आहे नं
कोण काय नेतं तर कोण काय नेतं.
कोण काय नेतं तर कोण काय नेतं... परदेशी जाताना आम्ही तर बुवा काळा पैसा नेतो..!
माणूस जेव्हा एका प्रदेशातून
माणूस जेव्हा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जातो (ह्यात देशा अंतर्गत आणि देशा बाहेर असा फरक नसतो)तेव्हा काय सामान घेवून जातो हे तो जिथे चालला आहे त्यावर अवलंबून आहे .
किंवा त्या व्यक्तीत स्वतः मध्ये बदल करण्याची(खानपान,
पोशाख) किती मानसिक तयारी आहे ह्या वर अवलंबून आहे .
काही लोक नवीन ठिकाणी लगेच मिसळून जातात आणि तिथे उपलब्ध असलेलं अन्न पदार्थ त्याला परके वाटत नाही पण काही लोक आयुष्य गेले तरी बदलत नाहीत .
त्या मुळे प्रत्येकाची सामान काय घेवून जायचं ह्याची गरज बदलते.
आणि एक निरीक्षण स्त्रिया पटकन स्वतः chya राहणीमान आणि खाण्याच्या सवयीत बदल करू शकतात पण पुरुष असा बदल पटकन स्वीकारत नाही (ह्या बाबतीत पण मागेच)
>>काही लोक नवीन ठिकाणी लगेच
>>काही लोक नवीन ठिकाणी लगेच मिसळून जातात आणि तिथे उपलब्ध असलेलं अन्न पदार्थ त्याला परके वाटत नाही पण काही लोक आयुष्य गेले तरी बदलत नाहीत .<<
संपुर्ण पोस्टला अनुमोदन, विशेषतः या वरच्या कामेंटला फक्त अन्नपदार्थां बरोबर क्ल्चर, लाइफस्टाइल हे अॅड करा...
पूर्ण अनुमोदन Rajesh188 ..
पूर्ण अनुमोदन Rajesh188 .. एकदम पते की बात बोललात तुम्ही.
आणि एक निरीक्षण स्त्रिया पटकन स्वतः chya राहणीमान आणि खाण्याच्या सवयीत बदल करू शकतात पण पुरुष असा बदल पटकन स्वीकारत नाही (ह्या बाबतीत पण मागेच) >> हे काही पटले नाही बुवा पण... पटले नाही म्हणण्या पेक्षा पटवून घेता आले नाही. तुमच्या निरिक्षणाची काही ऊदाहरणे देता का प्लीज?
आणि एक निरीक्षण स्त्रिया पटकन
आणि एक निरीक्षण स्त्रिया पटकन स्वतः chya राहणीमान आणि खाण्याच्या सवयीत बदल करू शकतात पण पुरुष असा बदल पटकन स्वीकारत नाही (ह्या बाबतीत पण मागेच) >> नाही पटलं. आमच्या घरात अगदी उलट परिस्थिती आहे. मला वाटत हे बहुतांशी स्त्रिया नोकरी करतात की नाही या वर अवलंबुन आहे. नोकरी निमत्ताने घराबाहेर पडल्यावर सगळ्यांना बदल करावेच लागतात मग ते स्वदेशात असो किवा परदेशात..
तामिळनाडू ही पार्श्वभूमी
तामिळनाडू ही पार्श्वभूमी असलेले जोडपं जेव्हा अमेरिकेत येवून राहतात आणि दोघेही नोकरी करणारे आहेत असे समजा .
South Indian लोकांचा भाषा बोलण्याचा जो हेल असतो तो स्त्रिया न पेक्षा पुरुषात जास्त दिसेल .
मला वाटतं मी चुकत नसेन
बेगानी शादी में अब्दुल्ला
बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना.
चीनमध्ये दुधाची चव वेगळी लागत
चीनमध्ये दुधाची चव वेगळी लागत होती त्यामुळे इथूनच readymix चहा पावडर बरीच घेऊन जावी लागली. शिवाय वर लिहिल्याप्रमाणे पिठं, वड्या, पॅराशूट कोकोनट आॅईल, आणि बर्रेच टिकाऊ खाद्यपदार्थ नेले.
भाषेचा प्रचंड प्रश्न असल्याने औषधं तर बारीक आजारांचीसुद्धा मस्ट.
तामिळनाडू ही पार्श्वभूमी
तामिळनाडू ही पार्श्वभूमी असलेले जोडपं जेव्हा अमेरिकेत येवून राहतात आणि दोघेही नोकरी करणारे आहेत असे समजा .
South Indian लोकांचा भाषा बोलण्याचा जो हेल असतो तो स्त्रिया न पेक्षा पुरुषात जास्त दिसेल .
मला वाटतं मी चुकत नसेन >> मला वाटतं तुम्ही चुकता आहात.मातृभाषेचा हेल न काढता परकीय भाषा बोलणे हे लँग्वेज स्कील झाले. त्यात स्री पुरूष असा काही फरक नाही.
अशी पुरूषांच्या सोयीची अॅनेक्डोटल ऊदाहरणे तर किती तरी देता येतील.
ऊदा. भारतीय पुरूष बीचवर किंवा स्विमिंग पूलमध्ये परकीयांसारखेच शॉर्ट्सवर पाण्यात ऊतरतात पण स्त्रिया बिकिनीत ऊतरत नाही मग त्याला तुम्ही काय म्हणणार?
तामिळनाडू ही पार्श्वभूमी
तामिळनाडू ही पार्श्वभूमी असलेले जोडपं
>>>
म्हणजे आंध्रप्रदेश किंवा कर्नाटकातले का?
मला जपानी आणि सिंगापुरियन
मला जपानी आणि सिंगापुरियन पदार्थ खुप आवडतात पण तरीही मी फक्त तेच खाऊन दिवसेंदिवस राहू शकत नाही. आणि हेच जपानी माणसाला रोज वरणभात खा म्हटलं तर तो वेडा होईल. सो जैसा देस वैसा भेस हे फक्त भेस पुरतं ठीक आहे जेवणावर नको.
क्या बात हाब , पॉईंट बरोबर
क्या बात हाब , पॉईंट बरोबर पकडलाय तुम्ही.
एक त्रिकालाबाधीत सत्य कस्काय
एक चिरकाल सत्य कस्काय विसरलात बुवा.
परदेशी मिळत असूनही, पुरूष बायको घेऊन जातात तर महिला नवरा घेऊन जातात हे माझे निरिक्षण आहे.फार कमी अपवाद. मग देश कोणताही असो आणि देशी व्यक्ती कुठलीही असो.


पण आजकाल दिवसेंदिवस ही चीज मिळवणे आणि नेणे कठीण होत चाललीय असे दिसते.
असो. तुमचा अनुभव काय.
माहीत नव्हतं हा धागा एव्हढा
माहीत नव्हतं हा धागा एव्हढा इंटरेस्टींग असेल ते...
भारीये सगळेच
राजेश ८८ यांनी बी वेगवेगळे मुद्दे मांडलेत इथे. नंतर लक्ष वेधून घेण्यात ते बी यशस्वी झाले आहेत. त्यांचे बी अभिनंदन !
परदेशात परत जाताना म्हणजे कोणता परदेश ? अमेरिकेचं फॉरेन की थायलंड, बांग्लादेश, नायजेरियाचं फॉरेन ?
त्याप्रमाणे सुचवता येईल सहज.
(थायलंडला भारतीय वस्तू सग़ळ्याच मिळतात. नका नेऊ कुणी)
मला फॉरेनच्या परदेशात असताना
मला फॉरेनच्या परदेशात असताना बाहेरून आल्यावर उंब-याबाहेर हातपाय धुवावेत, मगच घरात प्रवेश करावा असे नेहमी वाटत असे. पण त्यासाठी रांजण हवा, रांजणाला कोंदण हवे दगडमातीचे. टमरेल हवे. या गोष्टी काही काही फॉरेनच्या परदेशात मिळत नाहीत. तसेच दारात तुळशीवृंदावन हवे. त्याला राउंड राऊंड करावे.
मग गोठ्यात जाऊन गायी म्हशीची धार काढावी. ती चरवीत घेऊन चरवी घरात न्यावी. मुलांना धारोष्ण दूध द्यावे असे आजही वाटते. पण आज मी भारतात आहे. त्यामुळे ते स्वप्न पूर्ण होणार आहे.
पुन्हा फॉरेनच्या परदेशात जाणे झाले तर जहाजाने गायी म्हशी, टमरेल, दगडमाती, चुना, रांजण, तुळशीवृंदावन, गोठा हे सर्व पाठवायचा विचार आहे.
थॅनोस तुम्ही लालुप्रसाद यांचे
थॅनोस तुम्ही लालुप्रसाद यांचे नातेवाईक आहात काय?
इथे आमच्या ओळखीची एक आहे ती
इथे आमच्या ओळखीची एक आहे ती दरवर्षी भारतातून येताना एका टप्पर च्या डब्यात दही आणते , विरजण लावण्यासाठी(जरी दूध आणि दुधाचे पदार्थ आणण्यास बंदी आहे तरीही ) .. कारण इथल्या विकतच्या दह्याचं घरी विरजण लागत नाही (शेतकरी मार्केट मधून आणलेल्या दह्याचं लागतं .. ).. हे एकवेळ ठीक समजू शकतो .. एकीने घरात केर काढायची केरसुणी दुमडून आणलेली
अमेरिकेत बऱ्याच भारतीय
अमेरिकेत बऱ्याच भारतीय पदार्थावर बंदी आहे ना?
Exa .तूप etc
भारतातून येताना एका टप्पर
भारतातून येताना एका टप्पर च्या डब्यात दही आणते , >>>>>>टपर आणि दही! २-३ वेळेला नवर्याने ऑफिसमधे टपरमधून दही नेले होते.टेबलवर काढून ठेवल्यानंतर १-२ तासांनी झाकण आपोआप उडाले.नशीब बॅगमधे असताना काही घोटाळा झाला नाही.तेव्हापासून कधीच टपरमधून दही नेले नाही.
Pages